किचन टिप्स मराठी Kitchen Tips in Marathi

kitchen tips in marathi – kitchen cleaning tips in marathi किचन टिप्स मराठी आपण पाहतो कि स्त्रिया सतत स्वयंपाक घरामध्ये काम करत असतात आणि काही वेळा त्यांचे काम हे खूप वेळ संपत नाही म्हणून अशा स्त्रियांनी स्वयंपाक घरामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स वापरून काम केले तर त्यांचे काम हे लवकर आणि चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते. सध्या स्त्रियांची सकाळी खूप गडबड असते म्हणजेच त्यांना मुलांचा डब्बा बनवायचा असतो तसेच घरातल्या लोकांच्या साठी नाश्ता बनवायचा असतो आणि त्यामध्ये जर त्या नोकरी करत असल्या तर त्यांना घरातील सर्व कामे आवरून कामाला जावे लागते म्हणून त्या आपली कामे किंवा स्वयंपाक घरातील कामे पटकन कशी होतील ह्या साठी सतत प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी काही किचन टिप्स उपयोगी पडू शकतात.

तसेच काही वेळा कोणताही पदार्थ बनवताना तो बिघडतो जसे कि कोणत्या तरी पदार्थामध्ये जास्त प्रमाणात मीठ होते, काही वेळा अंड्याचे साल निघत नाही, कोणताही पराठा लाटताना त्याचे सारण बाहेर येते, पोळ्या लाटताना त्या पोळ्या पोळपाटला चिकटतात अश्या प्रकारे किचन मध्ये अनेक प्रकारच्या अडाणी येतात त्यावेळी स्त्रिया त्रस्त होतात.

परंतु त्रस्त होण्याचे काही कारण नाही कारण आपण किचन मध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपली किचन मधील कामे देखील सोपी करू शकतो. चला तर आता आपण या लेखामध्ये किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रिक्स आणि टिप्स काय काय असतात ते पाहूयात.

kitchen tips in marathi
kitchen tips in marathi

किचन टिप्स मराठी – Kitchen Tips in Marathi

किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या टीप – Tips for Kitchen in Marathi

किचन मध्ये अशी अनेक कामे असतात आणि ती कामे करण्यासाठी खूप वेळ देखील जातो तसेच काही पदार्थ देखील करताना ते बिघातात किंवा ते व्यवस्थित होत नाही अश्या अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत जर तुम्ही काही किचन टिप्स वापरल्या तर ते तुमच्यासाठी चांगलेच आहे म्हणून खाली आपण किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या टिप्स पाहणार आहोत.

 • काही वेळा स्त्रियांना अडचण येते कि त्यांना घरामध्ये दही लावायचे असते परंतु त्यांच्याकडे दही नसते त्यावेळी दही लावण्यासाठी लिंबूचा वापर केला जाऊ शकतो. १ ग्लास कोमट दुधामध्ये १ चमचा लिंबू रस घालून ते चांगले मिक्स करा आणि ते १५ ते २० तास झाकून ठेवा. चांगले घट्ट दही लागेल.
 • काही वेळा अंडी गरम असली आणि आपल्याला लगेच साल काढायची असेल तर त्या गरम अंड्यांची साल लगेच निघत नाही त्यावेळी तुम्ही अनादी गरम पाण्यामध्ये टाका आणि मग साल काढा यामुळे पटकन साल निघण्यास मदत होते.
 • आपण ज्यावेळ अंडी उकडत असतो त्यावेळी आपल्याला असे दिसून येते कि अंडी उकडताना ती पाण्यामध्ये फुटतात. त्यावेळी तुम्हाला अंडी फुटू नये म्हणून पाण्यामध्ये मीठ घाला. पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे अंडी पाण्यामध्ये उकडताना फुटणार नाहीत.
 • स्त्रियांना अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवी अशी वाटत असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही तर कुरकुरीत होईल.
 • काही स्त्रिया कणिक मळताना त्यामध्ये पूर्णपणे पाणी घालून कणिक मळतात परंतु जर त्यामध्ये अर्धे पाणी आणि दुध घालून कणिक मळली तर आपल्या पोळ्या मऊ होतात आणि त्या ताज्या राहण्यास मदत होते.
 • कारले हे कडू असते हे सर्वाना माहित आहे परंतु जर आपल्याला कारल्याचा कडवट पणा कमी करायचा असल्यास कारले चिरून त्याला कमीत कमी एक तासासाठी तरी मीठ लाऊन घ्या आणि ते एक तास तसेच ठेवा आणि मग त्याला पाणी सुटेल ते पाणी पिळून काढा. पाणी पिळून काढल्यानंतर त्यामधील कडवट पणा कमी होईल आणि मग ते पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
 • आपण अंड्याची बुरजी बनवतो त्यावेळी ती सुट्टी बनवण्यासाठी आपल्याला खूप हलवावे लागते आणि जर तुम्हाला ते लगेच सुट्टे बनवायचे असेल तर त्यामध्ये एक छोटा चमचा दुध घाला आणि आणि मग ते मिश्रण हलवा ते लगेच सुट्टे होईल.
 • असे अनेकदा होते कि कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि आपण पाणी येवू नये म्हणून अनेक प्रयत्न करतो पण पाणी येणे कमी होते नाही. जर आपण कांदा चिरताना कांद्याची साल आपल्या डोक्यावर ठेवली तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे कमी होऊ शकते.
 • काही स्त्रियांना किंवा मुलींना भात शिजवताना त्यामध्ये किती पाणी घालायचे ते कळत नाही त्यावेळी तुम्ही त्यामध्ये त्यामध्ये पाणी मोजून घालू शकता त्यामुळे भात चांगल्या प्रकारे शिजतो. भात शिजवताना एक वाटी तांदळा मध्ये बरोबर २ वाटी पाणी घालावे.
 • काही वेळा स्त्रिया पुरणाच्या पोळ्या बनवताना त्या मोडतात किंवा पोळपाटाला चिकटतात त्यावेळी तुम्ही पुरण आणि कानी एकसारखी बनवून घेतली तर पोळ्या चांगल्या लाटता येतात किंवा त्या चिकटत नाहीत.
 • आपण काही वेळा उपवासाला शाबुची खिचडी खातो आणि शाबु बनवण्यासाठी आपल्याला शाबु हि रात्री गार पाण्यामध्ये भिजवून ठेवावी लागते पण आपण काही वेळा शाबु रात्री भिजवून ठेवण्यास विसरतो त्यावेळी आपण शाबु सकाळी कोमट पाण्यामध्ये २ तास भिजवली तर ती चांगली भिजू शकते.
 • दही लावाताना जर आपण ते स्टीलच्या भांड्यामध्ये लावण्या ऐवजी मातीच्या मडक्यामध्ये लावले तर ते दही घट्ट बनते कारण त्यामधी पाणी मडक्यामध्ये शोषले जाते आणि दह्याची चव देखील छान लागते.
 • काही वेळा स्त्रियांची समस्या अशी असते कि बटाटे किती वेळपर्यंत शिजवले तरी ते शिजत नाहीत आणि हे न शिजण्याचे कारण देखील तसेच आहे कि बटाटे शिजवण्यासाठी कधीच अखंड टाकू नयेत तर ते अर्धे कट करून टाकावेत त्यामुळे बटाटे चांगले शिजतात आणि लवकर देखील शिजतात आणि त्यामुळे इंधन बचत देखील होते.
 • केंव्हाही भात हा कुकर मधेच करावा कारण भांड्यामध्ये भात शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याला सतत बघावे लागते परंतु कुकर मध्ये केलेला भात हा लवकर शिजतो आणि आपला वेळ देखील वाचते आणि इंधन देखील वाचते.
 • वांग्याचे भरीत करताना काही स्त्रिया ते वांगे तसेच भाजतात परंतु जर वांगे भाजताना त्याला जागोजागी होल पाडले आणि त्याला तेल लावले आणि भाजले कि तर ते चांगले आतमध्ये देखील भाजण्यास मदत होते तसेच लवकर भाजते आणि हे भाजलेले वांगे एका भांड्यामध्ये लगेच प्लेट झाकून ठेवा त्यामुळे त्याची साल देखील अलगद निघण्यास मदत होते.
 • दुध आटवताना काही वेळा दुध वरती येण्याची शक्यता असते आणि जर तुम्हाला दुध वर येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही त्या दुधा मध्ये छोटीशी वाटी टाका आणि मग बसुडी बनवा जर तुमचे काही वेळासाठी त्या दुधाकडे लक्ष नसेल तरी देखील दुध वरती येणार नाही तसेच दुध जसे घट्ट होयील तसे भांड्याला चिकटते ते चीकटणार नाही.

आम्ही दिलेल्या kitchen tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर किचन टिप्स मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tips for kitchen in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि kitchen cleaning tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये easy kitchen tips in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!