Marleshwar Temple Information in Marathi मार्लेश्वर देवस्थान आजचा ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्रातील अतिप्राचीन शिव मंदिराची माहिती घेणार आहोत. असे शिवमंदिर जे डोंगरांच्या मध्ये सह्याद्रीच्या रांगेला चिटकून आहे. हे शिवमंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. उंच उंच डोंगर रांगा, बाजूला शुभ्र पांढरा धबधबा, सोबत नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळीने संपूर्ण असलेलं हे मंदिर. महाराष्ट्रातील पुराणिक कथांनुसार हे मंदिर अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मार्लेश्वर देवस्थान मारळ या गावाजवळ आहे माराळचा देव म्हणजेच मारल आणि ईश्वर असे मिळून मारलेश्वर. हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर आहे. आणि शिखरावर जाण्यासाठी ४०० पायर्या चढून जावे लागते.

मार्लेश्वर मंदिर माहिती – Marleshwar Temple Information in Marathi
मार्लेश्वर मंदिर | माहिती |
मंदिराचे नाव | मार्लेश्वर मंदिर |
उत्सव, यात्रा | मकरसंक्रांती आणि महाशिवरात्रि |
मंदिर कोठे आहे | महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे |
मंदिर स्थापना कोणी केली? | भगवान परशुराम |
पाहण्यासारखी ठिकाणे | धारलेश्वर धबधबा, रत्नदुर्ग किल्ला, श्री भागेश्वर मंदिर, रत्नागिरी येथील मत्स्यालय, पांढरा व काळा वाळूचे समुद्रकिनारे, दीपस्तंभ, भगवती |
मंदिर वास्तुकला:
मार्लेश्वर हे अतिशय रमणीय व नैसर्गिक प्रकृतीने भरलेल सोबतच सह्याद्री पर्वतांची रांग. हे मंदिर भगवान परशुराम यांनी बनवलं आहे. मंदिराच प्रवेश द्वार साधारण तीन ते चार फूट उंचीच आहे. एका वेळेस एकच व्यक्ती या द्वाराने आत जाऊ शकतो आणि बाहेर येऊ शकतो. मंदिर एका गुहेच्या आत मध्ये स्थित आहे. त्यामुळेच या मंदिराचा गाभारा गुहेच्या स्वरूपाचा आहे. परंतु इथे जाणे अतिशय सुरक्षित आहे. मंदिराच्या गाभार्यात जवळपास पंचवीस ते तीस माणसे एका वेळेस उभी राहू शकतात. येथिल शंकराची पिंड स्वयंभू आहे. पुराणिक कथांनुसार ही गुहा पांडवकालीन आहे.
- नक्की वाचा: सिद्धिविनायक मंदिर मुंबई माहिती
मंदिराचा इतिहास:
मार्लेश्वर हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक छोटसं देवरुख नावाचं गाव आहे. या गावापासून जवळपास १८ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे भगवान शिव यांना समर्पित केलं गेल आहे. हे मंदिर डोंगराच्या एका गुहेत आहे. या मंदिरात दोन शिवपिंड आहेत. एका शिवपिंडाच नाव आहे मल्लिकाअर्जुन आणि दुसऱ्या शिवपिंडाचा नाव आहे मारलेश्वर. असं म्हणतात मल्लिकाअर्जुन हे मारलेश्वर यांचे मोठे भाऊ आहेत.
जेव्हा या स्थानाची निर्मिती झाली तेव्हा येथे पार्वतीची मूर्ती नव्हती. म्हणूनच या मंदिरात दरवर्षी मकर संक्रातीला पार्वती आणि शंकर भगवान यांचा लग्न विवाह होतो. या विवाहामध्ये मारलेश्वर हे वर आहेत आणि साखरपा या गावातील भवानी मंदिराची गिरिजादेवी वधू आहे. हे लग्न लिंगयात या पद्धतीने लावलं जातं.
- नक्की वाचा: लिंगराज मंदिर माहिती
मंदिराची वैशिष्ट्ये :
महाराष्ट्रातील पुराणिक कथांनुसार हे मंदिर अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मार्लेश्वर देवस्थान मारळ या गावाजवळ आहे माराळचा देव म्हणजेच मारल आणि ईश्वर असे मिळून मारलेश्वर. या मंदिरातील दोन्ही शिवपिंड स्वयंभू आहेत. मारलेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे स्थित आहे.
हे छोटेसे शिवमंदिर आहे जिथे रस्त्याने जाण्यासाठी सुमारे दीड तासाचा कालावधी लागतो. मंदिरात अंदाजे तीनशे-चारशे पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून गेल्यावर हे शिवमंदिर एका गुहेच्या आत वसलेले आहे आणि त्याच्या आवारात एक छोटासा दृश्य मंच असून, तेथे भव्य मारलेश्वर धबधबा आहे. हा बारमाही वाहणारा धबधबा आहे.
मंदिराचे मनोरंजक तथ्य :
मंदिराच एक मनोरंजक तथ्य सांगायचं गेलं तर या मंदिरामध्ये शिवपिंडी बाजूला सप सर्पांचा वावर असतो. परंतु हे सर्प मंदिरात येणाऱ्या भक्तांना इजा करत नाहीत. हे मंदिर एका डोंगरात एका गुहेमध्ये स्थित आहेत. या दोन गोष्टींमुळे पर्यटकांचा विश्वास अतिशय वाढला आहे. लाखोने दरवर्षी भक्तजन आणि पर्यटक या मंदिराला भेट देतात.
- नक्की वाचा: खिद्रापूर खोपेश्वर मंदिर माहिती
मुंबई ते मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी:
मुंबई ते मार्लेश्वर हे अंतर सुमारे ३३ किलोमीटर आहे. आणि इथे पोहचायला अंदाजे रोड मार्गे पाच ते सहा तास जातात. आपल्याला सायन-पनवेल एक्स्प्रेस वे आणि मुंबई – पुणे एक्सप्रेस वे ते पेन-खोपोली रोड यानुसार अनुसरण करण आवश्यक आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून बाहेर पडून. आपल्याला पानसई रोड द्वारा पुढे जायच आहे. त्यानंतर, खवटीमध्ये एसएच ९६ आणि एमएच एसएच २७२ ते एनएच ६६ या मार्गाचं अनुसरण करायच आहे.
एनडी ६६ ते एसएच १०७ हे संस्मेश्वर- देवरुख- नवडीतील साखरपा रोड आहेत याच मार्गे आपण मार्लेश्वरला पोहोचू शकतो. चार लोकांसाठी एक मार्ग कार / कॅब भाड्याने मुंबईहून मार्लेश्वरकडे ३००० रुपये इतकी आहे. जर आपण मोठी कार घेतली तर दर जास्त असतील. मुंबईहून रत्नागिरीला स्टेट ट्रान्सपोर्ट बसने आणि त्यानंतर रत्नागिरीहून देवरुखला जाण्यासाठी खासगी टॅक्सी किंवा बस घ्या. आपणास मुंबई ते रत्नागिरीला जाण्यासाठी बसेस व सर्व मोठ्या बस आगारातून मिळतील.
मार्लेश्वर मंदिराच्या पायर्यान:
हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर आहे. आणि शिखरावर जाण्यासाठी ४०० पायर्या चढून जावे लागते. या कुटुंबा सोबत या मंदिराची भेट देणे एक समाधानकारक अनुभव असेल. परंतु मुले आणि वडीलधारी माणसांना चढाई थोडी अवघड वाटू शकते. मंदिराच्या दर्शनासाठी मान्सून हा सर्वोत्तम काळ आहे, परंतु धबधबा पावसाळ्यात थोडा भयावह आहे. येथून जवळच्या मोठ्या शहरांमधून मारल गावी राज्य परिवहन बसेस आहेत.
- नक्की वाचा: कमळ मंदिर माहिती
मार्लेश्वर मंदिर स्थान:
रत्नागिरी पासून ६५ किलोमीटर अंतरावर मारलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळी मारल या गावात आहे. सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेलं श्री मार्लेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. आणि रत्नागिरी पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
मार्लेश्वर मंदिर उघडण्याची वेळ:
मार्लेश्वर रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र तेथील स्थानिक भाविकांसाठी व पर्यटकांसाठी नेहमीच खुल असतं. साधारण या तीर्थक्षेत्राची वेळ सकाळी सात वाजता ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असते. आणि सण, उत्सवांच्या वेळी तर मंदिरामध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते. जवळपास एक ते दोन लाखाहून अधिक भाविक पर्यटक मंदिराला भेट देतात.
उत्सव, यात्रा:
उत्सव आणि यात्रांच सांगायचा गेल, तर शिवप्रेमींसाठी हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. कारण प्रत्येक महिन्याच्या सोमवारी व शनिवारी, श्रावण महिन्यात, महाशिवरात्रि किंवा दत्तजयंती या दिवशी भक्तांचा कल्लोळ असतो. परंतु जानेवारी महिन्यामध्ये इथे खूपच गर्दी असते कारण की कोकणवासी चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेलं हे मार्लेश्वर इथे खूप मोठी जत्रा भरते.
ही जत्रा साधारणता जानेवारी महिन्याच्या १३ व १८ या कालावधीत होते. आणि इथे लाखो होऊन अधिक भाविक हजेरी लावतात. मकरसंक्रांती आणि महाशिवरात्रि येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचे लग्न होते. स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहात विवाह सोहळा साजरा करतात. महाशिवरात्री व्यतिरिक्त त्रिपुरी पौर्णिमेला मेळा भरतो.
मार्लेश्वर मंदिर फोटो:

कसे जायचे?:
मार्लेश्वर देवस्थान मारळ या गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ आणि ईश्वर असे मिळून मारलेश्वर. मारलेश्वर यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. मार्लेश्वरला जाण्यासाठी बस सेवा सुरू आहेत. कोल्हापूर वरून आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडी कोळवण मार्गे मार्लेश्वर हे २० किलोमीटर अंतरावर आहे. तर रत्नागिरी किंवा मुंबईवरून येताना देवरूख वरून १८ कि. मी आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते तेथुन पुढे चारशे ते पाचशे पायर्या चढून मारलेश्वर मंदिरात आपण पोहोचू शकतो.
पाहाण्यासारखी ठिकाणे :
धारलेश्वर धबधबा हे मार्लेश्वरचे आणखी एक आकर्षण आहे. बाव नदीवर धारेश्वर धबधबा तयार झाला आहे. साहसी प्रेमी आणि ट्रेकर्सना हा परिसर आवडेल. धबधब्याचे ठिकाण गुहेतून खूपच सुंदर आहे पण करंबळे दोह येथून धबधब्याचे आणखी एक चांगले दृश्य मिळू शकते. धारेश्वर धबधब्याच्या मागच्या बाजूला असलेल्या विशाल टेकडीच्या टोकावर उजवीकडे भगवा ध्वज फडकताना दिसतो.
या ध्वजात आणखी एक शिव मंदिर आहे. आणि दिवाळीच्या दिवशी ठिकठिकाणी मार्लेश्वर येथून गावकरी मिरवणूकी घेतात. रत्नागिरी कोकणातील एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. कारण की कोकण म्हटलं की समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे हे आलीच आणि रत्नागिरीत मुख्य आकर्षण आहे. रत्नागिरीमध्ये अतिशय प्राचीन मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. परंतु मारलेश्वर सोडूनही इथे बाकी ही अतिशय सुंदर अशी स्थळे बघण्यासारखी आहेत.
- नक्की वाचा: महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती
ती म्हणजे रत्नदुर्ग किल्ला, श्री भागेश्वर मंदिर, रत्नागिरी येथील मत्स्यालय, पांढरा व काळा वाळूचे समुद्रकिनारे, दीपस्तंभ, भगवती आणि मिरकरवाडा बंदर, श्री कालभैरव मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थान, श्री विठ्ठल मंदिर, पतीत पावन मंदिर, सावरकर स्मारक, वीर सावरकरांची कोठडी, ऐतिहासिक पॅलेस पॅलेस, राजवाडा बंदर, भाट्ये समुद्रकिनारा, गेटवे टू रत्नागिरी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, मारुती मंदिर, रत्नागिरी रेल्वे स्थानक, रेल्वे पूल, दत्त मंदिर, चिंचखरी, सोमेश्वर मंदिर, निवळीचा धबधबा, श्री क्षेत्र पावस, श्री गणेशगुळे, पूर्णगड किल्ला, गावखडी समुद्रकिनारा, गणपतीपुळे परिसर क्षेत्र, गणपतीपुळे, गणपतीपुळे पर्यटन केंद्र, गणपतीपुळे समुद्रकिनारा, आरे वारे समुद्र किनारा, प्राचीन कोकण दालन केशवसुत स्मारक, जयगड बंदर, जयगड किल्ला, दीपस्तंभ जयगड, श्री लक्ष्मी मंदिर.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी marleshwar temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास, मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती दिली आहे. marleshwar temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about marleshwar temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या marleshwar temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट