लाल महाल पुणे माहिती Lal Mahal Pune Information in Marathi

lal mahal pune information in marathi लाल महालाची माहिती, पुणे हे शहर अनेक ऐतिहासिक गोष्टींचा आणि ठिकाणांचा वारसा लाभलेले एक शहर आहे म्हणजेच या ठिकाणी अनेक इतिहासातील गोष्टी घडल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू देखील आहेत आणि त्यामधील एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे लाल महाल जे पुणे शहरामध्ये कसबा पेठ या ठिकाणी वसलेले आहे आणि आज आपण या लेखामध्ये पुणे शहरातील ‘लाल महाल’ विषयी माहिती घेणार आहोत.

लाल महाल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरचसे बालपण हे या महाला मध्ये गेले होते आणि हा महाल छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी त्यांची पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी बांधला होता. असे इतिहासामध्ये सांगितले जाते. चला तर खाली आपण लाल महाल विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Lal mahal pune information in marathi
Lal mahal pune information in marathi

लाल महाल पुणे माहिती – Lal Mahal Pune Information in Marathi

लाल महालाचा इतिहास – history of lal mahal pune in marathi

पुणे या शहरामध्ये अनेक प्रसिध्द अशी स्मारके आहेत आणि लाल महाल देखील प्रसिध्द स्माराकापैकी एक आहे कारण या स्मराकाशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जोडलेला आहे. लाल महाल हि वस्तू शहाजीराजे भोसले यांनी १६३० मध्ये पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी बांधला होता.

छत्रपती शिवाजी महाराज हे या ठिकाणी खूप दिवस राहिले होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिला किल्ला मिळावेपर्यंत ते याच ठिकाणी राहिले होते तसेच शाहिस्ता खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील चकमक देखील याच ठिकाणी झाली होती आणि शाहिस्ता खानची बोटे देखील याच ठिकाणी कापली होती.

परंतु त्या काळी बांधलेला लाल महाल या शत्रूंच्या हल्ल्यामुळे पडला होता आणि नंतर हा लाल महाल परत बांधला जो शनिवार वाड्याजवळ आहे आणि या महालाचे मूळ स्थान कोठे आहे ते आज्ञात आहे.

लाल महाल जवळची इतर प्रेक्षणीय स्थळे – other tourist places

पाताळेश्वर गुहा मंदिर, दर्शन संग्रहालय, सारसबाग गणपती मंदिर, शनिवार वाडा, बंदिवान मारुती मंदिर आणि इतर अनेक ठिकाणी आपल्याला या महालाजवळ पाहायला मिळतात.

लाल महाल विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे शहर होते आणि हि इमारत लाल विटांनी आणि तोफांनी बनलेली आहे.
 • सध्या पुणे या शहरामध्ये असणार लाल महाल हा पीएमसीने परत बांधला आहे आणि याचे बांधकाम १९८४ मध्ये सुरु झाले होते आणि ते १९८८ मध्ये पूर्ण झाले.
 • या राजवाड्यामध्ये जिजाबाईंचा पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा नकाशा आणि इतर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात.
 • छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह १६ मे १६४० मध्ये सईबाई यांच्याशी झाला होता आणि हा विवाह लाल महालामध्ये झाला होता.
 • मुळता लाल महाल हा लाकडाचा होता परंतु त्याच्या पुनर्बांधणीनंतर तो लाल विटांचा बांधला आहे आणि सध्याच्या संरचनेत मुख्य प्रवेशद्वार मध्ययुगीन वास्तुकलासारखे आहे.
 • लाल महाल मध्ये एक संग्रहालय देखील आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांचे प्रदर्शन केले आहे.
 • काही इतिहासकारांनी या महालाविषयी असे सांगितले आहे कि हा महाल पुणे शहरातील मुठा नदीच्या काठावर वसलेला होता.
 • लाल महालाच्या आत आपल्याला राजमाता जिजाबाई आणि बाल शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो.
 • असे म्हटले जाते कि छत्रपती शिवाजी महाराज हे या महालामध्ये १५ वर्ष राहिले होते.
 • हा राजवाडा किंवा महाल हा लाल विटांनी बनवलेला आहे त्यामुळेच याला लाल महाल असे नाव पडलेले असावे आणि ह्या महालामध्ये सुंदर आणि गुंतागुंतीचे कोरीवकाम देखील केले होते.
 • १७ व्या शतकामध्ये हा वाडा नष्ट झाला असला तरी त्या मूळ जागेवर एक प्रतिकृती तयार केली गेली आहे.
 • लाल महाल हे भारतातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ मानले जाते आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या वर्षाचा पुरावा मानले जाते.
 • नजीकच्या शनिवार वाड्याचे बांधकाम करणाऱ्या पेशव्यांनी या वाड्याच्या अवषेशातील विटांचा उपयोग केला होता असे म्हटले जाते

लाल महालला कसे पोहचायचे – how to reach

तुम्हाला जर हा महाल पाहण्यासाठी यायचे असल्यास तुम्ही बसने, ट्रेनने किंवा विमानाने पुणे या शहरामध्ये येऊ शकता. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून हा महाल फक्त ५ किलो मीटर अंतरावर आहे आणि विमानतळपासून ११ किलो मीटर अंतरावर आहे.

तेथून तुम्ही बसने किंवा टॅक्सीने महालापर्यंत पोहचू शकतो. कोणत्याही शहरातून येणारे पर्यटक पुणे या शहरामध्ये कोणत्याही मार्गाने येऊ शकतात जसे कि रोडने, ट्रेनने किंवा विमानाने कारण या ठिकाणी तिन्हीहि वाहतूक मार्ग उपलब्ध आहेत.

लाल महाल पाहण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क – timings and entry fees

 • जर तुम्हाला पुणे या शहरामध्ये असणाऱ्या लाल महालला भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंतच्या काळामध्ये देऊ शकता किंवा मग दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत हा महाल पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो आणि महाल पाहण्यासाठी फक्त ५ रुपये शुल्क आकारला जातो.
 • जर तुम्हाला लाल महाल पाहण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जाऊ शकता म्हणजे हे आठवड्यातील सातही दिवस खुले असते आणि वर्षातून केंव्हाही पाहायला जाऊ शकता.

आम्ही दिलेल्या Lal mahal pune information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राणी दुर्गावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lal mahal information in marathi या history of lal mahal pune in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about Lal mahal pune in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Lal mahal pune information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!