शनिवार वाडा इतिहास मराठी Shaniwar Wada History in Marathi

shaniwar wada history in marathi शनिवार वाडा इतिहास मराठी. महाराष्ट्रातील पुणे शहरात स्थित शनिवारवाडा ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ही वास्तू अनेक ऐतिहासिक गोष्टींची साक्षीदार आहे. बाजीराव पेशवे यांनी मस्तानी यांच्यासाठी शनिवार वाडा बांधला. हे त्यांच्या प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. या वाड्यामध्ये पेशव्यांच्या अनेक रहस्यमय कथा देखील दडल्या आहेत. सध्याच्या घडीला ही वास्तु एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त केलेली वास्तू म्हणून ओळखली जाते. शनिवार वाडा महाराष्ट्रातील पुणे येथे स्थित आहे परंतु पुणे शहर मुंबई, दिल्ली, जयपूर, बेंगलोर, इत्यादी सर्व प्रमुख शहरांशी रेल्वे व रस्ते मार्गाने जोडला गेलेला आहे. त्यामुळे शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी कोणत्याही शहरातून येणे सहज उपलब्ध होईल.

तसेच शनिवार वाडा शहराच्या मध्यभागी वसलेला आहे. पुण्यात उतरल्यावर बस, टॅक्सी अशा कोणत्याही स्थानिक वाहतुकीने शनिवार वाड्याला भेट देऊ शकता. सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला केला जातो. पहिले बाजीराव पेशवे यांनी पुण्यामध्ये शनिवार वाड्याची निर्मिती केली. १० जानेवारी १७३० रोजी शनिवार वाड्याचा पाया बांधला गेला‌‌. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्ध नंतर हा वाडा बांधण्यात आला.

shaniwar wada history in marathi
shaniwar wada history in marathi

शनिवार वाडा इतिहास मराठी – Shaniwar Wada History in Marathi

पुढील दोन वर्षांमध्ये या वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. हा शनिवार वाडा भव्य दिव्य असा सात मजली विशाल वाडा आहे. या वास्तूच्या भिंतींवर रामायण व महाभारतातील चित्रे पाहायला मिळतात. या किल्ल्याचे बांधकाम राजस्थान मधील कंत्राटदार यांनी केले आहे. केवळ दगडांचा वापर करून हा वाडा बांधण्यात आला. पुढे हा वाडा विटांनी बांधला गेला. या वाड्याच्या बांधकामासाठी सामग्री वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवली गेली होती.

या वाड्या साठी लागणारे लाकूड जुन्नरच्या जंगलामधून मागवले होते तर चिंचवाडी खाणींमधून दगड आणि जेजुरी खाणींमधून चुना मागवला गेला. हा भव्य दिव्य वाडा बांधण्यासाठी सुमारे सोळा हजार आणि शंभर रुपये खर्च केले गेले या वाड्यामध्ये जवळपास हजाराहून अधिक लोक एकाच वेळी राहू शकतात इतकी या वाड्याची  क्षमता आहे. येणाऱ्या काळामध्ये या वाड्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या ज्या मुळ्या वाड्याचे नुकसान झाले.

या वाड्याचे बांधकाम झाल्यानंतर ब्रिटिश सैन्याने या वाड्यावर हल्ला केला होता ज्यामुळे वाड्यातील इमारतीचे नुकसान झाले. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर पेशव्यांनी हा किल्ला इंग्रजांच्या हाती गमावला पुढे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकामध्ये या किल्ल्यावर विविध लष्करी हल्ले झाले व वेगवेगळ्या वेळी लागलेल्या आगीमुळे शनिवार वाडा उद्ध्वस्त झाला. १८१२ मध्ये या किल्ल्यामध्ये पुन्हा आग लागली आणि त्यावेळी या आगीत गोदाम आणि अस्मानी महाल या दोन मजलींचा नाश झाला.

१८२८ मध्ये या वाड्यामध्ये प्रचंड आग लागली ज्यामुळे या वाड्यातील बराच मोठा भूभाग आगीच्या झोतात उद्ध्वस्त झाला. ही आग भीषण होती जी ला विजवण्यासाठी सात दिवस लागले. या आगीमध्ये किल्ल्यातील अनेक स्तर, कलाकृती व कागदपत्रे यांची राख झाली. ही आग कशी लागली या प्रश्नाचे उत्तर अजूनही कोणाला माहित नाही आहे. या वाड्यामध्ये जवळपास पाच वेळा आग लागली होती आणि या आग अचानक कशा लागायच्या याचा कुणालाही अंदाज नाही. या भीषण आगीनंतर वाड्यातील काही मोजके अवशेष शिल्लक राहीले आहेत.

या शनिवार वाड्या मधिल मुख्य इमारती म्हणजे थोरल्या रायाचा दिवाणखाना, नाचाचा दिवाणखाना व जुना आरसा महाल इत्यादी होत्या परंतु लागलेल्या आगीमुळे ते उद्ध्वस्त झाल्या आहेत. या ऐतिहासिक वास्तूला पाच प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, विंडो दरवाजा, गणेश दरवाजा, जांभूळ दरवाजा व नारायण दरवाजा.

या किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा आहे या दरवाजाची रचना सांगायची झाली तर अतिशय उंच व रुंद असा भव्यदिव्य दरवाजा आहे. हा दरवाजा उत्तरेकडे तोंड करून होता आणि सोबतच बाजीराव यांच्या दिल्ली जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे दरवाज्याला असे नाव देण्यात आले होते. वाड्या मध्ये मस्तानी दरवाजा आहे. मस्तानी या पहिले बाजीराव पेशवे यांच्या दुसऱ्यापासून होत्या आणि हा वाडा बाजीराव यांनी त्यांच्यासाठीच बनवला होता. त्या बहुतांशी वेळी बाहेर जाण्यासाठी मस्तानी दरवाजाचा वापर करायचा.

म्हणूनच या दरवाजा चे नाव मस्तानी दरवाजा असे ठेवले गेले आहे. पूर्व दिशेला खिडकीचा दरवाजा आहे तर दक्षिण पूर्व येथे गणेश द्वार आहे या द्वारा चा उपयोग प्रामुख्याने स्त्रिया कासबा गणपती मंदिरात जाण्यासाठी करत असत. दक्षिणे च्या दिशेकडे जाण्यासाठी नारायण दरवाजा आहे. शनिवार वाडा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे या वाड्यामध्ये अनेक लहान इमारती, जलाशय आणि कमळ कारंजे देखिल बांधले गेले आहेत. हे कमळ कारंजे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे असे मानले जाते.

सन १८१८ पर्यंत हा वाडा मराठ्यांच्या ताब्यात होता. शनिवार वाड्या मध्ये अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाड्याला रहस्यमय ठिकाण किंवा झपाटलेलं ठिकाण अशी देखील ओळख आहे. हा सात मजली राजवाडा त्याकाळी इतिहासातील कलात्मक आणि मनमोहक वास्तु म्हणून प्रसिद्ध होता. लागलेल्या भीषण आगीमुळे व वेगवेगळ्या आक्रमणांमुळे वाड्यात वरचे मजले उध्वस्त झाले. या राजवाड्यात प्रवेश बिंदू व नऊ बुरूज होते. कोरीव नक्षीकाम केलेले सागवान दरवाजे, उत्कृष्ट डिझाईन केलेले सागवान खांब आणि संगमरवरी मजले यांनी या वाड्याची रचना करण्यात आली होती.

तसेच वाड्याच्या भिंतींवर ती रामायण आणि महाभारतातील ऐतिहासिक दृश्य सुशोभित केली केली आहेत. तसेच या राजवाड्यातील छतांवर मोठ मोठे काचेचे झुंबर टांगलेले होते. या राजवाड्या मध्ये गणपतीची भव्य मूर्ती देखील होती. या काळातील मुख्य आकर्षण म्हणजे तेथील भव्यदिव्य कारंजे जे कमळासारख्या आकारांमध्ये बांधले गेले आहेत. आज जो शनिवार वाडा पुण्यामध्ये स्थित आहे तो उध्वस्त अवस्थेत असला तरी पुण्यातील पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हा वाडा जवळपास ६२५ एकर मध्ये पसरलेला आहे.

या वाड्यामध्ये दररोज संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो सादर केला जातो. जो पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण ठरला आहे. हा शो दररोज सायंकाळी ७. १५. ते ८. १०. पर्यंत मराठी भाषेमध्ये दाखवला जातो. ८. १५. ते ९. १०. पर्यंत हा शो इंग्रजी भाषेमध्ये सादर केला जातो. या शो ची तिकीट जागेवरच खरेदी केली जाऊ शकते व ती अतिशय स्वस्त देखील असते. पहिले बाजीराव पेशवे हे याच वाड्यात राहायचे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय घडामोडी सुरू झाल्या. पेशवेपद प्राप्त करण्यासाठी राजवाड्यातील काही माणसे कटकारस्थाने करू लागले.

शनिवार वाड्यातील भुताचे रहस्य – shaniwar wada haunted story in marathi

shaniwar wada ghost story in marathi ज्यावेळी नारायण राव यांना पेशवे पद मिळाले तेव्हा त्यांचे काका राघोबा या मताशी सहमत नव्हते. त्यामुळे त्यांनी आनंदीबाई यांच्याशी मिळून नारायण राव यांना बंदी करण्याचा कट केला. परंतु आनंदीबाई यांनी पत्रातील नारायणराव यांना धरा या मजकुराचा अर्थ बदलून तिथे नारायण राव यांना मारा असा बदल केला ज्यामुळे नारायण राव यांची शनिवार वाड्यामध्ये हत्या झाली. या घटनेनंतर असे म्हटले जाते की हा वाड्यामध्ये आजही नारायण राव यांच्या किंचाळ्या ऐकू येतात.

नारायणराव यांचा आत्मा अजूनही या वाड्यामध्ये फिरत आहे अशी समज आहे. म्हणूनच या वाड्याला झपाटलेला वाडा असे देखील घोषित करण्यात आले आहे. आजही या वाड्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येते. कालांतराने नारायण राव यांचा मुलगा सवाई माधवराव यांनी देखील याच वाड्यामध्ये आत्महत्या केली होती. हा पुण्यातील भव्यदिव्य असा ऐतिहासिक राजवाडा व किल्ला आहे. हा वाडा मराठा साम्राज्याच वैभव आणि वैभवाचा इतिहास मानला जातो. हा वाडा जवळपास २८७ वर्ष जुना आहे जो पेशव्यांच्या इतिहासाची साक्ष देतो.

पहिले पेशवे बाजीराव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २०१५ साली बाजीराव मस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाची शूटिंग या वाड्यामध्ये करण्यात आली होती. या चित्रपटानंतर अनेक जण पहिले बाजीराव पेशवे यांची कथा समजून घेण्यासाठी या शनिवार वाड्याला भेट देऊ लागले. या वाड्याला आजपर्यंत जगभरातून दररोज सुमारे तीनशे पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

वाड्यामध्ये प्रवेश करण्याचे शुल्क भारतीयांसाठी पाच रुपये आकारले जाते तर परदेशी नागरिकांसाठी या वाड्यात प्रवेश शुल्क १२५ रुपये आहे. शनिवार वाड्याची निर्मिती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यासाठी महत्त्वाचा क्षण मानला जातो. या वाड्यामध्ये घडणाऱ्या रहस्यमय घटना व त्यांचा इतिहास पर्यटकांना या वाड्याकडे अधिक आकर्षित करतो.

आम्ही दिलेल्या shaniwar wada history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शनिवार वाडा इतिहास मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of shaniwar wada in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि shaniwar wada pune history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!