लोणार सरोवर कसे तयार झाले Lonar Sarovar Information in Marathi

lonar sarovar information in marathi – lonar lake in marathi लोणार सरोवर विषयी माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये जागतिक ठेवा म्हणून नोंद असणाऱ्या लोणार सरोवर बद्दल माहिती घेणार आहोत. लोणार सरोवर विषयी माहिती घेण्याअगोदर आपण सरोवर म्हणजे काय हे जाणून घेवूया कारण अनेक लोकांना सरोवर म्हणजे काय हे माहित नसते. सरोवर म्हणजे पाण्याच्या एका मोठ्या भागाला चहुबाजूने जमिनीने घेरलेले असते. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे आणि हे खाऱ्या पाण्याचे तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे आणि लोणार सरोवराचा उगम हा ५२ हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर उल्का पडली त्यावेळी झाले असे अनेकांचे मत आहे.

आणि या तलावाचा शोध युरोपियन जेई अलेक्झांडर यांनी सन १८२३ मध्ये लावला. लोणार सरोवराला लोणार विवर म्हणून देखील ओळखले जाते. लोणार सरोवर हे दख्खनच्या पठारावर वसलेले आहे आणि हे उद्रेकामुळे तयार झाले असे म्हटले जाते आणि अंडाकृती आकाराच्या तलावामध्ये विविध जीवाणू तसेच सूक्ष्मजीव राहतात.

lonar sarovar information in marathi
lonar sarovar information in marathi

लोणार सरोवर विषयी माहिती मराठी – Lonar Sarovar Information in Marathi

ठिकाणाचे नावलोणार सरोवर / लोणार विवर
उगम५२००० हजार वर्षापूर्वी 
शोधकर्तायुरोपियन जेई अलेक्झांडर
शोध केंव्हा लागलासन १८२३ मध्ये लागला
सरोवरा जवळील इतर ठिकाणेगोमुखी मंदिर, दैत्य सुधन मंदिर, राम गया मंदिर, कमलजा आणि सिंदखेड राजा किल्ला

लोणार सरोवराचा इतिहास – lonar lake history in marathi

लोणार सरोवर हा प्राचीन काळापासून ओळखला जाणारा सरोवर आहे आणि युरोपियन जेई अलेक्झांडर यांनी सन १८२३ मध्ये लोणार सरोवराचा शोध लावला असे म्हटले जाते. लोणार सरोवर हे ५२ हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर उल्का पडून तयार झाले आहे.

लोणार सरोवरावरील हवामान – Weather 

लोणार सरोवराजवळचा आणि सरोवराच्या आसपासचा परिसर हा वर्षभर कोरडा असतो आणि उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णता असते. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणाचे तपमान हे ३० ते ४० अंश सेल्सियस इतके किंवा ह्याच्या आसपास असते. तसेच या ठिकाणी हिवाळा हा १० अंश सेल्सियस इतका कमी असतो आणि या प्रदेशमध्ये सरासरी वार्षिक पाऊस १०६४.१ मिमी इतका पडतो.

लोणार सरोवाराविषयी मनोरंजक तथ्ये – facts about lonar lake 

 • बेसाल्टिक खडकामध्ये निर्माण झालेल्या जगातील एकमेव उच्च वेगाच्या प्रभावामध्ये हे सरोवर आहे. शास्त्रज्ञांच्या मते धुमकेतू किंवा लघुग्रह तशी ९०००० किलो मीटर वेगाने आदळल्यानंतर हा सरोवर तयार झाला.
 • सरोवराची परिसंस्था देखील तुम्हाला आश्चर्यचकित करेल कि तलावामध्ये दोन भिन्न पाण्याचे प्रदेश आहेत जे एकमेकांच्यामध्ये मिसळत नाहीत.
 • सरोवराच्या दक्षिणेकडील भागामध्ये गेल्यास गोड पाण्याची विहीर आहे जी सरोवारासाठी जलस्तोत्रासारखे आहे कारण याचा प्रवाह थेट सरोवरामध्ये वाहतो.
 • लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकामध्ये तयार झालेले सर्वोत्तम संरक्षित आणि सर्वात तरुण सरोवर आहे. या सरोवराचे वय ठरवण्यासाठी दोन पध्दती वापरल्या आहेत. थर्मो ल्युमीनेसेन्स विश्लेषणातून असे दिसून येते कि सरोवराचे वय हे ५२००० वर्षापूर्वीचे आहे.
 • लोणार सरोवरामध्ये आढळणारे सर्वात प्रमुख सरपटणारे प्राणी म्हणजे मॉनिटर सरडे.
 • राम गया मंदिर, कमलजा देवी मंदिर आणि अर्धवट पाण्यात बुडालेले शंकर गणेश मंदिर हे सर्व लोणार सरोवराजवळ वसलेले आहे. सर्वात महत्वाचे मंदिर म्हणजे दैत्य सुधन मंदिर हे लोणार शहराच्या मध्यभागी वसलेले आहे आणि हे मंदिर लोणारसुराचा संहार करणारे भगवान विष्णू यांना समर्पित आहे.
 • लोणार सरोवर हे जगातील ५ वे सर्वात मोठ्या सरोवरामध्ये समाविष्ट आहे आणि ते जगातील ३ रे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
 • लोणार सरोवराचा उगम हा ५२ हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर उल्का पडली त्यावेळी झाले असे अनेकांचे मत आहे आणि या तलावाचा शोध युरोपियन जेई अलेक्झांडर यांनी सन १८२३ मध्ये लावला.
 • लोणार सरोवराजवळचा आणि सरोवराच्या आसपासचा परिसर हा वर्षभर कोरडा असतो आणि उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णता असते.
 • लोणार सरोवराचा उल्लेख हा स्कंद पुराणा मध्ये देखील करण्यात आला आहे जो १८ महापुराणापैकी सर्वात मोठा आहे जे देशातील विविध तीर्थ क्षेत्रांची माहिती देते.
 • या सरोवराचा व्यास १.२ किलो मीटर इतका आहे.
 • लोणार सरोवर हे दख्खनच्या पठारावर वसलेले आहे आणि हे उद्रेकामुळे तयार झाले असे म्हटले जाते आणि अंडाकृती आकाराच्या तलावामध्ये विविध जीवाणू तसेच सूक्ष्मजीव राहतात.
 • सरोवराचा अंडाकृती आकार दर्शवितो कि लघुग्रह किंवा धुमकेतू भारताच्या डेक्कन ट्रॅप्सच्या बेसॉल्टिक फोर्मेशनल ३५ अंश ते ४० अशाच कोण म्हणून आदळला होता.
 • नासाच्या म्हणण्यानुसार सरोवराच्या ज्वालामुखीय बेसाल्टमुळे लोणारला चंद्राच्या पृष्ठभागावरील आघात असलेल्या विवराप्रमाणे एक विहीर बनते. शिवाय सरोवराच्या जागेवर नुकताच सापडलेला जीवाणूंचा ताण मंगळावर सापडलेल्या जीवानु सारखाच आहे.

लोणार सरोवराजवळील पाहण्यासारखी ठिकाणे

 • कमलजा देवीचे मंदिर : कमलजा देवीचे मंदिर हे लोणार सरोवराच्या जवळच आहे आणि मंदिरावर कोरलेल्या प्रतिमा देखील आहेत. कमलजा देवीचे मंदिर हे या ठिकाणातील प्रसिध्द पर्यटन स्थळांच्यापैकी एक आहे.
 • गोमुख मंदिर : गोमुख मंदिर हे पाण्याच्या प्रवाहशेजारी वसलेले मंदिर आहे आणि हे भाविकांच्या मते एक पवित्र मंदिर मानले जाते. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला साप, मुंगुस, हरीण आणि कोळे या सारखे प्राणी दिसतात.
 • श्री गजानन महाराज संस्थान : लोणार सरोवराच्या काही अंतरावर श्री गजानन महाराज संस्थान देखील आहे आणि या संस्थानाला किंवा मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून या मंदिराला संगमरवरीचे नक्षीकाम केले आहे आणि हे देशातील स्वच्छ मंदिर आहे.
 • दैत्य सुधन मंदिर : दैत्य सुधन मंदिर हे एक प्राचीन मंदिर हे आणि हे प्राचीन मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित केले आहे आणि ६ व्या ते १२ व्या शतकादरम्यान या प्रदेशावर राज्य करणाऱ्या चैत्य राजवंशातील आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम शैलीतील आहे आणि हे देखील सरोवर जवळील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
 • सिंदखेड राजा किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाऊबाई यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासाठी हा किल्ला लोकप्रिय आहे आणि त्यांनी १५९८ मध्ये हा किल्ला बांधला होता आणि हा देखील पर्यटकांच्यासाठी प्रेक्षणीय आहे.

कसे पोहचायचे – how to reach  

रेल्वेने : लोणार सरोवर पाहण्यासाठी तुम्हाला जर रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही मनमाड जंक्शन मार्गे मुंबई आणि औरंगाबाद दरम्यान २० हून अधिक रेल्वे आहेत. औरंगाबादहून आपण लोणारला बसने जावू शकतो. औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून बसस्थानक हे १ किलो मीटर अंतरावर आहे आणि तेथून लोणारला आपण बसने जावू शकतो आणि तेथून लोणारला बसने जाण्यासाठी ५ तास लागतात.

विमानाने : विमानाने लोणार सरोवर पाहायला जायचे असल्यास तुम्हाला मुंबई, पुणे किंवा कोणत्याही मुख्य शहरातून विमानातून औरंगाबाद विमानतळावर यावे लागेल आणि मग औरंगाबाद मधून लोणारला जाणारी बस पकडून तुम्ही लोणारला येवू शकता. औरंगाबादहून लोणारला येण्यासाठी ५ तास लागतात.

आम्ही दिलेल्या lonar sarovar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोणार सरोवर विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lonar lake history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of lonar sarovar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!