तसेच वेगवेगळ्या शेंगभाज्या खाल्ल्या जातात. संक्रांतीच्या दिवशी सकाळ सकाळी पतंग उडवले जातात. पतंग उडवले जाण्याच मुख्य कारण म्हणजे सकाळी पतंग उडवल्याने सूर्याची करणे शरीराला लागतात आणि त्यामधून शरीराला आवश्यक असणार विटामिन डी मिळते ज्यामुळे थंड हवेमुळे होणारऱ्या रोगा पासून आपला बचाव होतो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 – Makar Sankranti Wishes in Marathi
तिळगुळ का देतात?
मकर संक्रांतीला तिळाचे लाडू किंवा वड्या आणि तीळगूळ देण्याचा मुख्य कारण म्हणजे हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो. आणि थंडी मध्ये मानवी शरीराला उष्णतेची गरज असते तीळ व गुळ हे उष्ण पदार्थ आहेत. ज्वारी व बाजरी च्या पिठामध्ये तीळ टाकून त्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. त्या शिवाय त्याच्या जोडीला हरभरा, गाजर, मटार, चवळीची शेंग आणि तिळाच मिश्रण असलेली भाजी करण्याची पद्धत आहे.
या भाजीमध्ये अन्य भाज्यांचे देखील मिश्रण असल्यामुळे शरीरासाठी खूपच आरोग्यदायक आहे. या दिवशी तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटले जातात याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात झालेल्या चुका, गैरसमज, अपमान, राग या सर्व गोष्टी विसरून आपण आपल्या परिवाराला मित्र-मैत्रिणींना तिळगुळाचे लाडू देतो.
जेणेकरून आपल्या नात्यातील कडवटपणा जाईल आणि ह्याच्या पुढे संपूर्ण वर्षभर गोडवा रहावा. माणसाने कितीही चुका केल्या तरी आपण त्यांना नेहमीच माफ केलं पाहिजे आणि सर्वांनीच मिळून मिसळून आनंदित राहिले पाहिजे असा संदेश हा सण आपल्याला देत असतो.
Makar Sankranti Quotes in Marathi
- तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
- आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा… “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
- आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र– सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे. तिळगुळ घ्या गोड़ बोला.
- नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या, गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा!
- गगनात उंच उडता पतंग, संथ हवेची त्याला साथ, मैत्रीचा हा नाजूक बंध, नाते अपुले राहो अखंड, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Makar Sankranti Wishes in Marathi
- नाते अपुले, हळुवार जपायचे…, तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत, अधिकाधिक दॄढ करायचे…, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
- तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!, मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
- तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू, मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
- नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग, आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग…. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
- थोडं गोड आपणही बोलावं, सगळाच भार तिळगुळावर कशाला.
- तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही ऩात्यातील कटुंता इथेच संपवा, तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
Makar Sankranti Greetings in Marathi
- कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… , मकरसंक्राती हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला
- विसरुनी जा दुःख सारे, मनालाही द्या विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
- “विसरुनी सर्व कटुता मनात तिळगुळाचा गोडवा निर्माण व्हावा, दुःख विसरुनी सारी आयुष्यात सुखाचा सोहळा यावा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
- मराठी परंपरेची मराठी शान , आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण.. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ..!
Happy Makar Sankranti Marathi Images
- नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे …. तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
- म…… मराठमोळा सण, क…… कणखर बाणा, र …… रंगीबिरंगी तिळगुळ, सं…… संगीतमय वातावरण, क्रा…… क्रांतीची मशाल…, त …… तळपणारे तेज, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
- कणभर तिळ मणभर प्रेम, गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला…. मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
Makar Sankranti Images Marathi
मकर संक्रांतीचे महत्व
दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य वर्षाच्या सुरुवातीला मकर राशीमध्ये संक्रमण करतो. आणि याच प्रक्रियेला मकर संक्रांत असे म्हटले जाते. सूर्याची किरणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिणी या अंक्षांशावर लंबरूपात पडायला सुरुवात होतात. आणि या दिवसापासून सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो. अगदी प्राचीन काळापासून सूर्य हा देवासमान मानला जातो.
आणि मकर संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित आहे. त्यामुळे हा सण भारताचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. पौष महिन्यामध्ये हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत या सणाच्या आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रात होऊन गेल्यावर दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते आणि त्याशिवाय हवेतील गारवा देखील कमी होतो आणि उष्णता वाढायला सुरुवात होते.
प्राचीन ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीचे महत्व सांगितलं गेलं आहे. महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शरशय्येवर उत्तरायणाची वाट पाहत होते. त्याला इच्छामरण वरदान मिळालं होतं. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झालं त्याच दिवशी त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. उत्तरायणाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. हा सण साजरा करण्याचा दुसरा मुख्य कारण म्हणजे ह्या सणामध्ये थंडीच वातावरण असतं आणि या सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात. हा सण आरोग्य घेऊन येतो.
आम्ही दिलेल्या makar sankranti wishes in marathi images माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या makar sankranti quotes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि happy makar sankranti wishes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये makar sankranti greetings in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट