माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध Maza Avadta Sant Essay in Marathi

Maza Avadta Sant Essay in Marathi माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी असे खालील समर्पक दृष्टांत ज्यांनी दिले तसेच, परमात्मा, जीव आणि जगत यांच्यातील अद्वैत जाणून घेणे म्हणजे ज्ञान! असे ज्ञानाचे महत्व देणारे संत ज्ञानेश्वर महाराज खरंच किती महान होते. केवळ ज्ञानामुळे कैवल्यप्राप्ती होऊ शकते, हे खरे परंतु हा ज्ञानमार्ग पेलणारे, प्रज्ञावंत जगात सर्वत्र असू शकतील असे नाही, शिवाय परमात्मा हा केवळ बुद्धिगम्य नाही. तो अंत:करणाचाच विषय आहे. शांतरस हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. ज्ञानदेवांच्या अलौकिक निरीक्षण शक्तीमुळे सुंदर शब्दचित्रेही ज्ञानेश्वरीत सापडतात. सारा महाराष्ट्र ज्ञानदेवांना ‘माऊली’ या नावाने ओळखतो.

चंद्र तेथे चंद्रिका | शंभू तेथे अंबिका

संत तेथे विवेका | असणे चि जी || “

रावो तेथे कटक | सौजन्य तेथे सोयरीक

वन्ही तेथे दाहक | सामर्थ्य की || “

maza avadta sant essay in marathi
maza avadta sant essay in marathi

माझा आवडता संत निबंध मराठी – Maza Avadta Sant Essay in Marathi

माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी – Sant Dnyaneshwar Essay in Marathi

आई, माता, जननी असे याच अर्थाचे दुसरेही काही शब्द आहेत. पण, ‘ माऊली’ शब्द वेगळाच आहे. त्यातील जिव्हाळा, आपुलकी, जवळीक अवर्णनीय आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयातून स्त्रवलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी! ‘गीता’ हे उपनिषदरुपी गाईचे दूध मानले जाते, पण तेही पचेनासे झाले होते, कारण गाईचे नाही तर आईचे दूध या महाराष्ट्राला हवे होते. या माऊलीच्या दूधाने महाराष्ट्राच्या तनमनाने बाळसे घेतले ! माऊलीने गीता तत्वज्ञान पाजले,’ ‘हल्लरू’ गाऊन महाराष्ट्राला ‘समाधी बोधे’ निजवले.

माऊलीने सगळ्यांना ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी वेदांतीची  क्लिष्ट अशी परिभाषा टाळली. अवतरणे, खंडन – मंडन, अभिनिवेश यातून तत्वज्ञान मस्तकात चढते ! पण, कधी हृदयात उतरत नाही. तत्वज्ञान हा अतिशय मधूर व जीवनस्पर्शी असा विषय आहे. याची सुस्पष्ट जाणीव माऊलींच्या तेजोत्सर्जी अशा शब्दांनी आम्हाला करून दिली.

अशा थोर विचारवंताचा जन्म शके ११९७ युवा संवस्तर वद्य ८ गुरुवार मध्यरात्रीला झाला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे आपेगाव येथील कुलकर्णी होते. विठ्ठलपंत यांना संन्यास घ्यावासा वाटल्यामुळे गृहस्थाश्रम सोडून त्यांनी संन्यासधर्म स्विकारला. परंतु, पुढे आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम स्विकारला व पुढे त्यांना एकूण चार अपत्ये झाली.

विठ्ठलपंत यांनी संन्यासानंतर पुन्हा संसार केला. संन्याशाची पोरे म्हणून समाजातील लोकांनी त्यांच्या मुलांची अवहेलना केली. असा कडवट अनुभव येऊनही संत ज्ञानेश्वरांच्या अंत:करणाची शांती ढळली नाही. हे सारे त्यांनी अनुभवल्यामुळे स्त्रीशुद्रादिकांचे व बहुजन समाजाचे दुःख ज्ञानेश्वरांना समजले आणि म्हणूनच त्यांच्या सहानुभूतीचा ओघ या वर्गाकडे वळला.

ज्ञानेश्वरांच्या घराण्यात नाथपंथांची शिकवण परंपरेने आलेली होती. पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. ज्ञानेश्वरांनी नाथपंथांचा अद्वयानंद व पंढरपूरची प्रेम व भक्ती यांचा मनोहर संगम घडवून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची सुरेख सुरुवात केली.

देवाचिया द्वारी उभा क्षणभरी

तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||

हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा

पुण्याची गणना कोण करी ||”

यासारख्या अभंगातून परमार्थ अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात संत ज्ञानेश्वरांनी विशद केला आहे. हरीच्या सगुण – निर्गुण रूपाचे वर्णन त्यांच्या  अनेक अभंगात कलात्मक सौंदर्याने नटवून दर्शवले आहे. तसेच, त्यांचे अभंग प्रपंच आणि परमार्थाचा देखील सुंदर समन्वय घडवितात.

चांगदेवा तुझेनि व्याजे |

माऊलिया श्री निवृत्तीरागे ||

स्नानुभाव रसाळ पाजे |

दिधले लोभें || “

असे विनयपूर्ण उदगार काढून आपल्या लेखनाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथ व चांगदेव यांना दिले आहे.

ज्ञानेश्वरांनी गीतेच्या ७०० श्लोकांचा, ज्ञानेश्वरीतील ९००० ओव्याईतका स्वतंत्र विस्तार केलेला पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या प्रतिभेची झेप लक्षात येते. ‘यथार्थदीपिकाकार’ वामनाप्रमाणे, पांडित्याचा कोणताच अभिनिवेश ज्ञानेश्वरांनी आणलेला नाही. सर्वसामान्याला भक्तिमार्ग आचरता यावा म्हणून त्यांनी देशी भाषेत ग्रंथरचना केली व गीतेतील तत्वज्ञान सुबोध व्हावे म्हणून ज्ञानेश्वरीची रचना केली.

ज्ञानदेवे रचिला पाया,

उभारिले देवालया || “

भागवत धर्म मंदिराचा हा पाया रचताना ज्ञानेश्वरांचे विशेष वैशिष्टय दिसून येते, ते म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या रुढ अशा कल्पनेला धक्का न लावता त्यांनी समता प्राप्त केली.

म्हणोनी कुळजाती वर्ण |

हे अवघेचि गा अप्रमाण ||”

असे त्यांनी कळवळ्याने सांगितले. त्यांच्या रचनेत हरिपाठ, चांगदेव पासष्टी, नमन आणि अभंग इत्यादी गणना होते. ‘ अमृतानुभव ‘ सारखा, ‘ जग असकी वस्तुप्रभा ‘ असा, अत्युच्य सिद्धानुवाद सांगणारा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या परिणतप्रज्ञ बुद्धीचा विलासच होय.

आयुष्याच्या अखेरीस ज्ञानदेवांना तिर्थाटनाची इच्छा झाली होती. त्यावेळी सर्वजण प्रथम पंढरपूरला गेले. तेथे भक्त नामदेवाला त्यांनी बरोबर घेतले. नामदेव हा थोर ज्ञानी भक्त होता. ज्ञानदेवांचे ज्ञान आणि नामदेवांची भक्ती यांचा सुरेख संगम झाला होता. एकाने आपले योग सामर्थ्य प्रकट केले तर, दुसऱ्याने भक्तिसामर्थ्य ! त्यांच्यासोबत चाखोबा, आरणभेंडीचे सावतामाळी, नरहरी सोनार, परीसा भागवत आणि विसोबा खेचर ही थोर संत मंडळी समाविष्ट होती.

आळंदीस आल्यानंतर ज्ञानदेवांच्या मनात आपण समाधी घ्यावी असा विचार दृढ झाला. त्यांनी गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर लोटांगण घातले आणि समाधीची अनुज्ञा मागितली. निवृत्तीनाथांना त्यांच्या मनाची अवस्था ज्ञात झाली होती. ते उन्मनी अवस्थेत होते. सोपानदेव, मुक्ताबाई यांनी ज्ञानदेवांचे चरण धरले, लगेच निवृत्तीनाथांची उन्मनी अवस्था दूर झाली, “बालपणी आईबाप सोडून गेले तेंव्हा झाले नव्हते, इतके दुःख आज मला यावेळी होत आहे.” असे निवृत्तिनाथ म्हणाले .

इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे. तेथे सिद्धेश्वराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाच्या छायेखाली समाधिस्थान सिद्ध केले. शके १२१२ कार्तिक वद्य एकादशीला सर्वांनी हरि जागर केला. नामदेवांनी भरल्या अंत:करणाने हरिकीर्तन केले. द्वादशीला पारणे सोडले. समाधिस्थानाची शिळा तयार होती. ज्ञानदेव समाधीकडे जाण्यास उठले. सगळ्यांनी त्यांना वंदन केले.

भगवंतांनी ज्ञानदेवांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. सर्व संतमंडळी शोकाकूल झाली होती. आर्त स्वरात भजन चालले होते. नामघोषाने दशदिशा भरुन टाकल्या होत्या. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांनी शेवटी परत एकदा साष्टांग प्रणिपात केला. भावंडांनी ज्ञानदेवांचे अखेरचे दर्शन साश्रूनयनांनी घेतले. शेवटी, निवृत्तिनाथांनी ज्ञानदेवांना एका हाताने धरले आणि समाधिस्थानातील आसनावर नेऊन बसविले, अखेर ज्ञानदेवांनी डोळे मिटले.

वास्तववादी धर्मसुधारक, क्रांतदर्शी, तत्वज्ञ, अनुभूतिवादी संत आणि प्रतिभासंपन्न कवी, भागवत धर्माचे प्रवक्ते असे महान आणि माझे आवडते संत ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्र संस्कृतीच्या ज्ञानाचे चालते बोलते बिंब, कैवल्याचा पुतळा, कार्तिक वैद्य १३ शके १२१८ ला समाधिस्थ झाले .

आज जरी ते आपल्यासोबत नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे ज्ञान आजही अजरामर आहे.

रुप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी .

तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा .

बहुता सकृतांची जोडी |

म्हणुनी विठ्ठली आवडी

सर्व सुखांचे आगरु |

बाप रखुमादेवी वरु || “

            – तेजल तानाजी पाटील

              बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या maza avadta sant essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta sant nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majha avadta sant essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण maza avadta sant in marathi essay या लेखाचा वापर sant dnyaneshwar essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!