मेधा पाटकर यांची माहिती Medha Patkar Information in Marathi

Medha Patkar Information in Marathi – Medha Patkar Biography मेधा पाटकर यांची माहिती समाजसुधारणेची मशाल हाती घेतलेल्या मेधा पाटकर यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. गेले तीस वर्ष मेधा पाटकर महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश आणि गुजरात मधील विस्थापित लोकांच्या हक्कासाठी झुंज देत आहेत. विशेष करून मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलन साठी प्रसिद्ध आहेत. इसवी सन १९८५ पासून त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनामध्ये मेघाताई विस्थापित रहिवाशांच्या हक्का साठी लढा देत होत्या. मेधा पाटकर या एक समाजसेवक समाजसुधारक व भारतीय राजकारणी देखील आहेत.

medha patkar information in marathi
medha patkar information in marathi

मेधा पाटकर यांची माहिती मराठी – Medha Patkar Information in Marathi

पूर्ण नाव मेधा पाटकर
जन्म११ डिसेंबर १९५४
जन्म गावमहाराष्ट्रातल्या मुंबई शहरांमध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख समाजसेवक समाजसुधारक
पुरस्कारमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, मानवी हक्क रक्षक पुरस्कार.

जन्म व वैयक्तिक आयुष्य 

मेधा यांचा जन्म ११ डिसेंबर १९५४ रोजी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरांमध्ये झाला. मेधा यांचं संपूर्ण नाव मेधा वसंत खानोलकर असं आहे. मेधा यांचे वडील वसंत खानोलकर यांचा भारतीय स्वातंत्र्य सामग्रीत सक्रिय सहभाग होता. याशिवाय ते कामगार संघटनेचे नेते होते. आई स्वादर नावाच्या संस्थेच्या कार्यकर्त्या होत्या. मेधा यांचे आई-वडील वैचारिक दृष्ट्या प्रगत विचारांचे होते.

त्यामुळे मेधा यांच्या विचारांवर त्यांच्या आईवडिलांच्या विचारांचा प्रभाव होता. साधा पोशाख, साधारण राहणीमान, गोड स्वभाव, कणखर आवाज, तल्लख बुद्धिमत्ता, सामाजिक बांधिलकी या सगळ्यांचा समूह म्हणजे मेधाताई यांचे व्यक्तिमत्व होय. मेधा ताई यांचे आई-वडील प्रगत विचारांचे असल्यामुळे मेधाताईं वर कुठल्याही प्रकारचे बंधन नव्हतं.

त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी होती त्यांना आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी शिकवलं गेलं. मेधा पाटकर यांनी मुंबईच्या रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेतून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मेधाताई यांनी टाटा सामाजिक शास्त्रज्ञ संस्थेमधून एम.ए ची पदवी मिळवली. पुढील सात वर्ष मेधाताई मुंबईमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देत होत्या.

मेधाताईंनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेमध्ये देखील शिक्षक म्हणून आपली सेवा दिली होती. मेधाताई हे नाव मेधा पाटकर यांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळालं आहे. मेधा पाटकर यांचा विवाहदेखील झाला होता. परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. सात वर्षाचा संसार करून शेवटी गोष्टी घटस्फोटावर येऊन थांबल्या.

राजकीय आयुष्य

मेधा पाटकर यांनी नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मोमेंट्स ची स्थापना केली. ही एक भारतीय लोकचळवळ ची युती आहे. ज्याच्या मध्ये देशभरात शांती, न्याय आणि जनतंत्रासाठी काम करते. इतकच नव्हे तर या संस्थेद्वारे समाजातील आर्थिक, राजकीय न्याय, सम विषमता या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याचं काम करते.

समाजातील सम विषमता दूर करणे आणि सामाजिक चळवळींना बळ देण्यासाठी तसंच अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी आणि देशाच्या विकास योजना विरुद्ध प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मेधा पाटकर या एक राजकारणी देखील आहेत. २०१४ मध्ये मेधा पाटकर या आम आदमी जनता पार्टी जी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते.

या पक्षांमध्ये सामील झाल्या लोकसभा प्रचारादरम्यान मेघा पाटकर यांनी या पक्षाला पाठिंबा दिला होता. २०१४ मध्ये मेधा पाटकर लोकसभा निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून उतरल्या होत्या. परंतु खुप कमी मतांनी निवडून आल्यामुळे त्या या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकल्या नाही.

२०१५ रोजी मार्चमध्ये मेधा पाटकर यांनी आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इसवी सन २०१६ साली राष्ट्रीय सेवा दलाचे सरचिटणीस डॉक्टर सुरेश खैरनार यांनी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात जाहीरपणे सर्वांना सांगून टाकले की मेधा पाटकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्याही राष्ट्रीय संघटनेला राष्ट्रीय सेवा दलाचा संपूर्ण पाठिंबा असेल.

मेधा पाटकर एक समाजसेविका

मेधा पाटकर या एक भारतीय समाजसेविका आहेत. सामाजिक कार्यामध्ये यांचा सक्रीय सहभाग असतो. मेधा पाटकर या गेले तीस वर्ष राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर आधारित प्रश्न सोडवण्याचे काम करतात. मेधा पाटकर या मुख्यता आदिवासी जमात, शेतकरी मजूर, दलित आणि महिलांना समाजात मिळणारी उच्चनीचता या सगळ्या मुद्द्यांवर आपला आवाज उठवतात.

पाच वर्ष मेधा पाटकर या मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये उगवणाऱ्या समस्यांवर स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत होत्या, त्यानंतर गुजरातच्या ईशान्य जिल्ह्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये त्यांनी आदिवासी जमातीचे प्रश्न सोडवण्याचे काम तीन वर्षे केलं. त्याशिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये फॅकल्टी सदस्य देखील होत्या. मेधा पाटकर या टीआयएसएस मध्ये पीएचडी आहेत.

शिवाय अर्थशास्त्राचा विकास आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याचा अभ्यास देखील त्या करत आहेत. मेधा पाटकर यांची सामाजिक क्षेत्रातील खरी सुरुवात नर्मदा बचाव आंदोलना पासून सुरु झाली. नर्मदेच्या खोऱ्यातील आदिवासी आणि शेतकरी समुदायाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हा लढा १९८५ मध्ये सुरू केला. नर्मदा बचाव आंदोलन ही एक सामाजिक चळवळ आहे.

जी मेधा पाटकर यांनी सुरू केली आहे. ही चळवळ नर्मदा नदी वरील धरणांच्या बाबतीत आहे. तीन राज्यांमध्ये पसरलेल्या नर्मदा खोऱ्यातील आदिवासी, शेतकरी, मासे कामगार, मजूर आणि इतर घटकांसाठी मेधा पाटकर यांनी लढा दिला. गुजरात मधील सरदार सरोवर हे धरण नर्मदे वरील सर्वात मोठे धरण असल्यामुळे मेधा पाटकर ३४ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलना मध्ये सरदार सरोवराच्या धरणामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या हक्कासाठी लढत आहेत.

धरणाची पातळी वाढल्यावर प्रदेशातील अनेक गावांमध्ये पूर येतो ज्यामुळे गावात राहणाऱ्या नागरिकांना पूरग्रस्त भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवन विस्कळीत होतं. स्थानिक विस्थापित लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन स्थापन करण्यात आले आहे.

गुजरात मधील नर्मदा नदीवरील सरदार या सरोवरामुळे त्या भागातील बहुतांश आदिवासींचे विस्थापन झाले आहे. त्या आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी आणि पुनर्वसन करून मिळाव व योग्य ती भरपाई मिळावी म्हणून या आंदोलनास सुरुवात झाली आहे. हे‌ आंदोलन सुरू असताना मेधाताईंनी नर्मदा खोरे विकास प्रकल्पातील भ्रष्टाचारऱ्यांना त्यांची जागा दाखवुन दिली.

भ्रष्टाचाराचे बरेच प्रकरण मेधा ताईंनी समाजासमोर आणली. नर्मदा खोरे विकास प्रकल्पात नर्मदा नदी आणि तिच्या उपनद्यांवर हजारो धरणे बांधण्याचा प्रस्ताव होता ज्याला सरकारने १९७९ मध्ये मान्यता दिली. ९ ऑगस्ट १९८५ रोजी नर्मदा नदीचा विकास प्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने मंजूर केला होता.

हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प होता जो महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नर्मदा नदी आणि तिच्या उपनद्यांवर मोठ्या प्रमाणावर धरणे बांधण्याची कल्पना होती. या बांधकामाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक लोकांवर पडत होता. नर्मदा खोऱ्यातील शेतकरी, आदिवासी, मत्स्य कामगार, मजूर इत्यादींनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलना मध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला.

नर्मदा बचाव आंदोलन ही चळवळ गेल्या ३४ वर्षापासून आरोग्य, रोजगार हमी, अन्नाचा अधिकार, आणि पीडीएस पुनर्वसन आणि पर्यावरण संरक्षण या इतर क्षेत्रांमध्ये काम करत आहे. २००५ मध्ये मेधा पाटकर यांनी मुंबईच्या झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी सुरु केलेला घर बचाव घर बनाव आंदोलन अजूनही सुरू आहे.

या लढ्यामध्ये झोपडपट्टीतल्या रहिवाशांची विविध पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये बिल्डरकडून फसवणूक झाल्यामुळे त्यांच्या हक्कासाठी मेधाताई पाटकर घर बचाव घर बनाव आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मेधा पाटकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे एक गोष्ट साध्य झाली की समाजातील सर्व घटकांना समानतेचा अधिकार आहे.

आपल्या हक्कासाठी लढण्याचा हक्क आहे. आदिवासी जमाती, अशिक्षित लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांना आपल्या हक्कासाठी लढायला शिकवलं. यातून लोकशिक्षण झालं. अगदी राज्य सरकारपासून ते केंद्र सरकारा पर्यंत आणि जागतिक बँकांच्या अधिकाऱ्यांपर्यंत मेधा ताईंचा धबधबा आहे. जनकल्याणासाठी मेधा ताईंनी स्वतःचा पोट आळवल, उपोषणं केली.

गौरव व पुरस्कार

मेधा पाटकर यांना त्यांच्या समाजातील योगदाना साठी अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यातीलच काही पुरस्कार म्हणजे मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार, 1991 मध्ये राईट लाईव्हलिहुड अवॉर्ड स्वीडन येथे प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, मानवी हक्क रक्षक पुरस्कार.

आम्ही दिलेल्या medha patkar information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेधा पाटकर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या medha patkar full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about medha patkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of medha patkar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!