mhada information in marathi – mhada history in marathi म्हाडाचा इतिहास, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) या विषयी माहिती आणि याचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) हि एक ऑनलाईन लॉटरी आहे ज्याच्याद्वारे विजेत्यांना घरे वाटप केली जातात. म्हाडा हि एक प्रकारची गृहनिर्माण योजना आहे ज्यामध्ये निवडलेल्या विजेत्यांना ऑनलाईन लॉटरी ड्रॉद्वारे ८००० हून कमी खर्चाचे युनिट वाटप केले जाते आणि हा गृहनिर्माण प्रकल्प जिथे लागू होतो म्हणजेच मुंबई ( सांगली, कांदिवली, मीरा रोड इ. ), पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८९८४ घरे / सदनिका वाटप करणार आहे.
गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सुरु केला आहे आणि हा प्रकल्पाचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील रहिवाश्यांनाच फक्त होतो. प्रत्येक कुटुंबाला चांगला आणि योग्य निवारा मिळावा हा एखाद्याच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आवश्यक पैलू आहे आणि समाजातील प्रेत्येक स्तराला आर्थिक आणि शाश्वत घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची स्थापना १९७३ साली करण्यात आली.
जर एखाद्या व्यक्तीला म्हाडा चा लाभ घ्यायचा असल्यास त्या व्यक्तीला अनेक पात्रता निकष देखील पार पडावे लागतात आणि सर्व इच्छुक अर्जदार म्हाडाच्या अधिकृत साइटवर नोंदणी करून म्हाडा गृहनिर्माण योजनासाठी अर्ज करू शकतात. चला तर आता आपण म्हाडाच्या इतिहासाबद्दल आणखीन माहिती खाली जाणून घेवूया.
म्हाडाचा इतिहास – Mhada Information in Marathi
योजनेचे नाव | म्हाडा लॉटरी |
पूर्ण स्वरूप | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
लाभाराठी | महाराष्ट्रातील रहिवासी |
म्हाडा म्हणजे काय – mhada full form in marathi
म्हाडा (Mhada) म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि म्हाडा (mhada) हि एक प्रकारची गृहनिर्माण योजना आहे ज्यामध्ये निवडलेल्या विजेत्यांना ऑनलाईन लॉटरी ड्रॉद्वारे ८००० हून कमी खर्चाचे युनिट वाटप केले जाते.
म्हाडा ची उदिष्ठ्ये
- प्रत्येक श्रेणीसाठी घरांची किंमत वेगवेगळी असेल.
- म्हाडा २०२२ पर्यंत राज्यातील प्रत्येक रहिवाशाला स्वतःचे घर देण्याचा प्रयत्न करत आहे.
- EWS, LIG, MIG आणि HIG कव्हर करणाऱ्या प्रत्येक उत्पन्न श्रेणी गटामध्ये प्राधिकरणाचा समावेश करणे.
- महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण याचे मुख्य उद्दिष्ट लोकांचे राहणीमान उंचावणे हे आहे.
म्हाडा चा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा ) या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते पात्रता निकष काय काय आहेत ते आपण पाहूया.
- संगल्यात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
- अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- एमआयजी फ्लॅटसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०००१ ते ७५००० रुपयांच्या दरम्यान आले पाहिजे.
- एलआयजी फ्लॅटसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५००१ ते ५०००० रुपयांच्या दरम्यान असले पाहिजे.
- दरमहा ७५००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे अर्जदार एचआयजी फ्लॅटसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. मुलाच्या नावे कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
म्हाडा चा इतिहास – mhada history in marathi
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण हि सर्वात लोकप्रिय संस्था आहे आणि गेल्या सात दशकामध्ये म्हाडाने राज्यामध्ये एकूण ७०५० लाख कुटुंबांना परवडणारी घरे दिली आहेत. स्वातंत्र्यानंतर वाढत्या औद्योगीकरणामुळे वाढत्या शहरीकरणाला चालना मिळाली कारण लोक आपल्याला चांगल्या नोकऱ्या आणि रोजगार शहरामध्ये मिळतील म्हणून ग्रामीण भागातील लोक हे शहराकडे वळले. तसेच दुसऱ्या महायुध्दा नंतर, भरतीची फाळणी आणि पाकिस्थानच्या निर्मिती नंतर इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतर झाले.
अनेक हिंदू निर्वासित मुंबई शहरामध्ये स्थाईक झाले आणि त्यावेळी भारत सरकारने त्यांना आश्रय दिला परंतु यामुळे घरांची टंचाई जाणवू लागली आणि म्हणून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री या गृहनिर्माण विधेयक मंजूर झाले आणि कायद्यांतर्गत बॉम्बे हाऊझिंग बोर्ड हे १९४८ मध्ये स्थापन झाले.
अनेक वैधानिक संस्थाद्वारे केलेले उपक्रम आणि कार्ये एकत्रित करण्यासाठी आणि घरांच्या समस्येसाठी सर्वसमावेशक आणि समन्वित दृष्टीकोन प्रधान करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना हि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास कायदा १९७५ द्वारे करण्यात आली. सर्व विद्यामान गृहनिर्माण मंडळे ५ डिसेंबर १९७७ मध्ये महारष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाची मंडळाची पुनर्रचना ५.११ च्या शासन निनानायाद्वारे करण्यात आली.
नंतर राज्यामध्ये प्रादेशिक मंडळाची स्थापना करण्यात आली जसे कि पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ आणि अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ. त्यानंतर १० फेब्रुवारी १९८९ रोजी एका विशेष शासकीय आदेशाद्वारे गृहनिर्माण प्राधिकरणाच्या अंतर्गत कोकण गृहनिरमण आणि क्षेत्र विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आणि अशा प्रकारे म्हाडाचा इतिहास आहे.
म्हाडाविषयी काही महत्वाची माहिती – Important information about mhada
- लॉटरी पद्धतीने राज्यातील बेघर रहिवाशांना परवडणारी घरे वाटप करते आणि ही घरे सर्वोच्च दर्जाची असतील आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली असतात.
- सर्व इच्छुक अर्जदार म्हाडाच्या अधिकृत साइटवर नोंदणी करून म्हाडा गृहनिर्माण योजनासाठी अर्ज करू शकतात.
- म्हाडा योजनेचा लाभ नोंदणी करावी लागते आणि हि नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची असते ती म्हणजे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, चालक परवाना, पासपोर्ट आणि जन्म प्रमाणपत्र.
- म्हाडा मुंबई योजना लॉटरी पद्धतीने १३०० पेक्षा कमी किमतीची घरे देते आणि अर्जदारांना त्यांच्या उत्पन्नावर आधारित वेगळे केले जाते. या घरांची किंवा फ्लॅटची किंमत रु. १४.६ लाख ते रु. ५.८ कोटी आणि उत्पन्न गटानुसार बदलते.
- म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) १५००० ते ७५००० रुपयांपर्यंत आहे.
आम्ही दिलेल्या mhada information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर म्हाडाचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mhada history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट