मिक्स व्हेज रेसिपी Mix Veg Recipe in Marathi

Mix Veg Recipe in Marathi मिक्स व्हेज रेसिपी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून खातो परंतु आपल्याला काही वेळा मसालेदार आणि चमचमीत खावेसे वाटल्यास आपण काही मसालेदार आणि चमचमीत भाज्या बनवून खातो जसे कि पनीर मसाला, पनीर कुर्मा, व्हेज कुर्मा, पनीर टिक्का, कढई पनीर, काजू करी, काजू मसाला, व्हेज कोल्हापुरी यासारख्या भाज्या बनवू खातो तसेच आज आपण या लेखामध्ये चमचमीत आणि मसालेदर मिक्स व्हेज रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मिक्स व्हेज रेसिपी हि वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवलेली असते आणि त्याला काही मसाल्यांची फोडणी दिली जाते.

मिक्स व्हेज हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक लोकांना आवडते आणि हि भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवली जाते. मिक्स व्हेज हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आपण हि रेसिपी खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनवू शकतो आणि हि रेसिपी रोटी, चपाती किंवा नान सोबत सर्व्ह करू शकतो. चला तर मग आता आपण मिक्स व्हेज रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

mix veg recipe in marathi
mix veg recipe in marathi

मिक्स व्हेज रेसिपी – Mix Veg Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दतसोपी

मिक्स व्हेज कसे बनवतात ? 

मिक्स व्हेज बनवताना आपण सर्वप्रथम ग्रेवी बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेतो आणि मग ती ग्रेवी फोडणी टाकतो आणि मग त्यामध्ये तेलामध्ये चांगल्या कुरकुरीत भाजलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतो आणि ते शिजवतो.

नक्की वाचा: व्हेज कटलेट रेसिपी 

मिक्स व्हेज रेसिपी – mix bhaji recipe

मिक्स व्हेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी वापरल्या जातात जसे कि फ्लॉवर, मटार, फरसबी, शिमला मिरची, बटाटे ह्या भाज्या वापरल्या जातात. मिक्स व्हेज हि रेसिपी खूप मसालेदार आणि झणझणीत असल्यामुळे हि रेसिपी अनेक लोकांची आवडती डिश आहे आणि हि रेसिपी महाराष्ट्राबरोबर देशाच्या काही भागामध्ये देखील आवडीने बनवली जाते.

मिक्स व्हेज रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण मिक्स व्हेज रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दतसोपी

मिक्स व्हेज बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mix veg recipe 

मिक्स व्हेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी वापरल्या जातात जसे कि फ्लॉवर, मटार, फरसबी, शिमला मिरची, बटाटे आणि ह्या मधील सर्व भाज्या आपल्या घरामध्ये उपलब्ध नसतात त्यामुळे त्या आपल्याला बाजारातून आणाव्या लागतात तसेच हि रेसिपी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते त्यामधील काही साहित्य घरी असते आणि काही साहित्य घरी नसते ते बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण मिक्स व्हेज बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धी वाटी शिमला मिरची ( चैकोनी चिरलेली ).
  • अर्धी वाटी फ्लॉवर ( सुटे करून घेतलेले ).
  • अर्धी वाटी फरसबी ( चिरलेले ).
  • अर्धी वाटी बटाटा ( चौकोनी चिरलेला ).
  • १ मोठा चमचा वटाणे.
  • १ मध्यम आकाराचा कांदा.
  • १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ वाटी सुखं खोबरं ( खिसलेलं ).
  • २ ते ३ चमचा तीळ.
  • १/२ चमचा जिरे
  • अर्धा मोठा चमचा कोथिंबीर.
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा हळद
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

मिक्स व्हेज बनवण्यासाठी केली कृती – process to make mix veg recipe 

मिक्स व्हेज घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि खूप कमी वेळेमध्ये मसालेदार आणि चमचमीत बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मिक्स व्हेज कसे बनवायचे ते पाहूयात.

  • सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या आणि त्या बाजूला ठेवा.
  • आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये सुखं खोबरं घाला आणि ते भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढा आणि त्यामध्ये तीळ आणि जिरे देखील भाजून घ्या आणि ते खोबऱ्यामध्ये घाला.
  • भाजलेले खोबरे, तीळ, जिरे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्यामध्ये कोथिंबीर घाला आणि ते मिक्सरला फिरवा आणि बारीक करून घ्या आणि परत त्यामध्ये थोडे पाणी घालून परत मिक्सरला फिरवून चांगली बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि सर्व भाज्या मध्यम आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्या आणि त्या भाज्या बाजूला ठेवा.
  • आता त्याच कढई मध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ते तेलामध्ये काही सेकंद परत आणि मग त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि तो लालसर रंग येई पर्यंत भाजा मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि टोमॅटो ५ मिनिटे भाजा.
  • आता टोमॅटो चांगला भाजला कि त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घाला आणि ते मिक्स करा आता यामध्ये आपण बनवून ठेवलेली पेस्ट घाला आणि ती चांगली मिक्स करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण थोडे सरसरीत करा.
  • आता यामध्ये भाजून ठेवलेल्या भाज्या आणि चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि त्यामध्ये गरज असेल तर पाणी घाला आणि याला झाकण लावून मध्यम आचेवर हि भाजी ७ ते ८ मिनिटे चांगली शिजवून घ्या. भाज्या चांगल्या शिजल्या कि गॅस बंद करा.
  • मिक्स व्हेज भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

मिक्स व्हेज कश्यासोबत खातात – serving suggestions 

  • गरमागरम मिक्स व्हेज भाजी आपण चपाती, रोटी, पुरी, नान किंवा जीरा राईस सोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या mix veg recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मिक्स व्हेज रेसिपी माहिती मराठी mix bhaji recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mix veg kolhapuri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mix veg sabzi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mix veg bhaji recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!