My Childhood Essay in Marathi माझे बालपण निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझे बालपण किंवा लहानपण या विषयावर निबंध लिहिणार आहोत. बालपण हे सर्वांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग असतो तसेच जगामध्ये प्रत्येकाचे बालपण हे खूप आनंदामध्ये गेलेले असते आणि त्यामुळे बालपणीच्या खूप आठवणी आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात आणि त्या आठवणी आज देखील आठवल्या तर आपल्याला असे वाटते कि आपले बालपण परत यावे कारण बालपण हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदायी आणि निश्चिंत पने आयुष्य जगण्याचा टप्पा आहे.
तसेच बालपणी आपल्या आयुष्यामध्ये अश्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात ज्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात तसेच आपले बालपण हा आपल्या जीवनाचा पाया असतो कारण आपण सार्वजन याच टप्प्यामध्ये अनेक गोष्टी शिकतो तसेच या वयामध्ये आपण जे काही शिकू ते आयुष्यभर लक्ष्यात राहू शकते.
माझे बालपण निबंध मराठी – My Childhood Essay in Marathi
Majhe Balpan Marathi Nibandh
आज देखील लहान मुले आणि मुली शाळेला जाताना पहिले किंवा ग्राऊंड मध्ये खेळताना पहिले कि आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणी बहरतात जसे कि आपले ग्राऊंड मध्ये खेळणे, लवकर आवरून शाळेचा ड्रेस घालून मित्राच्या ग्रुप मधून शाळेला जाणे, संध्याकाळी शाळेतून आले कि बॅग टाकणे आणि परत खेळायला जाने, रोजचा शाळेमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण करणे हे आठवले कि वाटते आणि आम्ही लहान झालो तर किती चांगले होईल, आम्हालाही निश्चिंत पणे जगता येईल तसेच खेळलात येईल आणि बागडता येईल आणि म्हणूनच देवाला असे म्हणावेसे वाटते कि ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेच रवा’ म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि आपण लहान असलो कि आपले सर्वजन कौतुक करतात.
बालपण हा टप्पा खूप आनंदाचा आणि मजेमध्ये घालवला जाणारा टप्पा आहे असे मला वाटते कारण या टप्प्यामध्ये आपल्यावर कोणत्याही जबाबदाऱ्या नसतात किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची काळजी नसते तसेच आपल्याला जे हवे आहे ते लगेच मिळते. पण मोठे झाल्यानंतर मात्र अनेक जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर येवून पडतात तसेच कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी आपल्या अगावर येवून पडते आणि त्यावेळी काही वेळा विचार केल्यानंतर असे वाटते कि आपण लहानाचा असतो तर किती चांगले झाले असते.
लहानपणा विषयाच्या अनेक आठवणी प्रत्येकाच्या असतात आणि माझ्या देखील लहानपणीच्या असंख्य आठवणी आहेत आणि आज त्या आठवल्या कि वाटते कि आपण परत लहानपनामध्ये परत जावे आणि लहानपण परत जगावे. बालपणामध्ये आपले आई – वडील आपले पालन पोषण करायचे आणि आपल्याला जे हवे आहे ते हट्ट करून असो किंवा मग न हट्ट करता आपल्याला हवे ते मिळायचे आणि त्या काही वस्तू असोत किंवा मग खाण्यचे पदार्थ असोत किंवा मग कोठे बाहेर फिरायला असो सर्व गोष्टी आपले वडील किंवा आपली आई पूर्ण करायची.
आपले वडील आपले भावी जीवन घडवण्यासाठी जीवाचे रान करायचे तर आपली आई आपल्या खाण्या पिण्याकडे चांगले लक्ष द्यायची आणि आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवायची. तसेच लहान असतात घरामधील सर्व लोक आपले कौतुक करतात आणि जर आपण घरामध्ये घरामध्ये एकटेच लहान असलो तर काय विषयच नाही.
आमच्या घरामध्ये मी एकटाच लहान होतो आणि मी घरातील एकुलता एक होतो त्यामुळे आई – बाबा, आजी आणि काका – काकू देखील माझे खूप लाड करायचे आणि काका मला खूप फिरवत होते आणि बाबांच्या पेक्षा माझे जास्त लाड हे काकांच्या कडूनच व्हायचे कारण काका कुठेही बाहेर चालले कि मला घेवून जाणार आणि मग दुकानातून मला आवडणारे खायला देत होते तसेच घरी येताना माझ्यासाठी न चुकता खावू आणत होते.
माझे बाबा तसे कडक स्वभावाचे होते परंतु ते देखील खूप प्रेमळ होते ते देखील माझे लाड करायचे पण ते माझ्या भावी आयुष्याबद्दल चिंतीत असल्यामुळे ते माझ्यासोबत कडक वागायचे. बालपणी काकू आणि आई देखील आमच्या अवती भोवती असायच्या त्यामुळे मला खूप छान वाटायचे आणि आमची आजी मला पूर्वीच्या काही सत्य घटना सांगायची तसेच काही मजेशीर गोष्टी देखील खूप सांगायची आणि मला बालपणी आजीच्या अंगाई शिवाय झोप लागायची नाही.
हे झाले मी बालपणी माझ्या घरामध्ये कसा वावरत होतो याचे वर्णन आणि आपल्या बालपणामध्ये आपल्या बालपणीच्या मित्रांचा देखील खूप मोठा वाटा असतो कारण लहानपणी आपण मित्रांच्या सोबत देखील खूप मज्जा मस्ती केलेली असते. लहानपणी आम्ही शाळेला जाताना आमचा खूप मोठा गट होता आणि आम्ही आवरून एकमेकाला बोलवून सगळे जमले कि मग शाळेला जाणारा तसेच शाळेतून यातना देखील खूप मजा – मस्ती करत येणार आणि आम्ही शाळेला चालत जात होतो.
आणि आमची शाळा घरापासून एक ते दीड किलो मीटर अंतरावर होती आणि आमच्या शाळेच्या रस्त्यावर अनेक आंब्याची, चिंचेची झाडे होती आणि आम्ही शाळेतून येताना आंबे लागायला सुरुवात झाली त्या झाडावर चढून कि कच्चे आंबे तोडून आणणार तसेच चिंचा देखील तोडून आणणारा आणि त्या कच्च्या आंब्याचा आम्ही करम करून खात होतो.
तसेच मी एकदा कच्चे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलो होतो आणि त्यावेळी तेथे त्या झाडाचा मालक आला होता आणि त्यावेळी झाडाच्या खाली उभे असलेले सर्व मित्र पळून गेले आणि मी झाडावरच राहिलो आणि त्यामुळे मी पकडला गेलो त्यावेळी त्याने आमच्या घरी तक्रार घेवून आला होता त्यावेळी बाबांनी मला बदडले होते पण मी काकांच्यामुळे बाबांच्या तावडीतून वाचलो होतो आणि त्यावेळी पासून मी आंबे तोडणे बंद केले होते.
तसेच मला बालपणी सकाळ चालवणे देखील खूप आवडायचे त्यामुळे मी कधी कधी शाळेला सायकल देखील घेवून जात होतो तसेच सुट्टी दिवशी मी आणि माझे मित्र हिंडण्याचा आणि खेळण्याचा प्लॅन हा ठरलेलाचा असायचा आम्ही सुट्टी दिवशी एकदा जेवून गेलो कि दिवसभर घरामध्ये जाणार नाही तर दिवसभर लंपडाव खेळणे, क्रिकेटने खेळणे, झाडावर चढण्याची स्पर्धा म्हणजे झाडावर चडताना कोण अगोदर चढणार, तसेच गल्लीतून सायकल वरून फेऱ्या काढणे असे उपक्रम आम्ही सुट्टी दिवशी करत होतो.
तसेच आम्ही हे सर घराजवळ करत असल्यामुळे तहान लागल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर घरी जाऊन काही तरी स्नॅक्स खावून येणारा. तसेच सुट्टीच्या दिवशी आम्ही विहिरीला पोहायला जाणार आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा पोहायला जाणार अश्या प्रकारे आम्ही आमचे बालपण खूप आनंदामध्ये आणि मजेत घालवले आहे.
आम्ही दिलेल्या my childhood essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझे बालपण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ESSAY ON MY CHILDHOOD IN MARATHI या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Majhe Balpan Marathi Nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट