निलगिरी झाडाची माहिती Nilgiri Plant Information in Marathi

nilgiri plant information in marathi निलगिरी झाडाची माहिती, आपण निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहतो जसे कि अनेक वेगवेगळ्या फळांची झाडे, वडाचे झाड, सागवानचे झाड, पिंपळाचे झाड, कडूलिंबाचे झाड, अशोकाचे झाड आणि अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात आणि आज आपण या लेखामध्ये पण निलगिरी झाडाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. निलगिरीचे झाड हे मायर्टेस या कुटुंबातील असून या झाडाचे शास्त्रीय नाव यूकॅलिप्टस असे आहे. निलगीरीचे झाड हे सामन्यात मध्यम आकाराचे किंवा मोठे असते.

आणि ते बहुतेकदा मोठे किंवा उंच वाढते म्हणजेच या झाडाची उंची २६ ते ५० मीटर पर्यंत वाढू शकते. ब्रिटीशांच्या काळामध्ये इंधन आणि लाकूड या सारखा वापरासाठी १८४३ मध्ये तामिळनाडूच्या निलगिरी टेकड्यामध्ये निलगिरीचे झाड लावले होते.

निलगिरीचे झाड हे खूप प्राचीन झाड म्हणजेच १८ व्या दशकातील झाड आहे आणि हे झाड अनेक औषधी उपचारासाठी आणि लाकडाच्या वापरासाठी वापरले जाते. निलीगीरीचे झाड हे डिंकसारखे चिकट पदार्थ तयार करते आणि यामुळे डिंकातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणांमुळे हे झाड अपवादात्मकपाने कीटक प्रतिरोधक असते .

तसेच झाडाच्या गुळगुळीत, तपकिरी बाहेरील सालच्या खाली निळसर पांढऱ्या सालचे विस्तीर्ण ठिपके असतात. गुळगुळीत, जाड, राखाडी हिरवी पाने कालांतराने टोकदार लंबवर्तुळाकारामध्ये विकसित होतात.

nilgiri plant information in marathi
nilgiri plant information in marathi

निलगिरी झाडाची माहिती – Nilgiri Plant Information in Marathi

झाडाचे नावनिलगीरीचे झाड
कुटुंबमायर्टेस
शास्त्रीय नावयूकॅलिप्टस
झाडाची उंची२६ ते ५० मीटर
निलगिरीची इतर नावेनिलगिरी तैला, तैलपत्र, सुगंधपत्र या नावानी देखील निलगिरीच्या झाडाला ओळखले जाते.
निलगिरीची झाडे कोणत्या प्रदेशामध्ये जास्त असतातहि झाडे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, निलगिरी टेकडी, केरळ आणि म्हैसूर मध्ये कस्त प्रमाणात आहेत.

निलगिरी झाडाचा इतिहास – information of nilgiri plant in marathi

ब्रिटीशांच्या काळामध्ये इंधन आणि लाकूड या सारखा वापरासाठी १८४३ मध्ये तामिळनाडूच्या निलगिरी टेकड्यामध्ये निलगिरीचे झाड लावले होते. निलगिरीचे झाड हे खूप प्राचीन झाड म्हणजेच १८ व्या दशकातील झाड आहे आणि हे झाड अनेक औषधी उपचारासाठी आणि लाकडाच्या वापरासाठी वापरले जाते.

निलगिरी झाडांच्या लावणीच्यावेळी घेतली जाणारी काळजी

  • निलगिरीचे झाड हे उंच म्हणजेच २५ ते ५० मीटर उंची पर्यंत वाढते त्यामुळे हे इमारतींच्या रचनेपासून दूर लावले पाहिजे कारण यामुळे हानी पोहचण्याची शक्यता असू शकते
  • वसंत ऋतूच्या मध्यापासून ते शरद ऋतूच्या काळामध्ये निलीगिरीची लागवड करण्यासाठीचा एक योग्या काळ आहे.
  • निलगिरीच्या झाडाला ओलावा गरजेचा असतो त्यामुळे त्याला योग्य वेळी पाणी पुरवणे गरजेचे असते.
  • ज्या ठिकाणी तुम्ही या झाडाची लागवड करणार आहात त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानासाठी पोरेशी कठोर प्रजाती निवडा ज्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होण्यास मदत होईल तसेच निलगिरीची अशी प्रजाती निवडा जी प्रौढ झाल्यानंतर तुमच्या लँडस्केपमध्ये बसेल.
  • तसेच पूर्णपणे सूर्यप्रकाश आणि चांगला निचरा होणारी जागा झाड लावण्यासाठी निवडा.  
  •  

निलगिरी झाड लावल्यानंतर झाडाची काळजी कशी घेतले जाते – how to care

  • कुंडीमध्ये वाढलेल्या टॅस्मानियम निळ्या हिरड्यापेक्षा, जमिनीत उगवलेल्या टॅस्मानियम निळ्या हिरड्यांना फार कमी किंवा काहीही आहार देण्याची गरज नसते. मोठ्या झाडांच्या वाढीसाठी वसंत ऋतूमध्ये पाण्यात विरघळनारी खाते किंवा १०-३०-१० सारखे हळूहळू सोडणारी दाणेदार खाते घाला.
  • जर झाडे कोवळी असली तर त्या झाडांची छाटणी केली तर त्या झाडांची वाढ हि चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. जर तुम्ही मोठ्या झाडांची कापणी केली तर त्याला बहु दांडाचे झुडूप तयार होते.
  • या झाडांच्या वाढीसाठी पाणी हे महत्वपूर्ण भूमिका बजावते त्यामुळे या झाडांना योग्य त्या वेळी पाणी पुरवणे गरजेचे असते.
  • लागवडीनंतर पहिल्या हंगामामध्ये निलगिरीच्या झाडाला चांगले पाणी द्यावे लागते.

निलगिरीच्या झाडाचा वापर – nilgiri plant use in marathi

खूप पूर्वी पासून म्हणजेच १८ व्या शतकापासून निलगिरी झाडाची लागवड केली आणि या झाडाची लागवड करण्याचे मुख्य कारण म्हणजेच या झाडाचा वापर अनेक कारणांच्यासाठी होतो आणि ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये या झाडाचा वापर हा औषधी उपचारासाठी किंवा लाकडाच्या वापरासाठी केला जातो.

  • औषधी उपचारासाठी आणि लाकडासाठी या झाडाचा प्राथमिक वापर होत होता.
  • निलीगीरीच्या पानांचा वापर हा अनेक उपचारांच्यासाठी केला जात होता तसेच पानांच्या पासून तेल देखील तयार केले जाते.
  • त्याचबरोबर निलगिरीच्या पानांचा वापर हा पाककृती मध्ये देखील केला जात होता.
  • निलगिरी ची हि वनस्पती काही ठिकाणी सजावटीच्या उद्देशाने देखील वापरली जाते.
  • या वनस्पतीच्या लाकडाचा वापर हा घरे बांधण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू तयार करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर या झाडाच्या लाकडाचा वापर कागद बनवण्यासाठी देखील केला जातो.

निलगिरीचे औषधी वापर – nilgiri medicinal plant information in marathi

  • निलगिरीचा वापर हा अनेक प्रकारे औषध उपचारांच्यासाठी केला जातो म्हणजेच याचा वापर अनेक आरोग्य समस्यांच्यावर केला जातो आणि त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
  • जर तुम्हाला वेदना होत असतील आणि त्यापासून आपल्याला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही निलगिरीचा अर्क घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेदनेपासून आराम मिळू शकते.
  • जर एखादा व्यक्ती सर्दी, खोकला आणि श्वसन समस्येने त्रस्त असेल किंवा त्याचा घसा सतत खवखवत असेल तर त्या व्यक्तीने ताज्या पानांचा वापर केला पाहिजे.
  • अनेक जणांन दातांच्या समस्या असतात परंतु त्या काहीही करून कमी होत नाहीत अश्या वेळी जर त्या संबधित व्यक्तीने जर निलगिरी युक्त दंत मंजन वापरले तर त्या व्यक्तीचे दात मजबूत होण्यास मदत होते आणि त्याला दातांच्या कोणत्याही समस्या जाणवत नाहीत.
  • त्याचबरोबर निलगिरी हे ताप, जखमा, वर्ण, मधुमेह आणि मूत्राशय रोग यावर देखील उपचार करते.
  • निलगिरीच्या पानांच्यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि हे अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करते आणि म्हणून निलगिरीच्या पानांच्या वापर हा पाककृती मध्ये देखील केला जातो.
  • काही जणांची त्वचा हि खूप कोरडी असते आणि कितीही उपचार केले तरी ती मॉईस्चराईज झाल्या सारखी दिसत नाही परंतु जर त्या व्यक्तीने कोरड्या त्वचेवर नीलगिरीचे तेल लावले तर कोरड्या त्वचेवर उपचार होण्यास मदत होते.

आम्ही दिलेल्या nilgiri plant information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निलगिरी झाडाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nilgiri medicinal plant information in marathi या information of nilgiri plant in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nilgiri plant in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nilgiri plants information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!