निळवंडे धरण संपूर्ण माहिती Nilwande Dam Information in Marathi

nilwande dam information in marathi निळवंडे धरण संपूर्ण माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या शहरांच्यामध्ये मुख्य नदीच्यावर अनेक धरणे बांधलेली आहेत आणि हि धरणे त्या नदी किनारी असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी, शेतीसाठी पाणी पुरवण्यासाठी आणि वीजनिर्मिती करण्यासाठी अनेक धरणे बांधलेली आहेत आणि त्यामधील एक म्हणजे निळवंडे धरण आणि आज आपण या लेखामध्ये निळवंडे धरणाविषयी माहिती पाहणार आहोत.

अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदी वाहते आणि या नदीवर अकोले तालुक्यामध्ये निळवंडे तालुक्यामध्ये प्रवरा नदीवर या धरणाची बांधणी केली आहे आणि या ठिकाणी पाणी साठवून ते पाणी भागातील शेतीसाठी किंवा इतर वापरांच्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्यापर्यंत पोहचवणे हा धरण बांधण्याचा मुख्य उद्देश होता.

निळवंडे या धरणाची लांबी  १९१२ फुट इतकी आहे आणि उंची २४२ फुट उंच आहे आणि धरणाची बांधणी १९९९ मध्ये सुरु झाली होती आणि २०११ मध्ये पूर्ण झाली. निळवंडे हे धरण मुंबई या शहरापासून १८३ किमी अंतरावर आहे, पुणे शहरापासून १६० किमी अंतरावर आहे आणि नाशिक या शहरापासून हे ७५ किमी अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही शहरातून अगदी सहजपणे अकोले शहरामध्ये जाऊन तेथून निळवंडे धरण पाहण्यासाठी जाऊ शकता.

nilwande dam information in marathi
nilwande dam information in marathi

निळवंडे धरण संपूर्ण माहिती – Nilwande Dam Information in Marathi

धरणाची नावेनिळवंडे धरण, अप्पर प्रवरा निळवंडे धरण
धरणाची स्थापना१९९९
लांबी१९१२ फुट
उंची२४२ फुट

निळवंडे धरणाविषयी महत्वाची माहिती – information about nilwande dam in marathi

निळवंडे या धरणाचे बांधकाम प्रवरा नदीवर १९९९ मध्ये सुरु केले होते आणि या धरणाचे बांधकाम करताना अनेक अडचणी जरी आल्या असल्या तरी या धरणाचे बांधकाम ११ ते १२ वर्षांनी पूर्ण झाले म्हणजेच या धरणाचे बांधकाम २०११ मध्ये पूर्ण झाले. या धरणाची उंची २४२ फुट आणि लांबी १९९२ फुट लांब आहेत.

या धरणाला एकूण ५ दरवाजे आहेत आणि ज्यावेळी धरणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाले तर धरणाची दारे मोकळी करून ती सोडली जातात. या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता हि ८३३० दशलक्ष घनफूट इतकी आहे.

निळवंडे धरण बांधण्याचा मुख्य उद्देश – main objective

प्रवरा नदीवर या धरणाची बांधणी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नदी किनारी असणाऱ्या गावांच्यामध्ये पाणी पुरवण्यासाठी तसेच त्या भागातील शेतीसाठी देखील पाणी पुरवण्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे.

निळवंडे या धरणाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • निळवंडे धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे अकोले शहरापासून १० ते १५ किलो मीटर अंतरावर आहे.
  • निळवंडे या धरणाचे एकूण क्षेत्रफळ हे ८०० हेक्टर इतके आहे आणि यामध्ये ८३३० दशलक्ष घनफूट इतके पाणी साठवण्याची क्षमता आहे.
  • या धरणामध्ये ८३३० दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण्याची क्षमता असली तरी या धरणाची ७० ते ८० टक्के कामे रखडली आहेत आणि या धरणाच्या बांधकामाच्या काळामध्ये देखील अनेक अडचणी आल्या होत्या.
  • निळवंडे धरण हे अकोले तालुक्यामध्ये निळवंडे या गावामध्ये आहे.
  • निळवंडे या धरणाची देखरेख हि महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केली जाते.  

निळवंडे धरणाजवळ पाहण्यासारखी ठिकाणे

तुम्ही अकोले जिल्ह्यामध्ये निळवंडे धरण पाहण्यासाठी तर जाच परंतु तुम्ही त्या ठिकाणी अनेक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहू शकता. चला तर खाली आपण निळवंडे धरणाजवळील काही प्रेक्षणीय स्थळे पाहूया.

रतनगड

रतनगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो निळवंडे धरणापासून २१ किलो मीटर आहे. रतनगड हा किल्ल्याच्या पायथ्याशी रतनवाडी हे गाव आहे आणि हा किल्ला या गावापासून ५ ते ६ किलो मीटर अंतरावर आहे.

रतनगड हा किल्ला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असणारा किल्ला असून या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४२५० फुट (१२९५ मीटर) इतकी आहे. पाण्याचे टाके, बुरुज, टाक्यामध्ये असणारा नंदी आणि शिवलिंग, गणेश दरवाजा, हेमाडपंथी मंदिर, रत्ना देवीचे मंदिर या सारख्या प्राचीन वास्तू या ठिकाणी पहायला मिळतात.

पांडव लेणी

निळवंडे धरणाच्या परिसरामध्ये आपल्याला पांडव लेणी देखील पहायला मिळते म्हणजेच हि लेणी निळवंडे धरणापासून ४६ किमी अंतरावर आहे आणि या लेणीला नाशिक लेणी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी एकूण २४ लेणी आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या लेणी ह्या बुध्द लेणी आहेत.

कळसुबाई लेणी

कळसुबाई हे देखील महाराष्ट्रातील प्रसिध्द शिखर आहे आणि हे शिखर निळवंडे धरणापासून २१ किमी अंतरावर आहे. कळसुबाई शिखर हे वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची समुद्रसपाटी पासून एकूण १६४६ मीटर इतकी आहे आणि या शिखराच्या पायथ्याचे गाव हे बारी हे आहे आणि बरी या गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत.

अमृतेश्वर मंदिर

अमृतेश्वर मंदिर हे देखील या भागातील एक प्रसिध्द ठिकाण आहे जे निळवंडे धरणापासून २६ किमी अंतरावर आहे आणि तुम्ही निळवंडे धरणाला भेट देण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही या मंदिराला देखील भेट देऊ शकता.

भंडारदरा

भंडारदरा हे प्रेक्षणीय ठिकाण निळवंडे धरणापासून १३ किमी अंतरावर आहे आणि तुम्ही हे देखील ठिकाण पाहू शकता. तुम्हाला या ठिकाणी भंडारदरा धरण आणि अनेक नैसर्गिक ठिकाणे पहायला मिळतात.

निळवंडे धरणावर कसे पोहचायचे – how to reach

रस्ता मार्गाने

जर तुम्हाला निळवंडे धरण आणि इतर प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जायचे असल्यास तुम्ही तुमची कारण घेऊन जावू शकता किंवा बसने देखील जावू शकता कारण अहमदनगर जिल्ह्याला महाराष्ट्रातील इतर मुख्य शहरांनी चांगले जोडलेले आहे.

रेल्वेने

अहमदनगर या शहरामध्ये रेल्वे स्थानक आहे आणि हे निळवंडे धरणापासुनाचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही मुख्य शहरातून तुम्ही अहमदनगर शहरामध्ये येऊ शकता आणि तेथून तुम्ही टॅक्सी पकडून तुम्ही निळवंडे धरणापर्यंत पोहचू शकता.

विमानाने

जर तुम्हाला विमानाने या ठिकाणी यायचे असल्यास तुम्हाला विमानाने संभाजीनगर, पुणे किंवा शिर्डीला यावे लागेल आणि मग तेथून तुम्ही अकोले शहरामध्ये बसने किंवा टॅक्सीने पोहचू शकता.

आम्ही दिलेल्या nilwande dam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निळवंडे धरण संपूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Nilwande dam information in marathi wikipedia या nilwande dam information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nilwande dam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!