पारिजातक झाडाची माहिती Parijat Tree Information in Marathi

Parijat Tree Information in Marathi – Harsingar in Marathi पारिजात झाडाची माहिती सूर्यास्तानंतर अगदी पहाटेच्या कोवळ्या उन्हात रस्त्यावर किंवा अंगणात पडलेला प्राजक्ताच्या फुलांचा सडा आणि त्यांचा सर्वत्र दरवळणारा सुगंध सगळेच कसे मनाला मोहून टाकणारे असते. पारिजातकाचे झाड दिसायला अतिशय सुंदर असे असते. तसेच याला हिंदू धर्मात फार महत्त्वाचे मानले जाते. पारिजात हि भारतात उगवणारी औषधी वनस्पती आहे. सदरच्या लेखात आपण याच पारिजातकाच्या झाडाची माहिती थोडक्यात घेणार आहोत. 

parijat tree information in marathi
parijat tree information in marathi

पारिजातक झाडाची माहिती – Parijat Tree Information in Marathi

नावपारिजात – Harsingar in Marathi
शास्त्रीय नावnyctanthes arbortristis
इतर नावेहरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, प्राजक्त.

पारिजातकाचे वर्णन

याचे शास्त्रीय नाव निक्टॅन्थस आर्बोर ट्रिस्टीस आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच नैसर्गिकदृष्ट्या इतरत्र उगवणारा आहे. याला ‘प्राजक्त’ म्हणूनही ओळखले जाते. काही लोक हे झाड शोभेसाठी घराच्या अंगणात लावतात. पारिजातकाचे झाड गोलाकार बहारदार असते.

हे झाड १० ते २५ फुट उंचीपर्यंत वाढते. या झाडाच्या फांद्या पाच- सात मीटर उंच, चौकोनी आणि खरबडीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्याच्या आकाराची काळपट हिरवी, आणि कडांना नक्षी असल्यासारखी दंतुर कडांची पाने असतात.

याच्या पानाच्या टोकाकडून देठाकडे बोट फिरविल्यास, त्यावर काटे असल्याचा भास होतो. याची फळे गोलाकार पण चपटे असून ते कच्चे असताना हिरवे आणि पिकल्यावर तपकिरी होते. या फालत २ बिया असतात. याला फुले ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधी मध्ये येतात.

पारिजातक मुळची भारतातील असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्ये या सर्व ठिकाणी ती फुलांसाठी वाढविली जातात.

पारिजातकाबद्दल खूप साऱ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा अशी सांगितली जाते कि, सूर्यावर मोहित झालेल्या एका सुंदर, राजकन्येवरून सूर्याचे मन उडतं आणि तिला झिडकारून तो दुसऱ्या मुलीकडे निघून जातो. या अपमानाने दुखी झालेली राजकन्या देहत्याग करते. 

ती रोपट्याच्या रूपाने पुन्हा जन्म घेते, आणि तिचे वृक्षात रुपांतर होते. पण तिचा सुर्यावरचा राग गेलेला नाही, त्यामुळे ती रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी आपल्या अश्रूंचा पुष्परूप सडा जमिनीवर शिंपते.

असेही सांगितले जाते कि पारिजात हे चौदा रत्नांपैकी एक रत्न आहे, जे देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून मिळालेले आहे.

“बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी”

एकदा नारदांनी भगवान श्रीकृष्णाला पारिजातकाची फुले भेट म्हणून दिलीत. भगवान  श्रीकृष्णाला ती आवडल्याने इंद्र देवांशी युद्ध करून त्यांनी हा वृक्ष मिळवला आणि तो पृथ्वीवर आणला. यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला. श्रीकृष्णाने ते  झाड  सत्यभामाच्या वाटिकेत अशा ठिकाणी लावले कि ज्याच्या फुलांचा सडा रुक्मिणीच्या अंगणात पडत असे.

पारिजातक औषधी उपयोग – Harsingar Benefits

पारिजातकाच्या झाडामध्ये औषधी गुणधर्म आढळतात. याचे फुल, पाने, बिया, झाडाची साल हे सगळेच अवयव औषधी म्हणून वापरले जातात. त्यामुळे या झाडाला खूप महत्त्व दिले जाते.

  • पारिजातकाचे दररोज एक बी घेतल्याने मुळव्याध बारा होण्यास मदत होते असे म्हंटले जाते.
  • पारिजातकाची फुले हि हृदयासाठी चांगली मानली जातात. याच्या फुलांचा रस घेतल्यास हृदयरोग टाळता येतो.
  • दमा –  श्वसनाशी संबंधित आजारावर पारिजातकाची सालींची पूड बनवून नागवेलीच्या पानात टाकून खाल्याने फायदेशीर ठरतो.
  • पारिजातकाची फुले कुटून मधात मिसळल्यास कोरडा खोकलाही बरा होण्यास मदत होते.
  • पारिजातकाच्या पानांमुळे त्वचेशी संबंधित आजारही बरे होतात, असे मानले जाते.
  • सांधेदुखी – या झाडाची चार ते पाच हिरवी पाने घेऊन त्याची चटणी करून त्याला २०० मिली पाण्यात टाकून ते पाणी निम्मे होईपर्यंत उकळून या काढ्याचे उपाशीपोटी सेवन केल्यास शरीरातील सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते, तसेच याच्या तेलाचा उपयोग चिकनगुनिया मुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर, गुडघेदुखीवर देखील होतो.
  • पारिजाताच्या फुलांपासून हर्बल तेल तयार केले जाते. या फुलांमध्ये अॅन्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते.

पारिजातकाचे फुल – Parijat Flower Information in Marathi

पारिजातकाच्या झाड मोहक असण्याचे अनेक कारण म्हणजे या झाडाला येणारी बहारदार फुले. पारिजातकाची फुलं म्हणजे सौंदर्य आणि सुगंध यांचा उत्तम मिलाप आहे. या फुलांचा रंग, रूप, सौम्य सुगंध सगळंच मन प्रसन्न करणारे असते. हे फुल अत्यंत नाजूक असे असते जे हातात घेतले तरी कोमेजते. पारिजातकाच्या फुलांच्या पाकळ्यांचा रंग हा पांढराशुभ्र आणि देठ केसरी रंगाचा असतो.

पारिजातकाच्या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत.

या फुलांना कोरल जास्मिन, नाईट जास्मिन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याची फुले एका दिवसात कितीही तोडली तरी दुसऱ्या दिवशी पारिजात पुन्हा फुलांनी बहरलेला दिसतो.

पारिजातकाचे फुल हे पश्चिम बंगालचे “राज्यफुल” आहे. जगात याच्या केवळ पाच प्रजाती आढळतात.

पारिजातकाची फुले लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहेत. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी पारिजातकाची फुले लक्ष्मी देवीला अर्पण केल्यावर देवी प्रसन्न होते असे म्हणतात. परंतु या झाडावरून पूजेसाठी फुले तोडणे निषिद्ध मानतात. केवळ जमिनीवर पडलेली फुलेच पूजेसाठी वापरावी, असे म्हटले जाते.

अशी आख्यायिका सांगितली जाते कि, सीतेने १४ वर्षाच्या वनवासात पारिजातकाच्या फुलांनी स्वतःचा साजशृंगार करायच्या.

पारिजातकाच्या पानांचा उपयोग – Uses Of Parijat Leaf 

पारिजातकाच्या पानांना आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे.

  • पारिजातकाच्या झाडाची ६ ते ७ पाने घेऊन ती स्वच्छ धुवून, त्याची पेस्ट बनवून घ्यावी. हि पेस्ट पाण्यात घालून उकळावी. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. हा काढा थंड झाल्यानंतर गाळून घेऊन बाटलीत भरून ठेवावे. रोज सकाळी हे पाणी उपाशी पोटी घेतल्याने सांधेदुखी मध्ये आराम मिळतो.
  • याच्या पानांपासून आणि फांद्यांपासून हरसिंगार तेल तयार केले जाते.
  • तसेच हा काढा प्यायल्याने घसा दुखणे आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. जर याची पाने साध्या, नेहमीच्या चहामध्ये टाकून उकळून घेतल्यानेही खोकला बारा होण्यास मदत होते.
  • सायटिका व स्लीप डिस्क असेल तर पारिजातकाची ६० ते ७० gm पाने स्वच्छ धुवून ३०० मिली पाण्यात उकडावी. २०० मिली पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावे आणि त्यामध्ये २५ ते ५०  gm केसर घोटून मिक्स करावे. असे १५ ते २० दिवस केल्याने सायटिका चा आजार समूळ नष्ट होतो. स्लीप डिस्क मध्ये हि गुणकारी ठरते.
  • पारिजातकाची पाने त्वचा नितळ आणि चमकदार होण्यासाठी लाभदायी समजली जातात.
  • पारिजातकाच्या पानांच्या रसात थोडासा गुळ घालून पिल्याने जंत मलावाटे बाहेर जातात.
  • याच्या ३० ते ३५ पानांच्या रसात मध मिसळून ३ दिवस प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते.
  • नक्की वाचा: पिंपळाच्या झाडाची माहिती

झाडाचे फायदे – Parijat Benefits

  • पारिजातकाच्या झाडाचे फुल, पाने, बिया, झाडाची साल हे सगळेच अवयव औषधी म्हणून वापरले जातात.
  • पारिजाताच्या फुलांपासून हर्बल तेल तयार केले जाते.
  • याच्या फुलांपासून खाद्यपदार्थ मध्ये वापरला जाणारा पिवळा आणि केशरी रंग तयार केला जातो.
  • पारिजातकाच्या फुलांपासून विविध प्रकारची अत्तर आणि सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात.
  • पारिजातकाच्या फुलातील केशरी भागात निक्टॅन्थीन नावाचे रंग्द्रव्याचा वापर पूर्वी रेशीम रंगविण्यासाठी केला जात असे.
  • पारिजातकाची साल कातडी मिळवण्यासाठी, तर पाने हस्तिदंताला व लाकडाला चकाकी आणण्यासाठी वापरतात.
  • या झाडाच्या कोवळ्या फांद्या टोपल्या बनविण्यासाठी वापरतात.
  • लाकूड, भुरे, मध्यम कठीण छपराकरिता उपयोग केली जातात.
  • नक्की वाचा: आंबा झाडाची माहिती 

पारिजातक झाडाचे fact

  • पारिजातकाचे शास्त्रीय नाव निक्टॅन्थस आर्बोर ट्रिस्टीस आहे.
  • पारिजात हि भारतात उगवणारी औषधी वनस्पती आहे.
  • हिंदू लोक याला ‘स्वर्गीय वृक्ष’ मानतात.
  • याची फुले रात्री उमलतात आणि सकाळी त्यांच्या पाकळ्या गळून सडा पडतो.
  • पारिजातकाच्या फुलांमध्ये अॅन्टी इन्फ्लेमेटरी, टॅनिन, ग्लुकोज व डी- मॅनीटॉल असते. जे औषधी म्हणून वापरले जातात.
  • पारिजातकाच्या पानामध्ये कॅरोटीन आणि क जीवनसत्त्व असते.
  • पारिजातकाच्या फुलातील केशरी भागात निक्टॅन्थीन नावाचे रंगद्रव्य असते.
  • याच्या फुलांपासून सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात.

आम्ही दिलेल्या parijat tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पारिजातक झाडाची” parijat in marathi अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या harsingar benefits या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये parijat flower information in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर parijat benefits असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “पारिजातक झाडाची माहिती Parijat Tree Information in Marathi”

  1. पारिजातकाचे झाड ४ फूट उंट वाढले आहे , फाद्याही फुटल्या आहेत पण अजून फुले कांवा कळ्या येत नाहीत , फुले येण्यासाठी काय करावे ?

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!