प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी Plastic Mukt Bharat Essay in Marathi

Plastic Mukt Bharat Essay in Marathi प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी निसर्गाने मानवाला बरीच साधन संपत्ती दिली आहे. साधन संपत्ती म्हणजे मानवाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी किंवा पदार्थ निसर्गाकडून प्राप्त होतात अशा घटकांना नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये जमीन, हवा, महासागर, नदी, खनिजे, खनिज तेल, वृक्ष इत्यादी. निसर्गाने दिलेल्या या घटकांचा वापर करूनच जीवन सृष्टी चालते निसर्गाने दिलेली ही साधन संपत्ती मर्यादित असते त्यामुळे त्यांचा पुरेपूर वापर किंवा योग्य वापर करणे अतिशय गरजेचे आहे.

मनुष्याच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे निसर्गाला इजा होऊ शकते म्हणजे नैसर्गिक संपत्ती धोक्यात येऊ शकते आणि यात सध्या सातत्याने समोर येणारी एक समस्या म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक हे मानवनिर्मित असून सध्या त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.

हल्ली प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लास्टिक पासून बनणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकची भांडी, प्लास्टिकच्या बॉटल या सगळ्यांच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. प्लास्टिकचा वापर आणि त्याचा वातावरणाशी कसा संबंध आहे.

याचा एक मोठा उदाहरण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या वापरून झाल्यावर आपण त्या कचऱ्यात फेकून देतो पुढे जाऊन याच प्लास्टिकच्या पिशव्या नदी, नाल्यात, समुद्रामध्ये, मातीमध्ये रुतून बसतात आणि या प्लास्टिकच्या वस्तूंच संचयन होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम मनुष्य जीवनावर किंवा अन्य जीवनावर जाणवू शकतो.

plastic mukt bharat essay in marathi
plastic mukt bharat essay in marathi

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी – Plastic Mukt Bharat Essay in Marathi

Plastic Mukt Bharat Nibandh

प्लास्टिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे थर्माप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग पोलिमर. ऑलिफीन सारख्या पेट्रोकेमिकल मधून घेतली जाणारी सेंद्रिय व जैविक संयुगे यांचा प्लास्टिक मध्ये समावेश असतो. संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला जात आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या स्तरावर प्लास्टिक्स उत्पादन होत आहे.

परंतु प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचे कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्याने व जर प्लास्टिक जाळण्याचे ठरवले तरी वायुप्रदूषण होऊ शकतं ज्यामुळे वातावरणात बिघाड होऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम मनुष्य जीवनावर किंवा वन्य जीवनावर होऊ शकतात. आणि यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला प्लास्टिकचा खूप मोठा धोका आहे.

प्लास्टिक निर्माण करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात ही केमिकल्स कारखान्याद्वारे नंतर नदीच्या पाण्यात व समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. ज्याचा मनुष्य जीवनावर व प्राण्यांवर पक्षांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्लास्टिक उत्पादनात इथिलीन ऑक्साईड, जालिन, बेंजीन यांसारख्या रसायनिक विषाणूंचा वापर केला जातो.

ज्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. निसर्गाने जीवसृष्टीला उपयुक्त अशी सर्व घटक तयार केली आहेत परंतु मानवाने निर्मित केलेली प्लास्टिक सारखी अनेक घटक पर्यावरणाला दूषित करत आहेत. प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे व त्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे प्लास्टिक पृथ्वीवर जमा होत आहे.

दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. जगाचा असा कुठलाही कोपरा नसेल जिथे प्लास्टिकचा वापर होत नसेल. प्लास्टिकचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे आणि या धोकादायक वस्तूचा शोध इंग्लंड येथील अलेक्झांडर पार्क यांनी १८६२ मध्ये लावला. ग्रीक शब्द प्लास्टिकोझ या नावावरून प्लास्टिक या शब्दाची निर्मिती झाली आहे. या शब्दाचा अर्थ “बनवणे” असा आहे. 

असं संशोधनाद्वारे सांगण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या वस्तूंचा आपण सहजासहजी एक वेळेस वापर करतो आणि नंतर ती वस्तू फेकून देतो. परंतु टाकाऊ पासून टिकाऊ हे जर सत्यात उतरवायचा असेल तर आपण प्लास्टिकचा देखील पुनर्वापर करू शकतो. प्लास्टिकच्या वस्तू आपण रिसायकल करू शकतो प्लास्टिकची बाटली रिसायकल केली तर त्यातून इतकी ऊर्जा निर्माण होऊ शकते की त्या ऊर्जेपासून एक साठ व्हाॅटचा बल्प बनू शकतो जो सहा तास चालू शकतो.

खनिज तेल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून ती मर्यादित असते संपूर्ण जगामध्ये जेवढ तेल उपलब्ध आहे त्यातील आठ टक्के तेलाचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो आपण नैसर्गिक साधन संपत्ती अशा वस्तूंवर वापरत आहोत ज्याचा आपल्याला निसर्गाला धोका आहे. प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे दरवर्षी साधारणतः एक लाखाहून अधिक प्राणी मरत आहेत.

प्लास्टिक पृथ्वीवर असच साठत राहिल तर त्याचे भरपूर वाईट परिणाम होऊ शकतात परंतु जगभरातील जरी प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावायचं ठरवलं तर एक हजारपेक्षा अधिक वर्षे लागतील. फक्त भारताच म्हणायला गेलं तर भारतामध्ये एक व्यक्ती संपूर्ण वर्षभरात नऊ पॉईंट सात किलो प्लास्टिक वापरते भारताची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे.

वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे व त्याचे पर्यावरणावर होणाऱ्या विपरित परिणामांमुळे बऱ्याच देशांमध्ये प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली परंतु ती तात्पुरती. संपूर्ण जगभरात रवांडा असा एकमेव देश आहे ज्याने प्लास्टिक वर पूर्णतः बंदी घातली आहे. भारतामध्ये देखील प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेऊन प्लास्टिक बंदी करण्यात आली होती, परंतु ती फार काळ टिकली नाही.

बहुतांशी प्लास्टिकचा कचरा हा समुद्रामध्ये फेकला जातो समुद्रामधील वाळूमध्ये बराच वेळा प्लास्टिकच्या पिशव्या रुतलेल्या दिसतात ज्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या मानवी जीवनावर खूप मोठा भयानक परिणाम दिसू शकतो. प्लास्टिक मुळे मुद्रा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नदी व नाल्याच पाणी तुंबलेल्याच दृश्य पाहायला मिळतं जाच एकमेव कारण म्हणजे प्लास्टिक आहे. आपण प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरून झाल्या की त्या अशाच फेकून देतो ज्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये रुतून बसतात व त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. देशामध्ये होणाऱ्या जमीन प्रदूषण आणि महासागरात होणाऱ्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक आहे.

दरवर्षी संपूर्ण जगभरात ७० हजार टन प्लास्टिक समुद्रामध्ये फेकला जातो ज्यामुळे समुद्रातील जीवांना धोका असतो म्हणूनच दरवर्षी समुद्रातील बरेच मासे, मच्छी, कासव वेगवेगळे माशांच्या प्रजाती मरण पावतात. जलीय जनावर हे प्लास्टिक खातात ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये बायोॲक्युमुलेशन होतं जे त्यांच्या मृत्यूचं कारण बनतं.

प्लास्टिकचा वापर इतका वाढत चालला आहे. की संपूर्ण जगभरात दरवर्षी शंभर दशलक्ष टन प्लास्टिकच उत्पादन केले जाते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करून आपण ते असच उघड्यावर फेकून देतो ज्यामुळे भटके प्राणी त्यांना खातात ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

आपल्या निष्काळजीपणामुळे आपण प्लास्टिक उघड्यावर फेकून देतो आणि तेच प्लास्टिक पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या नदी नाल्यांमध्ये जात ज्यामुळे माशांचे जीवाला तर धोका असतोच परंतु त्यासोबतच पाण्याची गुणवत्ता देखील खालावते आणि यामुळे मनुष्य जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.

जरी पृथ्वीवर ७१% पाणी उपलब्ध असलं तरीही समुद्रात नदी, नाल्यांमध्ये मिसळणार प्लास्टिक व त्याच्या द्वारे मिसळणारे घातक रसायने पाण्याची गुणवत्ता व पातळी कमी करतात. उघड्यावर प्लास्टिक फेकल्यावर तो प्लास्टिक जमा होतो आणि पावसाळ्यामध्ये तो कचरा ओला होतो आणि ओला कचरऱ्या जवळ डास भयानक मच्छर जमा होतात. ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.

प्लास्टिक मध्ये असणारा स्टायरीन ट्रायमर, बिसफेनाॅल ए या रसायनांमुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावते. प्लास्टिक हे स्वस्तात मिळतं प्लास्टिकच्या वस्तू सोयीस्कर असतात परंतु प्लास्टिकच्या उत्पादनामुळे वापरामुळे होणारे पृथ्वीवर परिणाम फार भयानक आहेत. आपल्या पृथ्वीला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आणि पर्यावरण दूषित होऊ न देणे हे आपल्याच हातात आहे.

प्लास्टिकचा वापर योग्य प्रमाणात करावा व प्लास्टिकच पुनर्वापर देखील होतो. प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यापेक्षा कापडाच्या पिशव्या वापराव्यात भविष्यात होणारा धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर त्यासाठी प्लास्टिक वर निर्बंध आणणे अतिशय गरजेचे आहे किंवा त्याचा योग्य तो वापर कसा करावा त्याचे विघटन कसं करावं या सगळ्या गोष्टींवर उपाय काढणे अत्यंत गरजेचे आहे.

प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम आपण लक्षात घेऊन प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक केला पाहिजे. प्लास्टिक प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती काळजी व दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

प्लास्टिकचा वापर यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती वरती परिणाम होत आहे आणि नैसर्गिक साधन संपत्ती संपली तर ही जीवसृष्टी देखील संपेल भविष्यात येणाऱ्या संकटांवर आपण आत्तापासूनच उपाय काढायला हवा.

आम्ही दिलेल्या plastic mukt bharat essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी plastic bandi in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या plastic kachra mukt bharat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि plastic mukt bharat nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये plastic pradushan Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!