Poha Cutlet Recipe in Marathi पोहा कटलेट रेसिपी मराठी आपण सतत टेस्टी आणि झटापट बनणाऱ्या रेसिपी नाश्त्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि कटलेट हि एक नाश्त्यासाठी बनवली जाणारी उत्तम रेसिपी ठरू शकते. कटलेट हे आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो व्हेज कटलेट, ब्रेड कटलेट, पोहा कटलेट, साधे कटलेट परंतु आज आपण पोहा कटलेट कसे बनवायचे ते पाहणारा आहोत. कटलेट रेसिपी हि भारतामध्ये अनेक ठिकाणी बनवला जाणारा पदार्थ आहे आणि हा रस्त्यावर असणाऱ्या वडा – भजीच्या गाड्यांच्यावर देखील आपल्याला कटलेट खायला मिळते. पोहा कटलेट हा असा पदार्थ आहे.
जो लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपण घरामध्ये अगदी सहजपणे बनवून शकतो. कारण हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनू शकतो. चला तर मग आता आपण या लेखामध्ये पोहा कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
पोहा कटलेट रेसिपी मराठी – Poha Cutlet Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
बनवण्याची पद्धत | सोपी |
पाककला | भारतीय |
पोहा कटलेट रेसिपी – poha cutlet recipe
पोहा कटलेट रेसिपी हि एक झटपट बनणारी आणि एक स्वादिष्ट रेसिपी असल्यामुळे हि रेसिपी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो कारण सकाळी सर्वांची गडबड असते कारण सगळेच आपल्या कामासाठी घराबाहेर जाणार असतात आणि रोज रोज आपण पोहे खावून कंटाळून जातो आणि त्यामुळे आपण पोह्यापासून बनलेला हा वेगळा आणि क्रिस्पी पदार्थ बनवू शकतो. चला तर आपण झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून एकदम सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी पाहूया.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
बनवण्याची पद्धत | सोपी |
पाककला | भारतीय |
पोहा कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आधीपासून घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असल्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. पोहा कटलेट बनवण्यासाठी पोहा, बटाटा, रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स आणि तेल हे लागणारे मुख्य साहित्य आहे. चला तर मग पोहा कटलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
- २ चमचे आलं लसून पेस्ट
- ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
- १ वाटी पोहे
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा गरम मसाला.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १ मोठा चमचा तेल ( फोडणीसाठी ).
- २ वाटी रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स ( कटलेट कोट करण्यासाठी ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून कटलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
- सर्वप्रथम पोहे पाच मिनिटे पाण्यामध्ये भिजवून त्यामधील पाणी पाच मिनिटांनी काढून ते बाजूला ठेवा.
- आता बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते बारीक मॅश करून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला.
- आणि कांदा थोडा वेळ भाजला किं त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि १ ते २ मिनिटे भाजा.
- त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, भिजवलेले आणि कुस्करलेले पोहे, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
- आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करून गॅस लगेच बंद करा. मग हे मिश्रण थोडे गार होऊ द्या.
- ते मिश्रण गार झाले कि त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे बनवा आणि ते रव्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्ब्स मध्ये चांगेल कोट करून घ्या.
- कढईमध्ये आता तेल घाला आणि ते मध्य आचेवर गरम करा आणि त्या तेलामध्ये जितके कटलेट मावतील तितके कटलेट घाला आणि ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि भाजल्यानंतर ते टिशू पेपरवर काढा ज्यामुळे जादाचे तेल त्या पेपरमध्ये शोषले जाई.
- अश्या प्रकारे सर्व कटलेट रव्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्ब्स मध्ये बुडवून चांगले कोट करा आणि तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्या.
- तुमचे क्रिस्पी आणि टेस्टी पोहा कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
पोहा कटलेट कश्यासोबत खातात – serving suggestions
- पोहा कटलेट आपण चिंच चटणी, सॉस, ग्रीन चटणी या सोबत खावू शकतो.
टिप्स (tips)
- आपण वर प्रक्रियेमध्ये बटाटा आणि पोह्याला फोडणी दिली आहे ती फोडणी दिली नसली तरी चालते म्हणजे आपण आपण सर्व साहित्य कच्चे घालून ते चांगले एकजीव करून त्याचे कटलेट बनवू शकतो परंतु तुम्ही फोडणी देणार नसाल तर त्यामध्ये कांदा वापरू नका.
- आपण पोहा कटलेट मध्ये हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर देखील घालू शकतो.
- पोहा कटलेट गरमागरम सर्व्ह केले तरच चांगले लागतात.
आम्ही दिलेल्या poha cutlet recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पोहा कटलेट रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या batata poha cutlet recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि poha potato cutlet recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये poha cutlet recipe in marathi chakali Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट