रगडा पॅटीस रेसिपी Ragda Pattice Recipe in Marathi

Ragda Pattice Recipe in Marathi रगडा पॅटीस रेसिपी अनेक लोक चाट वेढे असतात आणि ते वेगवेगळे प्रकारचे चाट खातात ते म्हणजे कचोरी चाट, बटाटा चाट, पापड चाट यासारखे अनेक चाट बनवले जातात आणि त्यामधील एक लोकप्रिय चाट रेसिपी म्हणजे रगडा पॅटीस चाट आणि हा रगडा पॅटीस चाट हा खूप लोकांचा आवडता चाट आहे. रगडा पॅटीस हे एक मुंबई मधील एक स्ट्रीट फूड आहे आणि हा पदार्थ मुंबई तसेच भारतामध्ये इतर ठिकाणी देखील . रगडा आणि पॅटीस हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जाते. पॅटीस हे आपण बटाट्याच्या टिक्की बनवून करतो.

तर रगडा हा वाटाण्यापासून किंवा चणा डाळी पासून बनवतो. रगडा पॅटीस हि रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट आणि उत्तम बनतो. चला तर मग आता आपण रगडा पॅटीस रेसिपी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

ragda pattice recipe in marathi
ragda pattice recipe in marathi

रगडा पॅटीस रेसिपी – Ragda Pattice Recipe in Marathi

रगडा पॅटीस रेसिपी – ragada pattice recipe marathi

रगडा पॅटीस हि रेसिपी हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे. जी मुंबई सोबत महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये देखील मिळणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. रगडा पॅटीस हा पदार्थ लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक असून या पदार्थाला खूप मागणी आहे आणि हा पदार्थ गाड्यावर आवडीने खातात कारण गाड्यावरील या पदार्थाची टेस्टच काही वेगळी असते पण कित्येक लोकांना माहित नाही कि हा पदार्थ आपण घरच्या घरी खूप सोप्या पध्दतीने बनवता येतो.

रगडा पॅटीस हा पदार्थातील रगडा हा वेगळ्या पध्दतीने बनवला जातो तर पॅटीस हा वेगळ्या पध्दतीने बनवला जातो कारण हे दुनही वेगवेगळे पदार्थ आहेत. चला तर आता आपण रगडा पॅटीस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

रगडा पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make ragda pattice

रगडा आणि पॅटीस हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत आणि ते पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळे आणि भरपूर साहित्य लागते म्हणजेच हा पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट खूप मोठी आहे आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकत नाही तर ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आटत आपण रगडा पॅटीस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

 • ३ ते ४ मोठे बटाटे ( उकडलेले ).
 • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
 • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • मैदा किंवा कॉर्णफ्लोवर.

रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

 • १ वाटी पांढरे वाटाणे.
 • १ चमचा हळद.
 • २ चमचे लाल मिरची पावडर.
 • १ चमचा धने जिरे पावडर.
 • १ चमचा आले लसून पेस्ट.
 • कांदा ( बारीक चिरलेला ).
 • २ चमचे चिंच गुळ चटणी.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • १/२ मोठा चमचा तेल.
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

सर्व्हिगसाठी लागणारे साहित्य 

 • चिंच गुळ चटणी.
 • हिरवी चटणी.
 • शेव.

रगडा पॅटीस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make ragda pattice recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून रगडा पॅटीस रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

पहिली कृती : रगडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – ragda recipe in marathi

 • रगडा बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटाणे चांगले निवडून घ्या आणि मग ते कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी आणि हळद घाला आणि त्याला ६ ते ७ शिट्या द्या आणि गॅस बंद करा आणि कुकर गार होऊ द्या.
 • ६ ते ७ शिट्या दिल्यानंतर वाटाणे चांगले गिर शिजतील आता कुकर गार झाला कि त्यामधील शिजलेले वाटाणे बाऊलमध्ये काढा आणि ते थोडे मॅश करा आणि जर वाटाणे शिजून घट्ट झाले असतील तर त्यामध्ये पाणी घाला थोडे पातळ करा ( हे मिश्रण जास्त घट्ट देखील करू नका आणि जास्त पातळ देखील करू नका ).
 • आता मध्यम आचेवर पॅन गरम करा आणि त्यामध्ये तेल घाला आणि मग तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा आणि आले लसून पेस्ट घालून ते चांगले तेलामध्ये मिक्स करा आणि थोडा वेळ भाजा.
 • मग त्यामध्ये लाल मिरची पावडर घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये शिजवलेले वाटाणे घाला आणि मिक्स करा आणि आता त्यामध्ये धने जिरे पावडर, चिंच गुळ चटणी आणि मीठ घाला आणि ते मिक्स करा आणि तो रगडा ५ ते ६ मिनिटे शिजवा.
 • तुमचा रगडा तयार झाला.

दुसरी कृती : पॅटीस बनवण्यासाठी केली जाणारी कृती

 • पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये पाणी घालून उकडून घ्या.
 • मग बटाटे थोडे गार झाले कि कुकर मधून काढा आणि त्याची साल काढून ते कुस्करून एक मिक्सिंग बाऊलमध्ये घाला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवा आणि त्या मैद्याच्या किंवा कॉर्णफ्लोवर लावून घ्या.
 • आता तवा गरम करा आणि त्यावर तेल टाकून मावतील तेवड्या टिक्की घाला आणि त्याला तेल सोडून ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. ह्या सर्व टिक्की दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या.
 • तुमचे पॅटीस देखील तयार झाले.

तिसरी कृती : सर्व्हिग कसे करावे

 • रगडा पॅटीस सर्व्ह करताना एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये पॅटीस ठेवा आणि मग त्यावर एक मोठा चमचा गरम रगडा घाला आणि मग त्यावर १ चमचा चिंच गुळ चटणी, हिरवी चटणी , शेव आणि थोडीसी कोथिंबीर टाका आणि ते सर्व्ह करा.

टिप्स

 • पॅटीस मध्ये जर तुम्हाला आवडत नसेल तर हिरवी मिरची घातली नाही तरी चालेल.
 • बटाटे जास्त गार होऊ देवू नका ते थोडे गरम असतानाच मॅश करा ते गरम असताना मॅश केले तर चांगले होतात.

आम्ही दिलेल्या ragda pattice recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रगडा पॅटीस रेसिपी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ragada pattice recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ragda patties recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!