राकेश शर्मा मराठी माहिती Rakesh Sharma Information in Marathi

Rakesh Sharma Information in Marathi राकेश शर्मा मराठी माहिती राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते ज्यांनी अंतरिक्षात पहिले पाऊल ठेवले. भारताचे पहिले आणि संपूर्ण जगातून १३८ वे अंतराळवीर ठरले. ज्यांनी अंतरिक्षात सफर केली. आजचा लेखामध्ये आपण राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरी विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचा एक सर्वसामान्य ते अंतराळवीर होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. राकेश शर्मा यांच्या अंतराळवीर सफरी मुळे भारताचे नाव अवकाश संशोधन क्षेत्रात संपूर्ण जगभर पसरलं.

rakesh sharma information in marathi
rakesh sharma information in marathi

राकेश शर्मा मराठी माहिती – Rakesh Sharma Information in Marathi

पूर्ण नाव (Name)राकेश शर्मा
जन्म (Birthday)१३ जानेवारी १९४९
जन्म गाव (Birth Place)पंजाब प्रांतातील पटियाला
ओळख (Identity)अंतराळवीर

जन्म व वैयक्तिक आयुष्य

राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी भारताच्या पंजाब प्रांतातील पटियाला या जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचं बालपण अत्यंत मजेशीर गेलं. पुढे शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद येथे स्थलांतर केलं आणि तिकडूनच आपले प्राथमिक शिक्षण सुरू केलं. सेंट जॉर्ज ग्रामर स्कूल या हैदराबाद येथील शाळेतून राकेश शर्मा यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं.

पुढे ग्रॅज्युएशन साठी त्यांनी निजाम कॉलेज या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपली ग्रॅज्युएशन ची पदवी देखील प्राप्त केली. राकेश शर्मा यांना रशियन भाषा ज्ञात होती कारण ते त्यांच्या कुटुंबासह म्हणजेच पत्नी व मुलांसह इसवी सन १९९२ साली रशियातच राहत होते. त्यांचा मुलगा कपिल शर्मा हा दिग्दर्शक आहे आणि मुलगी कृतिका शर्मा ही मिडिया आर्टिस्ट आहे.

अंतराळवीर राकेश शर्मा – Rakesh Sharma Astronaut 

आपल्या सर्वांचचं लहानपणी मोठे होऊन काही ना काही बन्याचं स्वप्नं असतं. काहींना शिक्षक बनायचा असते तर, काहींना डॉक्टर तर, काहींना पायलट. अशी स्वप्न आपण सगळे लहान असताना बघतो परंतु पुढे जाऊन ती खरी होतील की नाही याचा कोणालाच अंदाज नसतो. परंतु राकेश शर्मा यांनी लहानपणापासून पायलट बनायचे स्वप्न पाहिलं.

आणि त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद एक करून आपलं स्वप्न सत्यात साकारलं आणि ते जगलं. सर्वसामान्य माणसापासून ते एक अंतराळवीर होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी नेहमीच काल्पनिक राहिला आहे. आज जग खूप पुढे निघून आलं आहे. आज असा कुठलाही देश नाही ज्याने अंतराळात झेप घेतली नसेल परंतु भारत हा अंतराळ या विषयाच्या बाबतीमध्ये नेहमीच कुठे ना कुठे पुढे राहिला आहे.

मग चंद्रयान असू दे किंवा मंगळ्यान अशा अनेक मोहिमा भारताने अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. माणसाला नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेण्याची आवड असते आणि त्यामध्ये अंतराळामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळणे व जगाला अजून नवीन गोष्टींची ओळख करून देणे,‌ अवकाश संशोधन करणे या सगळ्यांमध्ये भारत एका अव्वल स्थानावर आहे.

आज संपूर्ण जग अवकाश संशोधनाच्या पाठी लागला आहे पृथ्वी शिवाय इतर कुठला दुसरा असा ग्रह आहे जिथे मानवी वावर असू शकतो किंवा केला जाऊ शकतो. याचा शोध सर्वत्रच चालू आहे. अशामध्ये कल्पना चावला, राकेश शर्मा यांच्यासारखे दिग्गज अंतराळात सफर करून वेगळे संशोधन करून भारताला अवकाश संशोधनात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

लहानपणापासूनच राकेश शर्मा यांना अंतराळातील घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असायची. राकेश शर्मा फक्त अठरा वर्षाचे होते जेव्हा त्यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. राकेश शर्मा यांची अंतराळात जाण्याची सुरुवात १९७० सालापासून झाली. इसवी सन १९६६ मध्ये राकेश शर्मा यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला.

पुढे ३५ व्या राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी मधून पास होऊन राकेश शर्मा यांनी भारतीय वायुसेनेत टेस्ट पायलट म्हणून प्रवेश घेतला. इसवी सन १९७० मध्ये भारतीय वायू दलात टेस्ट पायलट म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. इसवी सन १९७१ सालापासून एअरक्राफ्ट द्वारे उड्डाण करण्यास सुरुवात झाली. राकेश शर्मा यांचे या क्षेत्रातील कौशल्य अतिशय आधुनिक होते. त्यांच्या कामामुळे त्यांची वरच्या पदांवर नियुक्ती होऊ लागली.

इसवी सन १९८४ मध्ये राकेश शर्मा यांना भारतीय वायु सेनेत स्कवार्डन लीडर व पायलट या पदांवर नियुक्त करण्यात आलं. इस्रो आणि सोवियत इंटर कॉसमॉसस्प्रेस यांच्या संयुक्त विद्यमानाने जी मोहीम आयोजित केली होती त्या मोहिमेमध्ये अवकाश यात्री सदस्यांच्या यादीमध्ये राकेश शर्मा यांचे नाव निवडलं गेलं.‌

राकेश शर्मा यांनी soyuz T११ या मोहिमेअंतर्गत अवकाश यानामधून २ एप्रिल १९८४ रोजी salyut 7 या स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली. त्यांच्या या कारकिर्दी मुळे भारताचे नाव अवकाश संशोधनात मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचलं. अंतराळातील राकेश शर्मा यांच्या वावर जवळपास सात दिवस २१ तास आणि चाळीस मिनिटे इतका होता. अंतराळात राहून राकेश शर्मा यांनी शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केला. बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी तिथे संशोधन केलं.

अंतराळात पाऊल ठेवण्याआधी तीन वर्ष राकेश शर्मा यांनी कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण घेतले. इतकच नव्हे तर सुप्त काॅलास्ट्रॉफोबियाची चाचणी घेण्यासाठी बंगलोर मधील हवाई दलाच्या सुविधेने त्यांना तब्बल ७२ तास एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. राकेश शर्मा यांनी रशियन भाषेच देखील प्रशिक्षण घेतलं कारण बहुतांश सूचना या रशियन भाषेत असायच्या.

ज्यावेळी राकेश शर्मा मास्को मध्ये अंतराळात जाण्यासाठी प्रशिक्षण घेत होते तेव्हा त्यांना त्यांच्या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी देखील कळाली. परंतु तरी त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत आपले ध्येय पूर्ण करून दाखवल. विंग कमांडर पदावरून निवृत्ती दिल्यावर इसवी सन १९८७ मध्ये राकेश शर्मा यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रवेश घेतला.

पुढे काही काळ त्यांनी hal नाशिक डिव्हिजन येथे चीफ टेस्ट पायलट म्हणून सेवा दिली. पुढे याच पदावर राहत त्यांची बदली बेंगलोर मध्ये करण्यात आली. ज्यावेळी राकेश शर्मा अंतराळवीर यात्रेवर होते त्यावेळी घडलेला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. तर झालं असं त्यावेळेची भारतीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांच्या सोबतच्या कॉन्फरन्स कॉल वर राकेश शर्मा यांना अंतराळातून आपला भारत कसा दिसतो?

हा प्रश्न केला होता या प्रश्नाचं उत्तर देताना राकेश शर्मा म्हणाले सारे जहाँ से अच्छा! हे उत्तर ऐकताच इंदिरा गांधीजी यांच्या चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हास्य आलं. खरंच हे वाक्य सर्व भारतीयांचा अभिमान आहे अंतराळातून देखील आपला भारत इतका सुंदर दिसतो याची कल्पना आपल्याला राकेश शर्मा यांच्यामुळे झाली.

अवकाशात मनुष्य पाठवणारा आपला भारत देश चौदाव्या क्रमांकावर आहे. राकेश शर्मा जेव्हा अंतरिक्ष यात्रेस गेले होते तेव्हा त्यांनी तिकडे वेगवेगळे भारतीय उपक्रम केले. त्यातीलच काही म्हणजे त्यांनी भारतीय जेवणाचा डब्बा अवकाशात नेला होता. जेवणाच्या डब्यामध्ये सुजीचा हलवा, आलू छोले, भाजी पुलाव इत्यादी पदार्थ त्यांनी नेहले होते.

याशिवाय अवकाशात गेल्यावर तिकडच्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगा देखील करून पाहिले. पुढे त्यांनी अंतराळात जाणारे यात्रेकरूंना तिकडील होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला होता. लहानपणापासून राकेश शर्मा यांचं स्वप्न होतं की मोठ होऊन त्यांना देखील पायलट बनायचे आहे.

आज त्यांच हे स्वप्न पूर्ण झालं शिवाय संपूर्ण जगभरात त्यांच्या कार्याची वाह!वाह! झाली. अंतराळातून आल्यावर काही वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा अंतराळात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु या वेळेला काही कामानिमित्त नाही तर अंतराळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी.

पुरस्कार

आज अवकाश संशोधन हे क्षेत्र खूप महत्त्वाचं बनलं आहे. रोज नवीन नवीन या क्षेत्रामध्ये अनेक शोध लागत असतात. येणाऱ्या पुढील काळामध्ये हे क्षेत्र आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनेल. या क्षेत्रांमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गजांनी आपले योगदान दिलं आहे आणि त्याची सुरुवात पहिले.

भारतीय राकेश शर्मा यांनी भारतीय म्हणून पहिल पाऊल ठेवलं आणि त्यानंतर पहिली भारतीय महिला म्हणून चावला यांनी अंतराळात पाऊल ठेवलं आणि आपल्या देशाचं नाव खूप मोठं केलं. राकेश शर्मा यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राकेश शर्मा यांची अंतरिक्ष यात्रा पार पडल्यावर त्यांना हिरो ऑफ सोवियेत संघ या पदाने सन्मान करण्यात आला. भारत सरकारने देखील त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला आणि त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली. अशोक शर्मा यांना पश्चिम स्टार, संग्राम मेडल, सैन्य सेवा मेडल, विदेश सेवा सर्विस मेडल असे वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राकेश शर्मा यांच्यासारख्य थोर व्यक्तिमत्व आपल्या भारताला लाभल्यामुळे भारताचे नाव सातासमुद्रापार गेलं. राकेश शर्मा हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

आम्ही दिलेल्या rakesh sharma information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राकेश शर्मा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rakesh sharma full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rakesh sharma astronaut information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये astronaut rakesh sharma information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!