त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर Ramabai Ambedkar Information in Marathi

Ramabai Ambedkar Information in Marathi त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर पुरुषाच्या एक यशस्वी कथे मागे स्त्रीचा हात असतो, याचा प्रत्यय रमाबाई आंबेडकर यांची जीवन कथा बघितल्यावर येतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासारखे थोर व्यक्तीमत्व ज्यांनी भारताचे संविधान स्थापन केलं. या थोर व्यक्तीच्या यशामागे त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या, त्याच मुळे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी इतकं मोठं ध्येय गाठलं. रमाबाई यांची साथ आणि मानसिक आधार या दोन गोष्टींवर भीमराव आंबेडकर यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. रमाबाई या भीमराव आंबेडकरांच्या प्रेरणास्थान होत्या. आजच्या लेखा मध्ये आपण रमाबाई आंबेडकर यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ramabai ambedkar information in marathi
रमाबाई आंबेडकर फोटो – ramabai ambedkar information in marathi

रमाबाई (रमाई) आंबेडकर यांची माहिती – Ramabai Ambedkar Information in Marathi

नाव(Name)रमाबाई आंबेडकर
जन्म (Birthday)७ फेब्रुवारी १८९८ (Ramabai Ambedkar Jayanti)
जन्मस्थान (Birthplace)वानंद
वडील (Father Name)भिकू धोत्रे
पती (Husband Name)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आईचे नाव (Mother Name)रुक्मिणी भिकू धोत्रे
मुले (Children)यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) आणि राजरत्न.
मृत्यू (Death)२७ मे १९३५

जन्म

अगदी जन्मापासूनच रमाबाई यांना कष्ट सहन करावे लागले. त्यांचा जन्म गरीब घराण्यात झाला. ७ फेब्रुवारी १८९८ रोजी रमाबाई यांचा जन्म झाला. पण रमाबाईंना त्यांच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटांची चाहूल नव्हती जन्मापासूनच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. गरीब घरात जन्माला आल्यावर प्रत्येक गोष्टींमध्ये चणचण भासते.

रमाबाईंचे वडील पण अगदी साधं काम करायचे दाभोळ बंदरातून माशांनी भरलेल्या मोठ्या मोठ्या टोपल्या ते बाजारापर्यंत पोहोचवत असत. या कामातून त्यांना जेमतेम पैसे मिळायचे या पैशातून त्यांचं घर अगदी कसं कसं चालायचं. शिवाय घरात खाणारे सहा जण होते. आई वडील तिघी बहिणी आणि एक भाऊ.

मोठ्या बहिणीच तर लग्न झालं होतं पण घरात धाकटी बहीण आणि भाऊ होता शिवाय त्यांच्या वडिलांना देखील छातीच आजारपण होतं. लहानपणापासूनच रमाबाई यांच्या आयुष्यात दुःखाची रोपटी लागत गेली लहान वयातच त्यांचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्यांची आई त्यांच्यापासून दुरावल्या.

शिक्षण

रमाबाई तशा लहानपणापासूनच हुशार होत्या रमाबाई यांचे शिक्षण तसं फारसं नव्हतं. त्यांना लिहायला वाचायला येईल एवढं शिक्षण बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं. रमाबाईंची शिकवणी त्यांच्या घरी चालायची.

वैयक्तिक आयुष्य

रमाबाई यांचे वैयक्तिक आयुष्य फार हाल-अपेष्टा सहन करण्यात गेलं. रमाबाई यांचं जीवन कष्टमय होतं त्यांना कधी आराम मिळालाच नाही. संपूर्ण जीवन त्या कष्ट करत राहिल्या. जन्म गरीब घरात झाल्यामुळे लहानपणी प्रत्येक मूलभूत गरज मिळवण्यासाठी रमाबाईंची धडपड चालू होती.

लहानशा रमाबाईने अगदी लहान वयात स्वतःच्या आईला स्वतःपासून कायमचा दूर जाताना बघितलं. तेव्हा‌‌ त्या खूपच लहान होत्या. जेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन एक दोन वर्षांमध्ये त्यांचे वडील देखील त्यांच्यापासून दुरावले लहान वयातच त्यांनी आई-बापाचं छप्पर गमावलं आता स्वतःच्या लहान बहिणीची आणि भावाची जबाबदारी रमाबाई यांच्यावर होती. त्या स्वतः देखील कवळ्या मनाच्या होत्या.

इतक्या लहान वयामध्ये त्यांच्यासमोर खूप मोठं संकट येऊन उभं राहिलं होतं. पण रमाबाईंचे नातलग चांगले होते त्यांचे काका म्हणजेच वलंगकर काका आणि गोविंदपूरकर मामा हे रमाबाई आणि त्यांची धाकटी बहीण आणि भाऊ या दोघांना घेऊन मुंबईमधील भायखळा मार्केट येथे कायमचे वस्तीसाठी आले.

इसवी सन १९०६ मध्ये रमा बाईंच्या आयुष्यामध्ये एक चांगली गोष्ट घडली त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला हा विवाह रमाबाई जिथे राहात होत्या म्हणजेच भायखळा मार्केट येथे संपन्न पडला. रमाबाईंचे वय तेव्हा आठ ते नऊ वर्ष होतं आणि आंबेडकर तेव्हा जवळपास १४ वर्षाचे होते. या दोघांचं नातं खूप चांगलं होतं आंबेडकर रमाबाई यांना लाडाने रामू असे हाक मारायचे.

एकामागोमाग एक रमाबाई यांच्यावर संकटे येत गेली. आधी लहान वयातच त्यांचे आई-वडील त्यांच्यापासून कायमचे दुरावले त्यानंतर सासरे आणि दीर त्यानंतर दीराचा मुलगा. हे सगळं घडत असताना बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण घेत होते. परंतु रमाबाई यांनी हे सगळे स्वतः सहन केलं बाबासाहेब यांना या गोष्टींची भनक देखील लागून दिली नाही. बाबासाहेब यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाई यांनी हे सगळं एकटीने सहन केल.

राजकीय आयुष्य

रमाबाई खूपच दयाळू होत्या. त्यांना दुसऱ्यांचे होणारे हाल कधीच बघवले नाही. त्या स्वतः कष्ट करत होत्या त्या स्वतः गरिबीतून जात होत्या. स्वतः हाल-अपेष्टा सहन करत होत्या. तरी पण दुसऱ्यांना मदत करण्याच त्यांनी कधीच सोडल नाही. डॉक्टर बाबासाहेब जेव्हा त्यांचं पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते तेव्हा, रमाबाई इकडे एकट्या पडल्या होत्या.

त्यांनी अस्पृश्य आणि दलित समाजाच्या हितासाठी नेहमीच स्वतःच्या सुखांचा त्याग केला. अस्पृश्यता समाजातुन मिटवून टाकण्यासाठी त्यांनी लढा दिला. भीमराव आंबेडकर यांना जेव्हा कामानिमित्त परदेशात जाव लागायचे तेव्हा एकदा ते रमाबाई एकट्या पडतील म्हणून त्यांना आपल्या जवळच्या मित्राकडे पाठवलं.

वराळे असं त्या मित्राचं नाव होतं वराळे यांचा स्वतःचं वसतिगृह होतं. जिथे मुले खेळायला यायची दोन चार दिवस झाले मुलं खेळायला आली नाही ही शंका रमाबाई यांच्या मनात येताच त्यांनी वराळे काकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले वस्ती गृहात मुलांच्या जेवणाचं सामान अजून आले नाही आहे आणि ते सामान यायला जवळपास तीन चार दिवस जातील.

तोपर्यंत हि मुलं उपाशी राहतील. त्या वेळी रमाबाई यांच्यातील एक आई जागी झाली त्यांचे आईपण जागं झालं त्या स्वतः डोळ्यातील आसवं पुसत आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या कपाटातून त्यांनी आपल्या जवळ असलेले सोनं-नाणं काढले आणि ते काकांना दिल आणि म्हणाल्या की हे सोने गहाण ठेवा नाहीतर विका आणि यातून जे पैसे मिळतील त्यातून जेवणाचं सामानं आणा आणि मुलांना जेवायला द्या. रमाबाई यांच्यातील ही प्रेमळ दयाळू बाजू बघूनच त्यांना लोकांनी रमाई असं नाव दिलं.

नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना शिक्षणात प्रोत्साहित करणारी रमाबाई एक वेळचं जेवण जेवायची आणि शेणाच्या गोवऱ्यआ थापायची आणि त्यातून मिळेल ते पैसे ती बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे लंडनला पाठवून द्यायची. पतीचं शिक्षण पूर्ण व्हावा म्हणून रमाबाई यांनी अतोनात कष्ट केले. आंबेडकर यांची गौरव गाथा रमाबाई यांच्यामुळेच आज लोकांना ठाऊक आहे.

रमाबाई आंबेडकर कविता

रमाबाई यांचे व्यक्तिमत्व आणि जीवनाची गाथा सांगणाऱ्या अनेक कविता आहेत. रमाबाई यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांना त्यागमुर्ती असं देखील नाव पडलं. रमाबाई यांचे जीवन किती कष्टमय होतं हे या कवितेद्वारे खूप छान शब्दात मांडलं आहे.

बुद्धा विचारांच्या सोबतीला, घोट विचारांचा प्याली

स्वप्न जगण्या भीमरावांचे, रमा त्यागमुर्ती झाली.

दारिद्र्याच्या झोतामंधी ति गरिबीत नाहली

बाबासाहेब विचारात ती अंगी अलंकार पाहली.

तिने कधी न केली भीमरावांना, चैन सुखाची मागणी

न्याय हक्कासाठी लढणारी तिने, मजबूत केली भिमलेखणी

आज पुन्हा एकदा रमाईनं फुंकर द्यावी रमाईला

आंबेडकरी विचारांची वात घ्यावी समईला.

मी वंदन करितो आज ज्ञानदिव्याच्या समईला

गोरगरीब बहुजनांच्या भीमरावांच्या रमाईला.

या कवितेमध्ये रमाबाई यांचे वर्णन इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात केले आहेत की खरंच थोर होत्या रमाबाई त्यांनी आपल्या पतीच्या विचारांना नेहमीच पाठिंबा दिला. आणि पतीचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी स्वतः कष्ट करीत राहिल्या. रमाबाई यांच्या जीवनाची कथा सांगणारे अनेक साहित्य प्रसिद्ध आहेत त्यातील दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत एक म्हणजे रमाई आणि दुसरं म्हणजे प्रिय रामू.

 रमाबाई भिमराव आंबेडकर मराठी चित्रपट

भीमराव आंबेडकर यांच्या यशाची कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु, त्यांना त्यांच्या या प्रवासात प्रोत्साहित करणाऱ्या रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या बद्दल अगदी फारच कमी लोकांना माहित आहे. जनतेला रमाबाई यांची माहिती मिळावी म्हणूनच रमाबाई यांच्या नावाने त्यांची जीवन गाथा सांगणारा रमाबाई भिमराव आंबेडकर मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाचं प्रदर्शन केलं आहे.

मृत्यू

आयुष्यभर रमाबाई यांनी फक्त स्वतःला कामांमध्ये झोकून दिलं होतं. त्या मिळेल ते काम करायच्या. त्यांचं संपूर्ण जीवन कष्टाने भरलेलं होतं. रमाबाईंचं शरीर काम करून करून थकून गेलं होतं. इसवी सन १९३५ मध्ये रमाबाई यांची तब्येत खराब होण्यास सुरुवात झाली. हळू हळू त्यांची तब्येत बिघडत गेली.

१९३५ मध्ये मे महिन्यात रमाबाई यांचे आयुष्यातील अखेरचे दिवस सुरू झाले. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळे वैद्य बोलवायला सुरुवात केली परंतु रमाबाई यांच्या प्रकृतीत काही बदल दिसत नव्हता. २७ मे १९३५ मध्ये रमाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यादिवशी समाजातील प्रत्येक व्यक्ती रडली होती. आंबेडकर यांचा देखील रमाबाईं वर अतिशय जीव होता. त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते. रमाबाई यांनी शेवटपर्यंत त्यांच्या पतीच्या समाज कार्यामध्ये त्यांना साथ दिली.

आम्ही दिलेल्या ramabai ambedkar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “रमाबाई भिमराव आंबेडकर” ramabai ambedkar jayanti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about ramabai ambedkar in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ramabai bhimrao ambedkar information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Ramabai Ambedkar Biography in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!