rayaji bandal information in marathi रायाजी बांदल माहिती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या इतिहासाबद्दल सर्वांना माहिती आहे. कारण त्यांनी अनेक युध्दे आणि गनिमी कावे करून स्वराज्याचा विस्तार केला होता आणि हा स्वराज्याचा विस्तार करत असताना त्यांच्यासोबत अनेक लोक होते जे स्वराज्यासाठी आपले प्राण देखील देण्यासाठी तयार होते आणि त्यामधील एक म्हणजे रायाजी बांदल ज्याचा इतिहास आणि त्यांचे स्वराज्यासाठी दाखवलेले शौर्य अपरिचित आहे.
आज आपण या लेखामध्ये अनेकांना अपरिचित असणारे आणि स्वराज्यासाठी प्राण सोडेपर्यंत लढणारे रायाजी बांदल यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांदल घराणे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या संकल्पनेला मदत करत होते.
कारण त्यांना देखील मराठा साम्राज्य विस्तारित व्हावे म्हणून ध्यास होता आणि म्हणून त्या कुटुंबाने स्वराज्यासाठी आपले आयुष्य पनाला लावले आणि बांदल या कुटुंबाने आपल्या चांगल्या कर्तुत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मन जिंकले होते.
परंतु या बांदल कुटुंबाचा आणि रायाजी बांदल आणि बाजी बांदल यांचा उल्लेख हा इतिहासामध्ये फारसा केलेला नाही. चला तर खाली आपण रायाजी बांदल यांच्याविषयी काही माहिती घेवूया.
रायाजी बांदल माहिती – Rayaji Bandal Information in Marathi
रायाजी बांदल हे कोण होते – rayaji bandal history in marathi
रायाजी बांदल हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये काम करणारे एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक सैनिक होते आणि या सैन्यामध्ये त्यांचे भाऊ बाजी बांदल देखील काम करत होते कारण त्यांना देखील स्वराज्य विस्ताराचा ध्यास होता आणि म्हणून बांदल कुटुंबाने स्वताला स्वराज्यासाठी समर्पित केले होते.
रायाजी बांदल हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळ या भागामधील पिसावारे या गावातील होते. रायाजी बांदल यांचे वडील कृष्णाजीराजे बांदल हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी काम करत होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनापती होते आणि त्यांच्याकडे एकूण ५३ गावांची वतनदारी देण्यात आली होती.
कृष्णाजीराजे बांदल हे शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या मुलांना देखील लहानपणी पासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर होता आणि त्यांना देखील महाराजांच्या सोबत काम करायचे होते आणि त्यामुळे कृष्णाजी राजे यांनी आपल्या मुलांना लहान वयामध्येच शौर्याचे आणि लढाईचे प्रशिक्षण दिले होते.
रायाजी बांदल यांचे स्वराज्यातील महत्व ?
रायाजी बांदल हे स्वराज्यातील एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती होते आणि त्यांनी पावनखिंड या लढाईमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे परंतु हे अनेकांना माहित नाही कारण या गोष्टीचा उल्लेख हा इतिहासकारांच्याकडून कधी झालाच नाही. त्यांनी पावनखिंडीतल्या लढाई मध्ये तर महत्व पूर्ण कामगिरी बजावली होतीच परंतु त्यांनी प्रताप गडाच्या लढाईमध्ये आणि स्वराज्याच्या इतर लढायांच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली होती.
पावनखिंड लढाई मधील रायाजी बांदल यांची कामगिरी
ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर होती त्यावेळी सिध्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता आणि त्यावेळी शिवाजी महाराज सिध्दी जोहराला चुकवून विशाळगड कडे निघाले होते त्यावेळी तो त्यांच्या पाठलाग करत विशाळगड परिसरातील डोंगरामधील खिंडी जवळ आला.
आणि त्यावेळी त्या ठिकाणी सिध्दी जोहरला त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल आणि शम्भूसिंग जाधव यांनी रोखले आणि छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित पणे विशाळगड वर पोहचले परंतु बाजी प्रभू, रायाजी बांदल फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल आणि त्यांचे इतर सहकारी हे खिंडीमध्ये सिध्दी जोहरशी लढत होते.
आणि सिध्दी जोहर कडे जास्त सैनिक होते म्हणजेच त्यांच्याकडे १०००० पेक्षा अधिक सैन्य फौज होती आणि बाजी प्रभू यांची सैन्य फौजेमध्ये ६०० सैनिक होते आणि पावन खिंडी पर्यंत आल्यानंतर असा निर्णय घेतला कि ३०० सैनिक हे बाजी प्रभू यांच्या सोबत खिंडीमध्ये लढतील.
पावन खिंडीतील हि लढाई १३ जुलै १६६० मध्ये झाली होती आणि या लढाई नेतृत्व रायाजी बांदल, बाजी प्रभू देशपांडे आणि बाजी बांदल यांनी केले होते. या लढाईमध्ये महाराजांचे सैनिक खूप कमी असले तरी बाजी प्रभू यांनी लढण्याचा निर्णय घेतला.
रायाजी बांदल आणि त्यांचे भाऊ हे धनुर्विद्या आणि तलवार बाजी मध्ये अगदी निपुण होते आणि त्यांनी या लढाई मध्ये सिध्दी जोहरच्या सैनिकांच्यावर धनुष्य बाणांचा मारा असा चालू ठेवला होता कि सिध्दी जोहरच्या सैनिकांना पुढे येताच येत नव्हते आणि ते पूर्णपणे हतबल झाले होते.
परंतु जोहरचे सैनिक जास्त असल्यामुळे त्यांना लढाई जिंकण्यास मदत झाली परंतु बाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल आणि बाजी बांदल हे शेवटपर्यंत लढाई लढले आणि या लढाई मध्ये रायाजी बांदल, बाजी प्रभू देशपांडे आणि बाजी बांदल आणि काही इतर सहकारी देखील धारातीर्थ झाले.
रायाजी बांदल आणि बाजी बांदल यांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आपले प्राण दिले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पिसावारे या गावामध्ये राहणाऱ्या बांदल बंधू यांच्या माता यांना भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या घराण्याला मनाची तलवार देखील देण्यात आली.
बांदल घराण्याचा इतिहास सांगणारे मराठी चित्रपट
बांदल या घराण्याचा इतिहास हा अनेकांना अपरिचित आहे आणि त्यांच्या कामगिरी विषयी अनेकांना माहिती नाही, परंतु काही कालावधी पूर्वी प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटामध्ये बांदल घराण्याचा काही इतिहास उघडकीस आला आहे आणि तसेच फत्ते शिकस्त या चित्रपटामध्ये देखील त्यांच्या इतिहासाविषयी काही प्रमाणात बांदल घराण्याचा इतिहास दाखवला आहे.
आम्ही दिलेल्या rayaji bandal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रायाजी बांदल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rayaji bandal history in marathi या rayaji bandal information in Marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rayaji bandal in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट