Saibai Bhosale Information in Marathi सईबाई भोसले माहिती मराठी महाराणी सईबाई या मराठा साम्राज्याचे पहिले सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. इतकच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री देखील होत्या. महाराणी सईबाई यांचा इतिहास घडविण्यात एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रोत्साहन आणि स्फूर्तीस्थान म्हणजे सईबाई निंबाळकर. त्या महाराजांच्या पहिल्या पत्नी असल्यामुळे महाराज आणि सईबाई यांच्यामध्ये एक अनोखं नातं होतं महाराणी सईबाई यांनी महाराजांना कशा प्रकारे त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी मध्ये सोबत दिली हे आज आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
सईबाई भोसले माहिती – Saibai Bhosale Information in Marathi
नाव (Name) | महाराणी सईबाई |
जन्म (Birthday) | २९ ऑक्टोंबर १६३३ |
जन्मस्थान (Birthplace) | फलटण |
वडील (Father Name) | मुधोजी राजे निंबाळकर |
पती (Husband Name) | छत्रपती शिवाजी महाराज |
मुले (Children Name) | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज |
मृत्यू (Death) | ५ सप्टेंबर १६५९ |
लोकांनी दिलेली पदवी | महाराणी |
महाराणी सईबाई जन्म:
महाराणी सईबाई म्हणजेच मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होय. महाराणी सईबाई यांचं संपूर्ण नाव सईबाई निंबाळकर आहे. महाराष्ट्रातील फलटण येथे २९ ऑक्टोंबर १६३३ रोजी महाराणी सईबाई यांचा जन्म झाला. मुधोजी राजे निंबाळकर आणि रेऊबाई निंबाळकर या दांपत्यांच्या पोटी सईबाई निंबाळकर यांचा जन्म झाला. पूर्वीपासूनच निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण मानलं जात होतं.
- नक्की वाचा: महाराणी ताराबाई यांची माहिती
महाराणी सईबाई यांच्यावर लहानपणापासूनच त्यांच्या आईवडिलांनी उत्तम संस्कार केले. घराला एकत्र ठेवणं, पतिव्रता तसच इतर गोष्टींच त्यांच्या आईने दिलेलं ज्ञान सईबाई यांना छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन करत होते तेव्हा कामी आलं. काही पुस्तकांमध्ये उल्लेख केलेल्या चित्रांप्रमाणे महाराणी सईबाई या दिसायला रेखीव आणि गव्हाळ्या रंगाच्या होत्या. महाराणी सईबाई यांचा स्वभाव अतिशय समजूतदार, शांत होता. महाराणी सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.
महाराणी सईबाई विवाह:
महाराणी सईबाई या निंबाळकर घराण्यात जन्माला आल्या. निंबाळकर घराणं हे सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच मानलं जायचं तसेच, निंबाळकर घराणे आणि भोसले घराणे यांच्यामध्ये आधीपासूनच चांगले व्यवहार संबंध होते. म्हणूनच मराठा स्वराज्याचे पहिले सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं लग्न सईबाई निंबाळकर यांच्याशी झालं.
सईबाई निंबाळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा लग्न सोहळा लाल महाल येथे १६ मे १६४० रोजी संपूर्ण झाला. त्या काळी बालविवाहाची प्रथा होती म्हणूनच महाराणी सईबाई या फक्त सात वर्षाच्या होत्या तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं वय अकरा वर्ष होतं. बाल विवाह असल्यामुळे सईबाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होण्या आधी त्यांच्या एक मैत्रीण बनल्या.
- नक्की वाचा: महाराणी येसूबाई यांची माहिती
ज्या त्यांना नेहमीच समजून घ्यायच्या त्यांना नेहमीच सोबत दिली आणि याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराणी सईबाई यांच्यावर अधिक जीव होता. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना सईबाई पासून चार अपत्य झाली. तीन मुली आणि धर्मवीर संभाजी राजे.
महाराणी सईबाई या सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचे दात मोजणारा शिवबाचा छावा ओळखले जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या. महाराणी सईबाई नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बऱ्याच घराण्याशी सोयरीक जुळली परंतु महाराणी सईबाई यांच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील स्थान कोणीही भरून काढू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच स्फूर्तिस्थान म्हणून महाराणी सईबाई निंबाळकर यांची ओळख आहे. महाराणी सईबाई यांचं वागणं आणि त्यांच्या समजूतदार पणामुळे तसंच त्या ज्या प्रकारे कौटुंबिक जबाबदारी पार पाडायच्या त्यामुळे त्या जिजाऊ यांच्या लाडक्या सुनबाई होत्या.
- नक्की वाचा: जिजामाता यांची माहिती
महाराणी सईबाई कार्य:
महाराणी सईबाई यांच इतिहासात नाव खूप कमी वेळा घेतलं जातं खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान जसं माता जिजाऊ होत्या त्याचप्रमाणे महाराज्यांना मानसिक बळ महाराणी सईबाई यांच्या कडून मिळायचं. महाराणी सईबाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत कुठलेही पराक्रम गाजवले नसले तरी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मानसिक बाळाचा पाठिंबा देणं हे सर्वात महत्त्वाचं काम सईबाई करत होत्या.
सईबाई आणि महाराज यांचं नातं अगदी लहान वयात बांधलं गेल्यामुळे सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये एक वेगळाच विश्वास एक वेगळाच वेगळच प्रेम होतं. लहानपणापासून सोबत असल्यामुळे सोबत बोलणं चाललं खेळत रुसवे-फुगवे झाल्यामुळे महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये एक अतूट बंधन तयार झालं होतं.
- नक्की वाचा: सावित्रीबाई फुले यांची माहिती
त्यामुळे महाराजांना कुठल्या गोष्टीची चिंता वाटते किंवा एकाप्रकारे सईबाई या महाराजांसाठी मनकवडी होत्या. महाराजांच्या मनातील प्रत्येक गोष्ट सइबाई यांना कळायची. छत्रपती शिवाजी महाराज जे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे सम्राट म्हणून ओळखले जातात.
ज्यांच्या मध्ये शत्रूला आव्हान देण्याच बळ त्यांना त्यांची पत्नी सईबाई यांच्या कडूनच मिळायचं. सईबाई यांच्या मानसिक आधाराशिवाय आणि पाठिंबा तसेच प्रोत्साहन शिवाय महाराजांचे पाऊल पुढे पडायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जितकं प्रोत्साहित राजमाता जिजाऊ यांनी केलं तितकच प्रोत्साहित, पाठिंबा आणि शिवाजी महाराजांवर विश्वास महाराणी सईबाई यांनी दाखवला.
स्वराज्यात कर्तव्य पार पाडण्यात जीतक राजमाता जिजाऊ यांचे श्रेय आहे तितकच श्रेय सईबाई यांनादेखील जात. जिथे राजमाता जिजाऊ महाराजांना राजकीय सल्ले द्यायचे तिथे सईबाई महाराजांना मानसिक आधार आणि पाठिंबा देण्याचं काम करायचे ज्यामुळे महाराजांना शत्रूंशी लढा देण्यात जोश यायचा.
महाराणी सईबाई मृत्यू:
महाराणी सईबाई या अतिशय गोड, मधुर स्वभावाच्या होत्या त्यांच्या स्वभावामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा सईबाई यांच्यावर खूप जीव होता. महाराज सोडले तर अख्खी रयत आणि घराण्यातील सगळ्यांनाच सईबाई यांच्याशी एक वेगळाच लगाव होता. महाराणी साईबाई यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या चालू असल्या तरी त्या अल्पायुषी ठरल्या.
अवघी २६ वर्षाच्या असताना महाराणी सईबाई यांचा मृत्यू झाला. महाराणी सईबाई २४ वर्षाच्या असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना जन्म दिला. त्यानंतर त्यांना बाळंत व्याधाने त्रासले महाराणी सईबाई या दिवसें-दिवस कमकुवत होऊ लागल्या. त्यांच्यामध्ये अशक्तपणा येऊ लागला आणि त्या त्यांनी अंथरूण पकडले.
महाराणी सईबाई यांना बरं करण्यासाठी अनेक उपाय करून बघितले देवाला नारळ दिला, देव पाण्यात ठेवले, नको-नको ते नवस केले, लांब लांब वरून अनुभवी वैद्य बोलावले, वेगवेगळ्या प्रकारची औषधे सुरू केली परंतु हे सगळं करून देखील महाराणी सईबाई यांना काही बरं वाटत नव्हतं.
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्यसाठीची धडपड देखील चालू होती आणि त्यामध्ये महाराणी सईबाई यांचं आजारपण दोन्हीकडून छत्रपती शिवाजी महाराजांवर संकट ओडवलं होतं त्यांना सईबाई यांची नेहमीच काळजी वाटायची म्हणून त्यांनी सईबाई यांना थोडासा हवापालट व्हावा किंवा हवापालट झाल्यामुळे सईबाई यांना बरं वाटेल यामुळे प्रतापगडावर नेलं, त्यावेळी महाराजांसोबत जिजामाता देखील प्रतापगडावर गेल्या तिथे काही दिवस राहिल्या नंतर देखील सईबाई यांच्या मध्ये काही बदल आढळून येत नव्हता.
त्या माघारी परतला परंतु महाराज प्रतापगडावरच होते महाराज्यांच्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी होती. त्यामध्ये सईबाईंचा आजारपण यामुळे महाराजांचं काही लक्ष लागत नव्हतं परंतु महाराणी सईबाई यांची प्राकृतिक परिस्थितीची माहिती महाराजांपर्यंत पोहोचायची आणि त्यांचा जीव व्याकूळ व्हायचा परंतु हे काही जास्त दिवस टिकलं नाही. आणि शेवटी तो दिवस आलाच.
अपार प्रयत्न करून देखील शेवटी नियतीने साथ दिली नाही आणि ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये कायमचा दुरावा आला. महाराणी सईबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवपत्नी महाराणी सईबाई निंबाळकर त्यांचा आधार त्यांचा विश्वास त्यांचं स्फूर्तिस्थान त्यांच्यापासून नेहमीसाठी दुरावलं गेलं.
संभाजी महाराज देखील पोरके झाले दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या नियतीने त्यांच्यापासून मातृसुख हिरावून घेतलं. सईबाई यांच्या जाण्याने नंतर महाराज एकटे पडले होते. महाराज आणि सईबाई यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं महाराज जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा परत आल्यावर त्यांच्या यशाची गाथा महाराणी सईबाई यांना सांगण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असायचे. असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घ्याच्या आधी त्यांच्या मुखातून सई असा शेवटचा शब्द बाहेर आला होता.
महाराणी सईबाई समाधी:
महाराणी सईबाई यांच समाधी समाधी स्थळ वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्या जवळील पाल बुद्रुक येथे आहे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, महाराणी सईबाई भोसले यांची प्रतिमा कशी होती. maharani saibai bhosale information in marathi language त्यांचा जन्म, विवाह तसेच त्यांनी केलेली कार्ये काय आहेत? त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. maharani saibai information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about maharani saibai in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही महाराणी सईबाई भोसले यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या maharani saibai wiki in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट