सत्येंद्रनाथ बोस यांची माहिती Satyendra Nath Bose Information in Marathi

Satyendra Nath Bose Information in Marathi सत्येंद्रनाथ बोस यांची माहिती भारताचं आणि विज्ञान क्षेत्राच एकमेकांशी अतूट नातं आहे. आत्ताच नव्हे तर, अगदी पूर्व प्राचीन काळापासून भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये आणि खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये प्रगती करून ठेवली आहे. अगदी आर्यभट्ट यांच्या काळापासून ते आता सी.व्ही. रमण, जयंत नारळीकर, विक्रम साराभाई यांसारख्या मोठ-मोठ्या शास्त्रज्ञान पर्यंत. या महान व जेष्ठ शास्त्रज्ञांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे आज भारत विज्ञान क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर आहे. याचा सगळ्यांना अभिमानच आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महान शास्त्रज्ञा विषयी माहिती घेणार आहोत.

सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय भौतिकविज्ञ होते. आजच्या लेखामध्ये आपण सत्येंद्रनाथ बोस यांनी लावलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाची व त्यांच्या जगभर पसरलेल्या प्रसिद्धीची माहिती घेणार आहोत.

satyendra nath bose information in marathi
satyendra nath bose information in marathi

सत्येंद्रनाथ बोस यांची माहिती – Satyendra Nath Bose Information in Marathi

पूर्ण नाव सत्येंद्रनाथ बोस
जन्म१ जानेवारी १८९४
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलसुरेंद्रनाथ बोस
आईअमोदिनी बोस
ओळख भारतीय भौतिकविज्ञ
जन्मगावकोलकत्ता
मृत्यू४ फेब्रुवारी १९७४

जन्म

इसवी सन १८९४ चा जन्म (१ जानेवारी १८९४). भारतातील कोलकत्ता येथे सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म झाला. सत्येंद्रनाथ यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. परंतु, घरची परिस्थिती थोडी बेताची होती. सत्येंद्रनाथ यांची आई साधी गृहिणी होती. सत्येंद्रनाथ यांच्यावर त्यांच्या आईचे फार प्रेम होते. घरची परिस्थिती थोडी कठीण असल्यामुळे कधीकधी सत्येंद्रनाथ आई वडिलांना मदत व्हावी म्हणून मिळेल ती छोटी मोठे काम करायचे. सत्येंद्रनाथ यांचे बालपण कोलकत्ता मध्येच गेल.

शिक्षण व वैयक्तिक आयुष्य

शिक्षण ही काळाची गरज असते, हे कुठेतरी सत्येंद्रनाथ यांना माहित होतं. सत्येंद्रनाथ बोस यांना लहानपणापासूनच तशी अभ्यास करण्याची फार आवड होती. शाळेमध्ये शिकत असताना गणित हा विषय त्यांच्या फार आवडीचा होता. त्यांच्या घराची परिस्थिती पण हालाखीची होती म्हणून शाळेत जाऊन शिकून चांगलं मोठं व्हावं असं स्वप्न सत्येन्द्रनाथ यांनी पाहिलं होतं.

शाळेमध्ये गणित विषयाची त्यांना फार आवड होती. प्रत्येक वेळी गणित विषयांमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळायचे. एकदा तर फार मोठी गंमत झाली सत्येंद्रनाथ बोस यांना गणित या विषयांमध्ये १०० पैकी ११० गुण मिळाले. ते म्हणजे झालं असं की, गणित हा विषय सत्येंद्रनाथ यांना इतका आवडायचा की ते जितकं शिक्षक शिकवायचे त्याच्या पुढे जाऊन देखील स्वतः अभ्यास करून स्वतःचे वेगवेगळ्या पद्धती तयार करायचे.

अशाच प्रकारे परीक्षेमध्ये देखील सत्येंद्रनाथ यांनी स्वतःची पद्धत तयार करून प्रत्येक गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलं होतं. ज्यामुळे त्यांच्या शिक्षिका ने आश्चर्यचकित होऊन त्यांना जास्तीचे गुण दिले. फक्त गणितातच नाही तर ते बाकीच्या विषयांमध्ये देखील सत्येंद्रनाथ हुशार होते.

प्रत्येक वर्गामध्ये त्यांचा पहिला नंबर यायचा. १९१५ मध्ये सत्येंद्रनाथ यांनी गणित या विषयांमध्ये एमएससी ची पदवी मिळवली. सत्येन्द्र नाथ यांनी त्यांच्या हुशारीचा वापर करायच ठरवल आणि पुढचं शिक्षण घेण्यास ते प्रोत्साहित झाले. १९१५ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून सत्येंद्रनाथ यांना पदवी मिळाली, तेव्हाही ते प्रथम आले होते.

संपूर्ण विद्यापीठांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. सत्येन्द्र नाथ यांना हिंदी,‌ इंग्लिश, मराठी त्यासोबतच अनेक भाषांचं ज्ञान होतं. व्हायोलिन हे वाद्य देखील त्यांना अतिशय उत्तम प्रकारे वाजवता यायचं.

कारकीर्द

चांगल्या संगतीचा आपल्या मनावर आणि भविष्यावर चांगला परिणाम होतो. असंच जर चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात आपण यशस्वी होतो. त्याचप्रमाणे सत्येंद्रनाथ बोस यांना सुभाषचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रॉय या दोघांचे मार्गदर्शन मिळाले. या मार्गदर्शनामुळे सत्येंद्रनाथ बोस यांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये मोलाची भर पडली.

सन १९१६ ते सन १९२१ पर्यंत सत्येंद्रनाथ बोस यांनी कोलकत्ता येथील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा दिली. इसवी सन १९१५ मध्ये महान सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जर्मन भाषेतील सापेक्षता सिद्धांत इंग्रजी भाषेत रूपांतर करणारे सत्येंद्रनाथ बोस हे पहिले होते. त्यांच्याकडे असलेला ज्ञानाच भंडार बघून सत्येंद्रनाथ बोस यांना वेगवेगळ्या संधी चालून आल्या.

१९२१ मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांनी ढाका येथील एका विद्यापीठांमध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. सत्येंद्रनाथ बोस यांची नेहमीची साधारण नोकरी चालू होती परंतु तितक्यातच सन १९२३ मध्ये प्रसिद्ध गणितज्ञ मॉल्ट यांनी काही शोध लावले. त्या शोधाच्या समीकरणाची संबंधित आपले स्वतःचे असे वेगळे शोध सत्येंद्रनाथ बोस यांनी लावले आणि, ते शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारी मासीक फिलोसोफिकल कडे पाठवण्यात आले.

परंतु, त्यांनी ते शोध छापण्यास नकार दिला. यानंतर आईन्स्टाईन यांच्याकडे शोध पाठवण्यात आले. त्यानंतर तो लेख आईन्स्टाईन यांनी आपल्या जर्मन भाषेत रुपांतरीत केला. आणि तो लेख छापून यावा म्हणून अथक प्रयत्न केले. जगभरातील वेगवेगळ्या गणितज्ञांनी हा लेख बघितला आणि बऱ्याच जणांना आवडला देखील.

या लेखामुळे सत्येंद्रनाथ बोस यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. मग पुढे दहा महिने सत्येंद्रनाथ बोस पॅरिसमध्ये होते. पॅरिसमध्ये सत्येंद्रनाथ बोस मेरी क्युरी यांच्यासोबत काम करत होते. तिकडून पुढे सत्येंद्रनाथ बोस यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तिकडे जर्मनमध्ये सत्येंद्रनाथ बोस यांची भेट महान व सुप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांच्याशी झाली.

आइन्स्टाइन यांनी सत्येंद्रनाथ ह्यांचा चांगला पाहुणचार केला. जर्मनी मध्ये असताना सत्येंद्रनाथ बोस यांची जगातील महान वैज्ञानिकांशी गाठ पडली. या वैज्ञानिकांच्या यादी मध्ये खालील नावे सामील होती – माक्स प्लांक, एरर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली. सन १९४५ मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांनी आपली ढाका इथल्या नोकरीतून कायमची रजा घेतली.

१९५६ मध्ये चंद्रनाथ बोस पुन्हा प्रोफेसर म्हणून कोलकाता येथे सेवा देत होते. या कामातून निवृत्ती घेतल्यावर सत्येंद्रनाथ बोस यांची विश्वभारती विद्यालयाचे उपकुलपीत म्हणून निवड करण्यात आली. आपलं ज्ञान समाजापर्यंत पोहचाव म्हणून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयावर लेख लिहिण्यास सुरुवात केली. भौतिकशास्त्र या विषयावर ‌त्यांचे चोवीस लेख उपलब्ध आहेत.

शोध – Satyendra Nath Bose Invention

सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय महान वैज्ञानिक होते. भौतिकशास्त्र व गणित या दोन विषयांचा त्यांना प्रचंड ज्ञान होतं. भौतिकीशास्त्रज्ञाचा त्यांना दांडगा अनुभव होता. बोस आईन्स्टाईन सांख्यिकी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सांख्यिकी यामिकीतील सिद्धांत करिता यांची विशेष ओळख आहे.

इतर माहिती

सत्येंद्रनाथ बोस यांच्या भौतिकशास्त्रातील कारकिर्दी मुळे भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालं. सत्येंद्रनाथ बोस यांच्या कारकिर्दीची दखल भारत सरकारने घेतली. आणि इसवी सन १९५८ मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांना भारत सरकार द्वारे “पद्मविभूषण” हा भारतामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

सत्येंद्रनाथ बोस यांची ख्याती जगभर पसरली होती. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून इसवी सन १९५८ मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांची निवड करण्यात आली. भारत सरकारने सत्येंद्रनाथ बोस यांना राष्ट्रीय प्राध्यापकपद देऊन त्यांचा सन्मान केला. सत्येंद्रनाथ बोस यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकाचे काम केलं होतं त्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला.

सत्येंद्रनाथ बोस भारत सरकार राज्यसभेचे इसवी सन १९५२ ते १९५८ पर्यंत सदस्य होते. सत्येंद्रनाथ बोस यांचा मेघनाद साहा स्मृती सुवर्णपदक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. १९४४ मध्ये भारतीय विज्ञान परीक्षेचे अध्यक्षपद सत्येंद्रनाथ बोस यांच्याकडे होतं. सत्येंद्रनाथ बोस यांच्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया या संस्थेचे देखील अध्यक्षपद होतं.

मृत्यू

सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाचा निधन हृदय रोगांमुळे झालं. कोलकत्ता येथे ४ फेब्रुवारी १९७४ रोजी महाल भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन झालं.सत्येंद्रनाथ बोस यांनी विज्ञान क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच सर्वोच्च राहील. सत्येंद्रनाथ बोस यांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जगापर्यंत पोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सत्येंद्रनाथ बोस यांनी बंगाल भाषेमध्ये देखिल विज्ञान व भौतिक शास्त्रावर विविध पुस्तके लिहिण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या पिढीला विज्ञान, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र या क्षेत्रांचं ज्ञान असावं जेणेकरून आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्यामध्ये त्याचा उपयोग करून भरपूर प्रगती करता येईल.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये satyendra nath bose information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of satyendra nath bose in marathi म्हणजेच “सत्येंद्रनाथ बोस यांची माहिती” satyendra nath bose information in marathi pdf यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या satyendra nath bose scientist information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि satyendra nath bose in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!