Shravan Month Essay in Marathi Language माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी “श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे” कवितेच्या या दोन ओळी ऐकताच डोळ्यासमोर श्रावण महिन्याच संपूर्ण चित्र उभं राहतं. कोवळ्या उन्हातून बाहेर येणाऱ्या त्या पावसाच्या सरी, हिरवीगार झाडे, हवेत पसरलेला मातीचा सुगंध वास, हवेतील गारवा अगदी मनाला भुरळ पाडतो. परंतु हा सर्व प्रसंग आपल्याला फक्त आणि फक्त श्रावणातच अनुभवायला मिळतो. अशा सुंदर व मन मोहित वातावरणाचा अनुभव श्रावणात घ्यायला मिळतो म्हणूनच श्रावण महिना प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.
म्हणून प्रत्येकाला श्रावण महिना आवडतो. श्रावणात पावसाच्या कोसळणाऱ्या रिमझिम सरी आणि आपले मराठी बांधवांचे सण हे श्रावण महिन्याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि म्हणूनच श्रावण महिन्याला सणांचा महिना देखील संबोधले जात. श्रावण हा महिना अल्हाददायक व मन प्रसन्न करणारा आहे म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच हा श्रावणमास आवडतो.
माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी – Shravan Month Essay in Marathi Language
Maza Avadta Mahina Shravan Nibandh in Marathi
श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं आकर्षित व मोहनीय अस रूप पहायला मिळतं जे इतर महिन्यांमध्ये नसतं. उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळा खाऊन प्रत्येक जीव थकलेला असतो आणि श्रावण महिन्यामुळे पावसाच्या सरी हवेतील तापट वातावरणाच थंडगार आणि सुखद हवेमध्ये रुपांतर करतात. म्हणूनच श्रावण महिन्यासाठी अगदी प्रत्येक जण उत्साहित असतो. शिवाय पावसामुळे संपूर्ण धरती हिरवीगार झालेली असते पावसाच्या या दृश्याला धरतीने जणू हिरवा शालू परिधान केला आहे.
असे देखील संबोधले जाते कारण जिकडे-तिकडे हिरवेगार गवत हिरवी पानं हिरव्या झाडी वेली पाहायला मिळतात. श्रावणातील पावसाच्या सुखावणाऱ्या सरी आणि पाऊस आणि ऊन यांचा चालू असणारा लपाछपीचा खेळ हे दृश्य तर अधिकच मनोरंजक असतं. पावसाच्या सरी रिमझिमत असतात आणि तितक्यातच गायब होऊन ऊन पडू लागतं. हा प्रसंग अनुभवायला मिळण्याची मजाच काही वेगळी आहे.
श्रावण महिन्यातील एक असा क्षण जो पाहून अगदी आपल्या डोळ्यांचे पारणे फिटेल किंवा अविस्मरणीय असेल असा क्षण म्हणजे आकाशामध्ये सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळणं. प्रत्येक झाडांवर वेलींवर रंगीबिरंगी फुलं फळं बहरलेली असतात झाडांना मोहर फुटलेला असतो. श्रावण महिन्यामध्ये सणांना सुरुवात होते. आणि सण म्हटलं तर आनंद उत्साह आला. श्रावण महिन्यामध्ये अनेक वेगवेगळे नवीन नवीन सण असतात.
या सणांमध्ये आनंदमयी क्षण साजरे करायला मिळणार या उत्साहाने स्त्रियांमध्ये व मुलींमध्ये अगदी उत्साह संचारतो. सण उत्सव साजरे करताना लागणारे साहित्य सामग्री म्हणजे पत्री फुले यामुळे रान अगदी सजलेलं असतं प्रत्येक झाडाला फळा फुलांचा बहर आलेला असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्त्रियांना श्रावणाच्या निमित्ताने वेगवेगळे सण साजरे करायला मिळतात त्यांना नटण्या आणि थाटण्यासाठी वेळ मिळतो. दोन आनंदाचे क्षण साजरे करायला मिळतात स्त्रियांना त्यांच्या माहेरी जाण्यासाठी संधी मिळते तर लहान मुलांना खेळण्याची बागडण्याची संधी मिळते.
सगळ्यांचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो शिवाय नेहमी वेगवेगळे सण असल्यामुळे मंदिरांमध्ये देखील गर्दी पहायला मिळते. प्रत्येकाच्या चेहर्यावर एक आनंद असतो व्रतवैकल्य पूजाअर्चा यामुळे घरात मंदिरामध्ये एक वेगळच भक्तिमय वातावरण निर्माण होतं. श्रावण मास हा महिना खासकरून सणांचा महिना असल्यामुळे वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचे वाचन या महिन्यामध्ये केले जाते. बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये उपवास ठेवतात.
श्रावण महिन्यातील सणांची सुरुवात नागपंचमीपासून होते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण असतो व अतिशय उत्साहाने साजरा केला जातो यामध्ये नागाची पूजा केली जाते शिवाय आपण आपल्या निसर्गातील घटकांबद्दल किती कृतज्ञ आहोत हे या सणाच्या निमित्ताने दिसून येतं. उंदरा पासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागाची नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. शिवाय त्यानंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला कोळी बांधव सागराची पूजा करतात.
संपूर्ण कोळी बांधव यांच्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी ते अतिशय भक्तिभावाने सागर देवतेला नारळ अर्पण करतात. समुद्रापासून त्यांची उपजीविका चालते आणि म्हणूनच समुद्र देवतेचे आभार मानण्यासाठी तिची या दिवशी पूजा केली जाते. त्यानंतर गोकुळाष्टमी हा सण तर अगदी एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माला आले याचा आनंद साजरा करत हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडी खेळली जाते.
श्रीकृष्ण जन्माला आले म्हणून संपूर्ण विश्वाला आनंद झाला आणि हा आनंद गोकुळाष्टमी या सणाच्या माध्यमातून साजरा केला जातो. सर्व भाविक या दिवशी उपवास करतात आणि हा कृष्णजन्माचा सोहळा अतिशय आनंदाने साजरा करतात. श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैलपोळा. शेतकरी बांधव या दिवशी बैलाची पूजा करतात. बळीराजाचं शेतकर्याच्या यशामध्ये खूप मोलाचं श्रेय असतं त्यामुळे बळीराजासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यास साठी हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
बैलपोळा या दिवशी बैलाची पूजा करून नैवेद्य दाखवून सर्व गावकरी बैलांची गावांमध्ये मिरवणूक काढतात या दिवशी बैलाला स्वच्छ धुवून त्याला सजवलं जातं बैलाच्या गळ्यामध्ये घुंगरांची माळ घालतात आणि या सणाला श्रावणी पोळा असेही म्हटलं जातं. श्रावण महिन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो आणि प्रत्येकाकडे श्रावण महिन्याची वाट बघण्याची आपली आपली अशी कारणे असतात. श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण येतात आणि सणांच्या निमित्ताने घरामध्ये वेगवेगळे गोड-धोड पदार्थ खायला मिळतात.
श्रावणामध्ये निसर्गाचं एक अविस्मरणीय रूपाच दृश्य पाहायला मिळत श्रावणामध्ये पावसाच्या आनंदाने नाचणारा पक्ष्यांचा राजा मोर पहायला मिळतो मोर हा पक्षी त्याचा डौलदार पिसारा फुलवून पावसाच्या सरींसोबत आनंद व्यक्त करत नृत्य करत असतो. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला अजून प्रोत्साहन मिळतं हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवायला मिळालं म्हणजे भाग्यच आहे.
श्रावण हा महिना हवाहवासा वाटणारा आणि मनाला एक वेगळा आनंद देणारा महिना आहे आणि म्हणूनच अनेक मोठमोठ्या लेखिकांनी लेखकांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दांमध्ये श्रावणाची वेगवेगळी रूपे सांगितली आहेत. उन्हामध्ये संपूर्ण काळे बोर झालेले रस्ते झाडांची गळलेली पाने श्रावणमहिना येताच पुन्हा त्यांना बहर येऊ लागतो सर्वत्र हिरवे हिरवे हिरवे गवत पसरते.
ग्रामीण भागामध्ये श्रावण महिन्याचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे तर शहरी भागांमध्ये श्रावणाच्या सरी बरसतात आपोआपच मन कांदा भजी कडे वळते तर गरमागरम चहा आणि कांदा भजी चा बेत हा प्रत्येक घरात रंगतो. आणि श्रावण महिन्यातल्या या काही खास आठवणी श्रावण महिन्याला अजूनच अविस्मरणीय बनवतात.
प्रत्येकासाठी श्रावण महिना हा महत्त्वपूर्ण आणि खास असतो स्त्रियांना श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण साजरे करायला मिळतात आणि त्यानिमित्ताने त्यांना माहेरी जायला मिळतं व त्यामुळेच त्यांच्या माहेरच्या आठवणींना उजाळा मिळतो. मोठ्यांना देखील क्षणभर सणांच्या निमित्ताने विश्रांती मिळते. लहानांना श्रावणात येणारा सणांच्या निमित्ताने खेळायला मजा मस्ती करायला मिळतं गोड-धोड पदार्थ खायला मिळतात त्यामुळे त्यांना श्रावण महिना खूप आवडतो. विद्यार्थ्यांना पावसाच्या निमित्ताने शाळेला दांडी मारायला मिळते.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील एक वेगळाच आनंद संचारतो. साऱ्या जगाचा पोशिंदा म्हणजेच आपला शेतकरी. शेतकऱ्यांना देखील श्रावण महिन्याच्या निमित्ताने शेतीची खोळंबलेली काम करायला मिळतात म्हणूनच शेतकरीदेखील श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण महिन्यामध्ये शेतामध्ये वाऱ्याच्या मंद झुळूक वर डोलारी पिके बघून शेतकऱ्याला आनंद मिळतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर श्रावण महिना आनंद उत्साह घेऊन येतो श्रावण महिन्या मध्ये वेगवेगळी सणवार असतात ज्यामुळे सोमवार मंगळवार असे बऱ्याच लोकांचे उपवास असतात. आणि श्रावण महिन्यातील या सणांना एक वेगळंच महत्त्व असतं. श्रावण महिना येताच आनंद घेऊन येतो हिरवळ घेऊन येतो इतके दिवस उन्हाच्या झळा खाणारी पृथ्वी श्रावण महिन्याच्या सरी कोसळतात अगदी थंडगार होते.
श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचा एक वेगळे रूप पाहायला मिळतं. असा हा वर्षातील पाचवा महिना ज्याला व्रतांचा राजा किंवा सणांचा राजा असे देखील संबोधले जाते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी कोणते ना कोणते सण व्रत उपवास असतातच. असा हा श्रावण महिना जो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ व महत्त्वपूर्ण मानला जातो.
आम्ही दिलेल्या Shravan Month Essay in Marathi Language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Maza Avadta Mahina Shravan Nibandh in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Shravan mahina Marathi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shravan month essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट