Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi – Swachata Che Mahatva Marathi Nibandh स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध परिसर स्वच्छता निबंध स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी, संपूर्ण समाजासाठी, गावासाठी तसेच, जगातील प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी सुद्धा, स्वच्छतेचे पालन हे सर्वांनी केले पाहिजेत. खरंतर, स्वच्छता ही अनेक प्रकारची असू शकते जसे की वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, वैचारिक स्वच्छता इत्यादी. वैयक्तिक स्वच्छता आपल्याला वेगवेगळ्या रोगांपासून वाचवते, अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते आणि आपला बचाव करते.
दररोज सकाळी अंघोळी करणे, जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, वाढलेली नखे नियमित कापणे, दातांची स्वच्छता राखणे, त्यासाठी दररोज ब्रश करणे आणि उघड्यावर पडलेले किंवा खाली पडलेले पदार्थ न खाणे, आपले घर स्वच्छ ठेवणे, घरामध्ये सूर्यप्रकाश खेळता राहण्यासाठी खिडक्या तसेच, दरवाजे उघडे ठेवणे, यांसारख्या चांगल्या सवयी वैयक्तिक स्वच्छतेमध्ये येतात.
स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी – Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi
स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध – Swachata Che Mahatva Marathi Nibandh
आता आपण सामाजिक स्वच्छता पाहूया सामाजिक स्वच्छता आपल्या समाजाला निरोगी बनवते त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत, शाळा, मंदिरे तसेच, सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवणे, जेथे पाणी साचते त्याठिकाणी जमीन सलग करणे, आपल्या परिसरात स्वच्छ हवा खेळती राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे अशा अनेक गोष्टी आपण सामाजिक स्वच्छतेसाठी केल्या पाहिजेत.
हे झालं सामाजिक स्वच्छतेबद्दल, पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या मनाची स्वच्छता सगळ्यात पहिल्यांदा करणे गरजेचे आहे. वैचारिक स्वच्छता ही आपल्याला एक चांगली आणि आदर्श व्यक्ती बनवते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने चांगली पुस्तके वाचणे गरजेचे आहे.
चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहणे, दुसऱ्यांच चांगलं व्हावं यासाठी चिंतन करणे, विकृत विचारांच्या लोकांना सुधारण्यासाठी त्यांना चांगले सल्ले देणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम बनावे यासाठी प्रयत्न करणे, प्रत्येकाने आपल्या आई – वडिलांना तसेच, समाजातील इतर गरजू लोकांना मदत करणे, सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शवणे, स्वतःसोबत समाजाला स्वच्छ ठेवणे यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या मनाला स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ बनवत असतात.
अशा प्रकारचा वैचारिक स्वच्छता असलेला व्यक्ती स्वतःसोबत समाजाचा ही विकास करायला मदत करतो. खरंतर, स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी नेहमी कार्यरत असायला हवं. व्यक्ती लहान असो की मोठी असो, प्रत्येक जणांनी जर स्वतःच्या घरापासून स्वच्छता राखण्याची सुरुवात केली, तर लवकरात लवकर संपूर्ण भारत देश स्वच्छ आणि सुंदर होईल.
स्वच्छतेचे खूप सारे फायदे आहेत जसे, स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून संरक्षित ठेवते. कोणताही रोग किंवा आजार हे रोगदायक तर असतातच, शिवाय यांमुळे आपला दवाखान्याचा खर्चदेखील वाढतो. खराब अन्न खाल्ल्याने तसेच, दुषित पाणी पिण्याने पिलिया, टायफॉइड आणि कॉलरा यांसारखे रोग होतात.
जास्त दिवस साचलेल्या पाण्यात डास तयार होतात आणि डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांना ते आमंत्रण देतात. अशा व्यर्थ आणि स्वतःचे नुकसान करणाऱ्या रोगांना वाढविण्यापेक्षा, चांगले आहे की आपण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत.
स्वच्छता अभियान निबंध
भारत सरकारने स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन ‘स्वच्छ भारत‘ हे अभियान देखील संपूर्ण भारतात राबवले आहे. या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०१४ ला महात्मा गांधींच्या जयंती दिवशी झाली होती. पण, फक्त सरकारच्या प्रयत्नांनी किंवा त्यांनी राबवलेल्या अशा योजनांनी, अभियानांनी कोणतेही काम सफल होत नाही.
त्यासाठी, जनतेची सुद्धा साथ लागते. त्यामुळे, सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या देशाला स्वच्छ बनवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत आणि जास्तीत जास्त लोकांना स्वच्छतेबाबत जागृत करायला हवे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालयांचाच वापर सगळीकडे झाला पाहिजेत.
त्यासाठी सगळ्या गावांमध्ये शौचालये हवीत. तरच, गावात स्वच्छता राहील. भारत सरकारने त्याकडे देखील लक्ष देवून गावांच्या स्वच्छतेसाठी’ हागणदारी मुक्त गाव’ ही योजना निर्माण केली आहे .
काही गावातील लोक नदी – तलावाचे पाणी खराब करताना आपल्याला दिसतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता करणे, घरातील सांडपाणी नदीत सोडणे, ही सर्व काम लोक नदीमध्ये करतात आणि तेच पाणी परत पिण्यासाठी वापरतात. खरंतर, असे पाणी पिण्यास अयोग्य ठरते.
अशा पाण्यामुळे सगळीकडे रोगराई पसरते. त्यामुळे, आपण सर्वांनी नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहिजेत. शिवाय, आपण सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवली पाहिजेत. जर, आपण घरात अस्वच्छता ठेवली तर घरामध्ये अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास, मुंग्या आणि प्राणी जसे की उंदिर, घुस आपल्या घरात शिरून रोगराई पसरविण्याचे काम करतात.
परिणामी आपण आजारी पडतो आणि त्यात आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात. घरामध्ये स्वच्छता असेल तर आपले मन स्वच्छ, प्रसन्न आणि ताजेतवाने राहते. त्यामुळे, आपण दिवसभर अनेक कामे मनसोक्तपणे करू शकतो.
स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे होय. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक असा गुण जो विविध प्रकारची आरोग्याची हानी रोखण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते .
स्वच्छतेचे महत्व कविता
” घनश्याम सुंदरा श्रीधरा,
अरुणोदय झाला! “
ही भूपाळी ऐकताना आपल्या डोळ्यासमोर एका घरासमोर स्वच्छ केलेल्या अंगणात सुंदर रांगोळी काढण्यात दंग असणारी गृहिणी जुन्या चित्रपटांमध्ये हमखास दिसते. शहरातून अस सारवलेल अंगण कधीच दृष्टीआड झाले असले तरीही , ‘घराची कळा अंगण सांगते’, हे ब्रीद कोणीही नाकारू शकत नाही.
जसे घराचे अंगण असते तसाच आपल्या आजूबाजूचा परिसर असतो संस्कार देणारा, मूल्य रुजवणारा ! जर, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता करण्यासाठी पहाटे हातात झाडू घेऊन, कुणी न उठायच्या आत काम करू शकतात तर, आपणही सामाजिक स्वच्छता करू शकतो; अशी प्रेरणा आपल्याला अशा महान व्यक्तींकडून मिळते.
पण, ही स्वच्छता करताना आपल्यासमोर खरे आव्हान उभे राहते ते निर्ढावलेल्या अस्वच्छ मानसिकता असलेल्या लोकांचे. अशी लोक ज्यांना कितीही सांगितलं तरी खरकटे, केर – कचरा, घाण, हागणदारी अशा गोष्टी मुद्दामहून करणार. या लोकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे तरच, आपण केलेल्या स्वच्छतेला अर्थ राहील हे मात्र तितकच खरं!
स्वच्छता हा निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे. अस्वच्छेतेमुळे रोगजंतूंचा सगळीकडे प्रसार होतो आणि त्यामुळे माणसे कमकुवत बनतात. काहीवेळा, तर माणसे रोगराईमुळे मरणही पावतात. भारत आणि पाश्चात्य देशांमधील सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता. पाश्चात्य देशांमधील शहरे खूप स्वच्छ, सुस्थितीत आणि नीटनेटकी असतात.
आपला भारत देश स्वच्छतेच्या बाबतीत खरंच खूप मागे आहे. लवकरच आपल्याला स्वच्छतेच्या मार्गाकडे पावले उचलावी लागणार आहेत. खरंतर, यामध्ये भारत सरकारचा काहीच दोष नाहीय. दोष आहे तो आपला, भारतीय नागरिकांचा. भारत सरकारचा ‘स्वच्छ भारत मोहीम’ सुरू करण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाहीय.
१९९९ मध्ये भारत सरकारने ‘संपूर्ण स्वच्छता अभियान’ सुरू केले होते, जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे ‘निर्मल भारत अभियान’ असे नामकरण केले होते. परंतू, त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाला सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली संजीवनी दिली.
आपल्या शपथविधी मध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच भारतीय नेते असावेत. यातून, त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेची मोहीम राबवली आणि नागरिकांना त्यात भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हा राजकीय स्टंट वाटू शकतो, पण या सर्वातून एक फायदा असा झाला की आपण भारतीय लोक स्वच्छतेबद्दल बोलू लागलो. त्यावर वादविवाद, चर्चा होऊ लागली.
स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे. दिवसेंदिवस या मोहिमेची प्रगती होताना आपल्याला दिसते आहे. स्वच्छ भारत अभियानाची स्वतःची अधिकृत अशी वेबसाईट आणि अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. आतापर्यंत १,४३,४९१ गावे, ७९ जिल्हे आणि ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत.
विविध राजकारणी, सेलिब्रिटीज, अभिनेते आणि क्रिडापटुंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता तसेच, पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा अशा अनेक जणांनी हातात झाडू घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या स्वच्छता अभियानाला या सर्वांकडून प्रेरक अशी प्रेरणा मिळत गेली.
या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. २०२० पर्यंत भारत देशाला ‘ओपन डेफकेशन फ्री (ओडिएफ)’ बनवणे हे स्वच्छ भारत अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
स्वच्छ भारत अभियान हा खूप मोठा प्रकल्प आहे. तीस लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच, शाळा, महाविद्यालयातील मुलांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. या मोहिमअंतर्गत भारताच्या ४०४१ शहरे आणि गावांना १.९६ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या मोहिमेने केलेल्या जागृतीने अनपेक्षित बदल घडत आहेत. भारतातील हिंदी चित्रपट जगातील (बॉलिवूड) सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “शौचालय” नावाच्या चित्रपटाद्वारे भारतातील खुल्या स्वच्छतेच्या समस्येच्या निर्मूलनास समर्थन देण्यास सुरुवात केली आहे.
हा चित्रपट ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो. ग्रामीण भागात शौचालये बांधण्याची का आवश्यकता आहे? या समस्येचं हा चित्रपट निराकरण करतो. असा विषय एका दिग्गज कलाकाराने करणे ही फार मोठी गोष्ट आहे, याचा अर्थ असा आहे की लोक आता स्वच्छतेवर विचार करू लागली आहेत.
स्वच्छतेचे महत्व आपल्या जीवनात अमूल्य आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते, पण त्यासाठी आपण प्रयत्न करणेही तितकेच गरजेचे आहे. सरकारने मोहिमा राबवणे जसे गरजेचे आहे तसेच, आपण त्याबद्दल जागृतपणे काम करणे तितकेच महत्वाचे आहे.
आपण सर्वजण जोपर्यंत सर्वजण स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत या मोहिमा अशा अंमलात येणार? जर आपल्याला स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकारला आणि आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल. चला तर मग, आजपासून आपण स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊया आणि स्वच्छतेचे काम हाती घेऊया.
” घ्या स्वच्छतेचे महत्त्व ध्यानी,
व्हा निरोगी जीवनाचे धनी.
उपयोगात आणू सांडपाणी,
फुलवू सुंदर फुले अंगणी.
सांडपाण्याची करून योग्य विल्हेवाट,
सर्वजण करू रोगराईचा नायनाट.
स्वच्छ घर, स्वच्छ अंगण,
प्रसन्न ठेवू वातावरण.”
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या swachh bharat abhiyan essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या swachata che mahatva in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on swachata in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण swachateche mahatva in marathi nibandh या लेखाचा वापर swachh bharat abhiyan nibandh marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट