विविधतेत एकता निबंध Unity in Diversity Essay in Marathi

Unity in Diversity Essay in Marathi विविधतेत एकता निबंध आज आपण या लेखामध्ये विविधतेत एकता या विषयावर निबंध लिहिणार आहोत. विविधतेतील एकता या विषयावर निबंध लिहिण्याअगोदर आपण विविधतेतील एकता म्हणजे काय या बद्दल जाणून घेवूया. विविधतेतील एकता म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये फरक किंवा विविधता जरी त्या फरकामधील एकतेला विविधतेत एकता म्हटले जाते आणि मला अभिमान आहे कि माझ्या देशामध्ये म्हणजेच भारत देशामध्ये आपल्याला विविधतेतील एकता पाहायला मिळते.

आपला भारत देश हा लोकसंखेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आपल्या देशामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या वेशभूषा करणारे, वेगवेगळे सण साजरे करणारे लोक, त्वचेचा रंग, शारीरिक गुणधर्म, सांकृतिक आणि धार्मिक प्रथा जरी वेगळ्या असलेले लोक एकत्र राहतात आणि जरी अश्या प्रकारे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहत असले तरी त्यांच्यामध्ये एकता दिसते आणि या एकतेला विविधतेतील एकता म्हणून ओळखले जाते.

unity in diversity essay in marathi
unity in diversity essay in marathi

विविधतेत एकता निबंध – Unity in Diversity Essay in Marathi

Essay on Unity in Diversity in Marathi

विविधतेतील एकता हि खूप महत्वाची कल्पना आहे कारण आपण वेगवेगळ्या जगात राहतो आणि जरी वेगवेगळ्या जगात म्हणजेच आपली संस्कृती, लिंग, पार्श्वभूमी, धर्म, प्रथा, पंथ आणि रंग यामध्ये जरी फरक असला किंवा विविधता असली तरी आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे कि आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे किंवा एकमेकांच्या तत्वाचा आदर केला पाहिजे आणि भारतामध्ये अश्या प्रकारच्या विविधतेमध्ये देखील आपल्याला एकता पाहायला मिळते.

तसेच आपला भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीमध्ये होता त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी विविधतेच्या एकतेने स्वातंत्र्य लढा लढला होता आणि तो यशस्वी देखील झाला होता त्यामुळे विविधतेची एकता ( unity in diversity ) असणे देखील खूप महत्वाचे आहे.

विविधतेत एकता हा शब्द ५०० इसा पूर्व वर्षापूर्वी उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये तयार झाला आणि याचा अर्थ असा होतो कि जात, धर्म, पंथ, भाषा, रंग, संस्कृती यामध्ये फरक असला तरी त्या ठिकाणातील लोकांच्यामध्ये एकता दिसून येते. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हा आपला देश साऱ्या जगासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक राहतात जसे कि हिंदू, मुस्लीम, ख्रिस्चन, जैन, शीख या सारखे अनेक जातीचे लोक राहतात आणि यांच्या धर्माच्या पूजा आणि परंपरा ह्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपल्याला विविधतेतील एकता दिसते.

भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात तसेच भारतातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाष्या बोलल्या जातात जसे कि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते तसेच कर्नाटक राज्यामध्ये कन्नड, तामिळनाडू मध्ये तामिळी, गुजरात मध्ये गुजराती अश्या प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या अधिकृत भाषा आहेत तसेच संपूर्ण भारताची अधिकृत भाषा हि हिंदी आहे आणि जर एकाद्या व्यक्तिल समोरच्याची भाषा समजत नसेल तर त्यावेळी समोरची व्यक्ती हिंदी बोलते आणि यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला देखील हिंदी भाषा बोलता येत असल्यामुळे त्यांच्या दोघांच्या भाषेतील फरक मिटवून ते देशाची अधिकृत हिंदी भाषा बोलतात.

त्यामुळे यातून देखील विविधतेतील एकता दिसून येते. त्याचबरोबर भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात आणि त्यांचे सन हे वेगवेगळे असतात जसे कि गणेश चतुर्थी, दिवाळी, पाडवा, दसरा, लोहरी, पोंगल, ईद यासारखे वेगवेगळ्या जातीचे सन हे सार्वजन मिळून करतात आणि त्यामुळे यामधील विविधतेतील एकता देखील दिसून येते.

तसेच भारतातील वस्त्र संस्कृती हि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पाहायला मिळते आणि त्यामुळे भारतातील विविधता आणि संस्कृती अधिक स्पष्ट होते. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्रिया गोल साडी किंवा कासूटा घालतात तसेच पुरुष धोतर आणि सदरा हा पारंपारिक पोशाख घालतात. कर्नाटकात स्त्रिया साड्या घालतात, कर्नाटकात सिल्कच्या साड्या आणि पुरुष लुंगी घालतात आणि त्यावर शर्ट घालतात.

अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे परंतु जरी भारतातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र घालण्याची परंपरा असली तरी भारतामधील विविधतेची एकता हि दिसून येतेच. भौतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विरोधाभास असताना भारत स्वतःला एकच प्रादेशिक एकक म्हणून प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. एकीकडे हिमालय पर्वतरांगांमधील ग्रेट प्लेन्स आणि दुसरीकडे द्वीपकल्पीय भारत यांची एकत्रित भूमिका आहे.

हवामानाच्या दृष्टीने, ऋतूंची मान्सूनची लय एकसारखेपणाचे मजबूत घटक प्रदान करते. भारत हा बहुवचन समाज आहे आणि त्याची एकता आणि विविधता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अनेक परकीय आक्रमणे, मुघल राजवट आणि ब्रिटीश राजवट असूनही देशाची एकता आणि अखंडता राखली गेली आहे. या संश्लेषणानेच भारताला संस्कृतींचा एक अनोखे आणि विविधते मध्ये देखील एकता जपणारा देश म्हणून ओळखले जाते. भारताने ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकसंध अस्तित्व म्हणून लढा दिला.

वैविध्यपूर्ण भाषा, धर्म आणि संस्कृतींचे अस्तित्व, परदेशी पाहुणे आणि जगाच्या इतर भागांतून आलेले स्थलांतर यामुळे भारताची संस्कृती सहिष्णू बनली आहे. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळी वस्त्रे घालणारे, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाणारे, राजकीय आणि सामाजिक गोष्टींच्या मध्ये दरक असणारे लोक देखील एकतेने राहतात आणि म्हणूनच आपल्या भारत देशाल विविधतेची एकता जपणारा देश म्हणून ओळखले जाते.

 आम्ही दिलेल्या Unity in Diversity Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विविधतेत एकता निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on Unity in Diversity in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!