Lohri Festival Information in Marathi लोहरी सणाची माहिती लोहरी किंवा लोहडी हा सण एक पंजाबी सण आहे जो पंजाबमध्ये पंजाबी लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा सण भारत देशामध्ये उत्तरेकडील भागामध्ये साजरा केला जातो आणि या सणामध्ये हरीयाणबी आणि पंजाबी लोक मोठ्या प्रमाणात सामील होतात. लोहरी हा सण मकर संक्रांतीच्या अधल्या रात्री साजरा केला जातो आणि या सणाच्या दरम्याने पतंग उडवले जातात आणि तसेच हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो. लोहरी हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशीची रात्र हि सर्वात लांब रात्र आहे.
असे काही लोक मानतात आणि म्हणून पंजाब मध्ये लोहरी हा सण त्यादिवशी साजरा केला जातो त्याचबरोबर हा सण साजरा करण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे हा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा काळ मानला जातो. लोहरी हा पंजाब मधील मुख्य सणांपैकी आहे आणि हा सण पंजाब तसेच भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.
जसे कि मध्य भारतात महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यामध्ये मकर संक्रांत आणि दक्षिन भारतामध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर हा सण देशाच्या काही भागामध्ये पंतग उडवून (पतंग उत्सव) देखील साजरा केला जातो.
लोहरी उत्सवाची माहिती – Lohri Festival Information in Marathi
लोहरी हा सण का साजरा केला जातो ?
प्रत्येक सण साजरा करण्यापाठीमागे काही न काही कारण असते तसेच लोहरी सण साजरा करण्यापाठीमागे देखील आहे. लोहरी हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशीची रात्र हि सर्वात लांब रात्र आहे. असे काही लोक मानतात आणि म्हणून पंजाब मध्ये लोहरी हा सण त्यादिवशी साजरा केला जातो. त्याचबरोबर हा सण साजरा करण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे हा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा काळ मानला जातो.
लोहरी सण केंव्हा साजरा केला जातो ?
लोहरी हा सण पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशी अगदी आनंदाने साजरा केला जातो. हा सण होण्याच्या अगोदर काही दिवस या सणाचे वेगवेगळे उत्सव सुरु होतात आणि ह्या सणामध्ये अनेक लोक अन्नदान करतात आणि स्त्रिया एकमेकांना काही तरी भेट वस्तू देतात.
पौराणिक कथा – History of Lohri in Marathi
- काही काळी पंजाब मधील मुलींचा पाकीस्थान मध्ये बाजार होत होता कारण पंजाब हे राज्य भारताच्या सीमा रेषेवर आहे आणि तेथून पाकीस्थान जवळ होते. पण पंजाबमध्ये दुल्ला भट हे एक व्यक्ती होते आणि त्यांना हे सर्व आवडत नव्हते आणि म्हणून त्यांनी या सर्व गोष्टींच्यासाठी विरोध केला आणि मुलींना या पासून वाचवले आणि त्यांना सन्माननीय जीवन दिले. या विजयाच्या दिवशी लोहरी साजरी केली जाते.
- ज्यावेळी प्रजापती दक्ष याने आपली मुलगी सती हिचा पती शिव आणि तिची सासू यांना यज्ञा मध्ये आमंत्रण दिले नाही त्यावेळी ती अग्नीमध्ये शरण गेली त्यावेळी पासून लोहरी सण साजरा केला जातो.
लोहरी हा सण कसा साजरा केला जातो ?
लोहरी हा सण पंजाब मध्ये साजरा केला जाते आणि हा सण मुख्यता शीख लोक साजरा करतात आणि तसेच पंजाब सोबतच भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी शीख लोक राहतात. त्या ठिकाणी ते अगदी आनंदाने लोहरी हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशी अगदी आनंदाने साजरा केला जातो.
हा सण होण्याच्या अगोदर काही दिवस या सणाचे वेगवेगळे उत्सव सुरु होता. हा सण दरवर्षी बोन फायर सह साजरा केला जातो आणि या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. जसे कि मोहिरीच्या भाज्या तसेच कॉर्ण ब्रेंड यासारखे पदार्थ बनवले जातात तसेच शेंगदाणे, गजक आणि रेवडी लोहरीमध्ये खाल्ली जाते.
या सणामध्ये लोक एकमेकांना भेटतात आणि मिठाई वाटतात तसेच ह्या सणामध्ये अनेक लोक अन्नदान करतात आणि स्त्रिया एकमेकांना काही तरी भेट वस्तू देतात आणि या सणामध्ये लोक भांगडा नृत्य देखील करतात.
प्रत्येक सणामध्ये काही विशेष पदार्थ बनवले जातात जसे कि पाडव्याला पुरण पोळी, गणपतीमध्ये मोदक, दिवाळीमध्ये दिवाळीचा वेगवेगळा फराळ तसेच लोहरी या सणामध्ये देखील वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या सणामध्ये पंजाबमध्ये मोहिरीच्या भाज्या तसेच कॉर्ण ब्रेंड यासारखे पदार्थ बनवले जातात तसेच शेंगदाणे, गजक आणि रेवडी लोहरीमध्ये खाल्ली जाते.
- लोहरी हा सण पंजाबी किंवा शीख लोकांचा एक पवित्र आणि महत्वाचा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
- या सणाचे लोहरी असे नाव लोई हि महान कवी कबीर दास यांच्या पत्नीच्या नावावरून ठेवले गेले आहे.
- लोहरी या सणाच्या माध्यमातून शीख समाज नवीन वर्षाच्या सुरुवातीचे स्वागत करतो.
- लोहरी हा एक पारंपारिक हिवाळी सण आहे जो भारताच्या उत्तर भागामध्ये साजरा केला जातो.
- या सणाच्या वेळी लोकांचा गट एकत्र येवून पारंपारिक बोन फायर पेटवून बोन फायर ची मजा घेत शेंगदाणे, गजक आणि रेवडी या सारखे पदार्थ खातात.
- ह्या सणामध्ये अनेक लोक अन्नदान करतात आणि स्त्रिया एकमेकांना काही तरी भेट वस्तू देतात.
- हा सण पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशी अगदी आनंदाने साजरा केला जातो.
- भारताच्या काही भागामध्ये लोहरी हा सण पतंग उडवून (पतंग उत्सव) साजरा केला जातो.
- लोहरी हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पौष महिन्यातील शेवटची रात्र किंवा मकर संक्रातीच्या अधल्या दिवशीची रात्र हि सर्वात लांब रात्र आहे असे काही लोक मानतात आणि म्हणून पंजाब मध्ये लोहरी हा सण त्यादिवशी साजरा केला.
आम्ही दिलेल्या Lohri Festival Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लोहरी उत्सवाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Lohri Festival Information in Marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Lohri Festival in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Lohri in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट