उद्योजक अशोक खाडे यांची माहिती Ashok Khade Biography in Marathi

Ashok Khade Biography in Marathi – Ashok Khade information in Marathi उद्योजक अशोक खाडे यांची माहिती आपलं भाग्य, भविष्य आणि नशीब हे इतर कोणाच्या नाही तर आपल्याच हातात असतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे उद्योजक अशोक खाडे. नियतीने जरी पदरामध्ये गरिबी टाकली असली तरी आपल्या जिद्द, चिकाटी, महिनत व इच्छा शक्तीच्या जोरावर अशोक खाडे यांनी आपलं भाग्य बदलल आणि आज ते ५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. आजच्या ब्लॉग मध्ये आपण अशोक खाडे ह्या एका प्रसिद्ध व यशस्वी उद्योजक बद्दल माहिती जाणून घेणार.

ashok khade biography in marathi
ashok khade biography in marathi

उद्योजक अशोक खाडे यांची माहिती – Ashok Khade Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)अशोक खाडे 
जन्म (Birthday)१९५६
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील सांगली
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)उद्योजक

Ashok Khade information in marathi

जन्म

अशोक खाडे यांचा जन्म १९५६ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. महाराष्ट्रातील एका चांभार घराण्यात अशोक खाडे जन्माला आले. घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य अशी परिस्थिती होती. वडील एक चर्मकार आणि आई व बहीण दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायची. शिवाय अशोक खाडे यांना सहा भावंडे देखील होती. इतक्या सगळ्यांचं संगोपण करताना कधीकधी दोन वेळेच्या जेवणाचे देखील हलवायचे. अत्यंत गरिबी आणि अस्पृश्यतेशी सामना करत अशोक खाडे आज एक यशस्वी उद्योजक बनले आहेत.

अशोक खाडे यांनी त्यांच सातवीपर्यंतचे शिक्षण पेड येथून पूर्ण केलं आणि अकरावी पर्यंतच शिक्षण त्यांनी तासगाव येथून पूर्ण केले. अशोक खाडे यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी मानसशास्त्रामध्ये बी.ए केले व तत्त्वज्ञान मध्ये एम.फिल, डॉक्टरेट आणि डि. ऑफ सायन्स या पदव्या मिळवल्या आहेत.

एक यशस्वी उद्योजक

उद्योग रत्न पुरस्कार विजेते अशोक खाडे यांच्याकडे त्यांच्या बालपणातील कथांचा अप्रतिम संग्रह पहायला मिळेल. त्यांची कहाणी अतिशय आकर्षक आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबी पासून ते मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या दास ऑफशोअर कंपनीचे प्रमुख होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अंगावर काटे आणणारा आहे. गरिबी माणसाला बरंच काही शिकवून जाते असं म्हणतात. तसंच अशोक खाडे यांचे सुरुवातीचे दिवस हालाखीचे होते.

गरीब आई-वडील आणि घरामध्ये एक वेळेच्या जेवणासाठी देखील संघर्ष करावा लागायचा. गरिबीला व संकटांना तोंड देत अशोक खाडे यांनी शिक्षणाची वाट कधीच सोडली नाही. अशोक खाडे यांच सातवीपर्यंतचे शिक्षण पेड येथून पूर्ण झाल आणि पुढील शिक्षणासाठी ते तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला गेले. वडिलांना व मोठ्या भावाला अशोक खाडे यांच्याकडून फार आशा होती‌. त्यांना असं नेहमी वाटायचं कि अशोक यांनी शिकून भरपूर मोठे व्हावा आणि आपल्या घराला लागलेली ही गरिबीची वाळवी नष्ट करून टाकावी.

वडील चर्मकार होते आणि आई आणि बहिणी दुसऱ्यांच्या शेतात काम करायच्या आणि पोटातील भूक मिटवण्यासाठी अशोक व त्यांचे भावंडे देखील मिळेल ते काम करायचे. आपण शिकावं मोठं व्हावं म्हणून आपल्या घरचे किती कष्ट घेतात याची अशोक यांना निश्चितच जाणं होती आणि मोठं व्हायचं हे स्वप्न डोळ्यात साठवून त्यांनी समोर येईल तसे दिवस जगायला सुरुवात केली. अशोक सर सन १९७२ मध्ये चांगल्या गुणांनी अकरावी पास झाले.

त्यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांच्याकडे अंगावर घालायला कपडे देखील नसायचे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सरांनीच त्यांना शर्ट व पायजमा घेऊन दिला. एका मुलाखतीमध्ये अशोक खाडे सांगतात की अकरावीच्या इन परीक्षेला पेनाची नीप तुटली होती जोशी सरांनी अडचण समजून घेत तिने आणून दिली. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे परंतु त्या पेनाची किंमत कशालाच नाही.

अशोक खाडे यांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्यात इतरांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवत आज ते एक मोठी यशस्वी उद्योजक झाले आहेत. या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या वडिलांपासून त्यांचे वडील नेहमी म्हणायचे की गरिबी आणि दुष्काळ मी आणलेला नाही परंतु तुम्ही धीर सोडू नका, माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे असे समजू नका खूप शिका. वडिलांचे हेच शब्द अशोक खाडे यांच्या काळजामध्ये बाणासारखे रुतले.

मिळेल ती वाट पकडायची आणि चालत राहायचं असं अशोक खाडे यांनी ठरवलं. सन १९७५ मध्ये अशोक व त्यांचे कुटुंबीय मुंबईत येऊन स्थायिक झाले. अशोक यांना नेहमीच वैद्यकीय क्षेत्राची आवड होती त्यांना त्यामध्येच करिअर करायचं होतं परंतु वेगवेगळ्या कारणास्तव त्यांची ती इच्छा अपुरीच राहिली. उपजीविकेसाठी खाडे आणि त्यांचे भाऊ माझगाव डॉक मध्ये नोकरीला लागले. खाडे यांनी इंजिनीरिंग मध्ये प्रवेश घेतला ते डिझाईन विभागांत नोकरीवर होते.

आता नोकरी आणि शिक्षण अशी तारेवरची कसरत सुरू झाली होती. याच दरम्यान १९८३ मध्ये अशोक खाडे यांना परदेशी जाण्याची संधी मिळाली. जर्मनी मध्ये अशोक खाडे पाणबुड्या घडविण्याचे काम करायचे. चार वर्ष माझगाव डॉक मध्ये नोकरी केल्यानंतर सन १९९२ मध्ये अशोक खाडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला. फाटका खिसा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला.

त्यांना स्वतःच असा स्वतंत्र उद्योग सुरू करायचा होता. त्यांनी आपल्या भावासोबत एक व्यवसाय सुरू केला तिन्ही भावांना इंजिनिअरिंगचे थोडाफार ज्ञान होतं. सोबतच जर्मनी मध्ये असताना मिळालेला अनुभव गाठी बांधून अशोक खाडे व त्यांच्या भावांनी स्वतःची कंपनी उभारली. या कंपनीला नाव दिलं दास ऑफशोअर. या कंपनीचं नाव तीन भावांच्या नावांची आद्याक्षरे देऊन ठेवण्यात आले आहे. हि कंपनी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम करते कंपनीला पहिलं कॉन्ट्रॅक्ट माझगाव डॉक मधूनच मिळालं.

बांद्रा येथील स्कायवॉक बांधण्याचं काम या कंपनीने केलंय. दास कंपनीने आजपर्यंत ओएनजीसी, ब्रिटिश गॅस यांसारख्या नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेलं आहे. दास या कंपनीने इंजीनियरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्ट, रस्तेबांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सात कंपन्या उभारल्या आहेत.

मराठी माणसाने उभारलेल्या या कंपनीला फक्त भारतातच नव्हे तर परदेशातूनही मागणी आहे. प्रत्यक्ष अबुधाबी चे प्रिन्स शेख महंमद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यवसायिक भागीदारी केली आहे आणि ह्याचा अशोक खाडे यांना फार अभिमान आहे. अशोक खाडे हे वारकरी संप्रदायाचे आहेत त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. शिवाय तेथ मोठे उद्योजक आहेत त्यांचं प्रेरणास्त्रोत जमशेदजी टाटा आणि मदर तेरेसा आहेत.

अशोक खाडे नेहमी गर्वाने सांगतात की आज जे काही त्यांनी प्राप्त केल त्याच श्रेय त्यांच्या घरच्यांना जातं. त्यांचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा होता. अशोक खाडे यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे की अशोक जे तुझं नेचर आहे तेच तुझं फ्युचर आहे. वडिलांचं हे वाक्य अशोक खाडे यांना यशाच्या मार्गावर घेऊन आलं.

अशोक खाडे यांनी गरिबीतही आणि श्रीमंती मध्ये ही त्यांचा स्वभाव कधीच बदलला नाही. एकेकाळी ज्यांच्या जेवणाचे ही वांदे होते तेच अशोक खाडे यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. मोठ्या महागड्या गाड्या आहेत. वर्षभर ते बीएमडब्ल्यू गाडी मधून‌ फिरतात परंतु पंढरीची वारी मात्र पायी करतात. अगदी जुन्या मधून अशोक खाडे यांनी विश्व उभं केलं आहे. शिवाय ते एक मराठी उद्योजक आहेत याचा अभिमान वाटतो.

आज अशोक खाडे यांनी ४५०० लोकांना रोजगाराची संधी दिलेली आहे. आणि ते आपल्या एम्प्लोयींना आपल्या कुटुंबास सारखेच समजतात. त्यांच्या कंपनीत चेहऱ्यावर दुःख किंवा चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही याची खात्री ते नक्कीच घेतात. आरंभी त्यांची कंपनी समुद्रातून तेल काढण्याचे प्लॅटफॉर्मवरून काम करत होती आणि तिथूनच त्यांच्या कंपनीला प्रचंड यश मिळायला सुरुवात झाली आणि त्यातून अनेक कंपन्या स्थापन केल्या आज या कंपनीने १०० हून अधिक प्रकल्प समुद्रामध्ये पूर्ण केले आहेत.

या कंपनीने सातासमुद्रापार नावलौकिक मिळवला आहे. अगदी न्यू यॉर्क टाइम्सने अशोक खाडे यांची कथा पहिल्या पानावर प्रकाशित केली होती. आज स्वीडनमध्ये ही अशोक खाडे यांच्या संघर्षाची कहाणी अर्थशास्त्राच्या पुस्तकात छापली गेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेत अशोक खाडे यांनी यशाचे उंच शिखर गाठलं. अशोक खाडे यांनी अतिशय गरिबीचे दिवस बघितले आहेत.

आज त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे परंतु तरीही त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. ज्या शेतांमध्ये त्यांच्या आईने घाम गाळला होता ती जमीन आज अशोक खाडे यांनी विकत घेतली आहे. अशोक खाडे यांच एकत्र कुटुंबावर्ती फार विश्वास आहे. आजही तिघी भाऊ मिळून मिसळून रहात आहेत. हेच अशोक खाडे यांच्या यशाचे रहस्य आहे. ज्या माणसाकडे एकेकाळी खिशामध्ये पंचवीस रुपये नव्हते त्याच माणसाने आज ५०० करोड ची संपत्ती गोळा केली आहे. इतक मोठा ध्येय गाठत असताना जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट हे अशोक खाडे यांच ब्रीदवाक्य होते.

आम्ही दिलेल्या Ashok Khade Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उद्योजक अशोक खाडे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Ashok Khade information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Ashok Khade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “उद्योजक अशोक खाडे यांची माहिती Ashok Khade Biography in Marathi”

  1. मला सुद्धा तुमच्यासारखा बिझनेस मॅन व्हायचे आहे तरी मला गार्डन्स कोणी करत नाही तरी सर तुम्ही मला मॅडम करणे ही माझी नम्र विनंती आणि माझा कॉन्टॅक्ट तुमच्याशी व्हावा माझ्या इमेलवर तुमचा नंबर पाठवा

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!