माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध Badminton Essay in Marathi

Badminton Essay in Marathi – Maza Avadta Khel Badminton Essay in Marathi माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध मैदानी खेळ खेळण्यात एक वेगळीच मज्जा आहे. मैदानी खेळांमध्ये थरारकता, रोमांच आणि आनंद अधिक असतो. मनोरंजन व शारीरिक व्यायाम साठी आपण मैदानी खेळ खेळतो. मैदानी खेळा मध्ये खो-खो, कबड्डी, हॉकी इत्यादी खेळांचा समावेश होतो. अशा मध्येच मैदानात खेळला जाणारा एक सुप्रसिद्ध खेळ म्हणजे बॅडमिंटन होय. बॅडमिंटन हा खेळ संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे बॅडमिंटन खेळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बॅडमिंटन खेळाला प्राचीन काळापासून प्रसिद्धी व महत्त्व लाभलेल आहे. बॅडमिंटन हा खेळ एक आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला जातो. बॅडमिंटन खेळाचे जगभर अनेक चाहते आहेत व बरीचशी युवापिढी करिअर ऑप्शन म्हणून क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटनची निवड करत आहेत.

शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आयुष्यामध्ये खेळ हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये तर खेळाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. खेळ हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा विषय आहे आणि आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग अगदी लहान मुलांपासून ते म्हातारं पर्यंत सर्वांनाच खेळायला फार आवडतं.

badminton essay in marathi
badminton essay in marathi

माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध – Badminton Essay in Marathi

Maza Avadta Khel Badminton Essay in Marathi

बॅडमिंटन या खेळाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ मैदानावरच खेळला जातो परंतु या खेळाला खेळायला जास्त जागेची गरज लागत नाहीत. बॅडमिंटन हे नाव जरी इंग्रजी वाटत असलं तरी शहरी भागांत पासून ते ग्रामीण भागांपर्यंत सर्वत्र हा खेळ खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ वेगवेगळा शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर, नॅशनल आणि इण्टरनॅशनल लेव्हलवर सर्वत्र ठिकाणी खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी कुठलेही निर्बंध नाही आहेत.

ना कुठली वयोमर्यादा आहे व ना कुठली लिंग मर्यादा अगदी छोट्या पासून मोठ्या पर्यंत ते स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत मुलींपासून मुलांपर्यंत सर्वजण हा खेळ खेळू शकतात. बॅडमिंटन हा खेळ उभ राहून खेळला जातो. बॅडमिंटन खेळामध्ये कसरतीची व कौशल्याची गरज असते हा खेळ खेळण्यासाठी शारीरिक क्षमता व शक्तीची गरज असते.

बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने दोन लोकांमध्ये खेळला जातो हा खेळ खेळण्यासाठी दोन लोकांची गरज असते परंतु दोन जण पेक्षा अधिक लोक देखील हा खेळ खेळू शकतात. बॅडमिंटन हा खेळ इंडोर गेम आहे परंतु हा खेळा आपण मैदानावर देखील खेळू शकतो म्हणून आपण याला मैदानी खेळ देखील बोलू शकतो. बॅडमिंटन या खेळाला प्राचीन इतिहास लाभला आहे असं म्हणतात पंधराशे बी.सी पासून बॅडमिंटन हा खेळ भारतात खेळला जात आहे.

या खेळाचं सुरुवातीचं नाव पुमा असून या खेळाचा उगम महाराष्ट्रातील पुणे या शहरातून झाला आणि पुढे ब्रिटिशांनी तो खेळ अठराव्या शतकामध्ये आपल्या भारताबाहेर नेला. हा खेळ खेळताना आयताकृती आकाराचं मैदान लागतं. या मैदानाच‌ मोजमाप ४४ फूट बाय १७ फूट असतं. मैदानाच्या मध्यभागी पाच फुटाची जाळी असते आणि सहा फूट अंतरावर दोन फूट ६ इंच लांबीची सर्विस रेषा आखली जाते.

अशा प्रकारे या खेळाचे मैदान तयार केलं जातं. हा खेळ खेळण्यासाठी रॅकेट आणि शटलकॉकची गरज असते.  एका खेळाडूस प्रत्येकी एक रॅकेट देण्यात येतं. रॅकेट हे धातूने बनलेल‌ अंडाकृती आकाराचे असून त्याला पकडायला खाली एक मूठ असते व त्याच्या मध्यभागी छोटे छोटे चौकोण असतात जे फायबर पासून बनवलेले आहेत.

रॅकेट ची लांबी ६५० ते ७०० मिली मीटर व रुंदी २०० ते २३० मिलिमीटर इतकी असते. रॅकेटचा उपयोग शटलकॉकला‌ मारण्यासाठी केला जातो शटल कॉक हा वजनाने अतिशय हलका असा पाच किंवा सहा ग्रॅम चा १६ पिस लावलेला एक कॉक‌ असतो जो फुलाच्या आकाराचा असतो. या खेळाचे काही नियम आहेत. ज्यांचा कठोर पालन आपल्याला करावच लागतं.

बॅडमिंटन खेळामध्ये दोन खेळाडूंची गरज असते तरी हा खेळ खेळताना तो तीन भागांमध्ये विभागलेला असतो. एका खेळाडूने सर्व्ह करण्यापूर्वी आपला प्रतिस्पर्धी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक असतं. शटल कॉक कोर्टाच्या हद्दीबाहेर मारण्यास मनाई आहे. एका सामन्यात २१ गुणांच्या तीन सर्वश्रेष्ठ खेळांचा समावेश असतो कोर्टाच्या मध्यभागी असलेल्या नेटला स्पर्श करण्यास मनाई आहे.

शटलकॉकला रॅकेटने खालि मारू नये. सर्व्हर कडून प्राप्त करणाऱ्या गटाला सर्व्हरने शटल कॉक मारण्यापूर्वी कोर्ट मधील रेषांना स्पर्श करण्यास मनाई आहे. रॅली जिंकणाऱ्या गटाला त्याच्या गुणांमध्ये एक गुण वाढवून मिळतो. २० गुण झाल्यावर जो गट सर्वात आधी दोन गुण मिळवतो विजय त्या गटाचा होतो. सर्व्ह होईपर्यंत दोन्ही खेळाडूंनी त्यांचे पाय स्थिर ठेवणे आवश्यक आहे.

प्रतिस्पर्धा कडून खाली येणारा स्ट्रोकला रोखण्यासाठी खेळाडू जाळी जवळ रॅकेट धरू शकत नाही. जर सर्व्हरचे पाय सर्विस कोर्टात नसतील किंवा रिसिवर चे पाय सर्व्हर च्या विरुद्ध व तीरपे असतील तर तो फॉल मानला जातो. जर सर्व्हर सर्व्ह करतेवेळी पुढे सरकत असेल तर तो फॉल मानला जातो. खेळाडू कडून किंवा कार्य संघाकडून जर सलग दोन वेळा शटल मारला जात असेल तर तो फॉल समजला जातो.

जो खेळाडू जेव्हा शटल कॉक प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने मजला मारतो तेव्हा गुण मिळतो. जो गट सर्वात आधी २१ गुणां पर्यंत पोहोचतो तो विजय होतो. विजयी संघाला अधिक दोन गुण प्राप्त करणे आवश्यक असते अशा प्रकारे बॅडमिंटन खेळामध्ये स्कोरिंग दिले जाते.‌ बॅडमिंटन हा सर्वांचा आवडता खेळ आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या खेळाला कोणतीही मर्यादा नाही आहे.

कोणीही हा खेळ खेळू शकतो या खेळा मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता, शारीरिक चपळता आणि निर्णय क्षमता गरजेची असते. हा खेळ मोठ्या स्तरावरदेखील खेळला जातो. आणि बॅडमिंटन स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात आणि ह्या मध्ये वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशातून बरेच खेळाडू सहभाग घेतात. आणि इतर खेळांपेक्षा बॅडमिंटन खेळताना शारीरिक धोकादेखील कमी असतो.

हा खेळ ऑलिम्पिक स्तरावर देखील खेळला जातो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये देखील या खेळाचा समावेश असतो. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ही संस्था बॅडमिंटन खेळाचे नियंत्रण करते. बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी ताकद लागते. बॅडमिंटन हा खेळ जिल्हास्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी या खेळाची अधिक सराव करण्याची व  प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

My Favourite Game Badminton Essay in Marathi Language

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी नियम आखले गेले आहेत आणि ते खेळाडूंनी पाळनं अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. बॅडमिंटन या खेळासाठी अधिक शारीरिक श्रम घ्यावे लागतात त्यामुळे तंदुरुस्त राहण्याचा व नियमित चांगला आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे आहे. बॅडमिंटन हा खेळ अगदी शेकडो वर्षांपासून खेळला जात आहेत.

ड्युक ऑफ ब्युफोडॆ हे बॅडमिंटन या खेळाचे जनक मानले जातात. बॅडमिंटन या खेळाचे नियम व अटी लागू करण्यासाठी इसवी सन १८९३ मध्ये बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या असोसिएशन द्वारे बॅडमिंटन या खेळाचे सर्व कायदे नियम व अटी तयार करण्यात आले आहेत.

आपल्या भारत देशातील काही नावाजलेले बॅडमिंटनपटू जे आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आपल्या देशाला बॅडमिंटन खेळामधील अव्वलनीय कौशल्यानी देशाचे नाव रोशन करत आहेत. आपल्या भारत देशातील काही उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणजे पी. व्ही. सिंधू , सायना नेहवाल, पी गोपीचंद इत्यादी हे आपल्या भारतातील बॅडमिंटन क्षेत्रात बॅडमिंटन खेळातील उत्कृष्ट खेळाडू असून भारताला राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत आज पर्यंत भारताला अनेक सुवर्णपदक मिळवून दिली आहेत.

पी गोपीचंद हे भारताचं बॅडमिंटन स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतात. ऑल ओपन इंग्लंड ही स्पर्धा जिंकली आणि १९७९ पासून ते २००१ पर्यंत भारताच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं. आपली भारताची कन्या सायना नेहवाल यांनी एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून जगभरात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. २०१२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवलं होतं.

हे खेळाडू इतर खेळाडुंना अधिक प्रेरणा देतात त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये बॅडमिंटन हे आपलं करिअर ऑप्शन नक्कीच होऊ शकतो. बॅडमिंटन या खेळाची प्रसिद्धी व आवड या खेळाला क्रिकेट नंतर जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ बनवते. बॅडमिंटन या खेळामध्ये आशियाई खेळाडू सर्वोत्कृष्ट आहेत.

शेकडो वर्षांपूर्वी बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी रॅकेटच्या ऐवजी पायाचा उपयोग केला जायचा म्हणजेच शटल कॉकला मारण्यासाठी रॅकेटच्या ऐवजी पायाचा वापर केला जायचा. शटल कॉक याला बर्ड, फुल, पक्षी अशी वेगवेगळी नावं आहेत. बॅडमिंटन खेळाला १९९२ मध्ये पुरुष व महिला एकेरी व दुहेरी सामान्यांसाठी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मान्यता दिली गेली.

१८७७ मध्ये बॅडमिंटन खेळाच पहिलं अधिकृत क्लब युनायटेड किंगडम येथे स्थापन करण्यात आलं द बॅडमिंटन क्लब हे त्या क्लबच नाव होतं.

आम्ही दिलेल्या badminton essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite game badminton essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on badminton game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये badminton essay in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!