Bhuikot Fort Information in Marathi महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांची माहिती महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलायचे म्हणले डोळ्यासमोर येतात ते किल्ले आणि पराक्रमाने आपली नावे इतिहासाच्या पानावर कोरलेले अनेक व्यक्ती. पूर्वीच्या काळी राजांनी आपला राजकारभार आणि वर्चस्व एखाद्या प्रांतावर टिकवून ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी अनेक किल्ले बांधले काही किल्ले उंच डोंगरावर, काही किल्ले समुद्रामध्ये तर काही किल्ला सपाट जमिनीवर बांधले. जे किल्ले सपाट जमिनीवर बांधले आहेत त्या किल्ल्यांना bhuikot killa भुईकोट किल्ले म्हणतात.
महाराष्ट्रामध्ये भुईकोट या प्रकारचे अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळतात त्यामधील काही लोकप्रिय भुईकोट म्हणजे अहमदनगर भुईकोट, सोलापूर भुईकोट आणि मालेगावचा किल्ला. महाराष्ट्रामध्ये पेशवाई काळामध्ये अनेक भुईकोट किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांची माहिती मराठी – Bhuikot Fort Information in Marathi
भुईकोट किल्ला म्हणजे काय ?
- भुईकोट किल्ला म्हणजे जो सपाट जमिनीवर जो किल्ला बांधलेला असतो त्या किल्ल्याला भुईकोट म्हणतात.
- भुईकोट म्हणजे भुई म्हणजे भूमी आणि कोट म्हणजे किल्ला. जो किल्ला भूमीवर बांधलेला असतो त्याला भुईकोट म्हणतात.
अहमदनगर भुईकोट किल्ला – bhuikot killa ahmednagar
अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या शहराजवळ वसलेला आहे. अहमदनगरचा हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून या किल्ल्याचची उंची ६७५ मीटर इतकी आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे आणि हा किल्ला १५ व्या किवा १६ व्या शतकामध्ये निजाम अहमद शहा बहिरी याने बांधला आहे.
ज्यावेळी महात्मा गाधींनी भारत छोडो आंदोलन केले होते त्यावेळी इंग्रज सरकारने सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. पी. सी. घोष आणि मौलाना आझाद या सारख्या आपल्यला भारतीय नेत्यांना याच किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते आणि ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू या किल्ल्यावर कैद होते त्यावेळी त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक या किल्ल्यावरच लिहिले.
त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये येसू बाई, नाना फडणीस यांना देखील कैद करून ठेवले होते. या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल बोलायचे म्हंटले तर हा किल्ला सुमारे २.५ किलो मीटर अंतरावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या सर्व बाजूंनी एक खोल खंदक काढलेले आहे आणि खंदकाच्या बाहेरील बाजूस मातीच्या टेकड्या बनवल्या आहेत या खंदकामध्ये त्या पूर्वीच्या काळी सुसरी आणि मगरी सोडलेल्या होत्या.
त्याचबरोबर या किल्ल्याला एकूण २२ भक्कम बुरुज आहेत. या किल्ल्याच्या भोवती एक संरक्षक गोलाकार तटबंदी देखील आहे जी १८ मीटर उंच आहे. या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोटबाग किल्ला म्हणून ओळखले जात होते.
किल्ल्याचे नाव | अहमदनगर किल्ला |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर आणि भिंगार गावाजवळ सीना नदीच्या काठी आहे |
प्रकार | भुईकोट |
क्षेत्रफळ | २.५ किलो मीटर |
उंची | समुद्र सपाटी पासूनची उंची ६५७ मीटर |
आकार | गोलाकार |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : चांदबीबी महल, म्युझियम, गगन महल, बगदाद महल, मीना महल, विहिरी, खंदक, सोन महल. दिवान ए आम, दिवान ए खास, शाही दरबार आणि भारतीय नेत्यांन कैद करून ठेवलेली इमारत.
सोलापूर भुईकोट किल्ला – bhuikot killa solapur
सोलापूरचा भुईकोट किल्ला महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. सोलापूरचा हा किल्ला भुईकोट प्रकारातील हा किल्ला सोलापूर भागातील एक मुख्य आकर्षण आहे. सोलापूर भुईकोट किल्ला हा १४ व्या शतकामध्ये बहामानिंच्या काळामध्ये बांधला आहे. सोलापूर शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर शहराच्या मध्यभागी असणारा हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
या किल्ल्यामधे जाण्यासाठी एकच मुख्य प्रवेश मार्ग किल्ल्याच्या उत्तरेला आहे. या किल्ल्यला भक्कम अश्या तटबंदीच्या भिंतीनी संरक्षित केले आहे. या किल्ल्याला पहिला एक मुख्य तटबंदी आहे आणि त्यानंतर त्या तटबंदीच्या पुढे किल्ल्याच्या भोवती पाण्याचे खंदक आहे आणि खंदकाच्या पुढे मजबूत आणि भक्कम अशी दुहेरी तटबंदी आहे.
या किल्ल्यला एकूण २३ बुरुज आहे आणि तटबंदीच्या भिंतीला एकूण ७ बुरुज आहेत. चांदबीबी आणि आदिलशहाचा निकाह याच किल्ल्यामध्ये झाला होता. त्याचबरोबर हा किल्ला ज्यावेळी पेशवाई कडे होता त्यावेळी दुसरे बाजीराव पेशवे या ठिकाणी राहिले होते त्याचबरोबर सातारचे भोसले देखील या किल्ल्यावर १ महिन्याच्या कालावधीसाठी राहिले होते.
किल्ल्याचे नाव | सोलापूर किल्ला |
प्रकार | भुईकोट किवा भूकील्ला |
स्थापना | १४ व्या शतकामध्ये |
संस्थापक | बहामनी काळामध्ये |
ठिकाण | सोलापूरचा भुईकोट किल्ला महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : सिध्देश्वर मंदिर, बुरुज, तटबंदी आणि खंदक, खाती दरवाजा, मालीकार्जुन मंदिर आणि इंग्रजकालीन तोफा.
तुगलकाबाद भुईकोट किल्ला :
तुगलकाबाद हा किल्ला दिल्लीतील एक प्राचीन किल्ला असून या किल्ल्याची स्थापना आणि तुगलकाबाद या शहराची स्थापना गयासुद्दिन तुगलक इ. स. १३२१ मध्ये केली. मिळतात. तुगलकाबाद हा किल्ला चार वर्षांच्या अल्प कालावधीत (इ. स. १३२१ ते इ. स. १३२५ ) बांधून पूर्ण झाला. तुगलकाबाद हा एक भूकिल्ला असून या किल्ल्याचा एकूण परीघ ६ किलो मीटर आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे इंडो इस्लामिक शैलीतील आहे.
किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी भक्कम अशी तटबंदी बांधली या तटबंदीच्या भिंतीची उंची कमीत कमी १० ते १५ मीटर इतकी आहे आणि त्या भिंतीना मजबूत असे दुमजली बुरुज बांधलेले आहेत आणि या किल्ल्यामध्ये आपल्यला भव्य बुरुज, भव्य वाडे, मशिदी आणि प्रेक्षकगृहे या सारख्या इमारती पाहायला मिळतील.
किल्ल्यचे नाव | तुगलकाबाद किल्ला |
प्रकार | भुईकोट किवा भूकील्ला |
ठिकाण | दिल्ली (तुगलकाबाद शहर ) |
स्थापना | इ. स. १३२१ |
संस्थापक | गयासुद्दिन तुगलक |
बांधकाम शैली | इंडो इस्लामिक शैली |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : भुयारी मार्ग, कृत्रिम पाण्यचा साठा, दुमजली बुरुज, दरवाजे, राजवाडे आणि प्रेक्षकगृह इत्यादी.
नळदुर्ग भुईकोट किल्ला :
नळदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि हा एक भूईकोट प्रकारातील प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा किल्ला उस्मानाबाद पासून ४५ ते ४६ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याचा संपूर्ण व्यास अडीच किलो मीटरच्या क्षेत्रामध्ये आहे. नळदुर्ग हा किल्ला कोणी बांधला आहे याचे इतिहासामध्ये ठोस असे पुरावे नाहीत पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला चालुक्य राजकर्त्यांच्या काळात म्हणजेच राजा नळ याने बांधला असावा आणि या किल्ल्याचे नाव त्याच्या नावावरूनच पडले असावे असे इतिहासामध्ये म्हंटले जाते.
हा किल्ला आज देखील सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा किल्ला अडीच किलो मीटर क्षेत्रामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याला संरक्षणात्मक भक्कम अशी तटबंदी देखील आहे त्याचबरोबर या किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच युध्दाच्या वेळी शत्रूवर आक्रमण करण्यासाठी नळदुर्ग किल्ल्यावर बुरुज आहे आणि या बुरुजांची संख्या ११४ इतकी आहे आणि हे बुरुज किल्ल्याला समांतर आहेत. नळदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी एकूण १५ वर्ष लागली होती.
किल्ल्याचे नाव | नळदुर्ग |
प्रकार | भूईकोट |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नळदुर्ग गावाजवळ वसलेला आहे |
बांधणीसाठी लागलेला काळ | १५ वर्ष |
उस्मानाबाद पासूनचे अंतर | ४६ किलो मीटर |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : पाणी महाल, तोफा, गणपती महाल, लक्ष्मी महाल अंबरखाना, जामा मशीद, हमामखाना, निजाम कोर्ट, राणीमहाल, रंगमहाल, बारुदखाना आणि कृत्रिम धबधबा
आग्रा भुईकोट किल्ला :
आपल्या भारतामध्ये कित्येक ऐतिहासिक किल्ले आहेत त्यामधील एक म्हणजे आग्र्याचा किल्ला. आग्रा हा किल्ला भारतातील प्रसिध्द ताजमहाल पासून फक्त ३ किलो मीटर आहे. आग्रा येथील हा किल्ला मोगलांच्या काळामध्ये ९४ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधला आहे. १५ व्या शतकामध्ये हा किल्ला बादलगड या नावाने ओळखला जात होता.
भारतामधील मुगल सम्राट बाबर, हुमायु, अकबर, जहांगीर आणि औरंगजेबाने या किल्ल्यावर राज्य केले. आज जो आपण लाल दगडांचा किल्ला पाहतो तो इ. स १५७३ मध्ये राजा अकबर यांनी बांधला आहे आणि या किल्ल्यामध्ये जेवढे बांधकाम आहेत ती लाल दगडांनी आणि संगमरवर याने बांधलेली आहेत. आग्र्याचा हा किल्ला भू किल्ला असून या किल्ल्याला लाल किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.
१००० वर्षापूवी बनवलेला हा किल्ला आता जागतिक वारसा असणाऱ्या किल्ल्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा किल्ला मोगलांनी बांधला त्यानंतर इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाई नंतर इब्राहिम लोधी येथे आला आणि त्याने मुगलांचा पहिला शासक बाबर याच्यावर हल्ला करून हा किल्ला आपल्यला ताब्यात घेतला आणि त्यामध्ये बांधकाम देखील केले.
हा किल्ला बांधण्यासाठी त्याने १४४४००० कामगार घेतले आणि या किल्ल्याचे बांधकाम ८ वर्ष चालले शेवटी ह्या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १५७३ मध्ये पूर्ण झाले. या किल्ल्यामध्ये आपण एकाच प्रवेश दाराने आत जावू शकतो आणि दाराचे नाव अमर सिंघ गेट असे आहे.
किल्ल्याचे नाव | आग्रा किल्ला किवा लाल किल्ला |
स्थापना | इ. स. १५७३ |
संस्थापक | अकबर |
ठिकाण | आग्रा |
बांधकाम शैली | मुगल शैली |
क्षेत्रफळ | ९४ एकर |
प्रकार | भू किल्ला किवा भूईकोट |
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे : शीश महल, अमर सिंह दरवाजा, दिवान आय खास, दिवान आय आम, जहांगीर महल, मुसम्मन बुरुज आणि खास महाल.
कंधार भुईकोट किल्ला :
एक हजार वर्षापूर्वीचा कंधारचा हा भुईकोट प्रकारातील किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील कंधार या गावामध्ये वसलेला आहे. हा किल्ला राष्ट्रकुट वंशामधील राजा तिसरा कृष्ण याने १० व्या शतकामध्ये बांधला आणि त्यानंतर या किल्ल्यावर ज्यांचे वर्चस्व येईल त्यांनी हा किल्ला विकसित केला. ज्यावेळी येथे राष्ट्राकुटांची वर्चस्व होते त्यावेळी कंधार हे शहर त्यांची राजधानी होती.
हा किल्ला नांदेड या मुख्य शहरापासून ५५ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याला तेथील प्रांताचे प्रतिक मानले जाते. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे २४ एकर असून या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक रुंद खंदक आहे आणि भक्कम अशी तटबंदीची भिंत आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची देखील एक पौराणिक कथा आहे जी महाभारताशी संबधित आहे.
किल्ल्याचे नाव | कंधार किल्ला |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील कंधार या गावामध्ये वसलेला आहे |
संस्थापक | राष्ट्रकुट वंशामधील राजा तिसरा कृष्ण |
स्थापना | १० व्या शतकामध्ये |
क्षेत्रफळ | २४ एकर |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : या किल्ल्यावर आपल्याला माचाली दरवाजा, सुंदर अशी भीतीवर कोरलेली शिल्प, मंदिरे, लाल महल, शीश महल, अंबरखाना, दरबार महल, बाग आणि बागेमधील कारंजे आणि राष्ट्रकुट रॉयल पॅलेस.
मालेगाव भुईकोट किल्ला :
bhuikot fort information in marathi मालेगाव हा किल्ला महाराष्ट्र राज्यामधील नाशिक या जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यामध्ये वसलेला आहे. हा किल्ला नाशिक या शहरापासून १०० किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला पेशवाई काळातील असून या किल्ल्याचे बांधकाम नरो शंकर राजे बहादूर यांनी इ. स. १७४० मध्ये बांधला आहे. मालेगाव हा किल्ला मालेगाव या शहराच्या मध्यभागी वसलेला आहे आणि हा किल्ला बांधण्यासाठी जवळ जवळ २५ वर्षाहून अधिक दिवस लागले होते.
हा किल्ला बांधकामासाठी उत्तर भारत आणि गुजरातमधील सुरात या शहरातून कारागीर बोलावून घेतले होते. या किल्ल्याचे बांधकाम करताना या किल्ल्याला संरक्षक भक्कम तटबंदीची भिंत बांधली होती त्याचबरोबर या किल्ल्यावर एकूण ९ बुरुज होते. हा किल्ला जास्त काळ पेशवाई मध्ये नाही राहिला इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
किल्ल्याचे नाव | मालेगाव किल्ला |
प्रकार | भुईकोट |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यामधील नाशिक या जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यामध्ये वसलेला आहे |
स्थापना | इ. स. १७४० |
संस्थापक | नरो शंकर राजे बहादूर |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : खंदक, प्रवेश दरवाज्य जवळ ठेवलेल्या २ तोफा, रंगमहल, २ सुंदर छत्र्या, बुरुज आणि रंगमहालावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
उदगीर भुईकोट किल्ला :
उदगीरचा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यामधील उदगीर या गावाजवळ हा किल्ला वसलेला आहे. उदगीर हा किल्ला प्रसिध्द होण्याचे कारण म्हणजे येथे निजाम आणि मराठा यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि त्याचा पुढाकार पेशवा सदाशिवराव भाऊ यांनी केला होता. उदगीर या किल्ल्याबद्दलची एक विशेषता म्हणजे या किल्ल्यामध्ये पूर्वीच्या काळी एक गुप्त भुयारी मार्ग होता तो उदगीर किल्ल्यापासून बिदर पर्यंत होता म्हणजे ६३ किलो मीटर भुयारी मार्ग होता. उदगीर हा किल्ला १२ व्या शतकामध्ये बहामनी वंशाच्या काळामध्ये बांधण्यात आला.
किल्ल्याचे नाव | उदगीर किल्ला |
प्रकार | भुईकोट |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यामधील उदगीर या गावाजवळ हा किल्ला वसलेला आहे |
स्थापना | १२ व्या शतकामध्ये |
संस्थापक | बहामनी |
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे : ६३ किलो मीटर भूयारी मार्ग, खोल खंदक, समुद्र धुनीय महतांची समाधी आणि सिवयल महल या सारखी प्राचीन ठिकाणे किल्ल्यावर पाहायला मिळतात.
पारोळा भुईकोट किल्ला :
पारोळा हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून या किल्ल्याची लांबी सुमारे ५२५ फुट आणि रुंदी ४३५ फुट इतकी आहे. पारोळा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा या गावाजवळ वसलेला आहे. पारोळा हा किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी इ. स. १७२७ मध्ये बांधला आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्याभोवती चारही बाजूंनी खोल खंदक आहे आणि किल्ल्याला भक्कम अशी तटबंदीची भिंत देखील आहे. पारोळ या गावाचे एक विशेषता म्हणजे हे गाव झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर होते.
किल्ल्याचे नाव | पारोळ किल्ला |
प्रकार | भुईकोट |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा या गावाजवळ वसलेला आहे |
स्थापना | इ. स. १७२७ |
संस्थापक | जहागीरदार हरी सदाशिव दामोदर |
आकार | किल्ल्याची लांबी सुमारे ५२५ फुट आणि रुंदी ४३५ फुट इतकी आहे |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे : या किल्ल्यावर आपल्याला ७ दरवाजे पाहायला मिळतात त्यामधील काही दरवाज्याची नावे म्हणजे वंजीरी दरवाजा, पीर दरवाजा आणि धरणगाव दरवाजा, खंदक, नागेश्वर मंदिर आणि शिव मंदिर.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, महाराष्ट्रातील भुईकोट किल्ला bhuikot fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. bhuikot fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bhuikot fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही महाराष्ट्रातील भुईकोट किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या bhuikot killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट