देवकुंड धबधबा माहिती Devkund Waterfall Information in Marathi

devkund waterfall information in marathi देवकुंड धबधबा माहिती, आज आपण या लेखामध्ये एक प्रसिध्द आणि पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय असणाऱ्या देवकुंड या धबधब्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही निसर्गरम्य पर्यटक क्षेत्र तुमच्या सहलींसाठी शोधात असाल तर देवकुंड वॉटरफॉल हा एक तुमच्या सहलीसाठीचा चांगला पर्याय आहे कारण देवकुंड धबधबा हा एक सुंदर धबधबा आहे जो जंगल झाडांच्यामध्ये लपलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेता येईल.

देवकुंड धबधबा हा पुणे शहरापासून १०३ किलो मीटर अंतरावर आहे आणि मुंबई शहरापासून १७० किलो मीटर अंतरावर आहे आणि हा धबधबा भारतातील पश्चिम घाटामधील ताम्हणी घाट मध्ये असलेल्या रायगड जिल्ह्यामधील भिरा पाटनुस नावाच्या गावामध्ये हा धबधबा वसलेला आहे आणि या धबधब्याबद्दल असे म्हटले जाते कि देवांचे स्नान करण्यासाठी असलेला तलाव होता आणि म्हणून या धबधब्याला देवकुंड असे नाव पडले आहे.

देवकुंड धबधब्याचे एक वैशिष्ठ म्हणजे हा महाराष्ट्रातील काही धबधब्यांच्यापैकी एक महत्वाचा धबधबा आहे आणि हा प्लंज फॉलच्या श्रेणीमध्ये येतो.  देवकुंडला जाण्याचा रस्ता हा एक ट्रेक सारखाच आहे आणि भिरा ते देवकुंड हा ५ ते ६ किलो मिटरचा ट्रेक आहे आणि हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी कमीत कमी १ ते २ तास लागतात.

devkund waterfall information in marathi
devkund waterfall information in marathi

देवकुंड धबधबा माहिती – Devkund Waterfall Information in Marathi

ठिकाणाचे नावदेवकुंड धबधबा
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ.
धबधब्याची उंची२७०० फुट
नदीचा उगमकुंडलिका

देवकुंड धबधबा विषयी महत्वाची माहिती – devkund waterfall trek information in marathi

देवकुंड धबधबा हा मुंबई पुणे, मुंबई आणि रत्नागिरी या शहरांच्यापासून एक जवळ असणाऱ्या पर्यटक स्थळापैकी आहे आणि या स्थानांच्याजवळील सर्वात प्रसिध्द आणि सुंदर धबधबा आहे. देवकुंड हा धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि भिरा या गावांच्याजवळ आहे.

हा धबधबा २७०० फुट उंचीवर असून जमिनीच्या पातळीपासून ८० फुटांवर पाणी तलावामध्ये जाते आणि त्याचबरोबर देवकुंड धबधबा हा कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे आणि आणि हा धबधबा तीन धबधब्यांचा संगम आहे असे हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी असते.

नक्की वाचा: आंबोली धबधबा माहिती

देवकुंड धबधब्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • महाराष्ट्र राज्यामध्ये बारमाही पाणी असणारे असे काही मोजकेच धबधबे आहेत आणि देवकुंड धबधबा हा देखील त्यामधीलच एक आहे.
 • देवकुंड हा धबधबा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामध्ये ताम्हणी घाटाजवळ आहे.
 • देवकुंड धबधबा हा २७०० फुट उंचीचा आहे आणि या खडकाळ पृष्ठभागावरून ८० मीटर उंचीवरून खाली वाहतो आणि हा ३० इंच व्यासाचा नैसर्गिक तलाव तयार करतो आणि ह्या धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला १ ते २ तासाची ट्रेक पूर्ण करावी लागते आणि ट्रेकचे अंतर ५ ते ६ किलो मीटर अंतराचे आहे.
 • त्याचबरोबर ट्रेक पूर्ण करण्यासाठी ३ ते ४ नद्या ओलांडून ट्रेक पूर्ण करावा लागतो आणि हे पावसाळ्यामध्ये खूप अवघड होते आणि म्हणून जर तुम्हाला हा धबधबा पाहण्यासाठी जायचे असल्यास तुम्ही पावसाळा ऋतू संपल्यानंतर लगेच जा.
 • या धबधब्याबद्दल असे म्हटले जाते कि देवांचे स्नान करण्यासाठी असलेला तलाव होता आणि म्हणून या धबधब्याला देवकुंड असे नाव पडले आहे आणि याला देवांच्या अंघोळीचा तलाव म्हणून देखील ओळखले जाते.
 • भिरा आणि माणगाव हे देवकुंड या धबधब्याजवळची गावे आहेत.
 • भिरा या गावामध्ये पोहचल्यानंतर जर तुमची स्वताची कार किंवा दुचाकी गाडी असेल तर तुम्ही ती कार किंवा गाडी भिरा गावामध्ये पार्क करू शकता परंतु त्यासाठी पार्किंगचा दर हा ३० रुपये आहे आणि हा धबधबा पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून दहा रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो.

टिप्स किंवा खबरदारी – tips

 • जर तुम्ही धबधबा पाहण्यासाठी समूहाने गेला असाल तर तुम्ही एकत्र रहा कारण या ठिकाणी जाण्याचे मार्ग हे तुम्हाला गोंधळात टाकू शकतात.
 • अभयारण्यामध्ये किंवा धबधब्याजवळ कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ घेऊन जाऊ नका.
 • त्याचबरोबर या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये खूप आतमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न करू नका.  
 • भिरा हे गाव महत्वाच्या शहरांशी योग्य प्रकारे जोडलेले नाही आणि त्यामुळे जर तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने आला तर आपल्याला भिरा या गावामध्ये येण्यासाठी खूपच वेळ लागेल त्यामुळे तुम्ही जर शक्य होईल तितके तुमची स्वताचीगाडी घेऊन आला तर ते फायद्याचे ठरेल.
 • कारण तुम्ही तुमच्या स्वताच्या गाडीने भिरा गावामध्ये पोहचू शकता आणि त्या गावामध्ये तुमची कार पार्क करून तेथून तुम्ही देवकुंड धबधब्याची ट्रेक पूर्ण करू शकतात.
 • जर तुम्ही  पुणे या शहरातून धबधबा पाहण्यासाठी जात असाल तर तुम्ही माणगावला जाणारी बस पकडा आणि मग तेथून रिक्षा पकडून धबधब्यापर्यंत जा.

देवकुंड धबधब्याला कसे पोहचायचे – how to reach

देवकुंड धबधबा हा पुणे शहरापासून १०३ किलो मीटर अंतरावर आहे आणि मुंबई या शहरापासून १७० किलो मीटर अंतर आहे. जर तुम्हाला हा धबधबा पाहण्यासाठी यायचे असल्यास तुम्ही पुणे शहरातून बसने किंवा ट्रेनने कर्जत ला येऊ शकता आणि तेथून खोपोली-पाली-भिरा गावामध्ये पोहचू शकता.

त्याचबरोबर तुम्ही मुंबई शहरातून देखील बसने किंवा ट्रेनने येऊ शकता आणि तेथून तुम्ही खोपोली-पाली-भिरा गावामध्ये पोहचू शकता आणि मग तुम्ही भिरा गावातून देवकुंड या धबधब्यासाठी पोहचू शकता.

आम्ही दिलेल्या devkund waterfall information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर देवकुंड धबधबा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या devkund waterfall trek information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about devkund waterfall in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!