Essay on Nag Panchami in Marathi नागपंचमी निबंध मराठी भारत हा देश विविध संस्कृती व परंपरा साठी ओळखला जाणारा देश आहे. भारतामध्ये प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि प्रत्येक सण हा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. त्यातीलच एक लोकप्रिय सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे आणि या सणाचं ऐतिहासिक व सांस्कृतिक रित्या फार महत्त्व आहे. नागपंचमी हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्याच्या सुरुवातीस येतो. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.
कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच सण येतात. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा यासारखे सण येतात आणि श्रावण महिन्या पासूनच सणांना खरी सुरुवात होते आणि सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी असतो. सण उत्सव आनंद साजरा करणं प्रत्येकालाच आवडतं म्हणूनच सगळेजण श्रावण महिन्यात येणार्या या पहिल्या सणासाठी फारच आतुर असतात.
नागपंचमी मध्ये नाग देवतेची पूजा केली जाते. या दिवशी नाग हा देवासमान मानला जातो. नागपंचमी हा हिंदू लोकांचा प्रमुख सण मानला जातो. हिंदू पंचांग च्या अनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरं केलं जातं. या दिवशी नाग देवतेची किंवा सापांची पूजा केली जाते आणि त्यांना दुधाने अंघोळ घातली जाते.
नागपंचमी निबंध मराठी – Essay on Nag Panchami in Marathi
Nag Panchami Essay in Marathi
हा सण पारंपारिक आहे. ग्रामीण भागांमध्ये हा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी लवकर उठून, संपूर्ण घर साफ करून, स्वच्छ आंघोळ करून, नवा पोशाख घालून, जमिनी शेणाने सारवतात त्यामध्ये रांगोळी काढतात, भिंतीवर नागाची वेगवेगळी चित्रे काढतात घरातल्या स्त्रिया गावातील जवळपासच्या वारुळा जवळ जाऊन त्या वारुळाची पूजा करतात. तिथे दूध अर्पण करतात वारुळावर फुल ठेवतात आरती करतात नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा प्रसाद अर्पण करतात.
अशा प्रकारे हा सण गावातील लोक साजरी करतात. ग्रामीण भागाप्रमाणेच नागपंचमी या सणाचं शहरी भागांमध्ये देखील तितकंच महत्त्व आहे सध्या शहरी भागात कुठलंही सापाचे वारूळ दिसून येत नाही परंतु या दिवशी मातीने बनवलेल्या नागाची पूजा केली जाते त्यामुळे मातीच्या मूर्तीवर दूध अर्पण केलं जातं. नागपंचमीच्या दिवशी प्रामुख्याने नागदेवतेला किवा सापाला आंघोळ घालण्याची प्रथा आहे.
परंतु सध्या बरेच लोक नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध वाहतात आणि त्या मुळे ही देखील एक नवीन प्रथा सुरू झाली आहे. आणि शास्त्रानुसार नागाला दूध पाजणे नव्हे तर नागाला दुधाने अंघोळ घालण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी अष्ट नागांची पूजा केली जाते. अनंत म्हणजेच शेष, वासुकि, पद्मनभ, धृतराष्ट्र, शंखपाल, तक्षक, कालिया, कम्बल अशा आठ नागांची पूजा केली जाते.
वाराणसी येथील काशी येथे नागपंचमीच्या दिवशी नाग कुवा नावाच्या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरते. नागपंचमीचं मुख्य कारण म्हणजे या दिवशी नाग देवतेची घरोघरी पूजा केली जाते व नागदेवतेला प्रसन्न करण्याची प्रथा मानली जाते. नागपंचमी या सणाला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे देखील काही सांस्कृतिक व ऐतिहासिक गोष्टी आहेत.
यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून सुरक्षित वर आले होते आणि तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा म्हणूनच त्या दिवशीपासून नागपूजा केली जाते. तर तर एकदा एका शेतकऱ्याने शेतामध्ये नांगरणी करताना नांगराच्या फळाने तीन छोट्या नागिनीची पिल्ले मृत्युमुखी पडली आणि तेव्हा नागदेव शेतकऱ्यावर कोपला म्हणून ही प्रथा सुरु झाली.
असाही काही लोकांचा समज आहे म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी बरेच नियम पाळण्याची प्रथा आहे जसे की कोणतीही भाजी चिरून नये, कोणताही पदार्थ तळायचे नाही, तवा वापरायचा नाही अशा काही प्रथा पाळल्या जातात. भारतीय संस्कृतीमध्ये नाग हे एक दैवत मानलं जातं. नागाचं वर्णन करायचं झालं म्हणजे एक फना धारी सर्प या सर्पाच्या फणे वर पुढच्या बाजूने दहा अंकान सारखे चिन्ह असतात. हिरवट किंवा पिवळा असा नागाचा प्रामुख्याने रंग असतो.
नागाच्या तोंडामध्ये वीष धारण करणारे दात असतात. नागाची जिभ दोन भागांमध्ये विभागलेली असते म्हणजेच दुभंगलेली असते. अगदी प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे. तसेच शेतकरी बांधवा साठी देखील नागपंचमी हा अतिशय विशेष आहे कारण शेतात राहून शेताची रक्षा करतात आणि म्हणूनच ते शेतकरी बांधवांचे मित्र म्हणून संबोधले जातात.
इतकंच नव्हे तर नागपंचमी या सणाच्या दिवशी स्त्रियांमध्ये व मुलींमध्ये फार उत्साह संचारतो स्त्रिया घरातील अंगणासमोर मोठे गाणी म्हणत नाच गाणी करतात किंवा हातावर मेहंदी लावतात शिवाय झाडावर झोके घेतात आणि अशाप्रकारे अगदी आनंदात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण भारतातील एक मुख्य सण आहे आणि म्हणूनच हा सण भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये देखील साजरा केला जातो.
मग ते गुजरात प्रांत असू दे किंवा राजस्थान असू दे केरळ, तामिळनाडू इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील अशाप्रकारे भारतातील बऱ्याच प्रांतांमध्ये नागपंचमी साजरी केली जाते. आपली भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे. अगदी प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीत नाग नृत्याचा प्रसार दिसून येतोय. मोठ्या भक्तिभावाने नागपंचमी हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो.
नागपंचमी हा सण वेदकाळापासून चालत आलेला सण आहे. म्हणूनच त्याचे फार महत्त्व आहे. नाग हा सरपटणारा प्राणी आहे परंतु नागाचे फार प्राचीन काळापासून किंवा अगदी देव लोकांपासून महत्त्व आहे. अगदी भगवान शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करायचे. शिवाय भगवान विष्णू यांचे तर नाग ही शेष आहेत. गणपती भगवान तर आपल्या कमरेला नाग बांधतात. अगदी लहानपणापासून प्रत्येक पुस्तकातून वेगवेगळ्या महान ज्येष्ठ कवींनी नाग व नागपंचमीचे महत्व वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून सांगितले आहे.
लहानपणापासून आपण नाग व नागपंचमी बद्दल वेग वेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहोत. मराठी भाषिक लोकांमध्ये नागपंचमी या सणाचे विशेष महत्त्व आहे आणि या सणाची माहिती पुढील पिढी पर्यंत पोहोचावी म्हणून ज्येष्ठ कवींनी कवितांच्या माध्यमातून नागपंचमी सणा बद्दल विशेष माहिती पुरवली आहे.
नागपंचमीच्या सणानिमित्त बऱ्याच स्त्रिया श्रद्धाळू भावनेने नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास ठेवतात हा उपवास आपल्या भावाला चिरंतन व सुखी आयुष्य लाभो व तसेच आपल्या भावाला प्रत्येक दुःखातून संकटातून वाचविण्यासाठी उपवास ठेवतात या सोबतच अनेक स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी देखील उपवास ठेवतात.
नागपंचमीच्या दिवशी तर लहान मुलांची फारच मजा असते लहान मुलांना गव्हाची खीर किंवा चण्याची डाळ आणि गुळापासून बनवलेल्या उकडीच्या दिंड्या असा मस्त बेत खायला मिळतो. तसेच नागपंचमीच्या दिवशी सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळीचा देखील बेत असतो. देवांचा देव महादेव म्हणजेच भगवान शंकर यांना प्रिय असणारा हा नाग, तसेच भगवान विष्णूचे जो सिंहासन आहे, पृथ्वीचा नागाचा संबंध असल्यामुळे आपण भारतात व भारताबाहेर देखील नागपंचमी साजरी करतो.
नागपंचमी हा सण साजरा करण्याचे मुख्य हेतू किंवा कारण म्हणजे नागा प्रती आपले प्रेम व्यक्त करणं व नागासाठी आपला सन्मान व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कारण आता दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणूनच पर्यावरणातील सापांचे संरक्षण करण्याच्या हेतूने देखील हा सण साजरा केला जातो तसेच समाजामध्ये सर्प बद्दल जनजागृती व्हावी म्हणून.
साप हा विषारी प्राणी आहे, म्हणून सगळे जण सापाला घाबरून असतात साप बघताच त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु असे न करता सर्प मित्राला बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून आपण समाजातील पर्यावरणातील सापांची संख्या घटण्याचे प्रमाण वाचवू शकतो. कारण या समाजातील सर्व मुक्या प्राणी व पक्ष्यांची जबाबदारी व त्यांचे संरक्षण घेणे हे समाजातील एक घटक म्हणून आपली जबाबदारी व आपले कर्तव्य आहे आणि म्हणूनच नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी हा श्रावणातील एक महत्त्वाचा सण असून या सणाचं महत्त्व येणार्या पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून दरवर्षी श्रावणाच्या पाचव्या दिवशी येणारी ही नागपंचमी आपण सर्वांनी अगदी आनंदात व उत्साहाने साजरी करायला हवी व नागपंचमी साजरी करण्यामागच मुख्य कारण शास्त्रीय कारण सांस्कृतिक कारण आपल्या येणार्या पुढच्या पिढीकडे पोहोचवायला हवं जेणेकरून येणारी पुढची पिढी आपला सांस्कृतिक वारसा नागपंचमी यांसारखे सण साजरे करून पुढे नेईल.
आम्ही दिलेल्या essay on nag panchami in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नागपंचमी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nag panchami essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि nag panchami in marathi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nag panchami essay in marathi language for grade 5 Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट