Essay on Natural Disasters in Marathi नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी निसर्गामध्ये एक चांगला समतोल आहे. ज्यामध्ये सर्व प्राणी, पक्षी आणि मनुष्य हे सर्वजन निसर्गाच्या वातावरणाशी अगदी सुसंगतपणे राहतात पण जर निसर्गाचा समतोल बिघडला तर आपल्याला निसर्गाचे विध्वंस रूप आपल्याला पाहायला मिळते आणि हे निसर्गाचे रूप जगाला संपवू शकते. त्सुनामी, भूकंप, चक्रीय वादळ, वादळ, महापूर, दुष्काळ हि सर्व नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे आहेत आणि जर पृथ्वीवर यासारखे काही संकट आले. तर कोणीच काही करू शकत नाही. आज आपण या लेखामध्ये नैसर्गिक आपत्ती या विषयावर निबंध लिहणार आहोत. चला तर मग नैसर्गिक आपत्ती या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.
नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी – Essay on Natural Disasters in Marathi
Natural Disasters Essay in Marathi
काही नैसर्गिक कारणामुळे किंवा निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे जगावर अनेक नैसर्गिक संकटे ओढवतात आणि ती म्हणजे भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, पूर यासारख्या गोष्टी घडतात आणि यामध्ये हजारो लोक मरतात. तसेच काहीजण जखमी होतात तसेच लोकांच्या घराचे आणि इतर गोष्टींचे नुकसान होते आणि पैशाचे देखील नुकसान होते. आपल्या भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीचा म्हणजेच महापूर आणि दुष्काळ या नैसर्गिक संकटांचा सामना हा दरवर्षी करावा लागतो आणि या नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान हे अनेक लोकांना सोसाव लागते.
म्हणजेच जर पूर आला असेल तर एकाद्या घराचे किंवा मालमत्तेचे नुकसान होते तसेच जर शेतकऱ्याने शेतामध्ये चांगले पिक येण्यासाठी कष्ट केले असतील आणि त्यावर्षी जर कोरडा दुष्काळ वैगेरे पडला तर शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अश्या प्रकारे लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.
नैसर्गिक आपत्ती होण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर वाढणारे प्रदूषण, ओझोनचा थर कमी झाल्यामुळे आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तीला मानवाला सामोरे जावे लागत आहे आणि या सर्व कारानंच्यासाठी माणूसच जबाबदार आहे कारण मानवानी मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, माती प्रदूषण केले आहे.
तसेच पृथ्वीवरील होणार्या बदलामुळे ओझेनचा थर कमी झाला आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील माणसासमोर येवून बसली आहे. त्याचबरोबर औद्योगीकरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोषणामुळे पृथ्वीचा किंवा समतोल बिघडला आहे आणि असंतुलित होण्याच्या मारागावर आहे. नैसर्गिक आपत्तीची जर आपण व्याख्या पहायची म्हंटली तर ‘पृथ्वीवर होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये होणारी एक मोठी घटना ज्यामुळे निसर्गाचे लक्षणीय नुकसान होते.’
नैसर्गिक आपत्तीचे काही प्रकार आणि त्यामधील पहिला म्हणजे हवामान विषयक आपत्ती आणि हि आपत्ती हवामानातील तापमान किंवा हवा यातील होणाऱ्या बदलामुळे घडतात आणि लोकांना चक्रीय वादळ, थंडीच्या लाठा, गोठणारा पाऊस, उष्णतेच्या लाटा यासारख्या हवामान विषयक आपत्तींना सामोरे जावे लागते.
त्याचबरोबर भूगर्भीर किंवा भूवैज्ञानिक आपत्ती, भूगर्भीर आपत्ती म्हणजे जी जमिनीच्या आत मध्ये होते जसे कि ज्वालामुखी किंवा भूकंप हि भूगर्भीय आपत्तीची उदाहरणे आहेत. त्याचबरोबर जलविज्ञान आपत्ती हि पूर, महापूर, दुष्काळ, सुनामी यामुळे होते आणि यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच काही वेळा जैविक प्रक्रियेच्या परिणामामुले अनेक धोके उद्भवतात आणि यामध्ये अनेक रोगांचा समावेश असतो तसेच जैविक आपत्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कोरोन हे आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे देशावर अनेक संकटे येतात आणि त्याचा परिणाम राजकीय गोष्टीवर देखील होतो. देशातील किंवा राज्यातील हिंसक संघर्षामुळे आपत्ती निवारण्यासाठी राज्ये, समुदाय आणि व्यक्तीची शक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव वाढू शकतो म्हणजेच नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा राजकीय गोष्टींच्यावर होतो.
नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानापासून कोणीच वाची शकत नाही. पण आपण पूर्वखबरदारी घेवून होणारे नुकसान कमी करू शकतो जसे कि ज्या ठिकाणी पूर मोठ्या प्रमाणात येतो म्हणजेच नदीच्या काठी, समुद्राजवळ, किंवा जेथे पावसाळ्यामध्ये पाणी येऊन घरामध्ये शिरते त्या भागामध्ये मालमत्ता किंवा घरे बंधू नका तसेच ज्याठिकाणी भूकंप आणि दंगलाप्रवन आहे.
त्याठिकाणी देखील आपली घरे किंवा मालमत्ता बंधू नका. आणि जर तुम्ही जर घर अश्या भागामध्ये बांधले असेल तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या महागड्या आणि उच्च किमतीच्या वस्तू तुमच्या घराच्या वरच्या मजल्यावर ठेवा तसेच तुमच्या घराच्या भोवती पावसाचे किंवा येणारे पाणी पुरेसे निचरा होईल अशी तजबीज करून घ्या तसेच या ठिकाणी तुमची घरे थोड्या उंचीवर बांधा.
तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रकारे नुकसान झाले असेल तर आपण वेगवगेळ्या प्रकारे त्या मालमत्तेसाठी विमा उतरवू शकतो जसे कि दुकानांच्यासाठी शॉपकीपर्स पॉलीसी, गावामध्ये जे लोक शेती करतात त्यांच्यासाठी गावकरी किसान पॅकेज पॉलीसी, आग आणि विशेष संकटांच्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी मालमत्तेवर केलेला विमा अश्या प्रकारे आपण नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी करू शकतो.
नैसर्गिक आपत्तीची काही उदाहरणे आहेत आणि ती म्हणजे १९९९ मध्ये झालेल्या सुपर सायक्लोन मध्ये अनेक लोक जखमी झाले होते तसेच यामध्ये १३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता तसेच ओडिशा मध्ये झालेले चक्रीय वादळ हि देशातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
त्याचबरोबर २०१३ मध्ये ओडिशामध्ये झालेले चक्रीयवादळ हे किनारपट्टीवर समान तीव्रतेने धडकले होते आणि त्यामुळे या वादळामध्ये मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या हि २२ होती आणि किनारपट्टीवर समान तीव्रतेने हे वादळ धडकल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आणि मृत्यू पावणाऱ्या लोकांची देखील संख्या कमी होती.
नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आहे आणि सध्या तर माणसाला अनेक वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करणे हि एक काळाची गरज बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन मध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संसाधनांचा वापर करणाऱ्या कृतीचा एकत्रित योजना याचा समावेश असतो.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान किंवा धोके जरी आपल्या रोखता येत नसले. तरी त्यापासून मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान किंवा त्या पासून होणारा प्रभाव हा आपण अगदी सहजपणे कमी करू शकतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती पूर्व नियोजन आणि आपत्तीच्या नंतरचे नियोजन करणे हा महत्वाचा भाग असतो आणि आपण आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतरचे नियोजन केले तर, आपले मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान आपण वाचवू शकतो.
आम्ही दिलेल्या essay on natural disasters in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या natural disasters essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि naisargik apatti nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट