माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay On Parrot in Marathi

Essay On Parrot in Marathi – My Favourite Bird Parrot Essay in Marathi – Maza Avadta Pakshi Popat माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध या संपूर्ण सृष्टीवर प्रत्येकाला कुठलाना कुठला पक्षी आवडतच असतो. पक्षी हे असतातच इतके भारी कि ते कुणालाही आवडतील. त्यांचा रंग, रूप, आवाज इतकं आकर्षक असत कि ते लगेच आकर्षित करून घेतात. मला पोपट हा पक्षी खूप आवडतो. शरीराने हिरवा आणि चोच गडद लाल रंगाची असणारा पोपट पक्षी हा मला खूप आवडतो. पोपटाचा मिठू मिठू हा आवाज मला खूप आवडतो. मिठू मिठू आवाज आपल्या कानांना सांगीताची एक वेगळीच लय ऐकून जातो. पोपट जंगलात झाडाच्या पोकळीत राहतो.पोपटाच्या मुख्य घरट्याला ढोली असे म्हणतात. पोपटाला झुपकेदार झाडांच्या सानिध्यात राहायला आवडत.

essay on parrot in marathi
essay on parrot in marathi

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध – Essay On Parrot in Marathi

पोपट पक्षी निबंध 

पोपटाच्या हिरव्या रंगाबद्दल एक अख्यायिका आहे, देवाने पोपटाला हिरवा रंग दिला यामागचे कारण म्हणजे, पूर्वीच्या काळी कुठल्याही पक्षाला रंग नव्हता, सगळे पक्षी रंगहीन होते .त्यामुळे शिकारी जंगलात यायचे आणि पक्ष्यांची शिकार करून घेऊन जायचे. त्यावेळी सर्व पक्ष्यांनी गणपती बाप्पाकडे विनंती केली. गणपती बाप्पांनी ठरवलं की सगळ्या पक्षांना रंग द्यायचा.

त्यांनतर गणपती बाप्पांनी सर्व प्रथम पोपटालाच विचारले, पोपट पण हुशार त्यानं बापाला सांगितलं की मी हिरव्या हिरव्या झाडावर राहतो त्यामुळं मला हिरव शरीर आणि चोच फक्त लाला दे. कारण शिकारी शिकार करायला आला तरी हिरव्या झाडीतून पोपट शिकारीला दिसणार नाही या हेतूने पोपटाने हिरवा रंग मागून घेतला.

पोपट हा खूप हुशार पक्षी आहे. तो माणसाच्या आवाजाची नक्कल सुद्धा करू शकतोय. काही लोक पोपटाला कसरती सुद्धा करायला शिकवतात. पोपट हा सर्कशी मध्ये सुद्धा उपयोगी ठरतो. जगात 350 हुन अधिक पोपटाच्या प्रजाती आहेत. पोपटाच्या बऱ्याच प्रजातींमध्ये नर आणि मादी सारखेच दिसतात. त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. पोपट फळे, फळांच्या बिया, दाणे, झाडाची पाने, शिजलेला भात सुद्धा खातो. पोपटाला आंबा, पेरू अशी फळे आवडतात.पेरू आणि मिरची पोपटाला खूप आवडते.

पोपट हा निसर्गानं दिलेल निसर्गाचे सौंदर्य आहे. निसर्गाने दिलेली देणगी आहे. पोपट हा पक्षी भारतात सगळीकडे पाहायला मिळतो. राघू, मिठू, मैना या नावाने पोपटाला ओळखले जाते. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्ये सुद्धा पोपट पाहायला मिळतो. औस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशांमध्ये पोपट पाहायला मिळतो. जगभरात निळ्या, पांढऱ्या, गुलाबी, पिवळा, लाल, अश्या विविध रंगातील पोपट आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मुख्य म्हणजे भारतात हिरव्या रंगाचा पोपट पाहायला मिळतो.

साधरणता 110 ग्रॅम पोपटाचे वजन भरते, 16 ते 35 सेमी अशी पोपटाची शेपटीपासून ते डोक्यापर्यंतची उंची असते. 8 ते 40 वर्ष हा पोपटाचा जीवनकाळ असतो. पोपटाची मादी एका वेळी चार ते सहा अंडी घालते. काही लोक हौसेने पोपटाला आपल्या घरात पिंजऱ्यात ठेवतात. पोपटाच्या सुरक्षेसाठी सरकारने राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली आहे.

जी माणसे पोपटाला घरच्या पिंजऱ्यात ठेवतात पण असे करू नये त्याऐवजी त्याला मनमोकळं फिरू द्या, आकाशात मस्त विहार करू द्या ,मनमोकळं श्वास घेऊ द्या, कारण त्यालाही आपल्यासारखे स्वातंत्र्य आहे. त्याला आकाशात उडायच असेल तर आपण का त्याला बंदिस्त करून त्याचे स्वातंत्र्य हिसकावून घ्यायचं???? त्यामुळं कुठल्याही पक्ष्याला मनमोकळं जगू द्या त्याला घरच्या पिंजऱ्यात डांबून ठेऊ नका.

पक्षी हे निसर्गाचे लेणे आहे .पक्षी निसर्गाची शोभा वाढवतात, त्यामुळं त्यांना निसर्गाच्या सानिध्यातच राहू आणि वाढू दिले पाहिजेत. आपल्याला  पक्षांच्या सौंदर्याचे कौतुक केले पाहिजे. त्यांना घराच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून मारून टाकण्यापेक्षा मनमोकळं जगायला देऊन त्यांचं आयुष्य वाढवायला पाहिजेत…..पक्षी आकाशात विहार करत असताना आकाशाची शोभा वाढवत असतात. त्यामुळं त्यांना विहार करायला मोकळेपणा दिला पाहिजेत..

मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड वृक्षतोड करत आहेत. त्यामुळे पोपट तसेच निसर्गातील सर्व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आपल्याला ह्या मनुष्याच्या स्वार्थी विकृतिना आळा घालायला हवा नाहीतर अन्य काळा नंतर ते आपणास पाहायला सुद्धा मिळणार नाहीत…

लोरिक्युलस व्हरनँलिस हे भारतात आढळणाऱ्या पोपटाचे शास्त्रीय नाव आहे. त्याला कातरा ह्या नावाने सुध्दा संबोधले जाते. १४ सेमी त्याची लांबी असून तो चिमणीच्या आकाराएवढा असतो. पक्षीवर्गाच्या शुकगणात पोपट पक्ष्यांचा समावेश केला जातो. पोपटाच्या आकारमानावरून त्यांचे वर्गीकरण लहान पोपट आणि मोठा पोपट अस केलं आहे. शुकगणात ७६ प्रजाती आणि ६७२जाती आहेत.

ज्या पोपटाची शेपटी आखूड असते त्यांना लांडा पोपट असेही म्हंटले जाते. तो त्याच्या हिरव्या रंगामुळं झाडावर बसला कि ओळखता येत नाही. तो जावा झाडावरून उडून जातो तेंव्हा तो दिसतो. बऱ्यापैकी नराच्या गळ्याजवळ निळ्या रंगाचा डाग असतो. पण मादीच्या गळ्याजवळ नसतो. पायांचा रंग पिवळसर किंवा फिकट नारंगी ते लाल असतात.

लहान पोपटाची एक वैशिष्ट्य म्हणजे तो कधी मोठ्या थव्याने वावरत नाही. तो नेहमी एकटा फिरतो. लहान पोपटाला झाडाच्या फांदीला उलटे लटकून फळे खायला आवडते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो झाडाला टांगलेल्या मडक्यातील ताडी पितो. तसेच तो रात्री झोपताना सुद्धा झाडाच्या फांदीला उलटे टांगून घेऊन झोपतो. जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत हा त्यांचा खास करून प्रजनन काळ असतोय.

झाडाच्या खोडावर त्यांचे घरटे ते तयार करतात,तयार केलेल्या घरट्यात तीन अंडी घालते. अंड्याचा आकार लहान आणि रंग पांढरा असतोय. मोठ्या पोपटाची लांबी हि साधारणपणे २० ते १०० सेमी असते. जगात ते सर्वत्र पाहायला मिळतात.

त्यांच्या विविध जाती आणि प्रकार आपण दक्षिण अमेरिका आणि औस्ट्रेलिया ह्या देशामध्ये पाहू शकतो. पोपटाचे साधारणतः तीन भागात विभाजन केले आहे. डोके, मान आणि धड. चोचीचे वैशिष्ट्य म्हणजे ती आखूड, मजबूत आणि बाकदार असते.

वरच्या चोचीच्या भाग हा कवटीला जुळलेला असतो. त्यांची मान छोटी असते. धडावर पंखांची लोळण असते. त्यांच्या बोटांवर नख्या असतात त्याच्या साहाय्याने पोपट झाडावर सहज चढू शकतात.

पोपट हा पक्षी पूर्णपणे शाकाहारी आहे. पोपट हे फळे खाण्यापेक्षा फळांचं नुकसान जास्त करतात. पोपट हे जोडीने फिरताना दिसतात. त्यात राघू मैना हि जोडी खूप ऐकायला भेटते. भारतात आपल्याला मोठ्या पोपटांच्या १३ जाती पाहायला मिळतात. यापैकी फक्त चार जाती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. पोपाटांच्या काही जातीं खालीलप्रमाणे:

रेनबोव पोपट

हा पक्षी खूप आकर्षक असतो. तो वेगवेगळ्या रंगानी नटलेला असतो.ह्या पक्ष्याला पाळले जाते. ह्यांची लांबी २७-३० सेमी असते. शेपूट १०इंच असते. हे पोपट मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत. झाडाच्या फांद्यावर घरटी बनवून वास्तव्य करतात. हे पक्षी अमृत फळे खातात. पक्ष्याचा आयुष्यकाळ १६-२० असतो.

आफ्रिकन ग्रे पोपट 

कॉगो आफ्रिकन ग्रे पोपट ह्या नावाने ओळखले जाणारे हे पोपट मूळचा आफ्रिकेमध्ये आहे. ह्या पक्ष्याचा रंग राखाडी असतो. ह्या पोपटाची चोच काळी असते. ३३सेमी लांबी असलेल्या ह्या पक्ष्याचे वजन ४०० ग्रॅम असते. हे पोपट बेरी, बिया खातात. जर ह्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवले तर आयुष्य ४०-५०वर्ष असते. आणि जंगलामध्ये २१-२३ वर्ष असते.

कैक पोपट 

ह्या जातीच्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळे शेड असतात. जसे काळा, पिवळा, हिरवा, नारंगी, पांढरा त्यामुळं ह्या पक्ष्याकडे पहिले कि आपल्या तिरंग्याची आठवण होते. ब्लॅक हेडेड ह्या नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या पक्ष्याच्या डोक्यावर फक्त काळा रंग असतो. हे पक्षी मूलतः ब्राझील मध्ये आढळतात. हे पक्षी फुले,फळे खातात.ह्यांचा आयुष्यकाळ ४०असतो.

रोज रिंगन्ड पोपट 

फिकट हिरव्या रंगाचा आणि लाल चोच असलेला हा पोपट भारतात सगळीकडे आढळतो. ह्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वर्तुळ असल्यामुळे त्याला रिंग नेक्ड पोपट असेही म्हणतात. हे पक्षी मूलतः आशिया आणि आफ्रिका मधील आहेत. ह्यांचा आयुष्यकाळ १५-२० असतो.

ब्लु- यल्लो मकाव 

ब्लु -गोल्ड मकाव ह्या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. आकाराने मोठा असणारा हा पक्षी निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या अश्या तीन रंगाचा असतो. ८५ सेमी लांबी असून वजन १.५ किलो असते. ह्याची मूळ जात दक्षिण अमेरिकेतील आहे. हे पक्षी बिया खातात. हे पक्षी ३१-३५वर्ष जगू शकतात.

अमेझॉन पोपट 

हे पोपट आकाराने लहान असतात. ह्यांचे शरीर पूर्णपणे हिरव्या रंगाचे असते. १०-१२ सेमी लांबी असलेले हे पक्षी दिसायला खूप छान असतात. हे पक्षी मेक्सिको मध्ये आढळतात. हे पक्षी वनस्पतीची कोवळी पाने खातात. ह्यांचा कालावधी ४०-५० वर्ष असतो.

गलाह 

पांढरा, गुलाबी, राखाडी असा रंग असलेला हा पक्षी दिसायला खूप विलक्षण दिसतो. ब्रिस्टेड पोपट ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोपाटाची  लांबी ३५ सेमी असते. हे पक्षी ऑस्ट्रेलिया मधील आहेत. हे पक्षी सवाना मध्ये राहतात. फळांच्या बिया खातात. ३५-४०वर्ष हे जगू शकतात.

बडगेरीर पोपट 

हे पक्षी दिसायला खूप आकर्षित असतात. आकाराने खूप लहान असतात. शेल पोपट ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या पोपाटची लांबी १८सेमी असते. ह्या पोपटाची जात मूलतः ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. हे पोपट फळे खातात.

पोपटांचा वापर 

पोपट हे मूलतः बुद्धिमान आणि चतुर असतात. त्यांचा पिसारा आणि कलाबाजी लोकांना आकर्षित करते. ते वॉचबर्ड म्हणून ओळखले जाणारे हे पक्षी लोकांना खूप मोहक बनवतात. 2007 मध्ये मरण पावलेला आफ्रिकन ग्रे पोपट अॅलेक्स ह्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे .

पोपटाचा अधिवास 

पोपट ह्या पक्ष्याला उष्ण भाग आणि उष्ण कटिबंधात राहायला आवडते.पोपट हे झाडीचा प्रदेश,पाम वनांचा प्रदेश,सवाना,वाळवंटातील कडा इथं आढळतात.

पोपट ह्या पक्ष्याच्या कुळात ८२ वंश आणि ३१६ जाती आहेत. मॅको, लॉरी, काकाकुवा इत्यादींचा समावेश होतो. दीड कोटी वर्षापूर्वीचे जे जिवाष्म सापडले त्यांना शिळारूप अवशेष म्हणतात. हे पक्षी पिकांची व फळांची नासाडी करत असल्यामुळं त्यांची हत्या केली जाते त्यामुळे त्यांच्या खूप जाती नामशेष झाल्या आहेत. मॅस्क्रीन बेटावर आज एकही पोपट शिल्लक नाही. पोपट विसाव्या शतकात काही अंशी लोप पावला आहे. भारतात पोपटांच्या पाचसहा जाती आहेत. त्यातील काही जाती खालीलप्रमाणे आहेत:

राघू 

सिटँक्युला यूपँटीया ह्या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा राघू त्याची लांबी ५० सेमी असते. त्याचा आकार हा कबुतराएवढा असतो. तो सामान्यतः शेते, बागा ईथ आढळतो. शरीराचा वरचा भाग गवती हिरवा असतो. खालच्या बाजूला फिकट हिरवा असतो. पंखावर लाल तपकिरी डाग असतो. तो दिसायला आकर्षक दिसतो. तो माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो.

कीर 

ह्याचे शास्त्रीय नाव सिटँक्युला क्रँमरी आहे. हा राघूपेक्षा लहान असतो. आणि साळुंकीपेक्षा मोठा असतो. हिरव्या पंखावर निळसर झाक असते. गुलाबी रंगाचा गळपट्टा असतो. पिसांवर आकाशी निळसर रंगाचा उभा पट्टा असतो. फळे खाताना किक आवाज करतात. त्यांना शिकवणी देऊन त्यांचा वापर सर्कशीत केला जातो.

लालडोकी पोपट 

सिटँक्युला सायनोसेफेला हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याची लांबी ३७सेमी असते. तो साळुंकीएवढा असतो. मानेभोवती काळे वलय असते. डोक्याचा रंग बऱ्यापैकी निळा असतो. हवेत उडताना टु ँ टुँ ँइ असा आवाज करतो त्यामुळं त्याला टो ँ इ पोपट म्हणतात.

निलपंखी पोपट 

सिटँक्युला कोलुबॉयडसेस हे ह्या पोपटाचे शास्त्रीय नाव आहे. ३८सेमी लांबी असून शेपटी हि लांब आणि निळी असते. पंखाचा रंग निळसर हिरवा असतो. नराची चोच लाल असते. नराच्या व मादीच्या गळ्याच्या कडेने काळा कंठ असतो. हा पोपट दिसायला खूप आकर्षक असतो. हे पक्षि चिचिवीsss असा कर्कश आवाज करतात. त्यामुळं हा पक्षी कमीतकमी पाळाला जातो.

असा हा पोपट पक्षी मला खूप आवडतो.

आम्ही दिलेल्या essay on parrot in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite bird parrot essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite bird parrot in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on parrot bird in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!