Fruit Custard Recipe in Marathi फ्रुट कस्टर्ड रेसिपी भारतामध्ये तसेच इतर देशांमध्ये देखील रात्रीच्या जेवणानंतर काही गोड पदार्थ डेझर्ट म्हणून खातात आणि त्यामधील एक भारतामध्ये बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे घालून बनवला जातो आणि त्यामुळे हा पदार्थ खुप टेस्टी देखील लागतो आणि हा पौष्टिक देखील असतो. फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ महाराष्ट्राबरोबर भारताच्या इतर भागामध्ये देखील खूप आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ बनवताना एका भांड्यामध्ये दुध गरम केले जाते आणि गार दुधा मध्ये साखर आणि कस्टर्ड पावडर घालून ते चांगले मिक्स केले जाते.
आणि मग ते गरम दुधामध्ये घालून दुध परत थोडा वेळ गरम केले जाते. मग दुधा मध्ये ते मिश्रण चांगले मिक्स झाले कि गॅस बंद करून ते दुध थोडे गार बनवले जाते आणि मग ते फ्रीज मध्ये ठेवून थंड बनवले जाते आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या फळांच्या फोडी घालून ते मिक्स केले जाते आणि बाऊल मध्ये घालून मिक्स केले जाते.
फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकतो. फ्रुट कस्टर्ड घरी बनवण्यास खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर मग आता आपण फ्रुट कस्टर्ड कसे बनवायचे ते पाहूयात.
फ्रूट कस्टर्ड रेसिपी मराठी – Fruit Custard Recipe in Marathi
फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ बनवताना एका भांड्यामध्ये दुध गरम केले जाते आणि गार दुधा मध्ये साखर आणि कस्टर्ड पावडर घालून ते चांगले मिक्स केले जाते आणि मग ते गरम दुधामध्ये घालून दुध परत थोडा वेळ गरम केले जाते. मग दुधा मध्ये ते मिश्रण चांगले मिक्स झाले कि गॅस बंद करून ते दुध थोडे गार बनवले जाते आणि मग ते फ्रीज मध्ये ठेवून थंड बनवले जाते आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या फळांच्या फोडी घालून ते मिक्स केले जाते आणि बाऊल मध्ये घालून मिक्स केले जाते.
- फळे : फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळे वापरली जातात जसे कि सफरचंद, डाळींबे, चिक्कू, मोसंबी, द्राक्षे किंवा तुमच्या आवडीची कोणतीही फळे यामध्ये वापरली तरी चालतात.
- कस्टर्ड पावडर : कस्टर्ड पावडर देखील हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे कारण कस्टर्ड पावडर घातल्याशिवाय रेचीपिला फ्लेवर येते नाही.
- साखर : फ्रुट कस्टर्ड मध्ये साखर देखील घातली जाते ज्यामुळे फ्रुट कस्टर्ड गोड बनते.
फ्रुट कस्टर्ड रेसिपी – how to make fruit custard
फ्रुट कस्टर्ड हि एक गोड रेसिपी आहे जी वेगवेगळ्या फळांच्या पासून आणि दुधापासून बनवली जाते आणि हि रेसिपी आपण जेवणानंतर एक गोड पदार्थ डेझर्ट म्हणून खाल्ला जातो किंवा जेवणासोबत देखील खाल्ला जातो. फ्रुट कस्टर्ड हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर मग आता आपण फ्रुट कस्टर्ड कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि दुध, साखर, कस्टर्ड पावडर आणि काही इतर साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते किंवा काही वेळेला काहीच साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते त्यावेळी आपण जे जे साहित्य फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी लागते ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग आता आपण फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.
- १ लिटर दुध.
- २ मोठे चमचे साखर.
- ५ ते ६ चमचे कस्टर्ड पावडर.
- अर्धी वाटी द्राक्षे ( मधून कट केलेली ).
- १ वाटी सफरचंद ( साल काढून चौकोनी फोडी केलेले ).
- अर्धी वाटी चिक्कू ( चिरलेला ).
- १ वाटी डाळिंब्याचे दाने.
- १ मोठा चमचा साली काढलेला आणि स्वच्छ केलेला मोसंबी.
फ्रुट कस्टर्ड घरी बनवणे खूप सोपे आणि आणि कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून फ्रुट कस्टर्ड कसे बनवायचे ते पाहूयात.
- फ्रुट कस्टर्ड बनवताना सर्वप्रथम एक लिटर दुधातील १ वाटी दुध बाजूला काढा आणि राहिलेले दुध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.
- आता फळांच्या साली आणि बिया काढून ती सर्व फळे चिरून घ्या आणि ती गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
- आता दुधाला चांगली उकळी आली जी गॅसची आच मंद करा आणि ते चमच्याने हलवत रहा. आपण बाजूला काढून ठेवलेल्या गार दुधामध्ये आता साखर आणि कस्टर्ड पावडर घाला आणि आणि ते मिश्रण साखर विरघळे पर्यंत आणि पावडर दुधामध्ये चांगली मिक्स होईपर्यंत मिक्स करा आणि मग हे मिश्रण गरम दुधामध्ये घाला आणि ते मिक्स करा.
- आणि हे दुध परत ८ ते १० मिनिटे चांगले गरम करून घ्या.
- आता गॅस बंद करा आणि मग ते दुध गार झाले कि ते फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ३ ते ४ तास ठेवा.
- मग यामध्ये सर्व फळे मिक्स करा आणि ते फ्रुट कस्टर्ड बाऊलमध्ये घालून सर्व्ह करा.
टिप्स (Tips)
- फ्रुट कस्टर्ड मध्ये आपण अवल्या आवडीची कोणतीही फळे सीजन नुसार घालू शकतो.
- यामध्ये व्हॅनीला इसेन्स देखील घातला तरी चालतो.
आम्ही दिलेल्या fruit custard recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फ्रूट कस्टर्ड रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fruit custard recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि fruit custard recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये custard fruit salad recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट