Khashaba Jadhav Information in Marathi – Khashaba Jadhav Story in Marathi खाशाबा जाधव माहिती मराठी कुस्ती म्हंटल कि सगळ्यांच्या तोंडातून खाशाबा जाधव हे नाव अपोआप निघतं. खाशाबा जाधव यांची कारकीर्दच अशी आहे, कि ज्यांचे नाव घेताना महाराष्ट्रवासियांची छाती अभिमामाने फुलून येते. प्राचीन काळापासून खेळल्या जाणाऱ्या कुस्ती या खेळामध्ये १९५२ सालच्या खेळल्या गेलेल्या ऑलिंपिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कास्य पदक मिळविले होते. आणि हे पदक स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक होते.
खाशाबा जाधव माहिती मराठी – Khashaba Jadhav Information in Marathi
पूर्ण नाव | खाशाबा दादासाहेब जाधव |
टोपणनाव | केडी(KD), पॉकेट डायनामो |
जन्म | १५ जानेवारी १९२६ |
निवास स्थान | रेठरे, तालुका – कराड, जिल्हा – सातारा, महाराष्ट्र |
मृत्यू | १४ ऑगस्ट १९८४, कराड, सातारा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
उंची आणि वजन | ५ फुट ६ इंच आणि ५४ किलोग्राम |
खेळ | कुस्ती |
वडील | दादासाहेब |
अपत्ये | रणजीत |
पुरस्कार (मरणोत्तर) | छत्रपती पुरस्कार (१९९२), अर्जुन (२००१) |
बालपण आणि शैक्षणिक जीवन
स्वातंत्र्यपूर्व भारतात १५ जानेवारी १९२६ ला खाशाबा जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या गोळेश्वर या खेड्यात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. खासाबांचे आजोबा हे उत्तम पैलवान होते. तसेच त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे सुद्धा ख्यातनाम पैलवान होते. त्यामुळे खाशाबा यांच्या रक्तातच कुस्ती होती. खाशाबा हे दादासाहेबांचे सगळ्यात लहान अपत्य होते.
खाशाबा हे ५ वर्षाचे असतानाच डावपेच शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी ८ वर्षाचे असताना आपल्या परिसरातील प्रसिध्द असणाऱ्या पैलवानाला २ मिनिटात लोळवले होते. गोवोगावी होणाऱ्या कुस्तीमध्ये ते सहभागी होऊ लागले आणि सगळीकडे त्यांचे नाव कोरले. त्यांनी १९४० – १९४७ च्या दरम्यान कराड मधील टिळक हायस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतरचे जीवन कुस्तीकडेच वळविले.
कारकीर्द
खाशाबा जाधव यांचे वडील हे कुस्ती खेळातील उस्ताद असल्यामुळे लहापणापासुनच त्यांना कुस्तीचे मार्गदर्शन मिळाले होते. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी हे मार्गदर्शक त्यांना लाभले. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. त्यांनी ऑलिंपिक मध्ये स्वातंत्र्याचा तिरंगा फडकीवण्याचा निश्चयही केला होता.
त्यांच्या मधील प्रतिभा पाहून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी खाशाबांना पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले. आणि कोल्हापूर म्हणजे कुस्तीपंढरी. त्यांच्या जीवनात चांगली संधी साधून आल्यामुळे दादासाहेबांनी शेती गहाण ठेवून खाशाबांना कोल्हापूरला पाठवलं.
राजर्षी शाहू महाराज यांच्या कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये आल्यावर खाशाबा यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कोल्हापुरातील मराठा बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी शिक्षण आणि तालीम दोन्हीही उत्तमरीत्या सांभाळले. नंतर त्यांना त्यांच्या प्रवासात गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि तिथून त्यांची ऑलिंपिक साठी वाटचाल चालू झाली.
१९४८ मध्ये लंडन ऑलिंपिक मध्ये फ्लायवेट गटासाठी खाशाबाची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर होते. ६ व्या क्रमांकावर पोहोचणारे खाशाबा हे भारतातील एकमेव खेळाडू होते. खाशाबा हे गादीवरील कुस्ती प्रकार खेळत असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमावलीचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे त्यांना पुढच्या फेरीत जाता नाही आले.
खाशाबा जाधव यांची कास्यपदकापर्यंतची वाटचाल
त्यानंतर त्यांनी पुढच्या १९५२ साली फिनलंड ची राजधानी हेलसिंकी येथे आयोजित केलेल्या ऑलिंपिक साठी खाशाबांनी जोरदार तयारी केली. या स्पर्धेपूर्वी मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत कार्यकारी मंडळाच्या सांगण्यावरून त्यांना मुद्दाम एक मार्क कमी देण्यात आला ज्यामुळे १९५२ च्या ऑलिंपिक साठी त्यांची निवड ऑलिंपिकसाठी झाली नाही.
येथे खाशाबांसोबत पक्षपात करण्यात आला आणि त्यांना ऑलिंपिक साठी अपात्र ठरवण्यात आले. याचवेळी पंजाबच्या काही कुस्तीपटू सोबत हि पक्षपात करण्यात आला होतं. खाशाबा जाधव यांनी न्याय मिळवण्यासाठी पतियाळाचे महाराजे यांच्याकडे विनंती केली. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे कुस्ती महासंघाने कलकत्याला ऑलिंपिकसाठी राष्ट्रीय निवड प्रक्रिया घेतली. या चाचणी मध्ये खाशाबांनी विरोधी कुस्तीगीरांना पिछाडीवर टाकले आणि त्यांची निवड १९५२ च्या ऑलिंपिक साठी झाली.
त्यांच्या हुशारीने ऑलिंपिक साठी त्यांची निवड झाली खरी पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्यासमोर हेलसिंकीला जाण्यासाठी पैश्यांची जमवाजमव कशी करायची हा मोठा प्रश्न उभा राहिला. पण गावातील लोकांनी वर्गणी जमा केली. त्यांच्या ओळखीतल्या अनेक लोकांनी त्यांना जमेल तशी मदत केली.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी खाशाबांना आपला विद्यार्थी ऑलिंपिक साठी जातोय या आनंदाने स्वतःचे घर गहाण ठेवून ७००० रुपये दिले. तसेच त्यांचे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी त्यांना कमी पडत असलेल्या ३००० रुपयांची मदत केली. अशी जमवाजमव करून त्यांची हेलसिंकी ची वारी शक्य झाली. पण त्या काळात मुंबई चे मुख्यमंत्री असणारे मोरारजी देसाई यांचेकडे निधी मागितली असता त्यांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही.
१९५२ च्या ऑलिंपिक मध्ये विविध देशांचे २४ स्पर्धक होते. खाशाबानी सेमी फायनलपर्यंत मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. इथेही त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फटका सहन करावा लागला. आणि त्यामुळे त्यांच्या नावावर कास्यपदक कोरलं गेलं. तिथे जर पक्षपात झाला नसता तर त्यांची मजल सुवर्णपदका पर्यंत गेली असती. त्याच स्पर्धेत हॉकी संघाने सुवर्ण पदक पटकावले होते. पण त्यावेळी खाशाबांचे विशेष कौतुक झाले होते.
१९५२ च्या ऑलिंपिक मध्ये खाशाबा जाधव यांनी मिळविलेले कास्य पदक हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक ठरले. आणि त्यांना हा विक्रम सुमारे ४४ वर्षे अबाधित राहिला. आणि १९९६ साली लियांडर पेसने टेनिसमध्ये भारतासाठी वैयक्तिक कास्यपदक मिळवीत या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
पदक जिंकल्यानंतर कराडच्या रेल्वे स्थानकावर हजारो लोक, १५१ बैलगाड्या, ढोल, ताशा, लेझीम पताका, फटाके घेऊन खाशाबा जाधव यांच्या स्वागतासाठी उभे होते. कराडपासून ते खाशाबांचे जन्मगाव गोळेश्वर पर्यंत त्यांची मिरवणूक काढली. त्यांच्या या कारकीर्दीमुळे त्यांच्या या छोट्याश्या गावाची गोळेश्वर ची ख्याती जगभर झाली.
जिथे खाशाबा जाधव यांनी कुस्तीचे धडे घेतले त्या कोल्हापूरमधील सर्व तालीम आखाड्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यात ते स्वतःही सहभागी झाले आणि त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. खाशाबा जाधव यांनी कुस्त्यांमधून झालेल्या कमाईतून त्यांना मदत करणारे कोल्हापूरच्या महाविद्यालयाचे प्राचार्य खर्डेकर यांना त्यांचे गहाण ठेवलेले घर परत मिळवून दिले.
त्यांच्या विजेत्या कामगिरीनंतर चार वर्षांनी म्हणजेच सन १९५५ मध्ये खाशाबा जाधव यांना पोलीस खात्यात नोकरी लागली. महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची सब-इन्स्पेक्टर (उपनिरीक्षक) पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तिथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. खाशाबा यांनी पोलीस खात्यात २२ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या पदावर निवृत्त झाले. त्याचवेळी खाशाबा जाधव यांच्या स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करण्याच्या त्यांच्या इच्छेस सरकारने दाद दिली नाही.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
साल | स्थळ | वजनगट | पदक |
१९४८ | लंडन ऑलिंपिक | फ्लायवेट वजनगट (५७ किलोग्राम) | ६ वा क्रमांक |
१९५२ | हेलसिंकी, फिनलंड | ५२ किलोग्राम | कास्यपदक |
साहित्य
नॅशनल बुक ट्रस्टचे संजय दुधाने यांनी खाशाबा जाधव यांच्यावर “ऑलिंपिक वीर के.डी जाधव” हे पुस्तक लिहिले आहे.
सन्मान
- त्यांच्या निधनानंतर सन २०१० मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला त्यांचे नाव दिले.
- सन १९९२ मध्ये त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला.
- सन २००१ मध्ये खाशाबा जाधव यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार दिला.
मृत्यू
खाशाबा जाधव यांचा १९८४ साली एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.
आम्ही दिलेल्या khashaba jadhav information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर खाशाबा जाधव यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khashaba dadasaheb jadhav information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of khashaba jadhav in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये khashaba jadhav in marathi information Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट