माळीण गाव दुर्घटना माहिती Malin Village History in Marathi

malin village history in marathi – malin village information in marathi माळीण गाव दुर्घटना माहिती, मित्रांनो निसर्ग हा सर्वांनाच आवडतो आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहण्यामध्ये तर आणखीनच मजा येते. परंतु माळीन गावांमध्ये निसर्गाचं असं महा भयंकर रूप बघायला मिळालं की अगदी क्षणभरात संपूर्ण माळीणगाव कायमचे नष्ट झाले. ही भयंकर दुर्घटना घडली तो दिवस होता ३० जुलै २०१४. जवळपास सहा वर्ष उलटून गेली परंतु तरीही ३० जुलै २०१४ रोजी जे घडलं त्याची भिती माळीण गावातील रहिवाशांच्या मनामध्ये आजही तशीच कायम आहे. असं नेमकं काय घडलं असेल असा प्रश्न पडतो ना‌  त्याच उत्तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

malin village history in marathi
malin village history in marathi

माळीण गाव दुर्घटना माहिती – Malin Village History in Marathi

Malin Village Information in Marathi

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण सुखद असत. मनाला निसर्गाचे फुलणारे दृश्य बघून आनंद मिळतो परंतु अतिवृष्टी होते त्यावेळी डोंगराळ भागातील लोकांना हा पाऊस नकोसा होतो. कारण अतिवृष्टीमुळे डोंगराच्या पायथ्या खाली असणाऱ्या गावांवर जर दरड कोसळली तर त्याचे परिणाम फार वाईट ठरू शकतात. तीस जुलै च्या आदल्या दिवशी दुपारपासूनच मुसळधार पाऊस लागायला सुरुवात झाली होती. आणि ३० जुलै २०१४ रोजी पहाटे माळीन गाव कायमच नष्ट झाला.

माळीन गाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये स्थित आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे गावांमध्ये जवळपास ७४ घरं आहेत. हे गाव आदिवासी लोकांचे गाव असून गावांमध्ये ७ वाड्या आहेत. गावामध्ये दुर्घटना घडण्याच्या आदल्यादिवशी गाव नेहमीसारखे शांत झोपून गेले आणि पहाटे सूर्य माथ्यावर येण्याआधीच संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. ३० जुलै २०१४ रोजी पहाटे फुटल्यासारखा मोठा आवाज झाला.

हा आवाज होता दरड कोसळण्याचा. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून गावावर पडला आणि मातीचा ढिगारा, चिखल व उमळलेली झाडे खाली येऊ लागली डोंगराचा भाग कोसळू लागला अखेरीस दरड कोसळली आणि मातीच्या ढिगार्‍या मध्ये संपूर्ण गाव कायमचे झोपी गेलं. गावामध्ये एकूण ७४ घरं आहेत आणि या गावाची लोकसंख्या ७१५. भरपूर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली. जवळपास ७४ घरांपैकी ४४ घर मातीच्या ढिगाऱ्याखाली नष्ट झाले.

तर सोबतच गावातील मानवी वस्ती म्हणजेच १५०-१६५ पुरुष, स्त्रिया, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्या, इत्यादी देखील त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मातीत मिसळले. क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं. सर्वत्र मातीच दलदल, रडण्याचे आवाज आणि गावातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर संपूर्ण जग उलथापालथ झाल्याची भावना दिसत होती.

या दुर्घटनेमध्ये कोणाची आई गेली, कोणाचे बाबा गेले, कोणाची मुलगी गेली, कोणाची सून, गेली कुणाचा सासरा, कोणाची सासू कोणाची नातवंड… या मातीच्या ढिगाऱ्याखालुन जवळपास  १५०-१६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. वर्षानुवर्षे डोंगराच्या पायथ्या खाली वसलेलं हे गाव अगदी काही क्षणाच्या आत मध्ये निसर्गाच्या कुशीत कायमचं झोपी गेले. त्यादिवशी झालेली पहाट गावासाठी काळी पहाट होती. गावाचे हे दुःख आणि विदारक चित्र अगदी मनाला चटका लावणारं होतं. माळीन गाव परिसरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा उपलब्ध नाही आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडेल याचा आढावा देणार तरी कोणाला अहुपे – मंचर या नावाची एसटी बस जवळपास सकाळी सात वाजेपर्यंत आहुपे हे गाव सोडून कोंढरे घाटापर्यंत पोहोचते आणि नेहमीप्रमाणे ही बस ३० जुलै २०१४ रोजी देखील सात वाजेपर्यंत कोंढरे घाटापर्यंत पोहोचली. दररोज सकाळी दिसणार माळीन गाव आज दिसेनासे झाले होते आणि त्यावेळी बस चालकाच्या लक्षात आले की माळीन गावावर दरड कोसळली आहे आणि संपूर्ण माळीन गाव मातीच्या ढिगार्‍यात अडकले आहे.

गावामध्ये देवाण-घेवाणीचा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने माळीन गावांमध्ये घडणाऱ्या घडामोडींची देवाणघेवाण करणारी ही एकमेव एसटी बस होती. बस चालकाने त्वरित आपल्या मंचर येथील नातेवाईकांना फोन लावला व त्या नातेवाईकांनी लगेचच ही दुर्घटनेची माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास दिली व या कारखान्याने प्रशासनास या घडलेल्या माहितीचा आढावा दिला. आणि पुण्याहून एनडीआरएफ ची टीम चारशेहून अधिक जवान, डॉक्टर्स, नर्सेस सोबत माळीन गाव येथे पोहोचली.

त्या दिवशी पाऊस देखील मुसळधार पडत होता शिवाय अरुंद रस्ता आणि वाहनांची गर्दी अशा असंख्य परिस्थितींना सामोरे जाऊन कसं बस करत एनडीआरएफच्या पथक माळीन गावांमध्ये दाखल झाले. १०० ते १५० ॲम्बुलन्स माळीन गावांमध्ये दाखल झाल्या.‌जसजशी माळीन गावात दुर्घटना घडल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडे पोहोचली तसं तेथून जेसीबी आणि पोकलॅंडचा ताफा घटनास्थळी पाठवून देण्यात आल्या आणि क्षणाचा विलंब न करता त्वरित तच मातीचे ढिगारे खोदण्यास सुरुवात झाली.

एनआरडीएफ च्या दोन मोठ्या तुकड्या अगदी स्वतःचे सर्वस्व पणाला लावून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. या दुर्घटनेनंतर गावांमध्ये मोजून दहा माणसं उरली होती परंतु त्यांच संपूर्ण कुटुंब या घटनेमध्ये त्यांच्यापासून कायमचा दूर गेलं होतं. शिवाय राहत्या घराची देखील माती झाली. या घटनेला सहा दिवस उलटून गेले आणि सहाव्या दिवसापर्यंत मातीच्या ढिगार्‍यातून जवळपास १२१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि याच्या शिवाय मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी ४० ते ५० मृतदेह असण्याची शक्यता दर्शवली गेली होती.

या आधीही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या परंतु त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नव्हती. डोंगर कोसळून क्षणार्धात संपुर्ण वस्ती, संपूर्ण गाव गायब झालं आणि ही क्षणार्धात झालेली जीवित हानी राज्यासाठी पहिलीच दुर्घटना घडली. ही एक राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आणि केंद्र सरकार व राज्य सरकार आणि इतर संस्थांकडून माळीन गावासाठी मदतीचा हात पुढे केला गेला.

दरड कोसळल्यामुळे माळीनगाव संपुर्ण गायब झाल परंतु आजूबाजूच्या भागातील काही घरांना देखील त्याचा तडाखा बसला म्हणूनच राज्य सरकार तर्फे संपूर्ण माळीण गावातील सर्व घरांचे व आजूबाजूच्या इतर घरांचे पुनर्वसन करून देण्याचे व त्यांना संसार उपयोगी वस्तू पुरवण्याचे आणि मृत व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून किंवा घडली तर त्वरित अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत पोहोचावी म्हणून महाराष्ट्र राज्यात एसडीआरफ सारखी यंत्रणा स्थापित करण्याचा निर्णय घेणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. माळीन गाव हे दुर्गम भागात वसलेले असल्याने इतकी मोठी दुर्घटना घडली आहे याचा कोणालाच अंदाज नव्हता.

रात्री निवांत झोपून गेलेले गावकरी सकाळी सूर्य उगवण्याच्या आधीच काळाने गावावर घाला घातला. जसजसं ही माहिती सर्वांना मिळायला सुरुवात झाली तोपर्यंत सकाळचे दहा वाजून गेले होते आणि त्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग पुढे सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि दुपार पर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि ॲम्बुलन्स व जेसीबी इत्यादी सारख्या गोष्टी घटनास्थळी पोहोचल्या. परंतु तोपर्यंत फारच उशीर झाला होता.‌

संपूर्ण डोंगरकडा गावावर कोसळला होता त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक लोक मृत्युमुखी पडले. आणि शिवाय मदत कार्यात देखील अनेक अडथळे आले गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता त्यामध्ये संपूर्ण मुसळधार पाऊस आणि सर्वत्र झालेला चिखल अशा काही कारणांमुळे आणखीनच बचाव कार्यामध्ये उशीर होत होता. माळिन गावामध्ये ४० ते ५० कुटुंब होती आणि अवगी क्षणभरात संपूर्ण गाव उध्वस्त झालं.

वर्षानुवर्षे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव एक दिवस निसर्गाच्या कुशीतच कायमचं समाविष्ट होईल याची कल्पना मात्र नासा संस्थेने दिली होती या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता. माळीन गाव दुर्घटना घडण्याची काही कारणे आहेत त्यातील एक म्हणजे नासा संस्थेने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले शिवाय पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे.

सरकारी यंत्रणेची अनास्था आणि नैसर्गिक संकट ही काही कारणे माळीन गावात घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार आहेत. माळीन गाव दुर्गम भाग आहे शिवाय येथे राहणारे रहिवासी प्रामुख्याने आदिवासी शेतकरी आहेत.‌ त्यामुळे गावात घडलेल्या दुर्घटनेची माहिती इतर यंत्रणां पर्यंत पोचायला वेळ लागला शिवाय हि दुर्घटना घडल्यामुळे दळणवळण सुविधा व संदेशवहन सुविधा बंद पडल्या ज्यामुळे मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली.

माळीण गावात घडलेली ही घटना सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी होती. निसर्गाने घातलेले हे थैमान व त्याचे हे महाभयंकर रूप माळीण गावातील रहिवाशांच्या मनात दुःखाचे व भीतीचे बीज पेरून गेल.

आम्ही दिलेल्या malin village history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माळीण गाव दुर्घटना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malin village information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि malin village landslide information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!