मराठी भाषा दिवस निबंध Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi

Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi  मराठी भाषा दिवस निबंध मराठी, राजभाषा दिन माहिती खरंतर संवादाचे मुख्य साधन म्हणजे भाषा आणि जगाच्या नकाशावर अनेक देश आहेत आणि अर्थातच प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. एवढ्या दूर कशाला जायचं आपल्या भारतातच घ्या ना प्रत्येक राज्याची संस्कृती आणि भाषा संस्कृती वेगळी आहे. एकमेकांशी संवाद साधू इच्छिणाऱ्या दोन व्यक्तीला किमान एक भाषा येणे गरजेचे आहे. तरच तो संवाद व्यवस्थित साधला जाऊ शकतो. मराठी माणूस आणि जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. कोणी नोकरीसाठी, कोणी शिक्षणासाठी, तर कोणी व्यवसायासाठी.

हे सर्व घरा बाहेर पडले ते मराठी घेऊनच. आजच्या युगात बहुभाषिक असण उत्तमच पण आपली मातृभाषा ही जोपासली पाहिजे. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रदेश बदलला की भाषा बदलते. भाषा हे संवादाचे प्रभावी साधन आहे मराठी भाषेला तिचा स्वतःचा इतिहास व परंपरा आहे. मराठी भाषेने आपल्या मातेकडून म्हणजे संस्कृत भाषे कडून विपुल वैभव घेतले आहे.

असंख्य असतील ही इथे

अनेकांच्या भाषा फेवरेट

पण आमची राजभाषा मराठी

 काळजात घुसते थेट

marathi rajbhasha din nibandh in marathi
marathi rajbhasha din nibandh in marathi

मराठी भाषा दिवस निबंध – Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi

मराठी राजभाषा दिन माहिती

“पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा” असे म्हणत अनेक असलेल्या तरुणाच्या पाठीचा कणा ताठ करणारे मराठीतील ज्येष्ठ कवी कथाकार  कादंबरीकार नाटककार आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर. 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचे भूषण वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस.

आज महाराष्ट्रात सर्वत्र कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक या त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती.

मराठी माणसाच्या मनावर या साहित्यकृती कित्येक दशके दारू घालून आहे त्यांच्या साहित्य सेवेसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिन या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते.

मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे, तर भारतातील लोकसंख्येत बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. मराठी भाषेचा उगम नवव्या शतका पासून झालेला आपल्याला दिसतो. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला.

देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी, भरभराट झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की “माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके.” म्हणजेच आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल अशी ग्वाही दिली.

संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली. अशा अनेक संतांनी मराठी भाषेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला आहे. अशाप्रकारे अतिप्राचीन व समृद्ध अशी परंपरा मराठी भाषेला आहे. जननी, जन्मभूमी यांच्याबरोबरच माणसाला प्रिय असते ती त्याची जन्मभाषा, मातृभाषा म्हणजेच मायबोली. नवनाथ महाराष्ट्रातील सर्वजण आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो,

मराठी असे आमची मायबोली

जरी भिन्न धर्मानुयायी असू

आपली मायबोली फार पुरातन आहे. मराठी भाषेची परंपरा फार उज्वल आहे. मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित आहे. तिची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठीत फार मोठे लेखक तसेच कवी होऊन गेले आणि आजही आहेत. उदाहरणात वि स खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले इत्यादी. मराठी भाषा ही शब्दसंपत्ती, काव्य संपत्ती, साहित्य संपत्ती यांनी समृद्ध आहे.

माझ्या मराठीची साहित्य समृद्ध आहे. मला वाटतं एक आयुष्य काही या साहित्याचा रसास्वाद घेण्यासाठी पुरणार नाही. मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नाही. मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे, असे इतिहासीचार्य वि का राजवाडे यांनी म्हटले आहे. मराठी भाषेची होत असलेली दुर्दशा दिवसेदिवस वाढत आहे.

मराठी भाषेची स्थिती बदलणे काळाची गरज आहे. हल्लीच्या पिढीला मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते यापेक्षा वाईट काय असेल? बोलण्याबरोबरच आपली मातृभाषा बोलण्याचाही अभिमान बाळगला पाहिजे. आपण मराठी भाषेला विश्वभाषा अशा होण्याचा सन्मान प्राप्त करून दिला पाहिजे.

आज आमच्या मराठीचे इतिहास मराठीत रूढ होण्याची गरज आहे. वेगवेगळे विपुलकोश मराठीत निर्माण करण्याची गरज आहे. भाषा व वाड्मयाचा पातळीवर कथा, काव्य, नाटक, सिनेमा, कादंबरी, आत्मकथन गीत हे सारं समृद्ध लेखन मराठी दृष्ट लागावी इतकं श्रेष्ठ लिहिलं गेलं पाहिजे. मराठी भाषणे प्रत्येकाला जगण्याचा मार्ग आणि ओळख दिली आहे.

मराठी भाषेचे वळण भाषा म्हणून, ज्ञान म्हणून, विचार म्हणून जास्त महत्त्वाचं वाटतं. मराठी ही केवळ महाराष्ट्राची राज्य भाषा नसून आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍नही असला पाहिजे. मराठी भाषेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. मराठी माणूस आणि त्याची साहित्य कृती आणि साहित्य रुची जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही.

मराठी माणूसच मराठी भाषेला विसरत चालला आहे. ज्या मराठी भाषेतून पालक शिकलेले आहेत, तेच पालक आता आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकायला पाठवतात मराठी माध्यमांमध्ये शिकायला पाठवायला त्यांना कमीपणा वाटतो, अन त्यांच्या कार्यामुळे आता मराठी शाळा बंद होत आल्या आहेत.

मराठी भाषेचा वात्सल्य मराठी माणसालाच जाणवत नाही. मराठी भाषा ही खूप गोल अर्थाने नागरिकांची भाषा आहे हे पटवून देण्याची वेळ आली आहे. मराठी भाषेला पर्याप्त प्रतिष्ठा मिळवून देण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजेत. आपण दुसऱ्या भाषा शिकत असताना मराठी भाषेचे महत्त्व जाणले पाहिजेत.

आपली मराठी भाषा सामर्थ्यवान आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजेत. दररोज मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. त्यासाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शाळा-कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत तसेच एक ठिकाणी मराठी नाटके, काव्य संमेलन, मराठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.

आम्ही दिलेल्या marathi rajbhasha din nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “मराठी भाषा दिवस निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi bhasha din nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi bhasha din bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण marathi rajbhasha din nibandh या लेखाचा वापर marathi bhasha diwas information असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!