माझा आवडता खेळ कबड्डी निबंध My Favourite Game Kabaddi Essay in Marathi

My Favourite Game Kabaddi Essay in Marathi माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मला आजही माझं बालपण आणि माझ्या  बालपणातील कबड्डी चांगलीच आठवते. माझ्या या बालपणातील सगळ्यात मोठा आनंद म्हणजे कबड्डी होय. मित्र मैत्रिणींसोबत कबड्डी खेळायचा तो आनंद म्हणजे माझ्याकरिता पुढील आयुष्यासाठी जपलेला अनमोल ठेवा होता. मित्रांनो, आज जगात सगळीकडे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात, शिवाय अशा निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धादेखील भरवल्या जातात. त्याचबरोबर क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस यांसारख्या खेळांच्या स्पर्धा जगभरातील बहुसंख्य लोक अगदी आवडीने आणि सवडीने पाहतात.

परंतू असं असलं तरी क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल यांसारखे अन्य कोणतेही खेळ कितीही लोकप्रिय खेळ असले, तरी मात्र माझा आवडता आणि सगळ्यात प्रिय खेळ हा कबड्डीचं आहे हे मात्र नक्की! कबड्डी हा खेळ आजच्या एकविसाव्या शतकातदेखील गावांमध्ये, मोकळ्या जागेत, ओसाड जमीन असलेल्या ठिकाणी, गल्लीत तसेच, शहरातील शाळांमध्ये देखील खेळला जातो.

my favourite game kabaddi essay in marathi
my favourite game kabaddi essay in marathi

माझा आवडता खेळ कबड्डी निबंध – My Favourite Game Kabaddi Essay in Marathi

कबड्डी निबंध मराठी

मित्रहो, आपल्याला माहीत आहे की सर्व प्रकारच्या खेळांमुळे आपले आरोग्य सदृढ बनते आणि त्यामुळे आपण सर्वजण कमी आजारी पडतो. अगदी त्याचप्रमाणे कबड्डी या खेळामध्ये सुद्धा मनोरंजनाबरोबरच आपला व्यायाम देखील होतो. कबड्डी आणि इतर खेळांमध्ये फरक फक्त एवढाच की अन्य खेळांप्रमाणे कबड्डी या खेळाला मात्र भारी खेळाच्या सामानाची अजिबात गरज नसते.

त्यामुळे, कबड्डी हा खेळ कुणीही सहजपणे खेळू शकतो. म्हणजेच, कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला कोणत्याही विशिष्ठ अशा प्रकारच्या साहित्याची आवश्यकता पडत नाही. शिवाय मित्रांनो, आजकाल कबड्डी हा खेळ परत एकदा दिव्य अशा प्रकाशाच्या झोतामध्ये आला आहे आणि या लोकप्रिय खेळाला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ लागले आहेत.           

पण मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला का? की अचानकपणे कबड्डी या गावाकडच्या भागांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाला अचानक चांगले दिवस कसे काय आले? शिवाय या खेळाला चांगला दर्जा कुणी मिळवून दिला? तर मित्रांनो, कबड्डीला असा बहुमोल दर्जा मिळवून देण्याचे श्रेय पूर्णपणे ‘प्रो कबड्डी’ या स्पर्धेला जाते.

कारण, तसे पहायला गेले तर आपल्या लक्षात येईल की कबड्डी हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा खूप जुना खेळ आहे. इसवी सन १९३४ मध्ये कबड्डी खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिंकमध्ये एक भव्य प्रदर्शनीय सामना खेळला गेला होता. शिवाय, इसवी सन १९३८ पासून हा खेळ आपल्या भारत देशात ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये प्रसिध्द झालेला हा नामांकित असा खेळ आहे. तर मित्रांनो, असा हा माझा आवडता खेळ खेळताना जो रेडर असतो त्याने कबड्डी कबड्डी असं म्हणतं रेड करण्याचा एक नियम आहे.

परंतू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्हीं राज्यांमध्ये कबड्डी ऐवजी हुतुतु, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये चाडू गूडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गमने तर बंगालमध्ये दो दो असे म्हणत म्हणत सुद्धा कबड्डी हा खेळ खूप उत्साहाने खेळला जातो.

कबड्डीसाठीचे मैदान

कबड्डी या खेळासाठी कोणत्याही विशिष्ठ अशा साहित्याची अजिबात गरज नसते. कारण, कबड्डी हा सांघिक खेळ मैदानावर खेळला जातो. परंतू मित्रांनो, असे असले तरी कबड्डीचे मैदान मात्र पुरुष वर्गासाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या मापाचे किंवा आकाराचे असते. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी.

अशा पद्धतीचे आयताकृती असे मैदान आखले जाते. कबड्डीसाठीचे मैदान बनवण्यासाठी बारीक आकाराची व चाळलेली अशी माती आणि शेणखत यांचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने, एकसारख्या आकाराचे सपाट मैदान कबड्डी खेळण्यासाठी तयार केले जाते. आपण वरील माहितीमध्ये पाहिलं की पूर्वी कबड्डी हा खेळ फक्त खुल्या मैदानावर होत होता.

पण मित्रहो, आता हा खेळ बंदिस्त जागेत तसेच, मॅटवर देखील खेळवला जायला लागला आहे. सहसा सगळीकडे कबड्डी हा खेळ मातीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात खेळला जातो. अनुप कुमार, परदिप नरवाल, राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे, दिपाली जोसेफ हे आपल्या भारतातील प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहेत. त्यांच्या खेळामुळे आज ते नामांकित आहेत. आपल्या देशातील अनेक मुलं त्यांच्या प्रेरणेतून आदर्श घेऊन कबड्डी खेळताना आपल्याला दिसतात.

कबड्डीचे नियम

आपणा सर्वांना माहीत आहे की कबड्डी हा खेळ सांघिक पद्धतीचा खेळ आहे, जो प्रत्येकी सात अशा खेळाडूंच्या एकूण दोन संघांमध्ये खेळला जातो. एका संघातील रेडरने प्रतिस्पर्धी संघाच्या अर्ध्या भागाकडे जाणे आणि त्यांचे शक्य होतील तितके बचावकर्ते काढून टाकणे व त्यांच्यासाठी असलेल्या पूर्वगत अर्ध्या भागाकडे परत जाणे हा कबड्डी खेळाचा मुख्य हेतू असतो.

एका संघातील रेडर प्रतिस्पर्धी संघाच्या एका खेळाडूला किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूंना, त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून मध्य रेषा ओलांडतो आणि परत आपल्या पूर्वगत संघाकडे येतो. त्यासाठी, त्या रेडरला प्राप्त गुण देखील मिळतात. अगदी याउलट प्रतिस्पर्धी संघ रेडर थांबविण्याकरिता पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो आणि गुण प्राप्त करतो. त्यानंतर, प्रतिस्पर्धी असलेल्या संघाचा रेडर गुण मिळवण्यासाठी विरोधी संघाच्या अर्ध्या भागात प्रवेश करतो आणि गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

कबड्डीच्या सामन्याला एकूण वीस-वीस अशा मिनिटांच्या सहसा दोन डावांमध्ये विभागले जाते. या दोन डावांमध्ये कबड्डीच्या दोन्ही संघांना विश्रांती घेण्यासाठी जवळपास पाच मिनिटांचा ब्रेक दिला जातो. तर याउलट महिलांच्या कबड्डी सामन्यांमध्ये वीस मिनिटांच्या ऐवजी पंधरा-पंधरा मिनिटांचे दोन डाव पाडले जातात.

कबड्डी सामन्याला सुरुवात करण्याआधी मैदानामध्ये दोन्हीं संघांच्या समोर नाणेफेक केली जाते आणि त्यानुसार नाणेफेक जिंकणारा संघ अंगण अथवा चढाई या दोहोंपैकी एकाची निवड करतो. अशा पद्धतीने, कबड्डीच्या सामन्याला सुरुवात झाल्यावर कबड्डीच्या दुसऱ्या डावात दोन्ही संघ आपापले पहिल्या डावातील अंगण बदलून आणि पहिल्या डावामध्ये जेवढे उरलेले खेळाडू असतील, अगदी तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरू करतात. दुसऱ्या फेरीमध्ये, पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाने चढाई केलेली नसते त्या संघाला चढाई करण्याची संधी दिली जाते.

मित्रहो, कबड्डी खेळाच्या एका टीममध्ये एकूण बारा खेळाडू असतात. परंतु, एकावेळी एका संघाचे केवळ सात खेळाडू मैदानात खेळू शकतात. उरलेले पाच खेळाडू हे राखीव असतात, या खेळाडूंना विशेष अशा परिस्थितीमध्ये खेळण्याची संधी दिली जाते. हा खेळ खेळताना ढाई करणार्‍या खेळाडूने कबड्डी या शब्दाचा उच्चार अगदी स्पष्टपणे आणि सलग पद्धतीने करणे खूप आवश्यक असते.

कारण, तसे न आढळल्यास सामन्याच्या पंचाने संबंधित खेळाडूला ताकीद द्यावी आणि त्याचवेळी विरूध्द संघाला चढाईची संधी देखील दयावी. ढाक चढाई करणार्‍या खेळाडूने कबड्डीतील मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरूवात करावी, कारण असे न आढळल्यास पंचांना विरूध्द संघाला चढाईची संधी देण्याचा अधिकार असतो.

त्याचबरोबर, खेळ चालू असताना खेडाळूचा कोणताही भाग मैदानाच्या अंतिम सिमारेषेच्या मर्यादेबाहेर जाता कामा नये, कारण असं झाल्यास संबंधित खेळाडू हा बाद ठरवला जातो.

याखेरीज मित्रांनो, खेळ चालू असताना एखाद्या वेळी खेळाडूंमध्ये झटापट सुरू झाल्यास संघाच्या राखीव क्षेत्राचा क्रिडाक्षेत्रात समावेश होतो. तसेच, खेळ चालू असताना जर खेळाडू मैदानाच्या अंतिम रेषेबाहेर गेला तर, त्या खेळाडूला पंचांनी खेळाच्या बाहेर काढावे. त्याचबरोबर, जर खेळाडूला ताकीद देऊनही खेळाडू आपल्या अंगणात दम घालवत असेल अथवा कबड्डी हा शब्द उच्चारण्यास सुरूवात करत नसेल तर, अशा खेळाडूला बाद न करता, संबंधित खेळाडूची रेड संपली असे जाहीर केले जाते.

त्याच्या विरूध्दच्या किंवा प्रतिस्पर्धी असलेल्या संघाला एक गुण दिला जातो. खास गोष्ट म्हणजे जेंव्हा कधीपण एक संघ दुसर्‍या प्रतिस्पर्धी असलेल्या संघाचे सर्व खेळाडू आऊट करेल तेंव्हा त्या संघाला दोन इतके अतिरिक्त गुण मिळतात.

परंतू, एकदा बदली केलेल्या खेळाडूला परत त्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली जात नाही. अशा प्रकारे, एकूण वीस मिनिटांचे दोन डाव पूर्ण होऊन देखील दोन्ही संघांचे गुण योगायोगाने सारखे झाले तर, अतिरिक्त ५-५ असे रेड दोन्ही संघांना दिल्या जातात आणि त्यामध्ये जो संघ जास्त गुण मिळवेल त्याला विजयी असे घोषित केले जाते.

                   तेजल तानाजी पाटील

                      बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या my favourite game kabaddi essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favorite game kabaddi essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of essay on kabaddi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on my favourite game kabaddi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!