potachi charbi kami karnyache upay – charbi kami karnyache upay in marathi चरबी कमी करण्याचे उपाय, पोटाची चरबी कमी करणे घरगुती उपाय. आज आपण या लेखामध्ये चरबी कमी करण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात ते पाहणार आहोत. सध्या दगदगीचच्या जीवनामध्ये सर्वांचे आपल्या आरोग्याकडे, सौंदर्याकसे तसेच आपण फिट कसे दिसू या सर्व गोष्टींच्या कडे दुर्लक्ष होत आहे आणि सध्या बाहेरचे पदार्थ खाऊन लोकांची चरबी झपाट्याने वाढत आहे. चरबी वाढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वजन वाढते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि त्या व्यक्तीला थोडेस चालले कि धाप भरते तसेच, उच्च रक्त दाबाचा त्रास होतो तसेच मधुमेह आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात.
आपल्या शरीरामध्ये जर चरबी वाढली तर आपल्याला अनेक त्रास तर होतातच परंतु धाप लागणे आणि उच्च रक्तदाबाचा त्रास हा हमखास होतोच. चरबी कमी करणे म्हणजेच आपले वजन कमी करणे आणि हे वजन आपण वेगवेगळे उपाय करून करू शकतो. सध्या वजन कमी करण्यासाठी अनेक लोकांची धडपड सुरु आहे आणि खास करून स्त्रिया ह्या आपण बारीक कसे दिसू या बद्दल सतत चिंतीत असतात कारण त्यांना स्लिम फिट दिसायचे असते. पण काही वेळा असे होते कि एक संबधित व्यक्ती जी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अशा व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी तो किंवा ती व्यक्ती बारीक होत नाही पण अश्या प्रकरणांमध्ये काही वेळा त्या व्यक्तीच्या पद्धतीमध्ये काही तरी चुकीचे असते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात चरबी वाढलेली असेल तर त्या व्यक्तीने ती चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी असणाऱ्या लोकांना हृदय रोगाचा झटका येवू शकतो. चला तर आता आपण चरबी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूयात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय – Potachi Charbi Kami Karnyache Upay
potachi charbi kami karnyasathi upay
चरबी वाढण्याची कारणे – causes of weight gain
चरबी वाढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वजन वाढते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि त्या व्यक्तीला थोडेस चालले कि धाप भरते तसेच, उच्च रक्त दाबाचा त्रास होतो तसेच मधुमेह आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. चला तर मग आता आपण चरबी वाढण्याची कारणे काय काय आहेत ते पाहूया.
- जे लोक बाहेरचे तेलकट पदार्थ खातात अश्या लोकांची चरबी हि झपाट्याने वाढते.
- काही व्यक्तींचे काम हे एके जागी बसून असते म्हणजेच ते दिवसभर एका खुर्चीमध्ये बसून काम करतात त्याचे देखील वजन वाढू शकते कारण त्यांची दिवसभर कोणतीच हालचाल होत नाही.
- तसेच सध्या जंक फूड जसे कि पिझ्झा, बर्गर देखील खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे आणि या प्रकारचे जंक फूड खाल्ल्यामुळे देखील त्या संबधी व्यक्तीची चरबी वाढू शकते किंवा वजन वाढू शकते.
- जर एकाद्या व्यक्तीचा नियमित व्यायाम नसेल आणि त्या व्यक्तीची दिवसभर कोणतीही हालचाल होत नसेल तर अश्या व्यक्तीचे वजन वाढते.
- अनेक लोकांना असे वाटते कि जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते पाणी तसे नाही तर व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन वाढत असते.
- जास्त फॅटयुक्त आहार जर एखादी व्यक्ती वारंवार खात असेल तर अशा व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढते.
- जर एकादी व्यक्ती जेवताना खूप वेगाने जेवत असेल म्हणजे आपला अन्न व्यवस्थित चाऊन खात नसेल किंवा सतत काही तरी खात असेल म्हणजेच त्या व्यक्तीच्या खाण्याला टायमिंग नसेल तर त्या व्यक्तीचे वजन वाढण्याची शक्यता असते.
- तसेच एकदा व्यक्ती मांस जास्त प्रमाणात खात असेल तर त्या व्यक्तीची चरबी वाढते.
चरबी कमी करण्यास उपाय – how to reduce belly fat in marathi
चरबी वाढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वजन वाढते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि त्या व्यक्तीला थोडेस चालले कि धाप भरते तसेच, उच्च रक्त दाबाचा त्रास होतो तसेच मधुमेह आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. आपल्या शरीरामध्ये जर चरबी वाढली तर आपल्याला अनेक त्रास तर होतातच परंतु धाप लागणे आणि उच्च रक्तदाबाचा त्रास हा हमखास होतोच आणि म्हणून जर आपल्याला वाटत असेल कि आपल्याला ह्या प्रकारचा त्रास होऊ नये तर त्या व्यक्तीने आपली चरबी कमी करायला पाहिजे. चला तर आता आपण चरबी कमी करण्यासाठी उपाय पाहूयात.
- जर तुम्ही रात्री झोपताना एक चमचा मेथी दाने एक ग्लास पाण्यामध्ये ठेवले आणि ते पाणी सकाळी गाळून पिले तर तुमची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
- तुम्हाला जर तुमच्या शरीरातील चरबी कमी करायची असल्यास तुम्ही दीड ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घाला आणि ते पाणी एक ग्लास होई पर्यंत उकळा आणि मग ते पाणी थोडे कोमट झाले कि ते गाळा आणि ते पाणी प्या. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फरक पडलेला दिसेल.
- तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काकडीचे, गाजराचे किंवा कोबीचे सलाड घ्या तसेच काकडीचा रस देखील घेवू शकता कारण यामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. तसेच तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी देखील घेतली तरी चालेल. तसेच तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये काही तरी लाईट खा जसे कि ओट्स, खिचडी किंवा दलिया. अशा प्रकारच्या डायट मुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि तुम्ही बारीक होण्यास मदत होईल.
- जर तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करायची असल्यास तुम्ही सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू रस आणि एक चमचा मध मिक्स करा आणि ते पाणी प्या. तुम्हाला फरक जाणवेल.
- तुम्हाला जर चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला रोजचा व्यायाम आणि रोजचे ३ ते ४ किलोमीटर चालणे पाहिजे. त्यामुळे तुमची चरबी कमी होऊ शकते.
- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फॅटयुक्त आहार तुमच्या आहारातून काढून टाका आणि तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त आहार समाविष्ट करा जसे किं वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, ताक आणि जे सगळे त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणत असेल. असे केल्याने आपल्याला बारीक होण्यासाठी खूप चांगली मदत होईल.
- रोज सकाळी दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस पिल्याने देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु त्या बरोबर तुम्हाला व्यायाम देखील केला पाहिजे.
- तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर तुम्ही गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ तसेच भात जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण या गोष्टींच्या मुळे वजन वाढते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आणि फायबर युक्त आहार खा त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
- जर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये दालचिन पावडर देखील मिक्स करून ते पाणी पिले तर तुमची चरबी कमी होण्यास मदत होते.
- वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने सकाळी कमीत कमी अर्धा लिटर कोमट पाणी पिले पाहिजे तसेच दिवसातून एक तासाला थोडे थोडे पाणी घेतले पाहिजे त्यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या potachi charbi kami karnyache upay माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to reduce belly fat in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि potachi charbi kami karne upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये potachi charbi kami karnyasathi upay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट