गर्भधारणा झाली कसे ओळखावे Pregnancy Symptoms in Marathi

Pregnancy Symptoms in Marathi – pregnancy information in marathi गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय, आज आपण या लेखामध्ये गर्भधारणा आणि त्याच्या संबधित सर्व माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे आई होणे आणि ज्यावेळी तिला कळते कि ती आई होणार आहे त्यावेळी तर तिचा आनंद हा गगनात मावत नाही परंतु प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेच्या काळामध्ये आपली काळजी घ्यावी लागते. गर्भधारणा हि जेव्हा शुक्राणू अंडाशयातून बाहेर पडल्यानंतर त्याचे फलित करते आणि ते फलित नंतर खाली नंतर गर्भाशयामध्ये जाते आणि तिथे ते रोपण होते आणि यशस्वी रित्या रोपण झाल्यानंतर गर्भधारणा होते.

गर्भधारणेचा काळ हा ९ महोने असतो आणि या ९ महिन्यांच्या काळामध्ये गर्भवती स्त्रीला अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. ज्या स्त्रिया लवकर गर्भधारणेचे निदान किंवा जन्मपूर्व काळजी घेतात त्यांना निरोगी गर्भधारणा होण्याची आणि निरोगी बाळाला जन्म देण्याची अधिक शक्यता असते. चला तर खाली आपण गर्भधारणा आणि त्याच्या संबधित सविस्तर माहिती पाहूया.

pregnancy symptoms in marathi
pregnancy symptoms in marathi

गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय – Pregnancy Symptoms in Marathi

गर्भधारणा म्हणजे काय – pregnancy information in marathi

गर्भधारणा हि जेव्हा शुक्राणू अंडाशयातून बाहेर पडल्यानंतर त्याचे फलित करते आणि ते फलित नंतर खाली नंतर गर्भाशयामध्ये जाते आणि तिथे ते रोपण होते आणि यशस्वी रित्या रोपण झाल्यानंतर गर्भधारणा होते.

गर्भ धारणेची लक्षणे – early pregnancy symptoms in marathi

कोणत्याही स्त्रीने गर्भधारणेची चाचणी घेण्याअगोदर तिला काही लक्षणे दिसतात ती लक्षणे काय असतात ते आपण पखाली पाहूया.

चुकलेला मासिक पाळीचा कालावधी हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक आहे. परंतु मासिक पाळी च्या वेळेचा अर्थ असा देखील नाही कि तुम्ही गर्भवती आहात कारण अनेक स्त्रियांना अनियमित पाळीच्या समस्येला देखील सामोरे जावे लागते.

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यामध्ये १ ते ४ पौंड वजन वाढण्याची शक्यता असते आणि तुमच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीस वजन वाढणे अधिक लक्षणीय होते.

 • बद्धकोष्ठता 

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हार्मोन्स मध्ये होणारे बदल हे तुमची पचन क्रिया मंदावू शकतात म्हणजेच त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते.

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळामध्ये डोकेदुखी हि समस्या सामान्य आहे आणि ते सहसा बदललेल्या संप्रेरक पातळीमुळे आणि रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे होतात. हि समस्या लगेच दूर होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

 • अशक्तपणा 

गर्भवती महिलांच्यामध्ये अशक्तपणाचा धोका वाढतो ज्यामुळे अश्या चक्कर येणे किंवा डोके हलके होणे या सारखा त्रास होतो.

 • स्तनातील बदल 

स्तनातील बदल हे गर्भधारणेच्या पहिल्या लक्षणापैकी एक आहे. तुम्ही चाचणी करण्याअगोदरच तुमचे स्तन हे कोमल, सुजलेले आणि जड किंवा भरलेले वाटू लागतात.

 • उलट्या होणे 

उलट्या ह्या मॉर्निंग सिकनेसचा एक घटक आहे आणि हे गर्भवती महिलांच्या मधील एक सामान्य लक्षण आहे आणि हे लक्षण गर्भवती महिलांच्यामध्ये पहिल्या ४ महिन्यामध्ये दिसून येते.

 • छातीमध्ये जळजळ 

गर्भधारणेच्या काळामध्ये बाहेर पडणारे हार्मोन्स काहीवेळा तुमचे पोट आणि अन्ननलिका यांच्यातील झडप शिथिल करतात आणि ज्यावेळी पोटातील अॅसिड बाहेर पडते त्यावेळी आपल्या पोटामध्ये जळजळ हिण्याचा त्रास सुरु होतो.

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळामध्ये पाठदुखीची सर्वात मोठी करणे म्हणजे हार्मोन्स आणि स्नायुवरील ताण आहे. नंतर तुमचे वाढलेले वजन देखील तुमच्या पाठदुखीमध्ये भर पाडू शकते. सर्व गर्भवती स्त्रियांच्यामध्ये त्यामधील निम्म्या स्त्रिया गर्भधारणेच्यादरम्यान पाठदुखीची तक्रार करतात.

 • पुरळ 

वाढलेल्या एंड्रोजन हार्मोन्समुळे बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मुरुमांचा अनुभव येतो करणे हे हार्मोन्स तुमची त्वच तेलकट बनवतात ज्यामुळे छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पुरळ उटतात परंतु बाळाच्या जन्मानंतर ते पुरळ कमी होतात किंवा जातात.

गर्भधारणेच्या कालावधीमध्ये घेतली जाणारी काळजी – tips 

गर्भधारणेच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते म्हणजेच तिला आपल्या राहणीमानात बदल करावा लागतो तसेच योग्य आणि पोषक आहार घ्यावा लागतो आणि अश्या प्रकारे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नियम ठरवावे लागतात.चला तर आता आपण गर्भधारणेच्या काळामध्ये त्रास होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया.

 • असे म्हटले जाते कि गर्भधारनेच्या काळामध्ये स्त्रियांनी पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे आणि या पौष्टिक आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या, दुध, सुका मेवा या सारखे अन्न तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा.
 • पाणी जास्त पिल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळते हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी गर्भधारणेच्या काळामध्ये सतत पाणी प्या म्हणजेच तुम्ही हायड्रेट रहा.
 • तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे ध्यान करा त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
 • बाळाच्या चांगल्या वाढीसाठी तुम्हाला व्हिटॅमीन्स हे खूप गरजेचे असते त्यामुळे तुम्ही व्हिटॅमीन्स ची कमतरता होऊ देऊ नका आणि तुम्ही शरीरामध्ये योग्य प्रमाणात व्हिटॅमीन्स वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेवून व्हिटॅमीन युक्त आहार घ्या.

 नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी काय काळजी घ्यावी – tips 

सध्या तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीला किंवा त्यांच्या घरातील लोकांना बाळाचा जन्म कसा झाला असे विचारले तर ते सांगतात कि सिजेरीयन झाले कारण सध्या महिलांच्यामध्ये खूप कमजोर पणा असतो तसेच त्या अशक्त असतात किंवा मग सतत आजारी पडणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या मध्ये शक्ती नसल्यामुळे त्यांची नॉर्मल डिलिवरी (normal delivery) होण खूप गुंतागुंतीच असत त्यामुळे खाली आपण नॉर्मल डिलिवरी होण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरल्या जाऊ शकतात ते पाहूया.

 • अनेक स्त्रियांना असे वाटते कि गरोदर पणा मध्ये कोणतीही हालचाल करायची नसते तर आपण झोपून राहायचे असते किंवा विश्रांती घ्यायची असते आणि आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची असते पण असे नाही तर गरोदर असणाऱ्या स्त्रियांना हालचालीची आणि व्यायामाची गरज असते. म्हणजेच त्यांनी नियमित पाने चालले पाहिजे पण त्यांचा चालण्याचा वेग हा खूप सावकाश असला पाहिजे आणि त्या स्त्रियांनी कमी कमी अर्धा तास तरी चालले पाहिजे.
 • नॉर्मल डिलिवरी ( normal delivery ) होण्यासाठी अनेक स्त्रिया ह्या योगासने करतात आणि हि योगासने त्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून करतात.
 • गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी सतत डॉक्टरांच्या कडे गेले पाहिजे तसेच त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तसेच जर आपल्या मनामध्ये कोणत्याही शंका असल्यास डॉक्टरांना सांगून त्या दूर केल्या पाहिजेत.
 • गर्भवती असणाऱ्या स्त्रियांना नियमित आणि चांगली झोप मिळणे खूप गरजेचे असते म्हणून गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी रोजच्या रोज झोप घेतली पाहिजे.
 • गर्भधारनेच्या काळामध्ये कोणत्याही स्त्रीने कोणत्याही प्रकारचा ताणताणाव घेवू नये किंवा कोणत्याही प्रकारची काळजी घेवू नये कारण याचा परिणाम त्यांच्या डिलिवरी वर देखील होऊ शकतो म्हणून अश्या स्त्रियांनी तणाव मुक्त राहणे खूप गरजेचे असते.

आम्ही दिलेल्या pregnancy information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pregnancy symptoms in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pregnancy in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!