रामेश्वरम मंदिर माहिती Rameshwaram Temple Information in Marathi

Rameshwaram Temple Information in Marathi रामेश्वरम मंदिर माहिती आजच्या ब्लॉग मध्ये आपण हिंदू धर्माच्या चार धामांपैकी तिसरा धाम म्हणजेच रामेश्वरम् मंदिर याची माहिती घेणार आहोत. हे मंदिर आपल्या भव्यता व आकर्षक बनावटी साठी देखील ओळखले जाते. हे मंदिर भारतीय निर्माण कलेचं एक आकर्षक आणि खूप सुंदर नमुना आहे. रामेश्वरम् हिंदू धर्माचा पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये हे मंदिर स्थित आहे‌. हे तीर्थक्षेत्र हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आहे. याशिवाय येथे स्थापित शिवलिंग बारा द्वादश ज्योतिर्लिंग पैकी एक मानले जात.

रामेश्वरम् मंदिराचा इतिहास आणि याच्या स्थापनेबद्दल खूप अनेक कथा प्रचलित आहेत. रामायणानुसार असं म्हटलं जातं कि भगवान विष्णू यांचे सातवे अवतार असणारे भगवान राम यांनी आपली धर्मपत्नी सीता यांना महापापी राक्षस रावण यांच्या विळख्यातून सोडवून आणण्यासाठी रावणाचा वध करावा लागला होता.

 rameshwaram temple information in marathi
rameshwaram temple information in marathi

रामेश्वरम मंदिर माहिती – Rameshwaram Temple Information in Marathi

रामेश्वरम् मंदिरमाहिती
मंदिराचे नावरामेश्वरम् मंदिर
महत्वचार धामांपैकी तिसरा धाम
उत्सव, यात्रामहाशिवरात्री
मंदिर कोठे आहेतमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये आहे
मंदिर स्थापना कोणी केली?भगवान राम
मंदिराची उंची१००० फूट
पाहण्यासारखी ठिकाणेपांबन पूल, कन्याकुमारी

मंदिराचा इतिहास:

रामेश्वरम् मंदिराचा इतिहास आणि याच्या स्थापनेबद्दल खूप अनेक कथा प्रचलित आहेत. रामायणानुसार असं म्हटलं जातं कि भगवान विष्णू यांचे सातवे अवतार असणारे भगवान राम यांनी आपली धर्मपत्नी सीता यांना महापापी राक्षस रावण यांच्या विळख्यातून सोडवून आणण्यासाठी रावणाचा वध करावा लागला होता. तेव्हा भगवान राम यांच्यावर रावणाची हत्या केल्यामुळे पाप लागण्याची टीका करण्यात आले होती. तेव्हा या पापांपासून मुक्त होण्यासाठी भगवान राम यांना महान संतांनी भगवान शिव यांची आराधना करायला सांगितली होती. परंतु द्वीप मध्ये कोणताही शिवमंदिर नव्हत म्हणून, भगवान राम यांनी रामेश्वरम मध्ये शिवलिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर भगवान राम यांनी पवनसुत हनुमान जी यांना शिवशंकर यांची मूर्ती आणण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले.

प्रभू राम यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हनुमान जी शिवशंकर यांची प्रतिमा आणण्यासाठी ते कैलास पर्वतावर गेले. परंतु त्यांना परत येण्यामध्ये खूप वेळ लागला. म्हणून माता सीता यांनी समुद्र किनार्‍यावर असलेल्या रेती पासून शिवलिंग बनवला आणि मग हाच शिवलिंग रामनाथ या नावाने जाणू लागला. त्यानंतर भगवान राम यांनी पूर्ण विश्वासाने व श्रद्धेने या शिवलिंगाची उपासना केली. आणि मग हनुमान द्वारा आणलेल्या शिवलिंगाची देखील येथे स्थापना करण्यात आली. हे शिवलिंग भगवान शंकर यांच्या प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

रामेश्वरम् दर्शनीय स्थळ:

रामेश्वरम् हिंदू धर्माचा पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे.‌ हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित करून रामनाथस्वामी मंदिर म्हणून ओळखलं जातं. जे शहराच्या केंद्र भागात स्थित आहे. देवळाचा परिसर २२(पवित्र जल संस्था) विहिरींच्या स्वरूपात आहे. ह्याला अग्नि तीर्थं असे देखील म्हंटलं जातं. बंगालच्या खाडीमध्ये स्थित असलेला समुद्रात स्नान करणं अतिशय शुभ मानल जात. बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी आणि द्वारका यांच्या सोबतच रामेश्वरम् हे हिंदू धर्माच्या चारधामां पैकी एक आहे.

रामेश्वरम जाणून घ्या योग्य वेळ :

दरवर्षी रामेश्वरम् मंदिराला भेट देण्यासाठी अनेक भक्त इथे रांगा लावतात. रामेश्वरम् दर्शनासाठी‌‌ सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यानचा काळ चांगला असतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असला तरी, या काळात हे दृश्य रमणीय दिसत. परंतु रामेश्वरम मंदिर भक्तजनांसाठी सकाळी ५ ते दुपारी १ पर्यंत चालू असत. आणि त्याच्यानंतर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी पहाटे ५ वाजता पल्लीयाराई दीप आराधना होते. तर ५:१० मिनिटांनी स्पादिगलिंगा दीप आराधना होते.  सकाळी ५:४५‌ च्या दरम्यान थिरूवनन्थाल दीप आराधना होते. मग पुढे सकाळी ७ वाजता विला पूजा आणि मग १० वाजता कालासन्थी पूजा होते.

मग पुढे दुपारी १२ वाजता उचकला पूजा आणि मग संध्याकाळी ६ वाजता सयरात्चा पूजा होते. आणि मग रात्री ८:३०  वाजता अर्थजामा पूजा आणि मग ८:४५  वाजता शेवटची पल्लीयाराई पूजा होते. आवश्‍यकतेनुसार आराधना आणि पूजेच्या वेळा मध्ये बदला होऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही रामेश्वरम मंदिराच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊ शकता.

चार धाम नाव मराठी:

भारताच्या धार्मिक स्थळांमधील चार पवित्र तीर्थक्षेत्र यांचा समूह म्हणजे चारधाम. चारधाम संकल्पनेमध्ये भारताच्या चार दिशेतील अतिशय महत्त्वपूर्ण मंदिरांचा समावेश आहे. चारधाममध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी आणि रामेश्वरम या प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

रामेश्वरम ते कन्याकुमारी :

रामेश्वरम् ते कन्याकुमारीचे एकूण अंतर ३२५ किलोमीटर आहे. गाडीने जायला ६:३० तास लागतात अनेक फोरमच्या उत्तरानुसार रामेश्वर ते कन्याकुमारी पर्यंतचा सर्वात लहान मार्ग म्हणजे रामनाथपुरम, सिकल, तुतिकोरीन, तिरूचेंदुर आणि कुडंखुळा. या रस्त्यावरून जाताना अतिशय रमणीय वातावरण ‌असत. परंतु पावसा च्या वेळेस कार ड्रायव्हिंग थोडं भयावह असू शकत. निसर्गप्रेमींसाठी हा मार्ग निसर्गरम्य, सौंदर्य,मंत्रमुग्ध करणारा आहे.

पॅंबन पूल:

पांबन पूल म्हणजे भारताच्या तमिळनाडू राज्यांमधील पांबन बेटला मुख्य भूमीशी जोडून ठेवणारा एक रेल्वेमार्ग आहे. या पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झालं होतं आणि २४ फेब्रुवारी १९१४ मध्ये संपन्न झालं. तेव्हा हा भारताचा एक मात्र समुद्रसेतु होता. १९८८ मध्ये रेल्वेमार्गाच्या समाप्तीनंतर एक रोड मार्गदेखील बनवला गेला. जो राष्ट्रीय राजमार्ग ८७ चा एक भाग आहे. लोहमार्गाचा पुल समुद्रसपाटीपासून १२ मीटर वर असून तो ६७७६६ फूट लांबीचा आहे. या पुलांमध्ये १४३ खांब आहेत. तिथे सेसर रोलिंग प्रकारचे लिफ्ट स्पॅन आहेत जे जहाजांची हलचाल करण्यासाठी उचले जाऊ शकतात.

कन्याकुमारी:

रामेश्वरमच्या दक्षिण बाजूस प्रायद्वीप भारताच्या दक्षिण बिंदु मध्ये कन्याकुमारी स्थित आहे. कन्याकुमारी केप कमोरिन या नावाने ओळखली जात होती. कन्याकुमारीला तिन्ही बाजूने समुद्राचा घेरा आहे. कन्याकुमारी सूर्योदय आणि सूर्यास्त साठी अतिशय प्रसिद्ध आहे. सूर्योदय बघण्यासाठी सर्वात उत्कृष्ट जागा विवेकानंद रॉक मेमोरियल आहे‌. सूर्याची किरणे थेट याठिकाणी पडतात सूर्य विवेकानंद रोय मेमोरियल आणि तिरुवल्लुवर प्रतिमा च्या अगदी मध्यभागातून क्षितीजातून वर येतो आणि अशाप्रकारे सुंदर शानदार समुद्रावर सूर्याची किरणे पडतात. हा नजारा कोणाच्याही मनाला भुरळ पाडेल‌ असा असतो. सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी शहराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये सुर्यास्त समुद्र तटावरून पाहू शकतो.

मंदिर वास्तुकला:

हिंदू धर्माच्या प्रमुख पवित्र तीर्थ धाम पैकी एक रामेश्वरम हे मंदिर आपल्या भव्यता व आकर्षक बनावटी साठी देखील ओळखले जाते. हे मंदिर भारतीय निर्माण कलेचं एक आकर्षक आणि खूप सुंदर नमुना आहे. या मंदिराची उंचाई १००० फूट असून लांबी ६५० फूट आहे. इतकंच नव्हे तर मंदिराचे प्रवेश द्वार ४० मीटर उंच आहे. मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या कलाकृती कोरल्या आहेत. या मंदिराचा निर्माण द्रविड स्थापत्यशैली मध्ये केला गेला आहे. या मंदिरामध्ये सीता यांनी स्वतः स्थापित केलेले शिवलिंग आणि भगवान हनुमान यांच्याद्वारे कैलास पर्वतावरून आणलेलं शिवलींग असे दोन्ही लिंग स्थित आहेत.

मंदिराची वैशिष्ट्ये:

रामेश्वरम् हिंदू धर्माचा पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये हे मंदिर स्थित आहे‌. हे तीर्थक्षेत्र हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आहे. याशिवाय येथे स्थापित शिवलिंग बारा द्वादश ज्योतिर्लिंग पैकी एक मानले जात. रामेश्वर चेन्नई पासून साधारण ४१५ मीटर दक्षिण-पूर्व मध्ये आहे‌. मंदिर सुंदर शंख आकार द्वीप असं हे मंदिर हिंदी महासागर आणि बंगालची खाडीच्या चारी दिशेने पसरलेल आहे. आधी हे भारताच्या मुख्य भूमीशी जोडले गेले होत परंतु नंतर समुद्राच्या लाटांनी ह्याला जोडणारा दुवा तुटन गेला त्यामुळे हे पाण्याने वेढलेलं एक बेट बनलं. याच ठिकाणी भगवान राम यांनी लंकेवर हल्ला करण्याआधी सेतू बांधला होता.

ज्या सेतू वर चढून वानरसेना लंकेला पोहोचली आणि विजयही मिळवला होता. परंतु नंतर राम यांनी विभिषणा च्या विनंतीनुसार रामाने धनुष्कोटी नावाच्या ठिकाणी हा पूल तोडला. परंतु आज देखील ४८ किलोमीटर लांबीवर समुद्रामध्ये या सेतूचे अवशेष दिसून येतात. ‌रामेश्वरम मंदिराचा कॉरिडोर विश्वातील सर्वात लांब कॉरिडोर आहे.

मंदिराचे रहस्य:

धर्मशास्त्र आणि पुराणांनुसार रामेश्वरम‌् याचे नाव गंधमादन पर्वत असे देखील आहे. तिथेच भगवान राम यांनी नवग्रहाची स्थापना केली होती. सेतु ह्याची सुरुवात देखील इथूनच झाली होती. या मंदिराच्या थोड पुढे तीर्थम नावाचा एक कुंड आहे. म्हणतात रामेश्वर मंदिराच्या येथील जलकुंडात डुबकी घेतल्याने सगळे आजार आणि दुःख बरे होतात. आणि पापांपासून मुक्ती मिळते. याच ठिकाणी मा देवी दुर्गा यांनी महिषासुराचा वध केला होता. म्हणतात रामेश्वरम् तीर्थ धाम यात्रा केल्याने मनुष्य पापांपासून मुक्त होतो. 

या मंदिरात साफ मनाने प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होते. उत्तराखंड येथील गंगोत्री गंगाजलातून आणलेला जळ शिवलिंगावर अर्पित करण्याचं एक विशेष महत्त्व आहे. जर रामेश्वरम्च दर्शन करणार्या भक्तजनांनडे जर गंग जळ नसेल तर येथील पंडित दक्षिणा घेऊन श्रद्धाळूना गंगाजल उपलब्ध करून देतात. चट्टा तीर्थ नावाचा एक कुंड आहे या कुंडामध्ये भगवान राम यांनी रावणाशी युद्ध करून आल्यावर आपले केस याच कु‌ंडा मध्ये धुतले‌ होते.

उत्सव, यात्रा:

रामेश्वरम हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित केलं आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला इथे भक्तांचा कल्लोळ असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी या मंदिराला भेट देतात.

रामेश्वरम् मंदिर फोटो:

 rameshwaram temple information in marathi

rameshwaram temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

रामेश्वरम मंदिर हे तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मदुराई येथे पोहोचावे लागेल. मदुराईला पोचण्यासाठी तुम्ही मुंबई, चेन्नई, दिल्ली अशा बाकी सर्व प्रमुख शहरांमधून ट्रेन किंवा विमानाद्वारे प्रवास करू शकतात. मदुराई ते रामेश्वरम् मधील अंतर १७० कि.मी. आहे. मदुराईला पोचल्यानंतर पुढे बस मार्ग किंवा रेल्वे मार्गे तीन ते चार तासात तुम्ही रामेश्वरम् येथे पोहचू शकता.

पाहण्यासारखी ठिकाणे:

रामेश्वरम् च्या मंदिरात ज्याप्रकारे भगवान शिव यांचे दोन शिवलिंग आहेत. तसेच देवी पार्वती यांच्या देखील दोन मुर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या आहेत. देवी पार्वती यांची एक मूर्ती पर्वतवर्धिनी म्हणून ओळखली जाते तर दुसरी विशालाक्षी म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या पूर्व द्वारा बाहेर हनुमान ‌जी यांची विशाल मूर्ती वेगळ्या मंदिरात स्थापन केली आहे.

रामेश्वरम हे मंदिर शिव भगवान यांचं असलं तरी रामेश्वरम् मंदिराच्या आत मध्ये अनेक अन्य मंदिर आहेत. त्यामध्ये सेतु माधव म्हणून ओळखल जाणारा भगवान विष्णू यांचं मंदिर प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. रामनाथ च्या मंदिरा मध्ये आणि मंदिराच्या परिसरात एक पवित्र तीर्थ आहे त्याच्यामध्ये कोटीतीर्थ नावाचा तलाव आहे. असं म्हणतात रामनाथस्वामी मंदिर येथे स्थित असलेल्या अग्नि तीर्थं मध्ये जो पण श्रद्धाळू स्नान करतो त्याचे सर्व पाप धुऊन जातात.

या तीर्थ मधून निघणार पाणी चमत्कारिक गुणांनी संपन्न आहे. तंगचीडम स्टेशन जवळ एक मंदिर आहे त्या मंदिराला एकांत राम मंदिर असं म्हटलं जातं. पण या मंदिराचे आता काही उरलेले अवशेष बाकी आहेत. रामनवमी मध्ये या मंदिरामध्ये खूप गर्दी असते परंतु बाकी दिवशी मंदिरात सन्नाटा असतो. मंदिरांमध्ये श्री राम, लक्ष्मण, हनुमान आणि सीता यांच्या सुंदर मुर्त्या आहेत. धुरणाधारी रामाची मूर्ती  इतक्या सुंदर प्रकारे बनवली आहे. की असं वाटतं श्री राम हातांनी काहीतरी गंभीर बोलत आहेत‌.

दुसऱ्या मूर्तीत राम-सीते कडे पाहत मंद हास्याने काहीतरी बोलत आहेत. हे दोन्ही शिल्पे अतिशय सुंदर आहेत आणि बघण्यासारखी आहेत. येथे समुद्राला उधाण येत नाही एकदम शांतता असते. म्हणूनच कदाचित या स्थानाचं नाव एकांत राम आहे. कोदंड स्वामी मंदिर रामेश्वर चा दक्षिण भागात समुद्रकिनाऱ्याजवळ एक अतिशय दर्शनीय मंदिर आहे.

हे मंदिर रामनाथ मंदिर पासून ५ मीटर दूर आहे. याच ठिकाणी ‌विभीषण भगवान राम यांना शरण गेला होता. मंदिरात सीता, लक्ष्मण यांच्या सोबतच विभीषणची मूर्ती पण स्थापित आहे.  रामेश्वरम् ला गेहरा घातलेल्या समुद्राचा देखील एक विशेष स्थान आहे. इथे स्नान केल्याने मुक्ती मिळते. सीताकुंड येथील मुख्य स्थान आहे. असे म्हणतात  हे तेच स्थान आहे जिथे सिताजी आणि आपलं सतीत्व सिद्ध करण्यासाठी आगीमध्ये प्रवेश केला होता. परंतु आग विझून गेली आणि अग्निकुंडात मधून‌ जळ बाहेर आलं. म्हणूनच हे स्थळ आता सीताकुंड म्हणून ओळखल जात. पंचमुखी हनुमान व एपीजे अब्दुल कलाम हाऊस हेदेखील इथले मुख्य आकर्षण आहेत.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा रामेश्वरम मंदिर rameshwaram temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. rameshwaram temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about rameshwaram temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही रामेश्वरम मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या rameshwaram temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “रामेश्वरम मंदिर माहिती Rameshwaram Temple Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!