गुढीपाडवा माहिती इतिहास Real History of Gudi Padwa in Marathi

Real History of Gudi Padwa in Marathi – Gudi Padwa History in Marathi गुढीपाडवा माहिती इतिहास भारतातील रूढी, परंपरा व संस्कृती यांना प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतामध्ये अनेक वेगवेगळे सण साजरे केले जातात जे अगदी प्राचीन काळापासून साजरे केले जातात. वर्षाचे बारा महिने वेगवेगळे सण येत असतात आणि या सणांचे काहीतरी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्यामागे काही रूढी-परंपरा व इतिहास दडलेला असतो. त्याच प्रमाणे असाच एक इतिहास किंवा पौराणिक कथा गुढीपाडव्या बद्दल देखील प्रचलित आहेत. गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? किंवा हा सण साजरा करण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली? हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

गुढीपाडवा हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. म्हणूनच त्याच इतिहासात विशेष महत्त्व आहे. आणि हिंदू धर्मियांच्या आयुष्यामधील गुढीपाडवा अत्यंत महत्त्वपूर्ण सण मानला जातो. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष. नवीन वर्ष म्हंटल तर उत्साह, आनंद,‌ नवीन आरंभ, नव्या कल्पना, नवी संधी, नवीन अनुभव. हा एक भारतीय सण असून प्रामुख्याने हिंदू समाज हा सण साजरा करतो. गुढीपाडवा हा हिंदू धर्मीयांचा सण आहे. हा सण चैत्र महिन्याच्या सुरुवातीस येतो.

real history of gudi padwa in marathi
real history of gudi padwa in marathi

गुढीपाडवा माहिती इतिहास – Real History of Gudi Padwa in Marathi

Gudi Padwa History in Marathi

हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिके मध्ये चैत्र हा महिना पहिला असतो आणि पहिल्या महिन्यातील हा पहिला सण म्हणून, हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवीन व्यवसायला प्रारंभ करू शकतो किंवा नवीन वस्तू खरेदी करणे, नव्या उपक्रमांचा प्रारंभ करणे किंवा सुवर्ण खरेदी करणे यांसारख्या गोष्टी केल्या जातात. कारण वेदांग ज्योतिष या ग्रंथाप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी काहीतरी नवीन व सकारात्मक सुरुवात केली की त्याचा शेवट उत्तम होतो असं मानलं जातं. घरांमध्ये गुढी उभारली जाते जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

घरासमोर मानाची, विश्वासाची, श्रद्धेची गुढी उभारल्यानंतर आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी नवीन प्रेरणा व आशा मिळते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे लवकर उठून, स्नान करून, घरासमोर रांगोळी काढली जाते व सूर्योदयानंतर गुढी उभारली जाते. ही गुढी प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस उंचावरती उभारली जाते. एक बांबू घेऊन त्याला कडुनिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावरती फुलांचा हार, साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या बसवला जातो व अशाप्रकारे गुढी सजवली जाते.

ही सजलेली गुढी दाराबाहेर उंचावरती उभारली जाते. या गुढी समोर गंध, फुले, अक्षता वाहून निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. या दिवशी सर्वत्र सकारात्मक वातावरण असतं. महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो कारण हा ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्ट्या हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक जण एकमेकांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. गुढीपाडवा हा सण म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आहे.

हा आनंद साजरा करत.. अनेक जण या दिवशी नवीन गोष्ट खरेदी करतात. गुढी म्हणजे विजयी ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथि होय. या दिवशी इतिहासामध्ये अनेक कौतुकास्पद व महत्त्वपूर्ण घटना घडल्या. म्हणून हा विजय साजरा करण्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते.

नववर्षाच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर गुढी उभारली जाते जेणेकरून येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये अधिक सुख व समाधान प्राप्त होईल व आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, म्हणून हि विश्वासाची गुढी उभारली जाते. या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवदिकांचे स्मरण केलं जातं. त्यांचे पूजन केले जात. वडीलधाऱ्यांना वंदन करावं लागतं अशी रूढी व परंपरा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गोडाच नैवेद्य दाखवला जातो व संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू आणि फूल वाहून गुढी उतरवली जाते. दारात उभी असणारी ही गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानलं जातं.

गुढीपाडवा हा दिवस मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या, नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असंदेखील म्हटलं जातं. हा वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. नवीन व्यवसायचा प्रारंभ केला जातो. नवीन उपक्रमांचा प्रारंभ केला जातो तसेच सुवर्ण खरेदी केली जाते. नवीन गोष्टींची सुरुवात या दिवशी केली जाते जेणेकरून त्या लाभदायक ठरतील.

गुढीपाडव्याच्या दिवशी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून संध्याकाळी सर्वांना प्रसाद म्हणून खायला दिली जाते. हे मिश्रण एक प्रसाद समजून खाल्लं जातं. परंतु यामागे आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्रीयकारण आहे. कडूनिंबाच्या पानांमुळे पचन क्रिया सुधारली जाते, पित्त सारखे प्रकार दूर होतात, त्वचेशी निगडित रोग बरे होतात. महाराष्ट्रामध्ये शेतकरी धान्यांमध्ये धान्याला कीड लागू नये म्हणून कडुनिंबाचा पाला टाकतात.

कडूनिंब हा आयुर्वेदिक मानला जातो. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते, वातावरणामध्ये बदल होतो, उष्णता वाढू लागते म्हणूनच कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घातली जातात जेणेकरून अंगाला थंडावा मिळतो. चैत्र महिन्यामध्ये झाडांना मोहोर फुटू लागतो झाडाची जुनी पानं गळून नवीन पाने येऊ लागतात. या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मिरवणूक काढली जाते जिथे प्रत्येक जण पारंपारिक पोशाख घालून अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात.

या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन एकत्रित भोजन करतात. या दिवशी नवे संकल्प केले जातात. गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून सुरु असलेला सण आहे. इतिहासामध्ये हिंदू सण व संस्कृती यांच्यावर आधारित अनेक पौराणिक कथा ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे गुढीपाडव्याशी निगडीत अनेक ऐतिहासिक गोष्टी किंवा कथा आहेत. या दिवसाचे भारतीय संस्कृती मध्ये एक विशेष स्थान आहे असे म्हणतात. काही पौराणिक कथांनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मितीला सुरुवात केली. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. भगवान श्रीराम सीता व लक्ष्मण यांनी १४ वर्षे वनवास केला ते याच दिवशी आयोध्या मध्ये परतले.‌

Gudi Padwa Story in Marathi

भगवान श्रीराम यांनी रावण व राक्षसांचा पराभव करून ते या दिवशी आयोध्यामध्ये परतले. १४ वर्ष वेगवेगळ्या संकटांवर मात करत रावणासारख्या बलाढ्य राक्षसाचा पराभव करून भगवान प्रभू रामचंद्र घरी परतले म्हणूनच भक्तजनांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांचा विजय एखाद्या उत्सवा प्रमाणे साजरा करण्यासाठी गुढी उभारली आणि तेव्हापासूनच ही परंपरा पुढे सुरू झाली असे म्हटले जाते.

या दिवशी शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे तयार केले ज्यामध्ये त्याने प्राण घालून त्यांना सैनिक बनवून शकांचा पराभव केला आणि म्हणूनच या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू झालं अशी कथा प्रचलित आहे. यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे महाभारताच्या आदिपर्वात एका राजाने इंद्रदेवाने त्याला दिलेली बांबूची काठी इंद्र देवांच्या जमिनीत खुपसली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला तिची पूजा केली आणि पुढे ही परंपरा अनेक वेगवेगळ्या राजांनी त्याच काठीला वस्त्र गुंडाळून तिला सजवून तिची पूजा करण्याची प्रथा सुरू केली.

गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदात साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष नवीन सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचा जल्लोष, मराठी अस्मितेचा व हिंदू संस्कृतीचा उत्साहाचा आणि मराठी माणसांचा सण होय. गुढीपाडवा हा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो चैत्र प्रतिपदेच्या दिवशी केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक व आंध्र प्रदेश मध्ये देखील हिंदू नववर्षाची सुरुवात होते.

कर्नाटक व आंध्र प्रदेश या भागांमध्ये गुढी पाडवा या सणाला उगादी असे म्हटले जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. या कार्यक्रमांमध्ये पारंपारिक लोकनृत्य सादर केलं जातं शिवाय पारंपारीक पोशाख घातला जातो. सर्वत्र रस्त्यावर रंगीबेरंगी ‌रांगोळ्यांचे सडे पहायला मिळतात. नवीन वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. सगळीकडे आनंदमयी वातावरण असतं जे पाहून मन प्रसन्न होतं.

आम्ही दिलेल्या real history of gudi padwa in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुढीपाडवा माहिती इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gudi padwa history in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gudi padwa story in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये history behind gudi padwa in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!