“निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही,
निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य अन् नवा आनंद काही!”
Retirement Speech in Marathi – Nirop Samarambh Bhashan in Marathi सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि आयोजक यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच, आज आपल्या शाळेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी, त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. खरंतर, आज मला याठिकाणी माझ्या आदर्श आणि प्रिय असलेल्या शिक्षकांना निरोप देताना वाईटही वाटतं आहे.
कारण, ज्यांनी मला इतकी वर्ष चांगलं घडवल, सुंदर जग चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी या जगाला कस ओळखायचं याच ज्ञान दिलं, आयुष्याच्या प्रवासात कुठून कस वळायचं याच मार्गदर्शन केलं, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी मनापासून आपलं कर्तव्य निभावलं त्या शिक्षकांचा, माझ्या गुरूंचा आज निवृती दिवस! पण, दुसरीकडे मला चांगलही वाटतं आहे; कारण, आज ते स्वतःच्या एका अनोख्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत.
सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण – Retirement Speech in Marathi
निरोप समारंभ भाषण – Nirop Samarambh Bhashan in Marathi
इतकी वर्ष आपल्या गुरूंनी आपणा सर्व विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ खर्ची घातला. पण, आज कुठंतरी त्यांना या सगळ्या गोष्टींमधून निवांतपणा मिळणार आहे हे मात्र खरं! कितीतरी वर्ष आपले गुरू या एकविसाव्या शतकात धावपळीचं जीवन जगत असताना आपल्याला दिसत होते.
पण आज मात्र त्यांना निवृत्तीनंतर सुखाचा विसावा भेटणार आहे. म्हणूनच मित्रांनो, मला आज अस म्हणावंसं वाटत आहे की माझ्या गुरुंना आज मी निरोप देण्यासाठी नव्हे तर, इथून पुढचं त्यांचं आयुष्य त्यांना स्वतःसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी चांगल्या पद्धतीने जगता यावं यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभी आहे.
खरंतर, प्रत्येकाच्या आयुष्यात हा निवृत्ती दिवस येतोच. फक्त निवृत्तीचे प्रकार वेगळे असतात एवढाच तो फरक! तर मित्रांनो, ‘निवृत्ती’ म्हणजे नेमक काय असतं? निवृत्ती ही संकल्पना कुणी निर्माण केली? निवृत्तीचे फायदे किंवा तोटे काय असतात?
- नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण
निवृत्तीनंतर लोकांचं जीवनमान कस असतं? आणि सगळ्यात महत्वाचं एखादी व्यक्ती निवृत्ती झाल्यावर खरंच त्या व्यक्तीचं आयुष्य निवांत होत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाले असतील. चला तर मग, आज आपण जाणून घेऊया निवृत्तीबद्दल!
तर मित्रहो, आपल्या आयुष्याचा बहुमोल कालावधी जो आपण आपल्या कर्तव्याच्या, कामाच्या ठिकाणी घालवितो आणि मग त्यातून आयुष्याची पंचावन्न किंवा साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या कामाच्या नियमांनुसार आपण आपले कार्य करण्याचे थांबवितो, यालाच विशेषकरून ‘निवृत्ती’ असे म्हटले जाते. खरंतर, कोणत्याही व्यक्तीचं नोकरीनंतरच आयुष्य म्हणजे स्वल्पविराम फक्त.
मित्रांनो, आपण थोडंसं निवृत्ती या संकल्पनेकडं लक्ष वेधून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की निवृत्ती हा आयुष्याचा पूर्णविराम नसून, ‘यंग सीनिअर्स’ म्हणून धमाल करण्याची काही वर्षे आहेत आणि खरोखरच अशा दृष्टिकोनातूनच आपण सर्वांनी त्याच्याकडं पाहणं आजच्या काळात सगळ्यात जास्त आवश्यक आहे.
शिक्षक सेवानिवृत्त भाषण मराठी – Seva Nivrutti Speech in Marathi
सेवानिवृत्ती हा आयुष्यामधला एक नवीन टप्पा असतो. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य अस आपल्याला येथे म्हणता येईल.
एकदा का आपल्याला आनंदाचा ठेवा सापडला, की निवृत्तीचा अर्थ आपणा लोकांना सहज उमजायला लागतो. म्हणूनच, आज याठिकाणी निवृत्त होत असलेल्या माझ्या गुरूंना मला सांगावस वाटतंय की आमची साथ सोडून जरी तुम्ही आम्हां सर्वांपासून दूर जात असला तरी तुम्ही आज खऱ्या अर्थाने स्वतःच्या लोकांमध्ये जाणार आहात.
त्यामुळे, तुम्ही कुणीही याक्षणी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण, आपल्या अनमोल असलेल्या आठवणी तुमच्या पुढच्या आयुष्यात सदैव ताज्या राहणार आहेत. आता येथे जमलेल्या माझ्या वरिष्ठांना आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना मला सांगावस वाटतयं की, पूर्वी निवृत्तीनंतर हाती येणारा पैसा हा खूप कमी असायचा किंवा आपल्याला पुरेसा नसायचा.
त्यात पूर्वीच्या काळी सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती असल्याने, जबाबदाऱ्या देखील खूप असायच्या; पण मित्रांनो, आता पूर्वीसारखे असे वातावरण राहिले नाही. कुटुंबे आता लहान झाली आहेत.
शिवाय, निवृत्तीचे वयही ठरलेले आहे आणि त्यामुळेच निवृत्त होणारी व्यक्ती आपण आपल्या निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा याचा विचार अगोदरच करून ठेवते. त्यामुळे, निवृत्तीनंतरच त्यांचं आयुष्य त्यांनी आधीच कल्पणात्मक पद्धतीनं जगलेल असत. म्हणूनच आजकाल सगळीकडे म्हटले जाते की, आजचे निवृत्तीनंतरचे जीवन हे पूर्वीइतके करूण राहिलेले नाही.
- नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण
आता निवृत्त झालेल्या व्यक्तींना निवृत्त व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती असं न म्हणता ‘यंग सिनिअर्स’ असं संबोधण्यात येत. त्यामुळे, आपल्या सेवेतून निवृत्त झालेल्या व्यक्तींना आता आपण म्हातारपणाकडे झुकलो आहोत याची जाणीव अजिबात होत नाही. त्यामुळे, यांच्यासोबत वृद्ध झालेल्या काही व्यक्तीसुद्धा आपले साठीनंतरचे येणारे तारुण्य उपभोगू लागल्या आहेत.
शिवाय, निवृत्ती नंतरच्या येणाऱ्या काळाला आताचे लोक पूर्वीच्या काळातील लोकांप्रमाणे आपल्या जीवनातील त्रासदायक काळ असं न मानता, निवृत्तीनंतरचा काळ म्हणजे निवांत आयुष्य जगण्याचा काळ असं मानू लागले आहेत. म्हणजेच मित्रहो, आताच्या काळातील लोकांचा निवृत्तीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.
एकंदरीत पाहता आपणही आपल्या पुढच्या आयुष्यात येणारा निवृत्तीनंतरचा विचार निवृत्तीपूर्वीच केलेला बरा. जेंव्हा मनुष्य रोजच्या कामात मग्न असतो, तेंव्हा त्याची खूप धावपळ होत असते. अशावेळी, त्याला खूप विश्रांती हवी असते; पण, जेंव्हा मानवाला सक्तीची विश्रांती समोर दिसते, तेंव्हा बिचाऱ्या मानवाची नेमकी धांदल उडते आणि त्याला विश्रांती विसरावी लागते.
म्हणूनच मित्रहो, निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून विश्रांती मिळणारी, जबाबदारीतून सुटका करणारी एक प्रकारची खूप मोठी सुट्टी असते. याच्याआधी आपण पाहिलं की आयुष्याला पूर्णविराम नसून, स्वल्पविराम असतो; कारण, निवृत्तीनंतर त्या व्यक्तीचे अजून बरेच आयुष्य बाकी असते. त्यामुळे, आताचे निवृत्त लोक खूप क्रियाशील असतात.
त्यांच्यात निवृत्तीनंतरही शारीरिक तसेच, मानसिक क्षमताही असते. खूप लोक याकाळात आपली राहिलेली इच्छा, स्वप्न आणि छंद पूर्ण करताना आपल्याला दिसतात.
अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ, इष्ट, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखावह व्हावी, एवढीच अपेक्षा असते. त्यासाठी ते ‘मॉर्निंग वॉक’ला जातात. तेथे त्यांचे ग्रुप तयार झाले की मग ते सर्वजण आपापल्या आयुष्याच्या अनुभवाच्या गप्पा मारतात. ज्येष्ठ नागरिक संघात जातात.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
त्यात होणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा, सहली यांचा आस्वाद घेतात. त्याचबरोबर, सकस आहार घेऊन, नियमित व्यायाम करून आपले आरोग्य सांभाळून, उरलेलं जीवन सुखात घालविण्याचा प्रयत्न करतात. निवृत्तीनंतर अनेकजण आपल्या घरातील मुलाबाळांच्या जीवनपद्धतीशी स्वतः जूळवून घेताना आपल्याला दिसतात.
आपल्या नातवंडांमध्ये डावे-उजवे करणे, गरज नसतानाही घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे, उठसूट सल्ले देणे, नातवंडांच्या प्रत्येक कृतीला नाक मुरडणे या गोष्टी निवृत्तीनंतर खासकरून टाळल्या जातात.
असे असले, तरी पूर्वनियोजन नसल्याने काही ज्येष्ठांना मात्र निवृत्तीनंतर काय करायचे तेच समजत नाही. एखादा दगड उतारावरून सोडला, तर तो जसा वाट फुटेल तिकडे जातो. तशी त्यांची अवस्था होते. दिवस त्यांना खायला उठतो. एकटेपणामुळे हे लोक नैराश्यग्रस्त होतात. कारण, निवृत्तीआधीचे त्यांचे आयुष्य खूप धावपळीत आणि धक्काधक्कित गेलेले असते.
शिवाय, त्यांच्या शरीराला देखील सतत कार्यमग्न राहण्याची आणि मनाला सतत दुसऱ्या दिवसाचा विचार करण्याची सवय झालेली असते. त्यामुळे, काही जण तर नोकरीतून नाही, तर कुठंतरी आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागतात; पण ही त्यांची शारीरिक बाब नसते, तर अशी माणसे शरीराआधीच मनाने निवृत्त होतात.
त्यासाठी छोटेसे का होईना; त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने दररोज काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास ठेवला पाहिजेत, तरच आपले मन तरुण राहते. त्याचबरोबर, आपले तरुण पिढीशी नातेसंबंध कशा पद्धतीने चांगले राहतील याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवे.
खरंतर, मानवाला भौतिक गोष्टींतून आपले मन काढून घेता आले पाहिजे. काहींना निवृत्त झाल्याक्षणी समाजातील आपले स्थान अचानक कोणीतरी काढून घेतले आहे, आपण आता इतरांपेक्षा दुय्यम आहोत, असे वाटू लागते. त्यामुळे, अशा प्रकारच्या होणाऱ्या बदलाची आपण आधीपासूनच तयारी केलेली असेल, तर निवृत्तीनंतरची ही वर्षे प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाळ बनू शकतात.
तसेच, नोकरीच्या खुर्चीशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात. स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व असे सारे अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे. कुठलाही शासकीय कर्मचारी निवृत्त होतो, तेंव्हा त्याला निवृत्तीवेतन दिले जाते आणि हे निवृत्तीवेतन त्याच्या मृत्यूपर्यंत सुरू राहते.
मृत्यूपश्चात या निवृत्तीवेतनाचा काही हिस्सा त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीलाही मिळतो. काही प्रसंगात तर या कर्मचाऱ्याच्या अपत्याला सुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद शासनात केलेली आहे.
पण मित्रांनो, या निवृत्ती वेतनाचेही अनेक प्रकार असतात आणि आपल्यातील अनेक जणांना मुळात हेच माहीत नसत. एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे एकूण आठ प्रकार आहेत.
नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची आपल्या अठ्ठावान वर्षे पूर्ण झाल्यावर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. याशिवाय, स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे दुसरे प्रकार आहेत. आपण जर मित्रहो, एल.आय.सी. ही पॉलिसी काढली असेल, तर यावेळी अकार्यक्षमतेमुळे आपल्याला देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती असते.
- नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी
याचबरोबर, निवृत्ती वेतन घेणारा व्यक्ती जेंव्हा केंव्हा मरण पावतो, तेंव्हा त्याच्या कुटूंबियांना जे निवृत्ती वेतन मिळते त्या निवृत्ती वेतनाला ‘कुटूंब निवृत्ती वेतन’ असे म्हटले जाते. तसचं, जर एखादा सरकारी कर्मचारी हरवला असेल तर त्याच्या कुटूंबियांना त्याचा त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जातात.
पण, इथेही काही अटी असतात, यामध्ये; सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी दहा वर्षे इतका कालावधी आधी हिशोबात घेतला जातो. पण, आता दहा वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर देखील पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी सेवा ही दहा वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी सेवा उपदान दिले जाते.
खरंतर, सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीसाठी अर्ध्या महिन्याचे वेतन असे उपदानाचे स्वरूप असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, निवृत्ती वेतनाची परिगणना कशी केली जाते? तर, निवृत्ती वेतनाची परिगणना ही निवृत्तीपुर्वी शेवटच्या दहा महिन्यात घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे.
त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के दराने, या दोन्ही गोष्टींपैकी त्या व्यक्तीला जे सगळ्यात जास्त फायदेशीर असेल, ते वेतन त्या व्यक्तीला निवृत्ती वेतन म्हणून दिले जाते.
आता मित्रांनो, आपण कुटूंब निवृत्तीवेतन म्हणजे काय व ते कोणाला मिळते हे पाहूया! तर, कुटूंब निवृत्तीवेतन हे आपल्याला दोन प्रकारे मिळते. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला कुटूंब निवृत्तीवेतन दिले जाते.
म्हणजेच कुटूंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस देण्यात येते. याशिवाय, जालना जिल्ह्यात जर भीषण स्फोट झाला, त्यात एखादी मृत्यू पावली तर, त्या व्यक्तीच्या पत्नी किंवा पतीला कुटूंब निवृत्तीवेतन दिले जाते. परंतू, जर त्या व्यक्तीचे संबंधित पती किंवा पत्नी यांपैकी कुणीही हयात नसेल तर हे वेतन त्याच्या वारसदाराला देण्यात येते.
- नक्की वाचा: लोकमान्य टिळक भाषण मराठी
मुलाला २१ वर्ष व मुलीला २४ वर्ष वय होईपर्यंत हे वेतन त्यांना देता येते. याखेरीज, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे अपत्य शंभर टक्के विकलांग असेल तर त्याला कुटुंब निवृत्तीवेतन हे कायमस्वरूपी मिळू शकते.
त्याचबरोबर, सेवेत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा एक वर्ष सलग सेवा झाल्यानंतर सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटूंबियांना कुटूंब निवृत्तीवेतन देय होते. परंतू, जर त्या व्यक्तीचा एक वर्ष सलग सेवा होण्यापुर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणुक होण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल, तरीसुद्धा त्यांच्या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्तीवेतन देण्यात येते.
आपल्या भारत देशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या ‘पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर’ या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम सर्वांसाठी खूप लाभदायक आहेत.
माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पत्र सूचना कार्यालयाच्या विशेष लेख विभागाने दिलेली निवृत्तीवेतन संदर्भातली माहिती ही केवळ पेन्शनर्स नव्हे तर त्यांचे कुटुंबीय, संस्था आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सर्व कर्मचाऱ्यांनाही उपयुक्त ठरेल अशी आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचारी, सार्वजनिक गाऱ्हाणी व निवृत्तीवेतन या कामासाठी एक विशेष विभाग कार्यरत आहे. खरंतर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती लाभासंबंधी धोरणे ठरविणे आणि त्यातील लाभाबाबत समन्वय घडवून आणणे ही कामे या विभागातर्फे केली जातात.
मित्रांनो, आज आपल्या भारत देशामध्ये निवृत्तीधारकांची एकूण संख्या ही दिनांक ३१ मार्च २०१४ पासून जवळपास पंचावन्न लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच ही संख्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. याशिवाय, या विभागाने अलिकडेच काही नवे उपक्रम निवृत्ती वेतनधानकांसाठी सुरू केले आहेत.
तसेच, पुढील काही वर्षात आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निवृत्तीची मानसिक व अन्य तयारी कशी करावी यावर व्याख्यान देण्यासाठी काही कार्यशाळा घेतल्या जातात आणि त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन देखील केले जाते.
याशिवाय, निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनुभव, ज्ञान, कौशल्य आदी गुणांचाही पुढे वापर केला जावा यासाठीही काही योजना आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आधार कार्डाच्या आधारावर डिजिटल स्वरुपातील आपल्या हयातीचा दाखला आणि सर्व निवृत्त वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
यावर्षी पंतप्रधानांनी दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी निवृत्ती वेतनधानकांकरिता विशेष योजना सुरू केली आहे. ‘आधार बेस्ड लाईफ सर्टिफिकेट ऑथिंटिकेशन सिस्टिम फॉर पेन्शनर्स’ असे या कार्यपद्धतीचे नामांकन केले आहे. ‘डिजिटल इंडिया’ या स्वप्नपूर्तीकडे नेणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे आपल्याला यासंदर्भात म्हणता येईल. यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाने आवश्यक ते तंत्रज्ञान सुद्धा पुरविले आहे.
- नक्की वाचा: महात्मा गांधी भाषण मराठी
या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे निवृत्तीधारकांचा आधार कार्ड नंबर आणि त्यांच्या देहाविषयी तपशील म्हणजे हाताचे ठसे, देहावरील ओळख पटविण्याचा खूणा इत्यादी माहितीची नोंद केली जाते.
शिवाय, शारीरिक माहितीची नोंद करणारी विशेष सोय या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे आणि त्यांच्या पेन्शन वितरणाच्या अर्जावर डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची माहिती नोंदवण्यासाठी याच वेबसाईटचा उपयोग करावा असे सूचित देखील केले आहे. आतापर्यंत सतरा हजारहून अधिक निवृत्ती वेतनधारकांनी त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहे.
निवृत्तीधारकांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी ‘संकल्प योजना’ या विभागाद्वारे केंद्र सरकारच्या नागरी कार्यालयातून दरवर्षी सुमारे चाळीस हजार कर्मचारी निवृत्त होतात. रेल्वे, सेनादले, टपाल व दूरसंचार या विभागांची निवृत्तींची संख्या जर आपण हिशोबात घेतली तर आपल्या लक्षात येईल की दरवर्षी सुमारे दोन लाख कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त होतात.
पण मित्रांनो, सेवा निवृत्ती म्हणजे कार्य निवृत्ती नव्हे हे आपल्याला माहीत आहे. आता भारतातील लोकांचे सरासरी आयुष्यमान हे ६९.२ वर्षे असे वाढले आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य, आणखी दहा ते पंधरा वर्षे चांगल्या स्थितीत असते. तसेच त्यांच्यात परिपक्वता, अनुभव, स्थैर्य असे चांगले गुणही असतात.
त्यांचा वापर देशातील स्वयंसेवी किंवा इतर काही संघटनांना करता येतो. अशा अनेक संस्थांना, अनुभवी परिपक्वता, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची गरज असते आणि त्यांची ही गरज निवृत्त कर्मचाऱ्यांना सहज भागवता येणे शक्य आहे.
याशिवाय, काही मंत्रालये निवृत्तीधारकांच्या गटाकडून विकास योजनांचे मूल्यमापन करणे, पुन्हा लेखापरीक्षण करून घेणे अशी कामे करून घेण्याची शक्यता अजमावून पाहत आहेत. बरेच निवृत्ती वेतनधारक ‘टीच इंडिया’ अर्थात भारतातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
यामध्ये, तमिळनाडूमधील ‘प्रथम’ या नावाच्या संघटनेने तेथील निवृत्त वेतनधारकाला सामील करून तेथे शिक्षण प्रसाराचे काम जोरात सुरू केले आहे. तीन निवृत्त व्यक्तींना ‘मास्टर ट्रेनर्स’ अर्थात प्रभावी प्रशिक्षक म्हणून सन्मानित देखील करण्यात आले आहे. लखनौ या उत्तर प्रदेशाच्या राजधानीतही साक्षरता कार्यक्रमात तेथील ११८ निवृत्त झालेल्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
ग्लोबल ड्रिम्स ही एन.जी.ओ. निवृत्तीधारकांच्या कौशल्यांचा उपयोग समाजासाठी करून घेत आहे. अशा प्रकारे, निवृतीनंतरच आयुष्य म्हणजे एखाद्या फुलपाखराच्या जगण्यासारख आयुष्य असत. जिथे व्यक्ती मनापासून, आनंदाने आणि निवांतपणे आपलं आयुष्य व्यथित करीत असते. शेवटी, आज माझ्या गुरुंच्या निवृत्तीच्या दिवशी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की,
“आला आनंदाचा क्षण,
आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील
प्रत्येक उरलेला क्षण!
सेवानिवृत्तीचा दिवस आला,
अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
तुमच्या आयुष्यात आनंद यावा!
या पुढचा तुमचा प्रवास,
हसरा आणि आनंद देणारा असावा!
कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी
तुम्ही कष्ट केले अपार!
आता ही वेळ म्हणते थांबा
करा थोडा आराम! करा थोडा आराम!”
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या Retirement Speech in Marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण” retirement speech in marathi given by retirees विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या send off speech in marathi या farewell speech in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि seva nivrutti lekh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण retirement farewell speech in marathi या लेखाचा वापर retirement speech for father in law in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट