समाजसुधारक निबंध मराठी Samaj Sudharak Essay in Marathi

Samaj Sudharak Essay in Marathi – Samaj Sevak Essay in Marathi समाजसुधारक/समाजसेवक निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये समाज सेवक या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या देशामध्ये अनेक असे समाज सेवक आणि सुधारक होवून गेले आहेत. ज्यांनी देशामध्ये होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवला तसेच त्यांनी अनेक वाईट रूढी आणि परंपरा मोडण्यासाठी अनेक कष्ट घेतले तसेच अनेक लोकांची मदत केली. चला तर आता आपण समाज सेवक या विषयावर निबंध लिहूया. समाज सेवक हे ते लोक असतात जे लोकांना दुष्काळाच्या काळात, पुराच्या काळामध्ये, साथीच्या रोगाच्या काळात किंवा इतर काही कारणांमुळे लोकांचे जीवन अस्ताव्यस्त होते किंवा विस्कळीत होते.

म्हणजे त्या काळामध्ये लोकांचे घरे किंवा त्यांना अन्नाचा तुडवडा बसत असेल तर काही लोक त्या लोकांना तत्काळ राहण्यासाठी जागेची सोय करून देतात तसेच अन्न पुरवतात किंवा एकाद्या भागाचे पावसामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर काही लोक त्या भागासाठी आर्थिक मदत करतात अश्या सर्व लोकांना समाज सेवक म्हंटले जाते. समाज सेवक किंवा समाज कार्यकर्ते हे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतात.

Samaj Sudharak essay in marathi
Samaj Sudharak essay in marathi

समाजसुधारक निबंध मराठी – Samaj Sudharak Essay in Marathi

समाजसेवक निबंध मराठी – Samaj Sevak Essay in Marathi

समाज कार्यकर्ते समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या मूलभूत आणि जटिल गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करणे. समाज सेवक हे वेगवेगळ्या प्रकारे समाज सेवा करतात जसे कि काही समाज सेवक हे लोकांच्या किंवा मुलांच्या शालेय समस्या सोडवण्याचे काम करतात तसेच शालेय समाज सेवक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि समाज विकास सुधारण्यासाठी योजना आणि धोरणे विकसित करण्यासाठी शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासकांसह कार्य करतात.

त्याचबरोबर आरोग्य सेवा करणारे समाज सेवक हे लोकांना रुग्णालयातून त्यांच्या घरी आणि समाजात परत येण्यासाठी आपली मोलाची कामगिरी बजावतात. काही समाज सेवक हे लहान मुलांच्या आणि  कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असतात. असुरक्षित मुलांचे रक्षण करतात आणि मदतीची गरज असलेल्या कुटुंबांना मदत करतात. या प्रकारचे समाज सेवक लहान मुलांचा गैरवापर आणि बाल रोजगारी विरुद्ध लढतात. समाज कार्यकर्ते शाळा, समुदाय विकास महामंडळे, बालकल्याण, मानव सेवा संस्था आणि मानसिक आरोग्य दवाखाने यासारख्या ठिकाणी काम करतात.

समाज सेवक जे आजारपण, घटस्फोट किंवा बेरोजगारी यासारख्या बदलांना आणि त्यांच्या आयुष्यातील आव्हानांशी जुळवून घेण्यास लोकांना मदत करतात तसेच ते लोकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेवून त्यावर योग्य ते पाऊल उचलणे. दुष्काळ ग्रस्त काळामध्ये आणि पूरग्रस्त काळामध्ये लोकांना मदत करणे त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्द करून देणे किंवा अन्न पुरवणे यासारखे काम समाज सेवक करतात.

लहान मुलांचा गैरवापर आणि मानसिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसारख्या संकटाच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात तसेच बालरोजगार देखील थांबण्याचा प्रयात करतात तसेच आपल्या देशामध्ये पूर्वी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी तसेच काही जन बालविवाह रोखण्यासाठी किंवा सती, अस्पृश्यता यासारख्या समस्या मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केले अश्या प्रकारे आपल्या देशातील अनेक समाज सुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आणि त्यांनी लोकांना मदत केली.

जे लोक समाज सेवा किंवा कार्य करण्यासाठी इच्छूक असतात त्यांच्यामध्ये सहानुभूतीची भावना असणे गरजेचे असते असते कारण जर समाज कार्यकर्त्यामध्ये सहानुभूतीची सहानुभूतीची भावना असेल तर ती व्यक्ती समोरील लोकांच्या समस्या सखोल पणे समजून घेऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतात.

तसेच समाज सेवकांच्यामध्ये लोकांच्या समस्या समजवून घेवून त्यांच्या ह्या समस्या सोडवण्याचे चांगले कौशल्य असले पाहिजे पण लोकांच्या समस्या ह्या चांगल्या संवादामुळे समजू शकतात म्हणून संवाद करताना समाज सेवकाने सर्व बाजूंनी विचार करून संवाद करणे गरजेचे असते. भारतामधील काही महान समाज सेवकांच्याविषयी खाली दिले आहे.

सिंधूताई सपकाळ 

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात म्हणून त्यांना अनाथांची आई म्हणू ओळखले जात होते. त्यांनी लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला आणि त्यांचे आयुष्य मार्गाला लावले आहे आणि त्यांनी ज्या मुलांचे पालन पोषण केले होते त्यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

ज्योतिबा फुले 

ज्योतिबा फुले यांचे नाव कोणाला माहित नाही आपण यांच्या बद्दल शाळेमध्ये शिकलोच आहोत. ज्योतिबा फुले हे आणखी एक लोकप्रिय समाजसुधारक आहेत आणि त्यांचे कार्य जातीविरोधी मोहिमेविषयी आहे. ज्योतिबा फुले या महान समाज सेवकाला महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्री बाई फुले यांना चांगल्या प्रकारे पाठींबा देवून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांनी अस्पृश्यता सारख्या समाज आजारांविरुद्ध लढा दिला आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठीही काम केले. त्यांनी बालहत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी अनाथाश्रम देखील स्थापन केले.

बाबा आमटे 

समाज सेवक म्हटले कि सर्वप्रथम तोंडामध्ये येणारे नाव म्हणजे बाबा आमटे कारण त्यांनी अनेक गरीब लोकांना मदत केली. त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांविरुद्ध भेदभावाच्या विरोधातील लढाईत भारताला मदत केली होती तसेच भारतातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती आणि त्यांनी जंगलामध्ये राहणाऱ्या अधिवासी लोकांच्या आरोग्याविषयी काम केले होते. बाबा आमटे हे डॉक्टर होते आणि त्यांचा जन्म डिसेंबर १९१४ मध्ये झाला आणि फेब्रुवारी २००८ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे त्यांचे निधन झाले होते.

विनोबा भावे 

विनोबा भावे भारतातील लोकप्रिय समाजसुधारक / किंवा समाज सेवकांच्या मधील एक होते आणि त्यांनी अहिंसा आणि मानवी हक्कांचे समर्थन केले. विनोबा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आणि सर्व समाज सुधारणांसाठी महात्मा गांधींशी त्यांचा निकटचा संबंध होता तसेच त्याशिवाय त्यांनी भूदान चळवळीसारख्या अनेक लोकप्रिय चळवळींचे नेतृत्व केले होते.

आम्ही दिलेल्या Samaj Sudharak Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर समाजसुधारक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या samaj sevak essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!