Shala Nasti Tar Essay in Marathi शाळा नसती तर मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये शाळा नसती तर (shala nasti tar ) या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. शाळा हि एक सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो कारण शाळेपासूनच आपल्या चांगल्या आयुष्याची सुरुवात होते तसेच शाळेपासून आपली जडणघडण होते. शाळेपासूनच आपल्याला चांगले संस्कार लागण्याची सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या मेंदूचा विकास देखील शाळेपासूनच होतो त्यामुळे आपण जे काही शिकतो त्याची आवड लहानपणी पासूनच असेल तर आपल्याला ते मोठे झाल्यावर चांगल्या प्रकारे येवू शकते.
शाळा हे असे ठिकाण आहे ज्याला विद्येचे मंदिर असते म्हणजेच शाळेमध्ये असतानाचा आपले ज्ञान भांडार वाढते. आपण पहिले ते दहावी परायान्ताचे शिक्षण हे शाळेमध्ये घेतो आणि मग त्यानंतर पुढील शिक्षण कॉलेज मध्ये घेतो आणि पहिले ते दहावी परायान्ताचे शिक्षण घेणे हे खूप गरजेचे असते कारण आपण हे शिक्षण घेतले नाहीत तर पुढचे शिक्षण घेवू शकणार नाही म्हणून शालेय शिक्षण घेणे आवश्यक आहे.
शाळा नसती तर मराठी निबंध – Shala Nasti Tar Essay in Marathi
Essay on Shala Nasti Tar in Marathi
शाळा नसती तर आपण पहिले ते दहावी शिक्षण कसे घेतले असते आणि जर दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले नसते तर मग कॉलेज शिक्षण कसे घेतले असते आणि कॉलेजचे शिक्षण घेतले नसते तर आपण उच्च शिक्षण कसे घेतले असते आणि उच्च शिक्षण घेतले नसते तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी किंवा काम कसे केले असते आणि जर काम केले नसते तर आपल्या घराची प्रगती कशी झाली असती तसेच आपल्या देशाच्या बाबतीत देखील आहे.
कारण जर देशामध्ये शाळा नसत्या तर मुले शालेय शिक्षणापासून वंचित राहिली असती आणि म्हणजेच मुलांना शालेय शिक्षण घेणे खूप अवघड झाले असते तसेच मुलांना शालेय शिक्षण घेता न आल्यामुळे त्यांना पुढचे कोणतेच शिक्षण घेता आले नसते आणि त्यामुळे मुले अशिक्षित राहिली असती आणि त्यामुळे देशाच्या प्रगती मध्ये अनेक अडचणी आल्या असत्या म्हणजेच मानव कोणत्याच गोष्टीमध्ये प्रगती करू शकला नसता जसे कि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये, अन्न क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास करणे खूप अशक्य झाले असते. कारण शिक्षणाशिवाय माणसाचे ज्ञान वाढत नाही त्याच्या मेंदूचा विकास होत नाही.
शाळा नसत्या तर मानवाने शिक्षण घेतले नसते आणि आपण आज ज्या आधुनिक जगामध्ये जगत अहोत ते कधीच शक्य झाले नसते. विज्ञानामध्ये रोज अनेक वेगवेगळे शोध लागतात तसेच वेगवेगळ्या वस्तूंचे देखील शोध लागतात आणि आपल्याला सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची इतकी सवय झाली आहे कि लोकांनाच एक दिवस देखील तंत्रज्ञांचा उपयोग केल्याशिवाय जात नाही.
आपण जे रोजच्या जीवनामध्ये वापरतो जसे कि फ्रीज, टी व्ही, ओव्हन, मोबईल, संगणक, टॅब, वॉशिंग मशीन, फॅन, कुलर, हिटर यासारख्या अनेक वस्तू आपण अगदी सहजपणे वापरतो आणि त्यामुळे आपली कामे सोपे होतात तसेच खूप कमी वेळेमध्ये काम होते आणि हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भेट आपल्याला मिळाली आहे. जर लोकांनी शिक्षण घेतले नसते तर हे सर झालेच नसते मानव कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती करू शकला नसता.
शाळा हे आपल्या लहानपणीच्या आठवणींचे ठिकाण असते आणि शाळेसारखे इतर दुसरे कोणतेच ठिकाण नाही कारण आपण शाळेमध्ये अनेक गोष्टी शिकतो. शाळेमध्ये आपण गणिते शिकतो, विज्ञान क्षेत्रातील गोष्टी शिकतो, समाज शास्त्राबद्दल शिकतो आणि त्यामुळे आपले वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान हे शाळेमधूनच वाढते तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण शाळेमधूनच सुरुवात करतो. शाळेमध्ये आपल्याला चांगले गुरु भेटतात तसेच शाळेमध्ये आपले चांगले मित्र बनतात आणि हे शाळेमध्ये बनलेलेच मित्र ह्या आयुष्यभरासाठी चांगले मित्र बनू शकतात.
तसेच शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असे म्हणातले तर वावगे ठरणार नाही. शाळेमध्ये आपण निश्चिंत जीवन जगू शकतो कारण आपल्यावर कोणत्याही गोष्टीचे ओझे नसते तसेच कोणत्याही गोष्टीची जबाबदारी नसते त्यामुळे आपण शालेय जीवन हे आनंदाने आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेवून जगू शकतो. पण जर शाळा नसत्या तर आपण या सर्व गोष्टी करू शकलो नसतो आपल्याला चांगले मित्र मिळाले नसते तसेच चांगल्या गुरुचे मार्गदर्शन मिळाले नसते.
शाळेमध्ये असताना आपल्याला गणित हा विषय असतो आणि शाळेमधील हा आपल्या गणिताचा पाया असतो आणि पाया चांगला तर आपल्या पुढच्या गोष्टी चांगल्या होतात आणि आपले गणित चांगले तर आपण मोठ मोठे व्यवहार चांगल्या प्रकारे करू शकतो कारण पैश्यांचा व्यवहार करताना वेगवेगळ्या गणिती पद्धती वापरल्या जातात. शाळा नसती तर आपण शाळेमध्ये गणित हा विषय शिकू शकलो नसतो आणि त्यामुळे आपण व्यवहार देखील चांगल्या पद्धतीने करू शकलो नसतो.
शाळेमध्ये अनेक कार्यक्रम असतात जसे कि गॅदरिंग, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळाच्या राज्य स्तरीय आणि तालुका स्तरीय स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रदर्शने अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ह्या शाळे मध्ये होतात आणि त्यामुळे आपल्याला शाळेमधेच आपल्या कला गुणांची ओळख होण्यास मदत होते.
तसेच आपल्याला शाळेतील या गोष्टींचा आनंद शाळेमध्ये घ्यायला मिळतो पण शाळा नसती तर आपल्याला हे सर्व करता आले नसते. जगामध्ये अशी देखील अनेक मुले आहेत ज्यांना शाळा आवडत नाही आणि ते शाळेमध्ये जाण्यासाठी तयार होते नाहीत त्यांच्यासाठी हि संकल्पना खूप चांगली आहे.
कारण शाळा नसती तर त्यांना जबरदस्तीने शाळेला पाठवले नसते तसेच त्यांना अभ्यास करावा लागला नसता तसेच शाळा नसती तर मुलांना परीक्षेची भीती देखील वाटली नसती. पण ज्यांना शाळेचे महत्व माहित आहे किंवा ज्यांना शाळा शिकून खूप मोठे व्हायचे आहे तसेच ज्यांना आपले नाव मोठे करायचे आहे त्यांच्यासाठी शाली हि खूप महत्वाची आहे आणि त्यांना ‘शाळा नसती तर’ या संकल्पनेचा द्वेष वाटेल.
शाळा हि आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण शाळा हे विद्येचे मंदिर आहे जेथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या विषयी ज्ञान मिळते. शाळा आहे म्हणूनच जगामध्ये डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभियांत्रिकी, राजकीय नेते, समाज सेवक बनू शकले आणि जर शाळा नसती तर मानवाची कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती झाली नसती.
आम्ही दिलेल्या shala nasti tar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शाळा नसती तर मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jar shala nasti tar essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on shala nasti tar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shala nasti tar short essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट