माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी Summer Vacation Essay in Marathi

Summer Vacation Essay in Marathi माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी एका विद्यार्थ्याचे जीवन म्हणजे वर्षभर अभ्यासाची तयारी करणे. सकाळी लवकर उठून शाळेत जाणं शाळेचा दिवसभर अभ्यास करणं,‌ शाळेतून पुन्हा घरी आल्यावर एक्स्ट्रा क्लासेस तर क्लासचा अभ्यास करणे आणि त्यात डोक्यावर परीक्षेची टांगती तलवार आहेच. या सगळ्यातून विद्यार्थी थकून जातात आणि आतुरतेने प्रत्येक विद्यार्थी वाट बघत असतो ते म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीची. कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतेय आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु होईल अशी धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनात चालू असते. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.

उन्हाळ्याची सुट्टी प्रत्येक विद्यार्थ्याला आवडते त्याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अभ्यास करावा लागत नाही, पुस्तकाच अगदी तोंड देखील बघावं लागत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीची व्याख्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळी असते. कोणासाठीतरी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मावशीचे घर, तर कोणासाठी तरी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाचं गाव कोणासाठी तरी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आजीची माया.

वार्षिक परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागते या दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी अगदी जीवाची मज्जा करतात. विद्यार्थ्याच्या जीवनातील वर्षभरातील सर्वात आनंदाचा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी होय. उन्हाळा म्हटलं तर त्यासोबतच कडक उष्णता तर आलीच आणि शहरी भागामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश विद्यार्थी उन्हाळ्याची सुट्टीसाठी मामाच्या गावी जातात.

मामाच्या गावाला जाण्यासाठी मी आणि माझी बहिण इतकं आतुर होतो की आम्ही उन्हाळ्याची सुट्टी पडायच्या आधीच गावी घालण्यासाठी नवीन कपडे खरेदी करायचो. मामाचं गाव म्हणजे समुद्रकिनारा, नदी झरे,‌ हिरवे हिरवे डोंगर, नारळाच्या बागा अशा प्रकृतीच्या सुंदर दृश्याने प्रत्येक विद्यार्थ्याच मन प्रसन्न होतं.

वर्षभरातील अभ्यासाच्या ताणातून मुक्त होऊन दोन महिने मस्त मज्जा करायला भेटेल यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच उत्साह संचारतो. उन्हाळ्यामध्ये असहाय्य ऊष्णतेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणं अवघड होऊ शकत म्हणूनच उन्हाळ्याची सुट्टी दिली जाते. उन्हाळ्याची सुट्टी हा वेळ विद्यार्थी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी करतात. जास्त उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच एप्रिल व मे या महिन्या दरम्यान शाळा बंद असतात तेवढच विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ताणतणावापासून आणि धकाधकीच्या जीवनापासून विश्राम मिळतो.

 summer vacation essay in marathi
summer vacation essay in marathi

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी – Summer Vacation Essay in Marathi

My Summer Vacation Essay in Marathi

उन्हाळ्याची सुट्टी लागली की कधी पहिली ट्रेन पकडून मामाच्या गावी पळतोय असं आपल्या सगळ्यांनाच झालं असतं. मामाच्या गावी जाताना ट्रेनमधून प्रवास करताना जी मज्जा येते ती मज्जा दुसरी कशातच नाही. ट्रेनमधून प्रवास करताना लागणारी घनदाट झाडे, हिरवा डोंगर शेत रान, आणि तो बोगदा ज्याच्या मध्ये बर्‍याच आठवणी लपल्या आहेत.

ट्रेनमधून दिसणारं हे सगळं दृश्य अतिशय मन मोहक असतं हे दृश्य बघून अभ्यासाच्या दडपणातून मुक्त झाल्या सारखं वाटतं. मामाच्या गावी सकाळी लवकर उठणे, आजीच्या हातचा नाष्टा करून विद्यार्थ्यांचा दैनिक उपक्रम सुरू होतो,‌ नंतर मंदिरात जाणे गावातल्या माणसाची भेट घेणे दिवसभर मैदानी खेळ खेळायचे, आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढणे,‌ दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ विश्रांती आराम करणे. दुपारी उन्हाच्या उष्णतेमुळे विहिरीत किंवा नदीत पोहायला जाणे, पुन्हा संध्याकाळी क्रिकेट खेळणे, कबड्डी खेळणे, संध्याकाळी शेतामध्ये फेरफटका मारून येणे, संध्याकाळी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे रात्रीच्या जेवणानंतर आजी-आजोबांचे गोड किस्से ऐकणे.

आजी आजोबांकडून भुताच्या गोष्टी ऐकणे यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. दिवसभर खेळुन दमुन रात्री गावच्या शुद्ध हवेमध्ये झोप सुद्धा अतिशय आरामशीर येते. असा अभ्यासापासून लांब आणि मजेशीर दिवस विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळतो. गावी गेल्यावर गावातील मित्र मैत्रिणीला भेटून फार आनंद होतो. गावाला गेल्यावर मस्त आंबे खायला मिळतात.

उन्हाळा ऋतू म्हणजे आंबे खायला मिळणार उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघण्याचा दुसरं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंबे खायला मिळतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर किंवा परिवारासोबत वेळ घालवायला मिळतो. मामाच्या गावी असल्यावर वेगवेगळे गड-किल्ले पाहणे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा संपूर्ण वेळ वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे म्हणजेच ऐतिहासिक स्थळ पाहणे, ऐतिहासिक मंदिरांना भेट देणे, रहस्यमय ठिकाणी जाणे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सामाजिक ज्ञानात भर पडेल.

गड-किल्ल्यांवर जाऊन गड किल्ल्या बद्दल माहिती जाणून घेणे आपला इतिहास जाणून घेणे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये आणि ज्ञानामध्ये वाढ होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी आपल्या राज्यातील नवीन ठिकाणांना भेट देऊन उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेतात. तर काही विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या कमकुवत विषयांवर अधिक जोर देऊन त्या विषयाचा सराव करतात.

दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी विद्यार्थ्यांचे आयुष्यामध्ये भरपूर आनंद घेऊन येते. प्रत्येकासाठी उन्हाळ्याची सुट्टी स्मरणीय असते. फक्त विद्यार्थीच नाही तर पालक देखील आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून कामाच्या व्यापातून थोडा वेळ सुट्टी टाकून विश्रांती करतात. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे घरच्यांसोबत वेळ घालवायला भेटतो घरच्यांसोबत वेगवेगळ्या नवीन आठवणी निर्माण होतात.

म्हणूनच उन्हाळ्याची सुट्टी सर्वांसाठीच स्मरणीय ठरते. बऱ्याच वेळा उन्हाळ्याची सुट्टी लागली की फॅमिली ट्रिप्स वर जाणे वेगवेगळ्या शहरांना भेट देत तेथील लोकजीवन, लोकशैली, वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या परंपरा जाणून घेणे अतिशय मनोरंजक वाटतं. उन्हाळ्याची सुट्टी विश्रांती आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी अतिशय योग्य वेळ आहे.

उन्हाळ्याची सुट्टी हा काळ आपल्या सर्वांसाठीच एक आनंदाचा व अविस्मरणीय काळ असतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या बर्‍याच आठवणी तयार होतात. आणि लहान मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हा काळ तर अतिशय महत्त्वाचा असतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी अतिशय सुखद क्षण. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लहान मुलांना त्यांच्या नेहमीच्या शैक्षणिक आयुष्या पासून व दैनिक आयुष्यातून लांब ठेवतात.

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं आपल्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करतात ज्यामधे त्यांना रुची असते उन्हाळ्याची सुट्टी मुलांना एक नवीन संधी देते. उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलं वेगवेगळे कौशल्य शिकतात. प्रत्येक वर्षी फक्त लहान मुलंच नाही तर प्रत्येक पालक देखील अतिशय आनंदाने व उत्साहाने उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघत असतो.

उन्हाळ्याच्या सुट्टी बद्दल फक्त विचार जरी केला ना तरी ‌मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि उत्साह निर्माण होतो. वर्षभर आपण सगळेच उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघत असतो. उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला बर्‍याच काही गोष्टी शिकवून जाते. उन्हाळ्याच्या सुटीसाठी आतुर असणारे प्रत्येक जण उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये काय काय करायचं याच वेळापत्रक उन्हाळ्याची सुट्टी पडायच्या आधीच तयार करतात.

उन्हाळा म्हटलं तर वर्षातील हा सर्वात गरम ऋतू भरपूर उष्णता असते आणि याच दरम्यान उन्हाळ्याची सुटी देखील पडते लहान मुलांना अभ्यासाची चिंता न करता खेळायला भेटतं म्हणूनच हा ऋतू लहान मुलांना सर्वात जास्त आवडतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या या दीर्घकाळ असतात. म्हणूनच विद्यार्थ्याला बराच वेळ निवांत मजेशीर घालवायला मिळतो.

उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांचा आनंद प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने घेतो. उन्हाळ्यामध्ये कितीही उष्णता असली कितीही गर्मी असली तरी लहान मुलांना, विद्यार्थ्यांना हे दिवस फार आवडतात कारण या दिवसांमध्ये त्यांना बरीच मज्जा करायला मिळते. उन्हाळ्याची सुट्टी ही कितीही मजेशीर असली तरी उन्हाळ्याची सुट्टी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अधिक खास असते कारण उन्हाळ्याची सुट्टी विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवून जाते उन्हाळ्याची सुट्टी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते.

काही विद्यार्थी परदेशात फिरायला जातात तर, काही विद्यार्थी आपल्या देशातच ऐतिहासिक स्थळांना भेट देतात, तर काही विद्यार्थी आपल्या नातेवाईकांच्या घरी जातात किंवा काही विद्यार्थी वेगवेगळे कौशल्य शिकतात अशा प्रकारे प्रत्येक जण आपली उन्हाळ्याची सुट्टी साजरी करतात.

आम्ही दिलेल्या Summer Vacation Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या studymode essay in marathi language on summer vacation या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on summer vacation in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how i spent my summer vacation essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!