शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी If Schools Are Closed Essay in Marathi

If Schools Are Closed Essay in Marathi – Shala Band Zali Tar Nibandh In Marathi शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी ज्ञान, मुल्य, कौशल्य, नैतिकता आणि विश्वास संपादन करण्याची प्रक्रिया म्हणून शिक्षणाची व्याख्या केली जाते. आणि हे शिकवणे,‌ कथा सांगणे, प्रशिक्षण, चर्चा करणे आणि ब-याच काही या सारख्या पद्धतीं द्वारे घडते. या सगळ्या पद्धती आपल्याला शिक्षक, प्रशिक्षक याद्वारे शिकवल्या जातात. आणि या सगळ्याची सुरुवात शाळेपासून होते. विद्येचे दैवत असणार्‍या सरस्वती देवीचे वास्तव्य असणारी जागा म्हणजे शाळा जिथे शिक्षणाचा प्रसाद विद्यार्थ्यांना दिला जातो. शिक्षणाने माणूस घडतो शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपण एक उत्कृष्ट माणूस शकतो. शिक्षण म्हणजे फक्त शालेय अभ्यास नसतो तर शिक्षण म्हणजे, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍याचां आदर करण,‌ इतरांना कशी वागणूक देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण माणूस म्हणून कसे वागतो कसे आहोत हे आपल्याला शिक्षणच शिकवतं. शिक्षणाचे अनेक फायदे असतात.

शिक्षणामुळे आपल्या वागण्याला पद्धत येते शिक्षणामुळे आपल व्यावहारिक ज्ञान वाढतं. शिक्षणामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते निर्णय घेऊन आपले आयुष्य अधिक चांगलं, सफळ आणि यशस्वी बनवू शकतो. थोडक्यातच काय तर आपल्या शिक्षण आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणतो. आपल्या आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व हे अमूल्य आहे.

if schools are closed essay in marathi
if schools are closed essay in marathi

शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी – If Schools Are Closed Essay in Marathi

Shala Band Zali Tar Nibandh In Marathi

शाळा हे विद्येचे मंदिर असतं परंतु जर याच मंदिराला एक दिवस टाळा लावण्याची वेळ आली तर काय घडेल? शिक्षण आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शिक्षणाशिवाय माणूस घडू शकत नाही. शिक्षणामुळे माणसाचे विचार बदलतात माणूस अधिक सकारात्मक विचार करतो. जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर त्याने आपल्याला फक्त नुकसानच होणार आहे.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जग इतके पुढे गेल आहे की आपण भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा अंदाज देखील लावू शकतो वैज्ञानिक क्षेत्रामध्ये देखील जगाने इतकी प्रगती केली आहे. आज लाखो शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातून करोडो विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना उत्तम मार्गदर्शन देत आहेत. विज्ञान, संगणक क्षेत्रामध्ये आपल्या देशाने संपूर्ण जगाने भरपूर प्रगती केली आहे आणि याच एकमेव कारण म्हणजे शिक्षण होय.

शिक्षणामुळे आपल्याला व्यावहारिक ज्ञान मिळतं शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळ्या संधी चालून येतात ज्या आपल्या भवितव्यासाठी चांगल्या असतात. शिक्षणामुळे कधीच कोणाच नुकसान होत नाही. जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर, मुलं निव्वळ आणि निव्वळ फक्त वेळच वाया घालवतील वेळेचे कोणतेही नियोजन उरणार नाही.

वेळेचे महत्त्व उरणार नाही शिक्षणाचे महत्त्व उरणार नाही शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळे विषय वेगवेगळ्या गोष्टी समजतात शिक्षणामध्ये आपल्याला विज्ञान समजत गणित समजतं शाळा बंद ठेवण्यात आल्या तर शिक्षणामध्ये कोणाला रस उरणार नाही आणि यामुळे आपल्या देशाची आपल्या जगाची प्रगती थांबू शकते. कोणतेही नवीन अविष्कार होणार नाहीत. कोणतेही नवे शोध लागणार नाहीत.

Essay On If Schools Were Closed in Marathi

जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर आपण भविष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही शिवाय शाळा बंद ठेवण्यात आल्या तर त्याचा खूप भयानक असर आपल्या तरुण पिढीवर किंवा भावी पिढीवर होईल. मुलांचं शिक्षणावरून लक्ष भरकटून मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. व्यवस्थित व्यवहार ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच वेळा तोटा होऊ शकतो. मुलांच्या चालल्या बोलण्याला काही पद्धतच राहणार नाही.

तरुण पिढी आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे निर्णय घेतील. जर शाळा बंद पडल्या तर मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिल शिक्षण न‌ मिळाल्यामुळे त्यांना कुठेही काम मिळणार नाही. बेरोजगारीची समस्या उपलब्ध होईल‌, ज्यामुळे बरेच कारखाने कंपन्या बंद पडतील याचा वाईट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतो.

मुलं चुकीच्या मार्गाला जर गेली तर हुंडा घेणे, मारामारी करणे, समाजामध्ये गुन्हे घडतील, लोक अंधश्रद्धांना बळी पडतील यांसारख्या अनेक समस्या उद्भवतील. शिक्षण लोकांना ज्ञान देतो शिक्षण समाजामध्ये प्रबोधन घडवून आणत. परंतु ज्या शाळांच्या मार्फत शिक्षण दिलं जातं त्याच शाळा जर बंद पडल्या तर समाजामध्ये प्रबोधन घडणार नाही समाजामध्ये अविश्वास वाढेल, लोक जुन्या चालीरीती परंपरां वर जास्त विश्वास ठेवतील. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या थोर व्यक्तिमत्व ज्यांनी लोकांपर्यंत प्राथमिक शिक्षण मिळावं, स्त्री शिक्षण मिळावं म्हणून रक्ताचं पाणी केलं.

शिक्षण ही कल्पना लोकांपर्यंत पोहचावी म्हणून इतक्या खस्ता खाल्ल्या त्यांचे हे सगळे श्रम वाया जातील जर शाळा बंद पडल्या तर. आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात तर शाळा आपली दुसरी गुरु असते याचाच अर्थ प्रत्येक मुलाला घडवण्यामध्ये आपल्या आई-वडिलांचा जितका वाटा असतो तितकाच वाटत शाळेचा देखील असतो शाळेकडून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपल्याला एक चांगलं माणूस बनवत.

जर शाळा बंद झाल्या तर त्याचा चांगला आणि वाईट असा दोन्ही अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला असता. लहान मुलांना सकाळी लवकर उठून शाळेत जाव लागलं नसतं त्यांच्यासाठी त्यांचे आयुष्य अधिक सुखी झाल असत. दिवसभर फक्त खायचं, खेळायचं, मज्जा करायची, नदीत पोहायला जायचंय, आंब्याच्या झाडांवर चढायचं, मैदानी खेळ खेळायचे इतकंच राहिलं असतं.

लहान मुलांसाठी जरी हे आयुष्य अगदी मजेशीर आणि सुखी आयुष्य असलं तरी पुढे जाऊन या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर नक्कीच झाला असता. तर शिक्षण घेतल्यामुळे बेरोजगारीची समस्या उद्भवते. शाळा व शिक्षण ही जोडी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे शाळेमुळे आपले वेगवेगळे चांगले मित्र मैत्रिणी बनतात शाळेमुळे आपल्याला वेगवेगळ्या खेळाबद्दल नवीन नवीन गोष्टी बद्दल माहिती मिळते शाळेमुळे आपला सर्वांगीण विकास होतो.

शाळेमध्ये संगणक, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, तंत्रज्ञान यांसारखे विषय शिकवले जातात ज्यामुळे आपल्याला आपल्या समाजात चालू असणाऱ्या वैज्ञानिक, ऐतिहासिक, भौगोलिक गोष्टीत बद्दल माहिती मिळते. शिक्षण घेतल्यावर माणसाला जितके फायदे होतील त्याचप्रमाणे जर शिक्षण नाही मिळालं तर तितकेच तोटे देखील आहेत.

होमी बाबा, सी. वी. रमण, एपीजे अब्दुल कलाम, सत्येंद्रनाथ बोस या सारखे महान व थोर वैज्ञानिक ज्यांनी आपल्या देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिलं आणि ज्यामुळे आपला भारत विज्ञान क्षेत्रामध्ये एका वेगळ्या स्तरावर पोहोचला हे इतके महान व थोर व्यक्ती यांनी लावलेले वेगवेगळे शोध हे त्यांनी शिक्षणाच्या आधारावरच लावले.

जर शिक्षण नसेल तर आपल्या देशाची वैज्ञानिक प्रगती कधीच होणार नाही. आज जगामध्ये सगळ्या गोष्टी संगणकावर केल्या जातात संगणकाचा वापर केल्यामुळे वेळ कमी व काम त्वरित होतं. तंत्रज्ञानाचा वापर करूनच संपूर्ण जगाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या गोष्टी करायला आधी भरपूर वेळ लागायचा त्याच गोष्टी आता चुटकीसरशी होतात हे सगळे तंत्रज्ञान, विज्ञान या गोष्टीमुळे शक्य झाल आहे.

तंत्रज्ञान व विज्ञानामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचा आहे. जर शिक्षण नसेल तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे. आपल्या आई-बाबांचं नेहमीच एक स्वप्न असतं की जरी आपण शिक्षण घेतलं नसलं तरी आपला मुलगा किंवा मुलगी शिकून खूप मोठी झाली पाहिजे ते असं का बोलत असतील? कारण त्यांना शिक्षणाचे फायदे चांगलेच माहीत आहेत.

आपल्या सर्वांनाच रोज शाळेत जायचा कंटाळा येतो सकाळी उठायचा कंटाळा येतो मग दिवसभर अभ्यास करा या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला शाळेपासून भरपूर सुट्टी हवी असते परंतु जर शाळा कायमच्या बंद झाल्या जर आपल्याला कायमची शाळेपासून सुट्टी मिळाली तर त्याचे परिणाम फारच वाईट असतील आपली कधीच प्रगती होणार नाही.

शिक्षण हे आपल्या आधुनिक समाजातील एक महत्त्वाचं साधन आहे शाळा आपल्याला योग्य ते शिक्षण देऊन आपल्यात असणाऱ्या कला कौशल्य गुणांची जाणीव करून देते. पुढे जाऊन याच शिक्षणामुळे आपण आपल्या देशाच्या प्रगतीचा एक भाग होतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघता शिक्षण हे फारच आनंददायी किंवा कंटाळवाणे असू शकत.

परंतु त्यांच्या येणाऱ्या भवितव्यासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाच आहे. भारत सध्या एक विकसनशील देश आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी घेतात. गेल्या काही दशकांमध्ये  शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि परिणामी तेव्हापासून भारताच्या अर्थव्यवस्थेत देखील बदल जाणवू लागला आहे. याचाच अर्थ शिक्षण हे आपल्या समाजातील एक महत्त्वाच घटक आहे आणि त्यासाठी शाळेत अस्तित्व टिकून राहणं हे देखील तितकच महत्त्वाच आहे.

आम्ही दिलेल्या if schools are closed essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शाळा बंद पडली तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on if schools were closed in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Shala Band Zali Tar Nibandh In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shala band jhalya tar Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!