तिकोना किल्ला मराठी माहिती Tikona Fort Information in Marathi

tikona fort information in marathi तिकोना किल्ला मराठी माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक किल्ले आहेत आणि मुख्याता पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक ऐतिहासिक किल्ले पहायला मिळतात जसे कि सिंहगड, रायगड, शिवनेरी आणि असे अनेक इतर किल्ले आहेत आणि त्यामधील एक महाराष्ट्रातील मावळ प्रांतातील किल्ला म्हणजे तिकोना किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.  तिकोना हा किला डोंगरी किल्ला किंवा गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे.

हा किल्ला महाराष्ट्र मधील पुणे या शहरापासून ६० किलो मीटर अंतरावर कामशेतजवळील पश्चिम भारतामध्ये मावळ या ठिकाणी आहे आणि या किल्ल्याचा आकार हा पीरॅमीडसारखा दिसतो आणि म्हणूनच कदाचित या किल्ल्याला तिकोना असे नाव पडले असावे, त्याचबरोबर हा किल्ला ३५०० फुट उंच आहे.

तिकोना या किल्ल्याला वितंडगड या नावाने देखील ओळखले जाते आणि हा किल्ला विसापूर, तुंग लोहगड या किल्ल्यांच्या जवळ आहे. मावळ प्रांतात्तील बोरघाटात गेल्यानंतर वाडा, बेडसे, भंडारदरा, कार्ला आणि शेलारवाडीच्या माथ्यावर लेण्या आहेत आणि या लेण्यांच्या संरक्षणासाठी तिकोना, लोहगड आणि विसापूर हे किल्ले आहेत.

तिकोना किल्ल्याविषयी खास अशी माहिती नसली तरी काही इतिहासकार असे म्हणतात कि या भागातील किल्ले हे बौध्द आणि हीनयान या वास्तूप्रकारातील आहेत.

आणि म्हणूनच तिकोना हा किल्ला देखील बौध्द आणि हीनयान पध्दतीचा असावा असे म्हटले जाते आणि हे किल्ले इसवी सन ८०० ते १००० च्या दरम्यान बांधलेले आहेत म्हणजेच तिकोना किल्ला देखील याच काळामध्ये बांधलेला आहे.

tikona fort information in marathi
tikona fort information in marathi

तिकोना किल्ला मराठी माहिती – Tikona Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावतिकोना किल्ला किंवा वितंडगड किल्ला
ठिकाणपुणे या शहरापासून ६० किलो मीटर अंतरावर कामशेतजवळील पश्चिम भारतामध्ये मावळ या ठिकाणी आहे 
प्रकारडोंगरी किल्ला किंवा गिरिदुर्ग
उंची३५०० फुट
आकारकिल्ल्याचा आकार हा पीरॅमीडसारखा आहे

तिकोना किल्ल्याचा इतिहास – tikona fort history in marathi

तिकोना या किल्ल्याविषयी आणि या किल्ल्याच्या इतिहासाविषयी फारशी माहिती जरी नसली तरी असे मानले जाते कि मावळ भागातील किल्ले हे बौध्द आणि हीनयान पध्दतीचे आहेत आणि हे इसवी सन ८०० ते १००० च्या दरम्यान बांधलेले आहेत.

इ. स. १५८५ मध्ये या किल्ल्यावर निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजाम शाह याने हल्ला केला आणि हा किल्ला जिंकून या किल्ल्यावर निजामशाही राज्य स्थापन केले आणि या प्रदेशातील अनेक किल्ले देखील आपल्या ताब्यात घेतले आणि तो भाग निजाशाही भाग म्हणून स्थापित केला.

परंतु १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण भागातील म्हणजेच मावळ भागातील कर्नाळा, लोहगड, विसापूर, तुंग, माहुली असे अनेक किल्ले जिंकले आणि त्यामध्ये तिकोना किल्ला देखील होता.

त्यानंतर १६६० मध्ये मावळ भागातील जबाबदारी हि देण्यात आली आणि त्यावेळी तिकोना किल्ल्याची सुरक्षा देखील देशमुखांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये अनेक किल्ले हे मुघल साम्राज्याला देण्याचे ठरले होते आणि त्या किल्ल्यांमध्ये तिकोना किल्ला देखील होता.

आणि १६६५ मध्ये तिकोना किल्ला हा मुघलांच्या ताब्यात गेला परंतु तिकोना किल्ला हा मराठ्यांनी परत आपल्या ताब्यात घेतला. १६८२ मध्ये औरंगजेबचा मुलगा अकबर याला या किल्ल्यावर मुक्कामाची ऑफर देण्यात आली होती. १८१८ मध्ये इंग्रज भारतामध्ये आले.

आणि त्यांनी भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील देखील अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली होते आणि १८१८ मध्ये इंग्रज आणि मराठी सैन्यामध्ये झालेल्या लढाईनंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला होता.  

तिकोना किल्ल्याविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • मुंबई – पुणे द्रुतगती या मार्गावरून तिकोना किल्ला हा अगदी सहज दिसू शकतो.
  • १९८० मध्ये झालेल्या पावसाळ्यात किल्ल्याची बरीच तट बंदी कोसळली होती.
  • तिकोना या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी किंवा पीरॅमीडसारखा आहे आणि म्हणून या किल्ल्याला तिकोना असे नाव देण्यात आले आहे.
  • तिकोना किल्ल्याच्या पूर्वेला आणि उत्तरेला दोन प्रवेश दरवाजे आहेत.
  • तिकोना किल्ल्यावर गुहा आहेत ज्यामध्ये १० ते १५ लोक राहू शकतात परंतु पावसाळ्यामध्ये या गुहेमध्ये राहणे अयोग्य आहे.
  • तिकोना किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.

तिकोना किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – what to see

  • तिकोना किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याची काही राहिलेली तटबंदी, प्रवेशदरवाजे, बुरुज हि ऐतिहासिक वासू पाहायला मिळते.
  • तिकोना किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके आणि गुहा पहायला मिळते.
  • किल्ल्यावर आपल्याला तुळजाभवानीचे मंदिर, मारुतीचे मंदिर, महादेव मंदिर देखील पाहायला मिळते आणि तसेच किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला त्रंबकेश्वराचे मंदिर देखील पाहायला मिळते.
  • त्याचबरोबर तुळजादेवी मंदिराच्या समोर एक छोटा तलाव देखील पाहायला मिळतो तसेच हनुमान मंदिराजवळ एक वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जाणारा एक दरवाजा आहे.
  • तसेच तिकोना किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला पावना आणि मावळा प्रदेशाचे विस्मयक दृश्य दिसते.

तिकोना किल्ला पाहण्यासाठी कसे जायचे – how to reach

या किल्ल्यापासुना सर्वात जवळचे शहर हे कामशेत हे आहे आणि कामशेत हे शहर पुण्यापासून ५१ किलो मीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही पुण्यापर्यंत बसने, ट्रेनने आणि विमानाने येऊ शकता आणि तेथून कामशेत शहरापर्यंत तुम्ही बसने किंवा टॅक्सीने पोहचू शकता.

आणि तेथून तुम्ही तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी परत टॅक्सी पकडू शकता कारण कामशेत या शहरापासून तिकोना पेठ हे किल्ल्याच्या माथ्याशी असणारे गाव २६ किलो मीटर आहे आणि या पायथ्याच्या गावापर्यंत आल्यानंतर तेथून किल्ला चढवा लागतो.

तिकोना किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ

तिकोना किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ हा पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर हा काळ नक्कीच सर्वोत्तम ठरू शकतो.

आम्ही दिलेल्या tikona fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तिकोना किल्ला मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tikona fort history in marathi या Tikona fort information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about tikona fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tikona fort height Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!