येसाजी कंक माहिती Yesaji Kank Information in Marathi

yesaji kank information in Marathi येसाजी कंक माहिती, येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणी पासूनचे साथीदार होते आणि आज आपण या लेखामध्ये येसाजी कंक यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येसाजी कंक हे रायगड जिल्ह्यातील भूतोंड या गावातील एक शूर वीर मराठा होते आणि हे अगदी लहान वयापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचे साथीदार होते तसेच त्यांनी मुघल आणि आदिलशाही आक्रमणांच्याविरुध्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ वर्षाच्या युध्दाचा संपूर्ण काळ पहिला.

येसाजी कंक यांचा जन्म हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील भूतोंड या गावामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी कंक असे होते आणि ते छत्रपती शहाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांच्या सैन्यामध्ये होते आणि नंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच येसाजी कंक यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी पाठींबा दिला.

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले त्यावेळी स्वराज्य स्थापनेच्यावेळी देखील येसाजी कंक हे त्यांच्या सोबत होते आणि ते तोरणा किल्ल्याच्या लढाईमध्ये देखील होते तसेच ते रायगड किल्ल्याच्या लढाईमध्ये देखील होते.

येसाजी कंक यांना शंभर हत्तीचे बळ असलेले व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते आणि ते हत्ती सोबत केलेल्या लढाईसाठी खूप प्रसिध्द आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांना मार्गदर्शन केले होते आणि फोंडा च्या युध्दा मध्ये संभाजी महाराजांच्यासोबत ते सहभागी झाले होते. चला तर खाली आपण येसाजी कंक यांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.  

yesaji kank information in marathi
yesaji kank information in marathi

येसाजी कंक माहिती – Yesaji Kank Information in Marathi

नावयेसाजी कंक
वडिलांचे नावदादिजी कंक
जन्मठिकाणमहाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामधील भूतोंड या गावामध्ये
ओळखछत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीपासूनचे मित्र किंवा साथीदार

येसाजी कंक यांचा इतिहास – yesaji kank history in marathi

येसाजी कंक जन्म

येसाजी कंक यांच्या जन्म महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील भूतोंड या गावामध्ये झाला आणि कंक वंशातील क्षत्रिय कोळी कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांचे वडील दादोजी कंक हे शहाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडिलांच्या सैन्यामध्ये काम करत होते आणि त्यामुळे येसाजींच्या रक्तामध्ये राष्ट्रवादाचा आवेश होता.

येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी खूप कमी वयामध्येच दोघांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचे स्वप्न पहिले होते आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सैन्य तयार केले होते आणि त्यावेळी येसाजी कंक यांना पायदळाचे सेनापती करण्यात आले होते

येसाजी कंक यांची पदवी

आणि त्यांना शिलेदार हि मानद पदवी देखील दिली होती आणि तेव्हापासून त्यांनी आपले जीवन हे स्वराज्यासाठी समर्पित केले. ते तरुण मुलांना लढाई साठी तयार करत होते तसेच ते मुलांना गनिमी युध्दाची कला देखील शिकवत होते जी नंतर मराठ्यांची ओळख बनली.

शंभर हत्तीचे बळ येसाजींच्यामध्ये आहे असे का म्हटले जायचे ?

येसाजी कंक यांना शंभर हत्तीचे बळ असणारे व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दख्खन च्या मोहिमेवर गेले तेंव्हा त्यांच्या सोबत येसाजी कंक देखील त्यांच्या सोबत होते. तानशहाच्या भेटीमध्ये तानशहाणे छत्रपती शिवाजी महाराजांना विचारले कि मराठा सैन्यामध्ये हत्ती का नाहीत.

या वर शिवाजी महाराजांनी उत्तर दिले कि माझा प्रत्येक माणूस हत्तीवर मात करू शकतो. आपल्या राजाचे म्हणणे सिध्द करण्यासाठी येसाजी लांक यांनी शेतामध्ये उडी मारून हत्ती सोबत लढले आणि हत्तीवर मात केला.

येसाजी कंक यांची भूमिका

येसाजी कंक हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पायदळाचे प्रमुख होते आणि ते गनिमी युध्द तंत्रामध्ये पारंगत देखील होते आणि ते लहानपणी पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत त्यांना साथ दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांना संभाजी महाराज यांना देखील मार्गदर्शन केले होते तसेच फोंडा युध्दामध्ये देखील त्यांनी संभाजी महाराज यांना साथ दिली होती

आणि त्यांच्या या युध्दातील शौर्याबद्दल त्यांना बक्षीस देखील देण्यात आले होते. प्रतापगडच्या लढाई मध्ये देखील त्यांनी मोठी भूमिका बजावली होती तसेच ते सदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिषदेच्या बैठकीमध्ये देखील होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यासाठी मध्यधुंद हत्तीशी देखील लढा दिला होता.

येसाजी कंक हे महाराजांच्या सर्वात विश्वासू साथीदारांच्यापैकी एक होते आणि ते शारीरिक दृष्ट्या बलाढ्य होते तसेच ते सात फुट उंच देखील होते. येसाजी कंक यांचा तोरणा आणि रायगडच्या लढाईमध्ये देखील त्यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.

येसाजी कंक यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • येसाजी कंक हे रायगड जिल्ह्यातील भूतोंड या गावातील एक शूर वीर मराठा होते आणि हे अगदी लहान वयापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचे साथीदार होते.
  • येसाजी कंक यांना शंभर हत्तीचे बळ असणारे व्यक्ती म्हणून ओळखले जायचे कारण ते हत्तीशी लढले होते.
  • ते लहानपणी पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत त्यांना साथ दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांना संभाजी महाराज यांना देखील मार्गदर्शन केले होते तसेच फोंडा युध्दामध्ये देखील त्यांनी संभाजी महाराज यांना साथ दिली होती.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी तोरणा किल्ला आणि रायगड किल्ला जिंकायचे ठरवले त्यावेळी येसाजी कंक यांनी देखील या युध्दामध्ये सक्रीयपणे भाग घेतला होता.
  • येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी खूप कमी वयामध्येच दोघांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचे स्वप्न पहिले होते.

FAQ

Q1. येसाजी कंक कोण होते?

येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणी पासूनचे साथीदार होते येसाजीराव कंक हे कुलीन मराठा सरदार होते. ते गनिमी युद्धाच्या तंत्रात तज्ज्ञ होते. प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती.


Q2. येसाजी कंक यांच्या मुलाचे नाव काय?

येसाजी कंक यांच्या मुलाचे नाव कृष्णाजी कंक असे होते.

Q3. येसाजी कंक यांची समाधी कुठे आहे?

येसाजी कंक यांचा जन्म हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील भूतोंड या गावामध्ये झाला. राजघर (ता. भोर) गावाच्या परिसरात शिवछत्रपतींचे सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचे शिवकालीन समाधीस्थळ आहे.

Q4. येसाजी कंक यांचे निधन कोठे झाले?

पोंडा किल्ल्याच्या लढाईमध्ये त्यांचे निधन झाले.

आम्ही दिलेल्या yesaji kank information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर येसाजी कंक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yesaji kank history in marathi या yesaji kank wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि yesaji kank death in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये yesaji kank sword weight Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!