अण्णाभाऊ साठे यांची माहिती Annabhau Sathe Information in Marathi

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली”

Annabhau Sathe Information in Marathi – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती वरील लोकप्रिय लावणीचे लेखक, महाराष्ट्रात लोकशाहीर म्हंटले कि सगळ्यात आधी आठवणारे नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे. समाजसुधारक, लोककवी आणि साहित्यिक या सगळ्या उपाध्या प्राप्त झालेले एक व्यक्तिमत्त्व, ज्यांनी आपल्या साहित्यप्रकारातून समाजाला परिवर्तनाकडे घेऊन जाण्याचे, एक नवी दिशा देण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले.

annabhau sathe information in marathi
annabhau sathe information in marathi

अण्णाभाऊ साठे यांची माहिती – Annabhau Sathe Information in Marathi

नावतुकाराम भाऊराव साठे
टोपणनावअण्णाभाऊ साठे
जन्म ठिकाण आणि जन्म गाव१ ऑगस्ट १९२० , वाटेगाव, ता. वाळवा, जि.सांगली
मृत्यू१८ जुलै १९६९
राष्ट्रीयत्व , धर्मभारतीय, हिंदू
कार्यलेखक, साहित्यिक, समाजसुधारक
भाषामराठी
साहित्य प्रकारशाहीर, कथा, कादंबरीकार
प्रसिद्ध साहित्यप्रकारफकीरा
चळवळसंयुक्त महाराष्ट्र चळवळ
प्रभावडॉ.बाबासाहेब आंबेडकर, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कार्ल्स मार्क्स
वडीलभाऊराव साठे
आईवालबाई साठे
पत्नीकोंडाबाई आणि जयवंता
अपत्येमधुकर, शांता, शकुंतला

जीवन परिचय

वारणेचा वाघ म्हणून संबोधले जाणारे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मांग या दलित समाजात १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांचे मूळनाव तुकाराम. त्यांच्या आईचे नाव वालबाई साठे होते. त्यांनी दोन लग्ने केली होती. कोंडाबाई, आणि जयवंता या दोघींशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली अशी एकूण ३ अपत्ये होती.- मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ अशिक्षित होते. ते केवळ दीड दिवस शाळेत गेले आणि नंतर तेथील सवर्णांच्या कडून होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळेत जाणे बंद केले. पण कठोर प्रयत्नांनी त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले. त्यांच्या लहानपणीच १९३२ साली अण्णाभाऊ वडिलांसोबत मुंबईला आले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले.

चरितार्थासाठी त्यांना कोळसे वेचणे, फेरीवाल्याच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडू मारणे अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. त्यांनी मुंबईतील झोपडपट्टीतील जगणे, अनेक लोकांनी भूक भागवण्यासाठी केलेला अवैध मार्गांचा अवलंब, त्यांचे दुःखी जीवन, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तव त्यांनी जवळून अनुभवले होते.

कामगारांचे संप, हक्कासाठी काढलेले मोर्चे पहिले आणि त्यांच्यातील लढाऊपणा अनुभवला. त्यांनी आपल्या एका कवितेतून त्यांचा मुबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केला आहे.

“गरिबीने ताटतूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची”

राजकीय जीवन

अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी, आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता परंतु नंतर ते आंबेडकरवादी झाले. इ.स १९३६ मध्ये अण्णाभाऊ साठे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारसरणीने प्रभावित झाले. आणि

  • इ.स १९३६ मध्ये अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय पोस्टाने ४ रुपयाच्या खास टपाल तिकिटावर त्यांचा फोटो ठेवला.
  • १ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे पहिले पोस्ट तिकीट आले.
  • १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. या पथका मार्फत ते अनेक सरकारी निर्णयांना आव्हान देत होते. म्हणून या कलापथकावर सरकारने बंदी घातली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्च वर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे २० हजार लोकांसमवेत मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती ती, “ये आझादी झुठी है, देश कि जनता भूखी है” भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक शाखा ‘इंडिअन पीपल्स थिएटर असोशिएशन’ मध्येही त्यांना एक महत्वाचे स्थान होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळी मध्ये अण्णाभाऊ साठेनी मराठीभाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. अन्न्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेच स्मरण देऊन, या आंदोलनासाठी त्यांनी अखंड महाराष्ट्राला प्रेरणा दिली.

मुंबईत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक क्रांतिकारी नेत्यांची भाषणे ऐकली. त्यांनी नंतर आंबेडकरांच्या शिकवणुकीना अनुसरून दलित समाजासाठी कार्य केले. त्यांनी त्यांच्या साहित्यातून दलित समाजाच्या समस्या प्रकट केल्या. इ.स. १९५८ ला बॉम्बे मधील पहिल्या दलित साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या भाषणात म्हटले कि, “पृथ्वी ही  शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”. यातून त्यांनी दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व सांगितले.

परंतु वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्यामुळे ते वाटेगाव या आपल्या गावी आले. तेथे त्यांनी बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. त्या ठिकाणी त्यांनी तमाशा ह्या कलेला लोकनाट्याची प्रतिष्टा प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकशाहीर हि पदवी बहाल केली. तिथून पुढे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून नावारूपाला आले.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर च्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात अण्णाभाऊ मोठी जागृती केली. त्यामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळी मध्ये त्यांनी शाहीर गीतांमधून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

साहित्यलेखन

निरक्षर, अशिक्षित असूनही अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. कष्टकरी, दलित, शोषित, पीडित लोकांचे शोषण त्यांच्या लेखनातून मांडले. आणि ते संपविण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांचे मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, लोकनाट्य, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, गवळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकारच्या लेखनामध्ये व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य आहे.

अण्णाभाऊनी लोकांच्या जीवनातील भयाण, विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांच्या साहित्यातून मांडले. त्यांचे साहित्य वाचताना शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो याची अनुभूती होते.

अण्णाभाऊ मुंबईत परतल्यानंतर त्यांना मॅक्झिम गोर्की चे साहित्य वाचायला मिळाले. आणि त्यातून त्यांना लिखाणासाठी प्रेरणा मिळाली. अण्णाभाऊंच्या लोककथा या लोकांचे मनोरंजन करत असतानाच जीवनातील तत्त्वज्ञान आणि वास्तवाचे दर्शन करून देते.

अण्णाभाऊ साठे कादंबरी

त्यांनी मराठी भाषेतून ३५ कादंबऱ्या लिहिल्या. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्राच्या उत्कृष्ट कादंबरीचा सन्मान प्राप्त झालेली अण्णाभाऊ साठेंची  “फकीरा” हि नावाजलेली प्रसिद्ध कादंबरी आहे. यामध्ये त्यांनी संपूर्ण मांग समाजाच्या जीवनाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे. मांग या दलित समाजातील लोकांच्या समस्या त्यांच्या पोटासाठीचा संघर्ष या सर्व गोष्टींचे दर्शन फकीरा या कादंबरीतून होते.

वारणेचा वाघ, जिवंत काडतुसे, गुलाम, चित्रा, पाझर रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, चीखलातील कमळ अशा अनेक कादंबरीचे लेखन अण्णाभाऊ यांनी केलेले आहे.

अण्णाभाऊ यांनी लिहलेल्या कविता

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” हि त्यांची गाजलेली लावणी आहे.

“मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती”

“जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”

अण्णाभाऊंच्या १५ लघुकथांचा संग्रह आहे, ज्यामध्ये बऱ्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. अण्णाभाऊंच्या कथासंग्रहामध्ये कृष्णा काठच्या कथा, गजाआड, नवती, खुळवडा, आबी, पिसाळलेला माणूस, फरारी, निखारा इत्यादी कथा समाविष्ट आहेत.

अण्णाभाऊ साठे यांनी अनेक १४ लोकनाट्य लिहिली. त्यामध्ये बेकायदेशीर, लोकमंत्र्यांचा दौरा, पुढारी मिळाला, देशभक्त घोटाळे, कापऱ्या चोर, अकलेची गोस्ट इत्यादी आहेत.

अण्णाभाऊ साठे यांनी अमृत, गुऱ्हाळ, तारा, रानबोका, आघात इत्यादी पुस्तके लिहली आहेत.

त्यांनी इनामदार, पेंग्याचा लगीन आणि सुलतान हि ३ नाटके, १० पोवाडे लिहिले. अण्णाभाऊ साठेनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवला.

रशियाच्या इंडो- सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरून अण्णाभाऊ १९६१ साली रशियात गेले. त्यावर त्यांनी लिहिलेलं प्रवास वर्णन लोकप्रिय आहे.

अण्णाभाऊ साठे यांची जयंती

अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते.

अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू

असे सांगितले जाते कि, अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळात दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये lokshahir annabhau sathe information in marathi pdf काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर annabhau sathe life information in marathi म्हणजेच “अण्णाभाऊ साठे” annabhau sathe yanchi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या annabhau sathe mahiti या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about annabhau sathe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!